The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लिओनार्डो डिकॅप्रियो आणि टोबे मॅगुइर म्हणजे हॉलिवूडचे जय-वीरू..!

by द पोस्टमन टीम
30 July 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


‘मैत्री’ कुणासारखी असावी? असा प्रश्न विचारला की, पहिलं उत्तर ‘शोलेतील जय-वीरूसारखी’ असंच येतं. चित्रपट रिलीज होऊन ४६ वर्षे झाली मात्र, त्यातील जय-वीरूच्या मैत्रीची उदाहरणं आजही आपल्याकडे दिली जातात. तुम्ही म्हणाल ते दोघे ‘रील’ लाईफ मित्र होते. दोन सेलिब्रिटी प्रत्यक्षात तितके चांगले मित्र होणं शक्य नाही. मात्र, हॉलीवूडमध्ये अशी एक रिअल लाईफ जोडी आहे, ज्यांच्या मैत्रीची उदाहरणं दिली जातात.

दोघेही प्रसिद्धीपासून शेकडो मैल दूर होते तेव्हापासून हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. लिओनार्डो डिकॅप्रियो आणि टोबे मॅगुइर अशी या आयकॉनिक जोडगोळीची नावं आहेत. लिओ स्वभावानं अतिशय लाजरा-बुजरा व्यक्ती म्हणून सर्वांना माहिती आहे. मात्र, जेव्हा-जेव्हा तो टोबेसोबत असतो तेव्हा प्रत्येक गोष्टीचा दिलखुलासपणे आनंद घेताना दिसतो. दोघांची मैत्री कशी आणि कुठे झाली याबाबत जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल ना!

लिओनार्डो डिकॅप्रिओ आणि टोबे मॅगुइर दोघेही बालकलाकार म्हणून पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. ८०च्या दशकात त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. त्यांच्या मैत्रीच्या सुरुवातीचा किस्सा मोठा रंजक आहे. एका ऑडिशनच्या ठिकाणी त्यांची तोंडओळख झाली होती.

त्यानंतर एक दिवस लिओ आणि त्याची आई लॉस एंजेलिसमधून गाडी चालवत असताना, त्याला अचानक टोबे दिसला. लिओनं टोबेला ओळखलं. त्यानं आनंदाच्या भरात आईला गाडी थांबवायला सांगितली आणि टोबेच्या दिशेनं धाव घेतली. तेव्हा त्या दोघांना तरी कुठे माहित होतं की, भविष्यात ते एकमेकांचे जिवलग मित्र होतील. 

तेव्हापासून ही जोडी एकत्र अभिनय करताना, एकत्र पार्टी करताना आणि एकमेकांना पाठिंबा देताना दिसत आहे.



असं म्हटलं जातं, तुमच्या कुटुंबातील अडचणी माहिती असणारा आणि त्या समजून घेणारा एखादा मित्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जगातील सर्वात नशिबवान व्यक्ती आहात. लिओ आणि टोबेची मैत्री जुळण्यामागे हाच घटक महत्त्वाचा ठरला. वयाच्या १२व्या वर्षी हे दोघे एकमेकांना भेटले होते. दोघेही लॉस एंजेलिसमध्ये राहत होते. विशेष म्हणजे दोघेही फक्त आपल्या आईसोबत राहत होते.

टोबे तीन वर्षांचा असताना त्याचे आई-वडिल विभक्त झाले होते. त्यामुळं आपल्या आईच्या कुटुंबियामध्ये तो वाढला. लिओच्या तुलनेत त्याला बालपणी सुरक्षित वातावरण मिळालं होतं. मात्र, लिओचं तसं नव्हतं. तो फक्त एक वर्षाचा होता तेव्हा त्याच्या आई-वडिलांचा घटस्फो*ट झाला होता. त्याच्या आईसोबत तो एकटाच राहत असे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

जेव्हा एकमेकांच्या कुटुंबाबाबत त्यांना कळलं तेव्हा त्यांनी एकमेकांमध्ये आधार शोधण्याचा प्रयत्न केला. आता देखील टोबेच्या कुटुंबियांसोबत लिओचे अतिशय चांगले संबंध आहेत. टोबेच्या मुलांना (रुबी आणि ओटीस) आपल्या ‘अंकल लिओ’सोबत वेळ घालवणं आवडतं. लिओनार्डो आणि टोबे दोघांच्या आवडी-निवडी देखील बऱ्यापैकी सारख्या आहेत. दोघांनाही याट घेऊन समुद्रात फिरणं प्रचंड आवडतं. टोबे आणि लिओला जपानी ऍनिमेचं प्रचंड आकर्षण आहे. लिओला १९८८ मध्ये आलेल्या ‘अकीरा’ या चित्रपटाचं लाईव्ह-ॲक्शनपटात रुपांतर करण्याची लिओची इच्छा आहे आणि कदाचित यासाठी टोबे निर्माता असणार आहे.

दोघांमध्ये आणखी एक गोष्ट सारखी आहे. दोघांनीही अभिनयाचं औपचारिक प्रशिक्षण घेतलेलं नाही. तरी देखील त्यांनी हॉलीवुडमध्ये काम, पैसा आणि प्रसिद्धी मिळवली. त्यांनी अनेक ठिकाणी एकत्रच ऑडिशन्स दिल्या. कित्येक दिवस दोघांनाही अपयशाचा सामना करावा लागला. अभिनय क्षेत्रात मोठ्या स्पर्धेला सामोरं जावं लागेल, याची दोघांनाही कल्पना होती. त्यामुळं त्यांनी एकमेकांच्या साथीनं प्रयत्न सुरू ठेवले. १९९० मध्ये, टोबे आणि लिओ दोघांनी एकाच टेलिव्हिजन सिरीजसाठी ऑडिशन दिलं. ती भूमिका लिओच्या पदरात पडली. लिओनं आपला मैत्री धर्म निभावत त्याच मालिकेतील एक दुसरी भूमिका टोबेला मिळवून दिली.

१९९२ साली ‘धिस बॉयज् लाइफ’मध्ये रॉबर्ट डी नीरोसोबत काम करण्याची मोठी संधी लिओनार्डोला मिळाली. त्यातसुद्धा टोबेनं लिओच्या मित्राची (चक) भूमिका साकारली. या चित्रपटानं लिओला हॉलिवूड स्टार बनवलं. नंतर ‘व्हॉट्स इटिंग गिल्बर्ट ग्रेप’मध्ये ॲर्नीच्या आणि टायटॅनिकमध्ये जॅक भूमिकेसाठी त्याला प्रेक्षकांची वाहवा मिळाली. 

तोपर्यंत टोबे दूरदर्शनच्या कार्यक्रमांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका करत राहिला. मात्र, त्यानं संघर्ष सोडला नाही. लिओचा प्रसिद्ध अभिनेता झाला तरी त्यांच्या मैत्रीमध्ये फरक पडला नाही. ‘द आइस स्टॉर्म’च्या रुपात टोबेला देखील मोठी संधी मिळाली.

लिओला टोबेपेक्षा जास्त भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे तरीही दोघांचाही एकमेकांच्या बरोबरीचा आहे, असं अनेक समिक्षकांनी सांगितलं. २००१ मध्ये डॉन प्लम या इंडी चित्रपटात आणि २०१३ साली ‘द ग्रेट गॅट्सबे’मध्ये सह-कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. दोघेही एकमेकांसोबत काम करण्यासाठी प्रचंड उत्सुक असतात, ही गोष्ट दोघांनीही मान्य केली आहे.

आपल्या कम्फर्टझोनच्या बाहेर जाऊन नवनवीन भूमिका साकरण्याचा लिओनार्डोचा प्रयत्न असतो. आतापर्यंत त्यानं अनेक बायोपिक्स आणि पीरियड फिल्म्समध्ये काम केलं आहे. २०१९ पर्यंत, त्याच्या विविध चित्रपटांनी जगभरात ७.२ अब्ज डॉलर्सची कमाई केलेली आहे. जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या वार्षिक क्रमवारीत त्यानं आठ वेळा स्थान मिळवलं आहे.

टोबेच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास, त्याला २००२ ते २००७ या काळात आलेल्या स्पायडर मॅन चित्रपटाच्या तीन भागांनी प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानं अनेक कॉमेडी-ड्रामा चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. 

सध्या टोबे चित्रपटांपासून काहीसा दूर आहे. २०१७ मध्ये त्यानं ‘द बॉस बेबी’ या ऍनिमेटेड चित्रपटासाठी निवेदक म्हणून आपला आवाज दिला होता.

सध्या कोण काय करत आहे, हे महत्त्वाचं नाही. राग, द्वेष, पैसा, प्रसिद्धी या पलीकडे जाऊन खऱ्या आयुष्यात जिवलग मित्रांची भूमिका मात्र, ते अतिशय प्रामाणिकपणे निभावताना दिसत आहेत. छोट्या-मोठ्या कारणांसाठी मैत्री तोडणाऱ्या आताच्या पिढीनं लिओ आणि टोबेचा नक्कीच आदर्श घेतला पाहिजे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

वसिम अक्रमने विव रिचर्ड्सचे पाय धरून माफी मागितली आणि सांगितलं इथून पुढे असं होणार नाही.

Next Post

जगप्रसिद्ध ‘क्वॅकर’ने दिव्यांग मुलांना प्रयोग म्हणून रेडिओऍक्टिव ओटमिल खाऊ घातलं होतं

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

जगप्रसिद्ध 'क्वॅकर'ने दिव्यांग मुलांना प्रयोग म्हणून रेडिओऍक्टिव ओटमिल खाऊ घातलं होतं

लॉस एंजेलिसच्या डोंगरावर लावलेल्या HOLLYWOOD नावाच्या छेडखानीचे हे किस्से वाचाच

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.