The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लडाखच्या या सर्जनने तब्बल १० हजार यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत!

by द पोस्टमन टीम
7 May 2025
in ब्लॉग, आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


लेहमधील कुठल्याही व्यक्तीला डॉ. त्सेरिंग नॉर्बु या लडाखच्या पहिल्या सर्जनबद्दल विचारणा केली तर तुम्हाला लोकांकडून त्यांच्या स्तुतीचे पाठ ऐकायला मिळतील. कशाप्रकारे त्यांनी आपलं आयुष्य रुग्णांच्या सेवेसाठी वाहून दिलं आहे, याची कहाणी लोक आवर्जून सांगतात.

गेल्या तीन दशकांपासून डॉ. नॉर्बु यांनी १० हजाराहून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत.

त्यांनी अशा लोकांच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत जे आजच्या आधुनिक औषधोपचार पद्धतीपासून पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. त्यांनी आयुष्यभरासाठी हे सेवाव्रत अंगिकारलं आहे.

१९४१ साली लेहपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या निम्मो ह्या अत्यंत दुर्गम भागातील गावी त्यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात डॉ. नॉर्बु यांचे बालपण गेले. बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी लेहच्या सरकारी शाळेत घेतले. पुढे ते बीएस्सीचे शिक्षण घेण्यासाठी श्रीनगरला गेले. १९५९ साली त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आपले शिक्षण पूर्ण केले. डॉ. नॉर्बु यांच्या मते त्यांचे बालपण फार कष्टाचे होते. त्यांना शिक्षणासाठी बराच संघर्ष करावा लागत होता, सोबतच शेतीवाडीत घरच्यांना मदत देखील करावी लागत होती.

त्यांनी कधी डॉक्टर होण्याचे स्वप्न देखील बघितले नव्हते, त्यांच्या मनात डॉक्टर, इंजिनियर होण्याचा विचार देखील आला नव्हता. त्यांचे नातेवाईक लेहला वास्तव्यास असल्यामुळे त्यांना शिक्षणाची संधी मिळाली होती. बरेच कठोर परिश्रम घेतल्यावर त्यांना श्रीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेण्याचं सौभाग्य प्राप्त झालं होतं.



आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉ. नॉर्बु यांच्या मनात फक्त एकच इच्छा होती, ती म्हणजे आपल्या लोकांची गावी जाऊन सेवा करण्याची.

१९६५ साली त्यांची नुब्रा खोऱ्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. आताप्रमाणे त्याकाळी खारडुंगला पास अस्तित्वात नव्हता, त्यामुळे नुब्रा खोऱ्यात जाण्यसाठी त्यांना तीन दिवस हिमालयातील पहाडात भटकंती करावी लागत होती. १९७० साली त्यांची नुब्रा खोऱ्यातुन लेहच्या जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. १९७५ पर्यंत ते तिथेच कार्यरत होते.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

१९७८ साली जनरल सर्जरीमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेऊन शल्यविशारद अथवा सर्जन ही पदवी प्राप्त केली. पुढे ते लेहच्या सोनोम नोरबो मेमोरियल रुग्णालयात सर्जन म्हणून रुजू झाले. एखाद्या सर्जनला कुठलीही शस्त्रक्रिया करण्याआधी एका भूलतज्ञाची आवश्यकता असते, पण डॉ. नॉर्बु यांनी कित्येक वर्षं दुहेरी भूमिका सर्जन म्हणून बजावली.

एखाद्या शस्त्रक्रियेवेळी त्यांच्यासोबत एक असिस्टंट असायचा, जो त्यांना सहाय्य करायचा. त्यातल्या त्यात रुग्णालयात कुठलीच उष्मतावर्धक यंत्रणा अस्तित्वात नव्हती.

त्यामुळे थंडीचा दिवसात मोठी अडचण व्हायची. पण डॉ. नॉर्बु यांनी ह्या समस्येवर देखील मात केली. ते आपल्या ऑपरेशन थिएटरमध्ये बुखारी पेटवून त्या खोलीच्या वातावरणातील उष्मता वाढवायचे. पण भूल देण्याच्यावेळी मात्र बुखारी विझवली जायची कारण भुलीची औषधे ही ज्वलनशील असायची, त्यामुळे कुठलाही अपघात टाळण्यासाठी त्यांना ही कसरत करावी लागत होती. इतकंच नाहीतर त्यांना वारंवार वीजेच्या समस्येला देखील तोंड द्यावं लागत होतं.

ज्याकाळी भारताच्या मुख्य भूमीवर पुरेशी वीज उपलब्ध नव्हती, त्यावेळी दुर्गम अशा लडाखमध्ये वीज पोहचण्याची अपेक्षा कमीच होती. भारनियमनाच्या वेळी कितीतरी दिवस वीज नसायची. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील डॉ. नॉर्बु लोकांवर शस्त्रक्रिया करायचे आणि लोकांचे प्राण वाचवण्याचे शक्य तितके प्रयत्न करायचे. त्यांच्याकडे सुधारित लॅबोरेटरीजचा आभाव होता. स्वच्छतेच्या नावाने बोंब होती. तरी त्यांनी कधीच ह्या गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने बघितलं नाही.

लेह ते कारगिल या संपूर्ण लडाख जिल्ह्यात ते एकमेव सर्जन होते. यामुळे त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी होती.

एखादी अत्यंत गंभीर शस्त्रक्रिया करायची असेल तर त्यांच्याकडे रुग्णाला चंडीगड अथवा दिल्लीच्या मोठ्या रुग्णालयात घेऊन जाण्याची सुविधा उपलब्ध नव्हती, अशा परिस्थितीत त्यांच्याकडे स्वतः पुढाकार घेऊन अत्यंत अवघड शस्त्रक्रिया करण्यावाचून कुठलाच पर्याय नसायचा.

परंतु या अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत देखील त्यांच्या नावावर फक्त एकाच अयशस्वी शस्त्रक्रियेची नोंद करण्यात आली आहे.

त्यांच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या १० हजाराच्या वर शस्त्रक्रियांमध्ये फक्त १ अयशस्वी शस्त्रक्रिया केली होती. त्यांनी सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. यात पोटाच्या, सांध्यांच्या, गर्भाशयाचा आणि हाडांच्या शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात आला होता.

डॉ. नॉर्बु यांनी यशस्वीरीत्या पार पडलेल्या शस्त्रक्रियांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. तीस वर्षांच्या करियरमध्ये एकही सुट्टी न घेणारा डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध आहे.

सर्जन म्हणून त्यांना अल्सर, मूत्रखडा, पोटाचा क्षयरोग आणि लिव्हर संबंधित विकार यांच्यावर देखील उपचार करावे लागतात. लडाखमधील आहाराच्या समस्यांमुळे तिथे लोकांना अशा रोगांचा सामना करावा लागतो. डॉ. नॉर्बु यांनी यकृतावर मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया केल्या असून, महिन्याला ४०-४४ च्या हिशोबाने वर्षाला सरासरी ५०० शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. ह्यात अनेक अपघात आणि इमर्जन्सीमध्ये करण्यात आलेल्या शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात आलेला नाही आहे.

१९८० सालानंतर रुग्णालयाचा विकास होण्यास सुरुवात झाली आणि ज्या काही मूलभूत सुविधांची कमतरता होती, त्यांची पूर्तता होण्यास सुरवात झाली.

यामुळे शस्त्रक्रियांचा वेग वाढला आणि  अनेक लोकांवर चांगल्या प्रकारे उपचार करणे सहज शक्य झाले. १९९९ सालापर्यंत त्या रुग्णालयात सेवा बजावल्या नंतर डॉ. नॉर्बु यांनी आपल्या शासकीय सेवेतून निवृत्ती स्वीकारली.

२००१ ते २००६ ह्या कालावधीत त्यांनी महाबोधिनी करुणा रुग्णालयात सेवा बजावली. या रुग्णालयात त्यांनी कित्येक गरजू रुग्णांची त्यांनी मोफत शस्त्रक्रिया केली आहे.

आज ते ८० वर्षांचे असून अजूनही रुग्णांची सेवा करायला कचरत नाही. एका अत्यंत दुर्गम भागात सलग तीस वर्षे त्यांनी सर्जन म्हणून काम केले आहे. अत्यंत जोखमीच्या आणि प्रतिकूल परिस्थितीत एकही सुट्टी न घेणारे सर्जन डॉ. नॉर्बु आजच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणा आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Dr. Tsering NorbooHealthcareLadakh
ShareTweet
Previous Post

एका राज्याचा मुख्यमंत्री राजीनामा देऊन बसने घरी गेल्याचा किस्सा वाचा…

Next Post

प्राचीन गुप्तहेर संस्था कशी होती? जाणून घ्या..

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
Next Post

प्राचीन गुप्तहेर संस्था कशी होती? जाणून घ्या..

देशाला लुटून पळून जाणारा पहिला माणूस म्हणजे जयंती धर्म तेजा..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.