The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘बप्पी दां’मुळे भारताच्या घराघरात डिस्कोची क्रेझ पोचली होती..!

by ऋजुता कावडकर
17 February 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


डिस्को म्हटलं की भारतात एकच नाव डोळ्यासमोर येतं. ते म्हणजे ‘बप्पी दा’. ६९ वर्षीय बप्पी दा आपल्यातून गेले असले तरीही ते त्यांच्या मागे मोठा सांगीतिक वारसा सोडून गेले आहेत. डिस्को किंग म्हणून ओळख असणाऱ्या बप्पी दांनी १९८०च्या काळात अनेक सुपर हिट गाणे संगीतबद्ध केलेत आणि गायले आहेत. बप्पी दा त्यांच्या अतुलनीय आवाजासाठी ओळखले जातील. त्यांची संगीत शैली इतकी वेगळी होती की हे गाणं ‘बप्पी दा’चंच हे लगेच लक्षात येतं. बप्पी दा यांनी डिस्कोच्या ट्रेंडमध्ये हिंदी चित्रपट संगीताची ओळख करून दिली. १९८०च्या दशकातील त्यांच्या अनेक गाण्यांवरही आजही आपले पाय थिरकतात.

डिस्को किंगच्या काही खास गोष्टी आज या लेखातून जाणून घ्या..

हे होतं बप्पी दांचं खरं नाव

आता कुणीही आपल्या मुलाचं नाव बप्पी ठेवणार नाही. बप्पी दा म्हणून सगळीकडे प्रसिद्ध असणाऱ्या या व्यक्तीचं नाव होतं अलोकेश लहरी. बप्पी हे नाव त्यांनी नंतर स्वीकारलं होतं व त्याच नावाने त्यांनी गाणे संगीतबद्ध केले.



किशोर कुमार आणि बप्पी दांचं नातं

बप्पी लाहिरी यांना संगीतकार म्हणून प्रचंड यश मिळाले पण असे दिसते की त्यांना मामा किशोर कुमार यांचा आशीर्वाद होता. एका म्युझिकल रिअ‍ॅलिटी शोमध्ये बप्पी दा यांनी शेअर केले होते की, त्यांचे रक्ताचे नाते नसले तरी, (बप्पी दाची आई किशोर दाच्या आईची मानलेली मुलगी होती) ते किशोर दांना स्वत:च्या मुलांपेक्षाही अधिक जवळचे होते. बप्पी अनेकदा त्यांच्या ‘मामा’सोबत घालवलेल्या बालपणीच्या कहाण्या सांगत असे. खरं तर, दरवर्षी, बप्पीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त किशोर दा यांच्या सन्मानार्थ एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला. बप्पी दा यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर या कार्यक्रमातील काही व्हिडिओ शेअर केले आहेत.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

बप्पी दांचा पहिला चित्रपट किशोर कुमार यांच्यासोबत होता

बप्पी लाहिरी त्यांच्या सिग्नेचर स्टाईल ऑफ कॅमेरासाठी ओळखले जात होते. परंतु तुम्हाला माहिती नसेल की त्यांनी काही काळ अभिनेता म्हणूनही काम केले आहे. १९७४ साली, बप्पी लाहिरी यांनी किशोर कुमार दिग्दर्शित ‘बढती का नाम दाढी’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. बप्पी दाने त्यांच्या सोशल मीडिया हॅन्डलवर या चित्रपटाच्या शूटचा एक संग्रहित फोटो देखील शेअर केला होता.

बप्पी लाहिरी यांनी २००३ मध्ये डॉ ड्रे वर खटला दाखल केला होता

एका कॉपीराइट प्रकरणात, बप्पी दाने अमेरिकन रॅपर डॉ ड्रे याच्यावर खटला भरला होता. डॉ. ड्रेने त्याचा अल्बम ऍडिक्टिवसाठी बप्पी दाच्या ‘कलियों का चमन’ची धून कॉपी केली होती. या खटल्यानंतर डॉ ड्रेने अल्बमचे श्रेय बप्पी लहरी यांना दिले.

बप्पी लहरी यांची शेवटची रचना

बप्पी दाची शेवटची रचना सप्टेंबर २०२१ मध्ये रिलीज झाली. त्यांनी “गणपती बाप्पा मोरया” या भक्तिगीतासाठी संगीत दिले होते. ते त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअरही केले. हा ट्रॅक अनुराधा जुजू यांनी गायला होता.

इथे तुम्हाला ते गाणं ऐकता येईल.

बप्पी दा आणि राजकारण

बप्पी लाहिरी २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षात सामील झाले. त्यांनी श्रीरामपूरच्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली परंतु अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या कल्याण बॅनर्जी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

अतिशय लहान वयात सुरु केली संगीत साधना

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणायला हरकत नाही. कारण बप्पी दांनी वयाच्या तिसऱ्या वर्षीच तबला वाजवायला सुरुवात केली होती. तिथून डिस्को किंग बनण्यापर्यंतच्या प्रवासाची सुरुवात झाली होती.

बप्पी दा यांचं पहिलं गाणं

बप्पी दा यांनी त्यांची स्वतःची अनेक गाणी प्रसिद्ध केली परंतु २००६ पर्यंत त्यांनी कधीही दुसऱ्या संगीतकाराचे गाणे गायले नव्हते. पण, विशाल-शेखर यांच्या टॅक्सी नंबर 9211 च्या बंबई नगरिया हे गाण्याने मात्र हे चित्र पालटवलं. हे गाणं प्रचंड हिट झालं होतं.

बप्पी दाची युनिक स्टाईल

एका शोमध्ये एका प्रश्नाचं उत्तर देताना बप्पी दाने हे उघड केलं की त्यांची युनिक ड्रेसिंग स्टाईल एल्व्हिस प्रेसलीकडून प्रेरित आहे.

बप्पी दाचा विश्वविक्रम

१९८६ साली एकाच वर्षी प्रदर्शित झालेल्या ३३ चित्रपटांसाठी १८० हून अधिक गाणी रेकॉर्ड करून बप्पी लाहिरीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले.

भारतीय संगीत जगतात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेले बप्पी दा कायमच स्मरणात राहतील!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

गुंतवणूक : IPO म्हणजे काय..? LIC च्या येणाऱ्या IPO बद्दल जाणून घ्या सर्वकाही..!

Next Post

जर संपूर्ण जगच मांसाहार सोडून शाकाहारी झालं तर..?

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

जर संपूर्ण जगच मांसाहार सोडून शाकाहारी झालं तर..?

घरच्या लोणच्याचाही मोठा ब्रँड होऊ शकतो हे या दोन भावांनी दाखवून दिलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.