The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकेकाळच्या ‘अपयशी’ विद्यार्थ्याने आज भारतातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षा टॉप केल्यात!

by द पोस्टमन टीम
2 January 2021
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

यश मिळवण्यासाठी तुम्हाला अपयशाच्या अनेक पायऱ्या चढाव्या लागतात. जर एखादा पराभव जिव्हारी लागला नाहीतर यश सुद्धा मिळवता येत नाही. यश मिळवण्यासाठी तुम्हाला टोकाचा संघर्ष करावाच लागत असतो. हा संघर्ष चुकवून यश प्राप्त करता येत नाही.

असाच एक अत्यंत टोकाचा संघर्ष करून भारतातील जवळ जवळ सरकारी परीक्षा पास होण्याचा विक्रम एका युवकाने केला आहे.

ह्या अत्यंत दिव्य यशाला त्याला सामना कराव्या लागलेल्या अपयशाची मोठी किनार लाभली आहे. अखंड स्वरूप पंडित असे ह्या युवकाचे नाव असून तो आज अनेकांसाठी प्रेरणा ठरला आहे.

स्वरुपने उत्तर प्रदेशातील बरेली येथे आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे त्याने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. स्वरूप हा आभ्यासाच्या बाबतीत सधारण होता. त्याला खेळायला आणि जिमला जाऊन तब्येत बनवायला प्रचंड आवडायचं आणि तो ते करत देखील होता. परंतु त्याच्या आयुष्यावर घाला घालणारा एक दुर्दैवी प्रसंग घडला आणि त्याचं संपूर्ण आयुष्य पालटलं. स्वरूपाच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाल्याचा फोन आला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली.



 

ह्या अपघातानंतर कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेण्याची वेळ आली असल्याची जाणीव स्वरूपला झाली. यासाठी त्याने यूपीएससीची तयारी करायला सुरुवात केली. त्याने स्वतःचा वैयक्तिक आभ्यास देखील सुरूच ठेवला आणि स्वतःला कामात झोकून दिलं.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

त्याने घरची परिस्थिती बघून घरून पैसे मागणे बंद केलं होतं. त्याने त्याऐवजी लोकांना शिकवायला सुरुवात केली.

लोकांना एखाद्या विषयावर शिकवताना, त्याचा सखोल अभ्यास करण्याची सवय त्याला लागली, जी निश्चितच चांगली होती. यामुळे त्याला पैसे देखील कमवणे शक्य झाले.

पहिल्यांदा त्याला यूपीएससीमध्ये मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला पण त्याने हार मानली नाही, तो प्रयत्न करत राहिला आणि त्याने यूपीएससी द्वारा घेण्यात येणाऱ्या भारतीय अभियांत्रिकी सेवेच्या परीक्षेत यश मिळवले.

पुढे त्याने आणखी काही परीक्षा दिल्या आणि त्या परीक्षांमध्ये यश कमावले. नुसतं यश कमावलं नाहीतर त्याने त्या परीक्षांमध्ये चांगला क्रमांक मिळवला.

ग्रॅज्युएट अँपटिट्यूड टेस्ट इंजिनियरिंग अर्थात गेटच्या परीक्षेत त्याने चांगले यश कमावले. त्यात त्याचा संपूर्ण भारतात ६वा क्रमांक आला. पुढे जाऊन त्यांनी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट अर्थात नेटची परीक्षा दिली, त्यात देखील त्याचा संपूर्ण भारतात त्याने ३ रा क्रमांक पटकावला.

मध्य प्रदेश राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याला राज्यस्तरावर ४ था क्रमांक मिळाला. हिमाचल  प्रदेश राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याचा राज्यस्तरावर तिसरा क्रमांक आला.

उत्तर प्रदेश राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याने चमत्कार करुन दाखवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.

उत्तर प्रदेश गृहनिर्माण विभागाच्या परीक्षेत त्याने चांगला परफॉर्मन्स दाखवत त्याने १ ला क्रमांक मिळवला, अधिकारी निर्वाचन आयोगाच्या परीक्षेत त्याला प्रथम क्रमांक मिळाला आणि सोबतच मुंबई मेट्रोच्या ऑफिसरपदासाठी दिलेल्या परीक्षेत त्याला चांगलं यश प्राप्त झालं आणि त्यात देखील त्याने प्रथमी क्रमांक मिळवला.

एकदा युपीएससीची तयारी केल्यामुळे इतर परीक्षांसाठी वेगळा अभ्यास करण्याची गरज पडली नसल्याची भावना त्याने बोलून दाखवली आहे.

यासाठी त्याने अभ्यासाची पंचसूत्री सांगितली आहे, ज्याच्या बळावर युपीएससी आणि इतर सरकारी परीक्षांमध्ये यश संपादन करणे शक्य होणार आहे.

स्वरूपाच्या मते कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी ही युद्धप्रमाणे करायची असते, त्यासाठी सर्वात महत्वाची आणि गरजेची गोष्ट आहे प्लॅनिंगची! कुठल्याही योजनेशिवाय केलेली कृती कशी फसते याचे असंख्य उदाहरण इतिहासात आहेत.

आपण ज्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतो त्याचा आभ्यासक्रम हा खूप विस्तृत असतो, अशा वेळी जर आपल्याला प्रत्येक विषयाला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला सर्वात आधी अभ्यासाचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक आहे.

स्वरूप दिवसाला ६-७ तास अभ्यास करण्याचा, त्याने कधीच स्वतःच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत तरी त्याला परीक्षेत घवघवीत यश मिळालं कारण त्याने अभ्यासाचं व्यवस्थितपणे नियोजन केलं होतं.

स्वरुपाच्या मते सलग अभ्यास करणे त्याला कधीच शक्य झाले नाही. त्यामुळे अभ्यास करताना तो नेहमी मध्ये विश्रांती घ्यायचा. त्याने आपल्या वेळेचे भाग करून ठेवले होते. ह्या अनुरूप त्याने आपल्या अभ्यासाची विभागणी केली होती.

तो सकाळी लवकर उठून अभ्यासाला बसायचा आणि संध्याकाळपर्यंत त्याचा बहुतेक अभ्यास झालेला असायचा. दुपारपर्यंत अभ्यास करून रिव्हिजन आणि पेपर्स सोडवण्याकडे त्याचा कल होता. तो उरलेल्या काळात स्वतःच्या नोट्स तयार करायचा.

आपल्या आभ्यासादरम्यान कुठल्याही प्रकारची अडचण  नको यायला म्हणून स्वरूपने मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा देखील अभ्यास केला होता. त्याने असंख्य जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव केला होता.

इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने अजून स्मार्टपणे आपल्या अभ्यासाला सुरुवात केली.

त्याने प्रश्नपत्रिकेच्या आधारावर वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी बनवली. त्याने परीक्षे आधी ती यादी नजरेआड केली आणि त्याचा त्याला खूप फायदा देखील झाला.

कुठलीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी एखादं कारण असायला हवं जे जिद्द टिकवून ठेवेल. कुठल्याही कारणाशिवाय केली गेलेली कुठलीही गोष्ट कालांतराने फसत असते.

एखाद्या गोष्टीला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला झपाटून काम करण्यासाठी प्रेरणा देणारं एखादं कारण देखील आपण शोधायला हवं. जोपर्यंत आपण जिद्दीला पेटून उठत काही मिळवण्याचा अट्टहास करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच मिळवणे शक्य नाही, असं स्वरूप नेहमी सांगतो.

आज स्वरूपने आपली नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॅटालीस्ट नावाचं मार्गदर्शन केंद्र सुरु केलं असून तो सध्या अनेक ठिकाणी प्रेरणादायी व्याख्यानं सुद्धा देतो.

आपल्याप्रमाणे अजून अधिकारी घडवण्याचा त्याचा प्रयत्न असून त्यात प्रयत्नात तो नक्की यशस्वी होईल अशी आपण आशा करुया!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

 

Tags: IAS
ShareTweet
Previous Post

मुलांचा ताबा मिळावा म्हणून ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फॅनने ट्रायल बाय कॉम्बॅटची मागणी केलीय!

Next Post

भारतातल्या या पर्यटनस्थळी चितेच्या राखेची होळी खेळली जाते!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

भारतातल्या या पर्यटनस्थळी चितेच्या राखेची होळी खेळली जाते!

राजीव दीक्षित यांनी स्वदेशीच्या प्रचारासाठी देशभरात १२००० हुन अधिक व्याख्यानं दिली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.