The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सेलिब्रिटी किड्स ज्यांनी अभिनय सोडून इतर क्षेत्रात आपला ठसा उमटवला..!

by Heramb
12 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


अलीकडे भारतीय चित्रपट क्षेत्र अलीकडच्या काळात अनेक वादांमध्ये सापडत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक वाद उदयास आले, अस्तास गेले, पण एक वाद सर्व काळांमध्ये समान असतो तो म्हणजे वशिलेबाजीचा! आजही अनेक अभिनेते असे आहेत जे प्रामुख्याने अभिनेते आणि निर्मात्यांच्या कुटुंबातून आले आहेत. काहीजण त्यांच्या उत्तमतेतून आणि प्रतिभेतून मोठे होतात तर काही ‘घराणेशाही’च्या माध्यमातून मोठे होतात. असो, हा वाद कधीही न संपणारा आहे.

असे अनेक “स्टारकिड्स” आहेत, ज्यांना चित्रपटसृष्टीत मोठ्या संधी मिळूनही त्यांनी ‘उद्योजक’ म्हणून आपली कारकीर्द स्वतःहून सुरु करण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी याच प्रकारे आपले आयुष्य घडवण्याचा प्रयत्न केला तर काही लोक त्यापासून शक्य तितके दूर राहिले. अशी यादी मोठी असली तरी या विशेष लेखात आपण अशा ७ ‘स्टारकिड्स’बद्दल जाणून घेणार आहोत.

१. एकता कपूर:

टेलिव्हिजन इंडस्ट्रीची राणी समजल्या जाणाऱ्या एकता कपूरने स्वतःचे नाव कमावले आहे. ती आता जितेंद्रची मुलगी किंवा तुषार कपूरची बहीण म्हणून ओळखली जात नाही. तिने १९९४ साली ‘बालाजी टेलिफिल्म्स’ची स्थापना केली. या कंपनीने टेलिव्हिजनवर अनेक सिरियल्स सुरु केल्या होत्या. २०१७ साली, तिने अल्ट बालाजी नावाचा ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच केला. या प्लॅटफॉर्मने अनेक यशस्वी चित्रपट आणि वेबसिरीज प्रदर्शित केल्या आहेत. त्यापैकी काही वेबसिरीजवर २०२०-२१ मध्ये आक्षेपही घेण्यात आला होता.

वयाच्या ३६व्या वर्षी, एकताला ‘फोर्ब्स एशिया पॉवर बिझनेसवुमन लिस्ट २०१२ मध्ये स्थान देण्यात आले. एकता कपूरला ‘फोर्ब्स टायकून ऑफ टुमारो’ येथे ‘आयकॉन ऑफ एक्सलन्स पुरस्कार’ आणि ‘फॉर्च्यून इंडिया अवॉर्ड्स’मध्ये वर्षातील सर्वात प्रभावशाली व्यावसायिक महिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.



२. ट्विंकल खन्ना:

भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वांत प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक, राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी, ट्विंकल खन्नाला चित्रपट उद्योगात फारसे यश मिळाले नाही. तिला अनेक मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये काम करायला मिळाले पण ते फारसे चालले नाहीत. चित्रपट क्षेत्रात अपयश आल्याचे फारसे दुःख ट्विंकल खन्नाला नाही. तिच्या अनेक मुलाखतींमधून ते स्पष्टही होते.

परंतु, आजमितीस, ट्विंकल खन्ना लेखक, वृत्तपत्र स्तंभलेखक, इंटिरियर डिझायनर आणि अगदी चित्रपट निर्मातासुद्धा आहेत. काही अहवालांनुसार, ट्विंकल खन्नाची एकूण संपत्ती ३० मिलियन डॉलर्स आहे. अभिनय क्षेत्रात जरी यश मिळाले नसले तरी आज चित्रपट आणि लेखन क्षेत्रात मात्र तिने भरारी घेतलेली दिसते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

३. श्वेता बच्चन:

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मोठी मुलगी, श्वेता बच्चन ही भारतीय स्तंभलेखिका, लेखिका असून काही वर्षांपूर्वी तिने मॉडेलिंगसुद्धा केलं आहे. तिने डेली न्यूज आणि वोग इंडियासाठी स्तंभलेखक म्हणून काम केले आहे. पॅराडाईज टॉवर्स ही बेस्ट सेलिंग कादंबरी देखील श्वेता बच्चनने लिहिली आहे. २०१८ साली, श्वेता बच्चनने स्वतःचे फॅशन लेबल, एमएक्सएस लॉन्च केले. २०२० सालापर्यंत तिची एकूण संपत्ती अंदाजे ८ मिलियन डॉलर्स आहे.

४. रिहा कपूर:

रिया कपूर ही ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी आणि सोनम कपूरची बहीण आहे. रिया ही एक प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माती देखील आहे. ती तिची बहीण सोनम कपूरसोबत फॅशन लाइन रेसनची को-ओनरसुद्धा आहे. अभिनेता अर्जुन कपूर, जान्हवी कपूर आणि मोहित मारवाह तसेच अभिनेता रणवीर सिंग ही तिची चुलत भावंडं आहेत. तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून “नाट्य साहित्य”मध्ये पदवीचे शिक्षण घेतले.

५. रिद्धिमा कपूर-सहानी:

आई वडिल आणि भावंडांपर्यंत अनेक प्रतिभावान अभिनेत्यांमध्ये वाढलेली रिद्धिमा, ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी आहे. ती चित्रपट क्षेत्रात कार्यरत नसली तरी आज ती स्वतः एक “ब्रँड” आहे. रिद्धिमा ही एक आघाडीची “सेलिब्रिटी फॅशन डिझायनर” आणि उद्योजक आहे. ती “आर ज्वेलरी” नावाच्या ज्वेलरी ब्रँडची सुद्धा को-ऑनर आहे.

६. तुषार कपूर:

ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूर याने प्रथम अभिनय क्षेत्रात अनेक प्रयत्न केले. क्या कूल है हम, ढोल, शूटआउट ऍट वडाळा पर्यंत, तुषारने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक प्रोजेक्ट्सवर काम केले आहे. तथापि, “गोलमाल” फ्रँचायझीने त्याच्या कारकिर्दीसाठी आश्चर्यकारक काम केले. त्याने ‘तुषार एंटरटेनमेंट हाऊस’ नावाने एक प्रॉडक्शन हाऊसही सुरू केले आहे. तुषारची एकूण संपत्ती अंदाजे १४ दशलक्ष डॉलर्स आहे.

७. उदय चोप्रा:

सर्वात प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक, यश चोप्रा यांचा मुलगा, उदय चोप्रा याने भारतीय चित्रपट उद्योगात एक अभिनेता म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. पण त्याला खरे यश मिळाले ते पडद्यामागे. त्याने स्वतःची चित्रपट निर्मिती कंपनी, वाय.आर.एफ. एंटरटेनमेंट सुरु केली. २०२१ पर्यंत, उदयची एकूण संपत्ती ६ दशलक्ष डॉलर्स आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सुकुमारा कुरूप – तीन दशकांपासून पोलिसांना चकवा देणारा कुख्यात कि*लर

Next Post

‘फ्रेंच टोस्ट’चा शोध फ्रांसमध्ये लागला असं वाटत असेल तर हा लेख वाचा..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

'फ्रेंच टोस्ट'चा शोध फ्रांसमध्ये लागला असं वाटत असेल तर हा लेख वाचा..!

दुसऱ्या महायु*द्धात एक पोस्ट ऑफिस जर्मन सैन्याचा सामना करण्यासाठी पुढे सरसावलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.