The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोझ शानिना : सोव्हिएत संघाची स्नाय*पर जिने ५९ ना*झींची बेदरकारपणे ह*त्या केली.

by द पोस्टमन टीम
25 April 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
1
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


शत्रू सैन्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांना, हाय व्हॅल्यू टार्गेट्सना किंवा मोठमोठ्या व्यक्तींना मारणे, अचूक टिपणे ही गोष्ट अत्यंत कठीण असते. हे काम अत्यंत जपून आणि बारकाईने करावे लागते. या कामासाठी काही लोकांना खास प्रशिक्षण दिलेले असते. त्यांना स्नायपर किंवा शार्प शू*टर असे म्हणतात.

शत्रुसैन्यातील महत्त्वाच्या लोकांचा काटा काढण्यासाठी आणि त्यांचा माग काढण्यासाठी स्नाय*पर्सना जीवावर उदार होऊन शत्रूच्या प्रदेशात म्हणजेच “बिहाइंड द एनिमी लाईन्स” जावे लागते. त्यासाठी त्यांना लपून राहणे आणि अत्यंत सावध राहणे आवश्यक असते.

स्नायप*र्सना शत्रूवर ह*ल्ला करण्याची एकच संधी मिळते, त्या संधीतच त्यांना त्यांचे काम पूर्ण करणे आवश्यक असते. म्हणूनच स्नाय*पर्स “वन शॉट , वन कि*ल” हे एकच ब्रीदवाक्य अक्षरश: जगतात. त्यासाठी त्यांना अत्यंत संयम ठेवून काम करावे लागते.

तासनतास दबा धरून बसणे , नेमबाजीचे उत्तम कौशल्य, एकाग्रता, श्वासावर आणि शरीरावर नियंत्रण या सगळ्या गोष्टींची अक्षरश: साधना करावी लागते. आपले काम झाल्यानंतरसुद्धा पकडले जाऊ नये म्हणून त्यातून अलगद सुटावे लागते.

पहिल्या महायु*द्धात जर्मनीने शत्रूला नामोहरम करण्यासाठी स्नायपर्सचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला होता. तसेच दुसऱ्या महायु*द्धातसुद्धा स्नायपर्सचा वापर झाला.



ना*झी जर्मनीच्या आक्र*मणाविरुद्ध सोव्हिएत रशियाने अनेक पुरुष व महिला स्नाय*पर्स तयार केले होते आणि त्या सर्व स्नाय*पर्सनी अत्यंत उत्तम कामगिरी करत ना*झी जर्मनीच्या सैन्याला खिंडार पाडले होते.

सोव्हिएतच्या ल्यूडमीला पावलीचेन्को या महिला स्नाय*परने तीनशेहून अधिक जर्मन सैनिकांना यमसदनी धाडले होते. अशीच आणखी एक धाडसी महिला स्नाय*पर होती रोझा शानिना! तिने ५९ ना*झी सैनिकांची ह*त्या केली होती.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

एप्रिल १९४४ मध्ये एका महिलेने स्नाय*पर बंदुकीचा चाप ओढला. “मी एका माणसाला मारले” असे ती म्हणाली. तिच्या पायातले त्राणच गेले आणि खंदकातच कोसळली. तिच्या या पहिल्या वेधाबरोबरच तिच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.

१९४४ च्या अखेरीस सोव्हिएत स्नाय*पर रोझा शानिना ही तिच्या प्राणघातक शॉट्ससाठी ओळखली जाऊ लागली आणि पूर्व प्रशियातील अनामिक द*हश*त म्हणून तिचा उल्लेख होऊ लागला.

३ एप्रिल १९२४ रोजी रोझा शानिना हिचा जन्म पूर्वीच्या लेनिनग्रॅड (आताचे सेंट पिटर्सबर्ग) पासून काही शेकडो मैल अंतरावर असलेल्या एका कम्युनमध्ये झाला. तिची आई ऍना ही एक दूधविक्रेती होती आणि तिचे वडील इगॉर हे लाकूडतोडीचे काम करत असत.

त्यांनी पहिल्या महायु*द्धादरम्यान सैन्यात देशसेवा केली होती. रोझाचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला पुढे शिकण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळे ती रोज माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी आठ मैल अंतर चालून बेरेझ्निक शहरातील शाळेत जात असे. ती जिथे राहत असे तिथून फक्त हीच शाळा जवळ होती.

रोझा एक हुशार विद्यार्थिनी होती आणि ती एक स्वतंत्र विचारांची मुलगी होती. म्हणूनच जेव्हा माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर तिच्या आईवडिलांनी तिला पुढचे शिक्षण घेण्यास आणि वाङ्मय शिकण्यास विरोध केला तेव्हा ती चौदा वर्षांची मुलगी घरातून निघून गेली.

चक्क पन्नास तास अंतर पायी चालून ती जवळच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचली आणि उत्तरेकडे असणाऱ्या Arkhangelsk ह्या शहरात पोहोचली.

तिथे तिचा भाऊ फ्योडर राहत असे. तिला सेकंडरी स्कुलमध्ये प्रवेश मिळेपर्यंत , स्टुडन्ट स्टायपेंड मिळेपर्यंत आणि शाळेच्या वसतिगृहात खोली मिळेपर्यंत ती भावाच्या घरी राहिली. पण जून १९४१ साली जर्मनीने दोन देशांत झालेला नॉन ऍग्रेशन करार मोडत सोव्हिएत संघाच्या पश्चिम सीमेवर आक्र*मण केले.

त्यामुळे सोव्हिएत संघाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आणि विद्यार्थ्यांना मिळणारे मोफत सेकंडरी शिक्षण बंद झाले तसेच रोझाला मिळणारा स्टायपेंडसुद्धा बंद झाला.

हळूहळू यु*द्ध हे रोझाच्या घरापाशी येऊन ठेपले आणि ना*झी सैन्याने Arkhangelsk शहरावर बॉ*म्बह*ल्ले सुरु केले. रोझा एक धाडसी तरुणी होती.

ती ज्या किंडरगार्टनमध्ये शिक्षिका म्हणून काम करायची त्या इमारतीच्या छतावर ती एयर रेड ड्युटी करण्यासाठी स्वतःहूनच पुढे सरसावली.

डिसेंबर १९४१ मध्ये तिच्या भावाचा, मिखाईलचा बॉ*म्ब ह*ल्ल्यात मृत्यू झाल्याची बातमी तिला कळाली . तेव्हाच तिने भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी यु*द्धात भाग घेण्याचे निश्चित केले.

सुरुवातीला सोव्हिएतच्या सैन्यप्रमुखांना स्त्रियांना सैन्यात प्रवेश देणे मान्य नव्हते. पण परिस्थिती खूप बिकट झाली आणि त्यांना त्यांचा निर्णय बदलणे भाग पडले. त्यावेळी इतर दहा हजार रशियन महिलांबरोबरच रोझाने देखील सैन्यात प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज केला.

तिने तिचे नाव फिमेल स्नाय*पर अकॅडमीमध्ये नोंदवले आणि एप्रिल १९४४ मध्ये तिचे प्रशिक्षण पूर्ण झाले. त्यावेळी ती फक्त वीस वर्षांची होती.

तिच्या अचूक वेधासाठी ती ओळखली जाऊ लागली आणि अकॅडमीने तिला फ्रंटवर जाऊन मृत्यूला कवटाळण्यापेक्षा अकॅडमीमध्येच प्रशिक्षक म्हणून काम करण्याची विनंती केली. पण अखेर तिला सीमेवरूनच बोलावणे आले आणि ती गेली.

ती १८४व्या रायफल डिव्हिजन फिमेल स्नाय*पर या तुकडीची कमांडर झाली. पश्चिम सीमेवर आल्यावर तीनच दिवसांत तिने तिचा पहिला अचुक वेध घेतला.

त्याबद्दल बोलताना ती म्हणाली की, “अखेर संध्याकाळच्या वेळेला एक जर्मन आमच्या खंदकाजवळ आला. मी अंतराचा अंदाज घेतला. तो आमच्यापासून जवळजवळ ४०० मीटर अंतरावर होता. जेव्हा फ्रित्झ मान खाली घालून जंगलाच्या दिशेने जात होता, तेव्हा मी गोळी झाडली. तो ज्या प्रकारे खाली कोसळला त्यावरून माझ्या लक्षात आले की तो अजूनही जिवंत आहे.

तो एक तासभर तरी चिखलात शांतपणे पडून होता. हालचाल करण्याची त्याची हिम्मत झाली नाही. आणि जेव्हा त्याने हळूहळू सरपटत पुढे जाण्यास सुरुवात केली तेव्हा मी परत एकदा गोळी झाडली. यावेळी मी अचूक नेम साधला होता.”

पण तिने एका व्यक्तीला ठार मारले आहे हे जेव्हा तिला कळले तेव्हा तिच्या पायातील शक्तीच नाहीशी झाली आणि ती खंदकात कोसळली. घडलेल्या घटनेमुळे धक्का बसलेला असताना ती म्हणाली, “मी एका माणसाला ठार मारले!” तेव्हा एक महिला कॉम्रेडने तिला म्हटले की “तू ज्या व्यक्तीला संपवले आहेस, तो एक फॅसिस्ट होता.”

त्या वर्षी मे महिन्यात रोझाला “ऑर्डर ऑफ ग्लोरी”ने सन्मानित करण्यात आले. असा गौरव होणारी ती पहिलीच महिला स्नाय*पर होती. “डबल हिट्स” करू शकणारी म्हणून तिची ओळख निर्माण झाली होती. ती अगदी कमी वेळात दोन टार्गेट्सचा अचूक वेध घेऊ शकत होती.

तरीही जेव्हा तिला फ्रंटला पाठवण्यात आले, तेव्हा तिला या सगळ्याचा तिला उबग आला होता. इतके शौर्य दाखवून देखील तिला मागच्या पोझिशनला ठेवण्यात येत असे. कारण सोव्हिएतची अशी पॉलिसी होती की महिलांना फ्रंटवर पाठवायचे नाही.

या सगळ्यामुळे तिने वैतागून तिच्या मित्राला म्हणजेच प्योटर मोल्चनाव्हला २९ जुलै १९४४ रोजी पत्र लिहिले. या पत्रात तिने तिच्यासाठी शब्द टाकण्याची त्याला विनंती केली. प्योटर मोल्चनाव्ह हा तेव्हा यु*द्ध वार्ताहर म्हणून काम करत होता.

त्यावेळी तिला स्वस्थ बसवत नसे म्हणून ती ऍबसेन्ट विदाऊट लिव्ह (AWOL) असे करून फ्रंटवर जाऊन तिचा “डेड लिटिल हिट*लर्स” चा स्कोअर वाढवण्याचा प्रयत्न करत असे. लवकरच तिच्या बळीसंख्येत प्रचंड वाढ झाली आणि मीडियाला तिची ओळख झाली. तिच्याबद्दल विविध वृत्तपत्रांत हेडलाईन्स छापून येऊ लागल्या.

या वेळेपर्यंत तिचा स्कोअर ४६ इतका झाला होता. तिची ड्युटी पहाटे सुरु व्हायची. ती चिखलाने भरलेल्या खंदकात सरपटत जायची आणि तिच्या खास खंदकात जाऊन जर्मन लोकांवर नजर ठेवायची. एके दिवशी सकाळी रोझा अगदी स्तब्धपणे तिच्या टार्गेट्सची वाट बघत थांबली होती.

तेव्हाच एक जर्मन मशीनगनर तिच्या नजरेच्या टप्प्यात “पिल बॉक्स”च्या एक्झिटजवळ आला. तो सुरक्षा नसलेल्या एका कॅम्पजवळ अगदी सावधपणे सरपटत आला आणि रोझाने अगदी आत्मविश्वासाने त्याच्यावर गोळी झाडली. त्या एकाच गोळीत तो कोसळला.

त्याची मदत करण्यासाठी दोन कॉम्रेड्स आले असता रोझाने त्यांनाही ठार केले. त्यानंतर आणखी दोन जर्मन सैनिक आले आणि रोझाने तिच्या बंदुकीने तात्काळ त्यांचाही वेध घेतला.

सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर रोझा ही “पूर्व प्रशियाची अनामिक द*हश*त” होती. सोव्हिएतचे लोक कसे असू शकतील ह्याचे ती एक मूर्तिमंत उदाहरण होती. तिच्या ह्याच कौशल्यामुळे १९४४ च्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत ती एक सेलेब्रिटी झालेली होती. अनेक पत्रकारांनी तिच्याबद्दल गौरवास्पद लेख लिहीले.

ती तिच्या कामाच्या वेळांची तिच्या डायरीत नोंद करून ठेवत असे. त्याशिवाय ती तिच्या भावनासुद्धा त्या डायरीत लिहून ठेवत असे. “आता मी कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही.” असे तिने १० ऑक्टोबर १९४४ रोजी लिहिले होते.

तिने सैन्यात असताना अनेकांशी मैत्री केली होती. क्वचित काही वेळा तिला एखादा मुलगा देखील आवडून गेला होता आणि तो तिचा प्रियकर देखील झाला पण युद्धाने तिचा प्रियकर तिच्यापासून हिरावून नेला.

जसे यु*द्ध भडकू लागले तसे तसे रोझाला अधिक काळ फ्रंटवर काम करावे लागले. आणि गोळी*बारसुद्धा खूप वाढला होता. तिच्या डायरीतील नोंदी अधिकाधिक दुःखी होत गेल्या.

१६ जानेवारी १९४५ रोजी तिने लिहिले होते की ,”मला आता अखेर खात्री पटलेली आहे की कुणावर प्रेम करू शकण्याची माझ्यात आता क्षमताच उरलेली नाही.” तिच्यासाठी ते आयुष्य जगणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागले होते.

एक दोन वेळेला सैन्यातील काही लोकांनी तिच्यावर शारीरिक जबरदस्ती करण्याचे देखील प्रयत्न केले होते. त्यामुळे तिला आणखी नैराश्य येऊ लागले होते.

२७ जानेवारी १९४५ रोजी एका सैन्य अधिकाऱ्याला वाचवताना तिला वीरमरण आले. दोन सैनिकांना ती जखमी अवस्थेत सापडली. तिच्या छातीत गोळी लागली होती आणि तिला वाचवण्याची वेळ निघून गेली होती. तिच्यावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

इतके शौर्य गाजवून देखील तिच्याबाबतीत फार कुणाला ठाऊक नव्हते. तिच्या मृत्यूनंतर २० वर्षांनी तिच्या मित्राने तिची पत्रे आणि डायरी प्रकाशित केली. तेव्हा कुठे रशियात तिच्याबद्दल लोकांना माहिती झाले.

इतक्या कमी वयात इतके शौर्य गाजवणाऱ्या रोझाने मुलींपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: GermannaziSoviet UnionWorld War 2
ShareTweet
Previous Post

निसानचा CEO पियानो मध्ये बसून जपान मधून निसटला होता

Next Post

इतिहास, राष्ट्रवाद, सांप्रदायिकता आणि रोमिला थापर

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

इतिहास, राष्ट्रवाद, सांप्रदायिकता आणि रोमिला थापर

७१च्या यु*द्धात या अधिकाऱ्याने एक जुगाड केला आणि आपला विजय सोपा झाला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.