The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा पेंग्विन नॉर्वेच्या सैन्यात ब्रिगेडिअर आहे, त्याला मानाची सलामीसुद्धा मिळते.

by द पोस्टमन टीम
13 July 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


मॅस्कॉट म्हणजे एखाद्या देशासाठी, संघटनेसाठी शकुनाचं प्रतीक म्हणून वापरली जाणारी वस्तू किंवा प्राणी. आजपर्यंत गरुड, सिंह, वाघ, हत्ती, गेंडा यांसारखे अनेक शूर आणि शक्तिशाली प्राणी आणि पक्षी मॅस्कॉट म्हणून वापरल्याचं तुम्ही ऐकलं असेल.

पण एखादं क्युट पेंग्विनही मॅस्कॉट म्हणून वापरलं जाऊ शकतं का? ते ही एका देशाच्या राजाच्या सेनेचं प्रतीक म्हणून?

खरंतर पेंग्विन दिसायलाही इतर पक्षांपेक्षा अगदी वेगळे असतात. पांढऱ्याशुभ्र हिमासारखा रंग, अतिशय गुबगुबीत शरीर आणि त्याला साजेशी अशी त्यांची चाल, या सगळ्यामुळे सर्वांनाच पेंग्विन आवडतात.

सहसा पेंग्विन म्हटलं की बर्फाळ प्रदेशात बर्फावर घसरगुंडी खेळणारा, पाण्यातले लहान लहान मासे शोधून खाणारा एक पक्षी आपल्या डोळ्यासमोर येतो, पण एक पेंग्विन असासुद्धा आहे ज्याला “ब्रिगेडियर” ही उपाधी दिली आहे, ज्याच्या पंखावर चक्क आर्मीचं मेडल लावलं जातं आणि ज्याला राजाचे रक्षक सलाम ठोकतात!!

आज अशाच आगळ्यावेगळ्या पेंग्विनबद्दल आपण जाणून घेऊया!



या ब्रिगेडियर पेंग्विनचं पूर्ण नाव आहे “सर निल्स ओलाव्ह III” (Sir Nils Olav III). “सर निल्स ओलाव्ह” हे जगातलं सर्वात प्रसिद्ध पेंग्विन आहे. ब्रिगेडियर सर निल्स ओलाव्ह हे पेंग्विन नॉर्वे या देशाच्या राजाच्या रक्षक सेनेचा एक सदस्य आहे. हे पेंग्विन नॉर्वेच्या राजघराण्याच्या सेनेचं प्रतीक मानलं जातं. एखाद्या राजाच्या सेनेचा सदस्य होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. राजाच्या रक्षक दलात सहभागी होणे ही अतिशय प्रतिष्ठेची बाब मानली जाते.

एखाद्या पेंग्विनला अशा दलात सहभागी करून घेण्याची कल्पना नेमकी आली तरी कुठून?

साधारण ५० वर्षांपूर्वी, म्हणजेच ७०च्या दशकात याची सुरुवात झाली. नॉर्वे देशाचे मिलिटरी गार्ड्स एडिनबर्ग या ठिकाणी आले. तेव्हाचे कर्नल इन चीफ निल्स एगलन पेंग्विन्स बघायला तिथल्याच एका प्राणिसंग्रहालयात जायचे. तिथल्या पेंग्विन्सना बघून त्यांना वाटायचं जणू ह्यांची छोटीशी परेडच चालली आहे आणि किंग पेंग्विनला म्हणजेच पेंग्विन्सच्या मुख्य लीडरला आपण राजघराण्याच्या सेनेचं प्रतीक  बनवण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. तेव्हापासूनच “किंग पेंग्विनला” एक शुभशकुन मानण्यात येऊ लागलं.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

या पेंग्विनला नावंही सर नील्स आणि तत्कालीन राजा ओलाव्ह यांच्या नावावरून सर निल्स ओलाव्ह असं देण्यात आलं. १९७२ पासून आत्तापर्यंत असे ३ पेंग्विन्स झाले आहेत. या पदासाठी सर्वात चांगल्या पेंग्विनची निवड केली जाते.

“सर निल्स ओलाव्ह I” हे जे पहिलं पेंग्विन होतं त्याला १९७२ साली नेमण्यात आलं. पण दुर्दैवाने काहीच वर्षांत म्हणजेच १९८७ साली त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर “सर निल्स ओलाव्ह II” या अवघ्या दोन वर्षांच्या पेंग्विनने ही जागा घेतली. त्याला २००५ साली “कर्नल-इन-चीफ” ही उपाधी देण्यात आली.

२००५ साली तर या पेंग्विनचा ४ फूट उंचीचा ब्रॉंझचा पुतळा एडिनबर्ग प्राणिसंग्रहालयात आणला गेला.

त्यानंतर राजा हॅराल्ड पाचवा यांनी १५ ऑगस्ट २००८ रोजी त्याला नाईटहूड ही उपाधी दिली. यावेळी त्या पेंग्विनच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या परेडला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.

त्यानंतर २००८-२०१६ च्या दरम्यान “सर निल्स ओलाव्ह III” या तिसऱ्या पेंग्विनची नियुक्ती करण्यात आली. २२ ऑगस्ट २०१६ रोजी त्याला “ब्रिगेडियर” ही उपाधी मिळाली.

“ब्रिगेडियर” ही खास उपाधी मिरवणारा हा पहिलाच पेंग्विन! 

आत्ताचं सर निल्स ओलाव्ह III पेंग्विन हे तिसऱ्या क्रमांकाचं पेंग्विन आहे. याचं मूळ नाव डोपी असं होतं पण या पदावर त्याचं नाव बदलण्यात आलं. या पेंग्विनला व्यवस्थित ट्रेनिंग देण्यात आलं आहे. राजाचे रक्षक जेव्हा त्याची भेट घ्यायला येतात तेव्हा तो त्यांना ओळखसुद्धा दाखवतो.

ब्रिगेडियर सर निल्स ओलाव्हला पण योग्य त्या मानाने वागणूक मिळते. अगदी राजाच्या रक्षकांकडून त्याला मानाची सलामीसुद्धा मिळते. त्याची परेड म्हणजे तर आवर्जून बघण्यासारखा एक सोहळाच असतो. दूरवरून पर्यटक आणि स्थानिक नागरिक ही परेड बघायला हजर होतात.

तर असं हे आगळंवेगळं पेंग्विन सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय होऊन बसलं नसतं तर नवलच होतं, नाही का?


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

करोडो डॉलर्स खर्चून उभारलेल्या दुबईतील ‘पाम आयलंड्स’चा प्रोजेक्ट का बारगळला..?

Next Post

लॅम्बॉर्गिनीनं डिझाईन नाकारलं म्हणून ‘पागानी’सारखी सुपरकार तयार झाली

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

लॅम्बॉर्गिनीनं डिझाईन नाकारलं म्हणून 'पागानी'सारखी सुपरकार तयार झाली

४३६ लोकांचा जीव घेऊन चंपावत वाघिणीने गिनीज बुक रेकॉर्ड केला होता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.