The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सिग्मंड फ्रॉईडच्या उल्लेखाशिवाय मानसशास्त्र हा विषयच अधुरा आहे..!

by द पोस्टमन टीम
6 October 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


मानवी मेंदू आणि मन या दोन सर्वांत जास्त गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. त्यांच्यात एकच फरक आहे, एक प्रत्यक्ष डोळ्यांना दिसू शकते तर दुसरी आभासी आहे. मानवी मेंदू व वर्तणुकीचा अभ्यास मानसशास्त्रात केला जातो. सिग्मंड फ्रॉईड या व्यक्तीच्या उल्लेखाशिवाय मानसशास्त्र हा विषय अधुराच आहे. मानसशास्त्रातील सर्वांत प्रसिद्ध व्यक्ती असलेल्या फ्रॉईडचा, विसाव्या शतकातील सर्वात प्रभावशाली आणि वादग्रस्त विचारवंतांमध्ये समावेश होतो.

सिग्मंड फ्रॉईडच्या सिद्धांतांमुळं बालपण, व्यक्तिमत्व, स्मरणशक्ती, लैंगिकता आणि थेरपीबद्दलच्या आपल्या विचारांना आकार देण्यात मदत झाली. स्वप्नांबद्दल पडणाऱ्या अनेक भ्रामक कल्पना मोडीत काढण्याचा प्रयत्न फ्रायडनं आपल्या संशोधनाच्या माध्यमातून केला.

थोडक्यात, त्यानं मानसशास्त्रज्ञांना स्वप्नांचा अर्थ लावायला शिकवलं. म्हणूनच त्याला आधुनिक मानसशास्त्राचा जनक आणि मनोविश्लेषण प्रक्रियेचा प्राथमिक विकसक म्हणून व्यापक मान्यता मिळालेली आहे.

सुरुवातीच्या वैयक्तिक आयुष्याचा विचार केला तर सिग्मंड फ्रॉईडचं आयुष्य सामान्यच होतं. त्याचा जन्म मोरेवियामधील (झेक रिपब्लिक) फ्रीबर्ग येथे १८५६ साली झाला. त्याच्या पालकांना एकूण आठ अपत्ये होती आणि त्यात सिग्मंड सर्वात मोठा होता. फ्रॉईड चार वर्षांचा असताना त्यांचं कुटुंब व्हिएन्नाला गेलं. तिथं त्यानं लिओपोल्डस्टॅडच्या शाळेत शिक्षण घेतलं. ग्रीक, लॅटिन या भाषा आणि इतिहास, गणित व विज्ञान या विषयांमध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट होती.

प्रखर बुद्धिमत्तेमुळं त्याला वयाच्या सतराव्या वर्षी व्हिएन्ना विद्यापीठात प्रवेश मिळाला. त्यानं न्यूरोलॉजीमध्ये वैद्यकीय पदवी मिळवली आणि पीएचडी देखील केली. फ्रॉईडने १८८६ साली मार्था बर्नेसशी लग्न केलं. या जोडप्याला सहा मुले झाली. फ्रॉईडच्या मुलांपैकी सर्वात लहान असलेल्या ॲनानं आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मानसशास्त्रज्ञात करियर केलं.



मानसशास्त्रात संशोधन करण्याअगोदर तर तो एक न्यूरोलॉजीस्ट होता. त्यानं काही काळ व्हिएन्ना जनरल हॉस्पिटलमध्ये डॉ. जोसेफ ब्रेरबरोबर काम केलं. त्यानंतर जीन-मार्टिन चार्कोटच्या मार्गदर्शनाखाली संमोहनाचा अभ्यास करण्यासाठी पॅरिसला गेला. जेव्हा तो व्हिएन्नाला परतला, तेव्हा त्यानं आपलं स्वत:चं क्लिनिक सुरू केलं. त्याने मेंदू आणि मज्जातंतू विकारांचा सखोल अभ्यास केला. संमोहनाची पद्धत त्याच्या अपेक्षेप्रमाणं जास्त प्रभावी ठरत नव्हती. त्यामुळं त्यानं थेरपीचा एक नवीन प्रकार रुग्णांसाठी वापरण्यास सुरुवात केली. या थेरेपीला ‘टॉकिंग क्युअर’ या नावानं ओळखलं गेलं.

रुग्णाला त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रवेश करण्यास प्रोत्साहित करणं, हा या थेरेपीमागचा उद्देश होता. ही थेरेपी फ्रायडच्या सायकोऍनालिसीस संशोधनाचा पाया ठरला.

नीत्शे, दोस्तोवस्की आणि कान्ट यांसारख्या तत्त्ववेत्त्यांच्या अभ्यासावर जोर देत फ्रॉईडनं अभ्यास केला. फ्रॉईडच्या सिद्धांतांचा आधुनिक मानसशास्त्रावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला. जॅक लॅकन आणि कार्ल मार्क्ससारख्या विचारवंतांनी देखील फ्रॉईडच्या सिद्धांतांवर जोर दिलेला आहे.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडबद्दलचा त्याचा सिद्धांत मानशास्त्राच्या अभ्यासात मैलाचा दगड ठरला. मानवी मनाचे दोन भाग असतात, असा युक्तीवाद फ्रॉईडनं केला. कॉन्शियस माइंडमध्ये असलेले विचार आणि विश्वासांबद्दल आपण जागरूक असतो. सबकॉन्शियस माइंडमध्ये व्यक्तीच्या आयुष्यातील दडपलेल्या आठवणी आणि अव्यक्त इच्छा असतात. सबकॉन्शियस माइंडमधील भावना जेव्हा कॉन्शियस माइंडवर वरचढ होण्याचा प्रयत्न करतात तेव्हा व्यक्तीचं वर्तन बदलू शकतं. याच सिद्धांतावर त्यानं पुढे ओळख, इगो आणि सुपरइगो या संकल्पना मांडल्या.

फ्रॉईडनं व्यक्तीच्या आयुष्यातील सायकोसेक्शुअल विकासाचे टप्प्यांचा देखील अभ्यास केला. प्रत्येक लहान मुलगा आणि मुलगी यांना सायकोसेक्शुअल विकासाचे वेगवेगळे टप्पे पार करावेच लागतात. त्याशिवाय त्यांची मानसिक वाढ पूर्ण होत नाही, हे फ्रॉईडनं निदर्शनास आणून दिलं. ‘इडिपस कॉम्प्लेक्स’ हा सायकोसेक्शुअल थेअरीतील सर्वात वादग्रस्त सबथेअरी ठरलेली आहे.

शारीरीक आणि मानसिक वाढ होत असताना मुलगा अनाकलनीयपणे त्याच्या आईकडे आकर्षित होतो तर मुलगी वडिलांकडे. मात्र, या स्थितीवर मुलगा आणि मुलीच्या कॉन्शियस माइंडचं नियंत्रण असतं, हे देखील त्यानं स्पष्ट केलं होतं. स्वप्नाचा अर्थ लावण्याबाबतचं सर्वांत मोठं आणि महत्त्वाचं संशोधन फ्रॉईडनं केलं.

व्यक्तीला पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ लावल्यास, त्याचा उपयोग एखाद्या व्यक्तीच्या मानसशास्त्राचा आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो, असा त्याचा विश्वास होता.

मानसशास्त्रातील फ्रॉईडचं योगदान इतकं विस्तीर्ण आहे की, शब्दमर्यादेमध्ये त्याला बंदिस्त करताच येणार नाही. मात्र, त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अशा काही गोष्टी नक्कीच आहेत, ज्या अनेकांना माहिती नाहीत. त्याच्या चेन-स्मोकिंगमुळं त्याच्यावर ३० पेक्षा जास्त कर्करोगाच्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या! वयाच्या विशीत असताना त्यानं पहिली सिगारेट ओढली होती. अल्पावधीतच तो पूर्णपणे सिगारेटच्या आहारी गेला होता. एक वेळ तर अशी होती की, फ्रॉईड दिवसाला तब्बल २०-२० सिगारेट ओढत असे. सिगारेटमुळं आपली क्रियाशीलता वाढत असल्याचं त्याचं म्हणणं होतं. लहानमोठ्या एकूण ३३ शस्त्रक्रिया होऊन देखील कधी त्यानं सिगारेट ओढण्याची सवय सोडली नाही!

कोकेन एक जादुई पदार्थ असल्याचं त्याचं म्हणणं होतं. १८८० च्या दशकात, फ्रॉईडला कोकेनमध्ये रस निर्माण झाला. त्यावेळी जर्मन लष्करी डॉक्टर्स थकलेल्या सैन्यामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी कोकेनचा वापर करत होते. फ्रॉईडनं कोकेनवर अनेक प्रयोग केले. कोकेन पाण्यात विरघळून पिल्यानंतर पचनशक्ती सुधारत असल्याचा निष्कर्ष त्यानं मांडला.

त्यानं आपल्या मित्रांवर आणि होणाऱ्या पत्नीवर कोकेनचा वापर केला. मात्र, कोकेनच्या अतिसेवनानं मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं कानावर आल्यानंतर त्यानं कोकेनचं गुणगाण गाणं सोडून दिलं.

आयुष्यभर रहस्यमयी मानवी मेंदू आणि मनाचा अभ्यास करणाऱ्या सिग्मंड फ्रॉईडचा मृत्यू देखील अनोख्या पद्धतीनं झाल्याचं म्हटलं जातं. त्याचा मृत्यू आजारपणामुळे नाही तर मॉर्फिनचे जास्त डोस दिल्यानं झाला होता. १९३९च्या उन्हाळ्यापर्यंत, तोंडाच्या कर्करोगामुळं फ्रॉईड अतिशय कमजोर झाला होता. २१ सप्टेंबर १९३९ रोजी फ्रॉईडनं त्याचा मित्र आणि डॉक्टर मॅक्स शूरकडं, त्याला वेदनेतून मुक्त करण्याची विनंती केली. फ्रॉईडची मुलगी ॲनाच्या परवानगीनं डॉक्टर शूरनं फ्रॉईडला मॉर्फिनचे तीन डोस दिले. त्यानंतर फ्रॉईड कोमामध्ये गेला तो पुन्हा कधीही उठला नाही!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सर्वांना छळणारा गणितातला X नेमका कुठून आला..?

Next Post

आपल्या नागरिकांना दुसऱ्या देशाबाहेर काढण्यासाठी केलेलं हे सगळ्यात मोठं मिलिटरी ऑपरेशन होतं

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

आपल्या नागरिकांना दुसऱ्या देशाबाहेर काढण्यासाठी केलेलं हे सगळ्यात मोठं मिलिटरी ऑपरेशन होतं

मेलेला राजा साधू बनून परत आला, प्रकरण लंडनच्या प्रिव्ही कौन्सिलपर्यंत गेलं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.