The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रसूतीला एक दिवस बाकी असताना ती ‘कोरोना टेस्टिंग किट’ बनवण्यासाठी झटत होती

by द पोस्टमन टीम
29 March 2020
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

कोरोना व्हायरसचा विळखा एकीकडे जगभरात वाढत जात आहे. अमेरिकेतील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने १ लाखाचा पल्ला ओलांडला असून भारतात मात्र ह्या व्हायरसची बाधा झालेल्या लोकांची संख्या ही ९७९ वर पोहचली आहे. भारतात कोरोनाबाधितांची संख्या कमी असण्याचे सर्वात मोठे कारण हे सांगितले जात आहे की भारतात कोरोनाच्या चाचणीचे प्रमाण हे फार अत्यल्प असून त्यामुळे अनेक कोरोना बाधितांची ओळख सरकारला पटवता आलेली नाही.

भारतात कोरोना बाधितांची ओळख पटवण्यासाठीची जी चाचणी केली जाते त्यासाठी लागणाऱ्या किट्सचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे रुग्णांची ओळख पटवण्यात अडचण येत आहे. जेवढ्या किट्स उपलब्ध आहेत त्या परदेशातून आयात करण्यात येत आहे. किट्सचे कमी प्रमाण आणि चाचणीचे निकाल येण्यासाठी लागणारा कालावधी यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची ओळख पटवण्यात अपयश येत असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय ह्या एका किटचा खर्च ४,५०० इतका आहे.

परंतु आता ह्या समस्येवर मात करणे शक्य होणार असून पुण्याच्या माय लॅब ह्या संस्थेने तयार केलेल्या नवीन किटच्या माध्यमातून आता कोरोनाची चाचणी मोठ्या प्रमाणावर करून अत्यंत अल्पावधीतच निकाल प्राप्त करता येणार आहे.



या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांची ओळख पटवणे हे अजून सहज होणार आहे. इतकंच नाहीतर ह्या नवीन किट्स संपूर्णतः भारतीय बनावटीच्या असून त्यांच्यासाठी होणारा खर्च हा १२०० रुपये प्रति किट असणार आहे. आधीच्या किट्सच्या तब्बल एक चतुर्थांश किंमतीत ह्या किट्स उपलब्ध होणार असल्यामुळे याचा अनेकांना फायदा होणार आहे. सोबतच या किटच्या बळावर १०० रुग्णांची तपासणी करणे सहज शक्य होणार आहे.

पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने ह्या किटला प्रमाणित केले असून Covid-19 ह्या विषाणूची ओळख पटवण्यासाठी ह्या किट्सचा वापर केला जाऊ शकतो असं प्रमाणपत्र माय लॅबला प्रदान करण्यात आलं आहे.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

ह्या किटचा निर्मितीत माय लॅबच्या डॉ. मीनल भोसले यांचा मोठा वाटा असून त्यांनी नऊ महिन्याच्या गर्भवती असून देखील ह्या किटच्या निर्मितीत आपलं सक्रिय योगदान दिलं आहे.

किटची निर्मिती करून त्या किटला पुढील परीक्षणासाठी पाठवल्यानंतर त्यांनी एका लहान मुलीला जन्म दिला आहे.

डॉ. मीनल भोसले ह्या माय लॅबच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागाच्या प्रमुख व्हायरॉलॉजिस्ट असून त्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर ज्या किट्सच्या निर्मितीला तब्बल तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणे अपेक्षित होते ते काम फक्त काही आठवड्यात करून दाखवले असल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गर्भवती असून देखील राष्ट्रीय आपत्तीच्या काळात त्यांनी आपले कर्तव्य बजावत एक चांगलं उदाहरण समाजासमोर उभं केलं असून देशाच्या आरोग्य क्षेत्राला मोठं योगदान दिलं आहे.

डॉ. मीनल भोसले ह्यांनी एका खाजगी वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की त्यांना जेव्हा ह्या किटच्या निर्मितीसाठी विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांच्या गर्भावस्थेचा नववा महिना सुरू झाला होता. पण त्यांनी ह्या आव्हानाचा स्वीकार केला आणि किटच्या निर्मितीसाठी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी अगदी १८ तारखेपर्यंत ह्या किटच्या निर्मितीसाठी काम केले ज्या दिवशी ही किट केंद्र सरकारच्या अन्न व औषध तपासणी यंत्रणेकडे पाठवण्यात आली. त्या दिवशी संध्याकाळी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मुलीला जन्म दिला.

आता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने ह्या किटला प्रमाणित केल्या नंतर ह्या १५० किट्सची पहिली बॅच मुंबई, बेंगलोर, दिल्ली, गोवा ह्या ठिकाणी रवाना करण्यात आली असून ह्या किटसच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी माय लॅब आणि त्यांच्याशी संबंधित निर्मिती संस्था युद्धपातळीवर काम करत आहेत, अशी माहिती माय लॅबचे प्रमुख गौतम वानखेडे यांनी दिली आहे. ह्या किट्स देशाच्या अनेक भागात लवकरात लवकर मोठ्या प्रमाणावर पोहचवण्यासाठीचे काम आम्ही हाती घेतले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

भारतात कोरोना तपासणीच्या किट्सच्या निर्मितीसाठी अनेक संस्था कार्यरत होत्या पण कोणालाच सलग दहा टेस्टमध्ये एकच रिजलट मिळवण्यात अपयश येत होते पण माय लॅबच्या डॉ. मीनल भोसले यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या टीमने तयार केलेल्या किट्सने सलग दहा टेस्टमध्ये एक समान रिजलट दिल्यामुळे ते शंभर टक्के उपयोगीतेसाठी वापरले जाऊ शकते हे सिद्ध झाले. अन्न व औषधी प्रशासन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांनी प्रमाणित केल्यामुळे माय लॅबच्या ह्या किट्स आता देशभरात पाठवल्या जाणार असून ह्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कोरोना संशयितांचे नमुने तपासले जाणार आहेत.

जेवढ्या जास्त प्रमाणात रुग्णांची ओळख पटवणे शक्य होईल तितक्या जास्त प्रमाणात ह्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होणार आहे. त्यामुळे ह्या किट्स देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचायला हव्यात यासाठी माय लॅब आणि सरकार एकत्रितपणे प्रयत्न करत आहे.

माय लॅब ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून टेस्टिंग किट्स आणि सूक्ष्म जंतू विषयक संशोधनात कार्यरत असून त्यांनी आता पर्यंत एचआयव्ही, हेपीटायटीस बी ह्या सारख्या आजरांच्या निदान करणाऱ्या टेस्टिंग किट्सची निर्मिती केली आहे.

डॉ. मीनल भोसले यांच्या कार्याचे आणि समर्पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा आणि अभिनेत्री सोनी राजदान यांनी देखील समाज माध्यमातून डॉ. मीनल भोसले यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हा गोव्याचा डॉक्टर प्लेगच्या साथीत मुंबईकरांसाठी देवदूत ठरला होता

Next Post

दूरदर्शनवरील या १० मालिकांच्या आठवणी तुम्हाला तुमच्या बालपणात घेऊन जातील

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
Next Post

दूरदर्शनवरील या १० मालिकांच्या आठवणी तुम्हाला तुमच्या बालपणात घेऊन जातील

महाभारत मालिकेबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.