The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा ‘सील’ रोज पाण्यातून बाहेर येऊन, रस्ता ओलांडून दुकानात जाऊन मासे खायचा

by द पोस्टमन टीम
21 June 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आयर्लंडमधील एरवी कोणालाही माहिती नसणारं एक गाव, विकलो, हे पर्यटकांसाठी एका वेगळ्याच कारणासाठी आकर्षणाचं कारण बनलं. विकलोला जगात प्रसिध्द करण्याचं काम सॅमी या माशानं केलं.

माशांच्या दुकानात जाऊन मासे खाणारा हा सिल मासा, सॅमी, जगभर व्हायरल झाला होता आणि लोकांनी विकलोला आवर्जून भेट देण्यास सुरवात केली.

आयर्लंडमधील विकलो गावातील सेलिब्रेटी आहे, सॅमी सिल मासा. विकलो शहरातील दक्षिण कवे येथील रहिवाशांसाठी आता एक चित्र नवीन राहिलं नव्हतं.

दिवसातून तीन वेळा एक सील मासा, ज्याचं नाव सॅमी आहे, पाण्यातून बाहेर येतो आणि रस्त्यापलीकडील एका मच्छीमाराच्या दुकानात जातो. आपल्या खाऊची मागणी करतो आणि दुकानदारानं हातात मासा घेतलेला दिसला की पुन्हा पाण्यात जाऊन शहाण्यासारखा आपला खाऊ खातो.

मात्र हे चित्र जगभरात औत्सुक्याचा विषय बनलं आणि लोक विकलोला आवर्जून भेट देऊ लागले. तोंडानं मोठमोठ्यांदा आवाज काढत सॅमी हट्टानं आपला खाऊ मागतो आणि दुकानदार त्याला रस्ता ओलांडू देत नाही हे चित्र अत्यंत मजेशिर दिसतं.



२०१२ पासून हा सील विकलोमध्ये दिसू लागला. आता तर शहरानं त्याला आपला अधिकृत मॅस्कॉट म्हणूनही स्वीकारलं आहे. विकलोमध्ये सॅमीचं चित्र असणारे टी-शर्टही विकले जाऊ लागले. ज्यांना सॅमीचं दर्शन होतं, अर्थात खाऊसाठी रस्ता ओलांडताना, ते याचा पुरावा म्हणून आवर्जून हा टी-शर्ट खरेदी करतात.

२०१४ पर्यंत सॅमी आणि त्याचे रस्ता ओलांडण्याचे उपद्व्याप फ़ारसे कोणाला माहिती नव्हते मात्र २०१४ सालच्या एका व्हिडिओनं सॅमीला फेमस केलं. या व्हिडिओमध्ये तो रस्ता ओलांडून माशांच्या दुकानात जाण्याचा प्रयत्न करत आहे तर मासेविक्रेता त्याला रस्ता ओलांडण्यापासून मज्जाव करत आहे. यासाठी या मासेविक्रेत्यानं हातात एक प्लॅस्टिकची खुर्ची घेतलेली आहे आणि तो सॅमीचा रस्ता अडवत आहे. मात्र सॅमी चिकाटी न सोडता रस्ता ओलांडत आहे असा एक मजेशीर व्हिडिओ कोणीतरी शूट करून पोस्ट केला आणि बघताबघता सॅमी जगभर प्रसिध्द झाला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

ॲलनकडे खाऊचा हट्ट करणारा सॅमी आणि त्याला पुन्हा नदीत पाठवणारा ॲलन हा व्हिडिओ लोकांना इतका आवडला की त्यालाही प्रचंड हिट्स आणि लाईक्स मिळाले.

लाईटमनहाऊस रेस्टॉरंट आणि फ़िशमॅन सिल फ़्रिक्वेण्टस या मासे विक्रीच्या दुकानाचे मालक ॲलन हेगर्टी यांचा आणि सॅमीचा माशांसाठीचा हट्ट यांचा संबंध आहे. २०१२ मध्ये ॲलन आणि लिझ या दांपत्यानं फ़िशमॅन चालू केलं. अनेक वर्षं दारोदारी जाऊन फ़िश व्हॅनमधून मासे विकल्यानंतर पैसे साठवून त्यांनी हे दुकान चालू केलं. त्यानंतर २०१५मध्ये फ़िशमॅन त्यांनी दुकानाच्याच बाजूला “द लाईट हाऊस” हे रेस्टॉरंटही चालू केलं.

दुकान चालू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात ॲलनला नदीतून डोकं बाहेर काढून रस्त्याकडे बघणारा सॅमी दिसला आणि ॲलननं कौतुकानं एक माशाचा तुकडा नेऊन सॅमीला खाऊ घातला. त्यानंतर आठाडाभर सॅमी गायब होता. ॲलनला तो पुन्हा दिसला नाही. मात्र आठवड्याभरानंतर पुन्हा एकदा सॅमी किनार्‍यावर अवतरला आणि ॲलननं पुन्हा एकदा त्याला मासा खाऊ घातला. सकाळी मासा खाऊन झाल्यावर दुपारी पुन्हा सॅमी किनार्‍यावर आला आणि ॲलननं पुन्हा त्याला खाऊ घातलं.

त्यानंतर दिवसातून तीन वेळा अक्षरशः घड्याळ लावल्यासारखा सॅमी किनार्‍यावर येऊ लागला आणि ॲलन त्याला खाऊ घालू लागला. आता सॅमी नदीतून बाहेर येत सरळ दुकानाला भेट देऊ लागला आणि तिथून हा सिलसिला चालू झाला. 

खाऊसाठी तीन वेळा किनार्‍यावर येणं अगदी नियमित चालू असतं मात्र केवळ समुद्री वादळं आणि सॅमच्या मेटींग सिझनच्यावेळेस या भेटींमध्ये खंड पडतो. मात्र सॅमला जो खाऊ दिला जातो तो तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच दिला जातो जेणेकरून त्याच्या तब्येतीला त्रास होऊ नये. एवढंच काय तर, सॅमीचा वाढदिवसही ॲलन धुमधडाक्यात साजरा करतो. त्याच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सीफूड फ़ेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येतं. या फ़ेस्टीव्हलमधून जे उत्पन्न मिळतं त्याचा वापर समाजपयोगी कामासाठी भरगोस देणगी देऊन करण्यात येतं.

सॅमीला भेटायचं असेल तर ॲलनला शोधावं लागतं हे आता विकलोला भेट देणार्‍यांना माहिती आहे. त्यामुळे त्याच्या दुकानात सॅमी कुठे आहे आणि कधी दिसेल? अशी चौकशी करण्यासाठी सतत लोक येत असतात. ॲलनही हे काम आनंदानं करतो मात्र कुठेतरी त्याला काळजीही वाटते, कारण व्यवसाय-वृध्दीसाठी सॅमीचा उपयोग झाला असला तरीही त्याच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ नये असं ॲलनला वाटतं.

पर्यटकांचा अती उत्साह सॅमीसाठी घातक ठरू नये असं त्याला वाटतं. कितीही झालं तरी तो एक प्राणी आहे आणि जर त्यानं चुकून ह*ल्ला केला तर त्यातून गंभीर घटना घडू शकतात असं त्याला वाटतं. तसेच तो पर्यटकांना विनंती करतो की सॅमीला खाऊ घालू नका, उत्साहाच्या भरात त्याला सतत खाऊ घातल्यानं त्याच्या तब्येतीवर त्याला परिणाम होईल. सॅमीला ॲलन अगदी नियमित खाऊ घालत असला आणि सॅमी त्याच्याशी ओळख दाखवत असला तरीही ॲलननं कधीच त्याला माणसाळवण्याचा प्रयत्न केला नाही.

सुरवातीला एकटाच येणारा सॅमी मध्यंतरी आपल्यासोबत त्याची एक मैत्रीणही घेऊन आला होता. मात्र त्यानंतर ती कधीच त्याच्यासोबत दिसली नाही.

आपल्या अन्नदात्याला सॅमी उत्तम ओळखू लागला आणि रात्री जेव्हा ॲलन घरी जाण्यासाठी कारकडे येत असे तेव्हा सॅमी त्याच्या कारजवळ जणू काही गुडनाईट म्हणून निरोप द्यायला आल्यासारखा आढळू लागला. सॅमी ॲलनसाठी गुडलक घेऊन आला होता. अनेक वर्षं कष्टात काढल्यानंतर सॅमीच्या रुपानं ॲलनच्या व्यवसायाला आयती प्रसिद्धी लाभली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

फेमस ‘ह्युगो बॉस’ ब्रँडने त्यांच्या काळ्या इतिहासाबद्दल माफी मागितली आहे..!

Next Post

सीरियातील ऐतिहासिक अलेप्पो शहराच्या जागी आता फक्त मातीचे ढिगारे उरलेत..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

सीरियातील ऐतिहासिक अलेप्पो शहराच्या जागी आता फक्त मातीचे ढिगारे उरलेत..!

या यु*द्धनीतीमुळे मंगोल राजांनी एवढं बलाढ्य साम्राज्य उभं केलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.