The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या स्टार्ट-अपमुळे लाखांच्या शस्त्रक्रिया काही हजारात होणं शक्य झालंय

by द पोस्टमन टीम
26 March 2025
in विज्ञान तंत्रज्ञान, आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


गेल्या काही वर्षांत आरोग्य सुविधा क्षेत्रात नवनवीन  तंत्रज्ञान येत आहे, रोज नविन शोध लागत आहेत आणि रूग्णांना उपचारात मदत करणारी तंत्र-यंत्रं विकसीत होत आहेत. असंच एक तंत्रज्ञान आहे, थ्री-डि प्रिंटिंग. या तंत्रज्ञानाची डॉक्टर्सना शस्त्रक्रिया करताना खूप मदत होत आहे. मुंबईतील अनॉटोमिझ-३-डी ही या क्षेत्रात झपाट्यानं पुढे जाणारी कंपनी आहे. काय आहे हे थ्री डी प्रिंट तंत्रज्ञान? जाणून घेऊया –

३डी प्रिंट भारतात आणणार्‍यात साहस सॉफ़्टेकचा सहभाग महत्वाचा आहे. साहस सॉफ़्टेक एलएलपीची स्थापना २०१२ साली मुंबईत झाली. भारतात थ्री डी प्रिंट हा प्रकार अगदीच नवीन होता, त्या काळात आरोग्य व्यवस्थेच्या क्षेत्रात थ्री डी प्रिंटचं तंत्रज्ञान आणून साहसनं एक वेगळं पाऊल उचललं. दीडशे इस्पितळांसोबत काम करत त्यांनी ही सुविधा भारतात रूजवली. या दीडशे इस्पितळांमधे मॅक्स, अपोलो आणि एम्स, दिल्ली यांचाही समावेश होता.

हा व्यवसाय मुळात सुरुच कसा झाला किंवा साहसची स्थापना कशी झाली याची कथा रोचक आहे. हे सगळं गुगल सर्चमुळे शक्य झालं किंवा असं म्हणावं लागेल की या व्यवसायाच्या संकल्पनेचा पाया गुगल सर्चमधे रचला गेला. त्याचं झालं असं की, सागर शाह आणि सोहराब कोठारी हे दोन तरूण त्यांच्या नोकरीतल्या रूटीनला कंटाळले होते. काहीतरी वेगळं करायचं मनात होतं, मात्र वेगळं म्हणजे काय? असं इतर लाखोंप्रमाणेच त्यांनाही पडलेलं कोडं होतं.

हे कोडं अचानक एक दिवस सोडवलं गुगल सर्चनं. काहीतरी व्यवसाय करू असा विचार करून कोणत्या प्रकारचा, कोणत्या क्षेत्रातला व्यवसाय करावा? याबद्दल त्यांची रेकी चालली होती. गुगलमध्ये त्यांनी सर्वोच्च पाच व्यवसाय कोणते? असा सर्च टाकला आणि जी यादी आली त्यात ३ डी प्रिंट हा पर्याय दिसला. ही संकल्पना नेमकी काय आहे? याचा अभ्यास करत गेल्यावर त्यांना या क्षेत्रात रूची निर्माण झाली. देशात तोवर ही संकल्पना नविन होती. तिनं इतकं मूळ धरलं नव्हतं. जे क्षेत्र नवीन  ते दीर्घकालीन फ़ायद्याचं हा व्यवसायाचा प्राथमिक नियम आहे.



लोकांना फ़ारसा माहित नसलेला व्यवसाय चालवण्यात धोका असला तरिही एकदा लोकांना संकल्पना पटली की जे पहिले ते नफ़ा मिळवून जातातच. याच नियमाला धरून सागर आणि सोहराब यांनी साहस सॉफ़्टेक एल एल पी ची २०१२ साली मुंबईत स्थापना केली.

स्थापनेनंतर तीन वर्षांनी सोहराब यांच्या भगिनी फ़िरोजा कोठारी देखील या व्यवसायात सामिल झाल्या. फ़िरोजा कोठारी बायोटेक इंजिनियर असल्यानं त्यांचं सहभागी होणं एका नविन क्षेत्राची दारं उघडणारं ठरलं. हे क्षेत्र होतं, आरोग्य सुविधा क्षेत्र. २०१५ मधे ॲन्टोमिझ ३ डी ची स्थापना झाली आणि याद्वारे केवळ आरोग्य विभागातील ३ डी प्रिंट्ची सुविधा सुरू करण्यात आली. कालांतरानं साहस आणि ॲण्टोनिझ ३ डी विभक्त झाल्या. दोघांनीही स्वतंत्रपणे काम करण्यास सुरवात केली.

सुरवातीच्या काळात फ़िरोजा डॉक्टरांना भेटून अक्षरश: हे तंत्रज्ञान बसून समजावून सांगत असत कारण डॉक्टर्सचा यावर पटकन विश्वास बसत नसे. काही झालं तरीही रूग्णांच्या जीवाचा, आरोग्याचा प्रश्न असल्यानं कितीही नवं तंत्रज्ञान असलं तरीही त्याचा वापर पटकन केला जात नव्हता.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

हळूहळू डॉक्टर्सनाच पटू लागलं. या तंत्रज्ञानामुळे उलट शरीराच्या ज्या भागात काही बिघाड आहे तो जास्त व्यस्थित समजतो आहे हे लक्षात आल्यावर त्याचा वापर वाढला.

सामान्यांना समजायला हे तंत्रज्ञान थोडं किचकट असलं तरीही ते कसं वापरतात हे थोडक्यात आणि सोप्या शब्दात सांगायचं तर, ज्या भागाची शस्त्रक्रिया करायची आहे त्याचं ३ डी मॉडेल बनवलं जातं आणि डॉक्टर गुंतागुंतीची असलेली शस्त्रक्रिया या मॉडेलवर करून बघतात. वास्तवातल्या शस्त्रक्रियेचा नेमका अंदाज यामुळे सहजपणानं येत असल्यानं किचकट शस्त्रक्रियांसाठी याचा वापर होऊ लागला आहे. बरेचदा अस्थिरोगतज्ज्ञांना हाडांना ड्रिल करावं लागतं. ते नेमकं कोणत्या बिंदूवर आणि कोणत्या कोनात करायला हवं आहे हे या ३ डी प्रिंटमुळे कळतं.

एका लहानग्या बाळाच्या अशाच एका गुंतागुतीच्या ह्रदयशस्त्रक्रियेसाठी ॲण्टोनिमिझनं ३ डी प्रिंट मॉडेल बनवलं आणि डॉक्टरांचा भार हलका केला. वास्तवातली शस्त्रक्रियाही किचकट असली तरीही या प्रिंटमुळे नेमकं काय करायचं आहे याचा अंदाज आल्यानं त्याची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी मदतच झाली.

आजच्या घडीला ॲन्टोनिझ ३डी देशभरातील दीडशेहून अधिक इस्पितळांशी संलग्न आहे. कोची एम्स, एम्स दिल्ली, मॅक्स, लीलावती, अपोलो ही त्यापैकी काही नावं.

आरोग्यसुविधा क्षेत्रातील ॲण्टोनिमिझनं जे यश अल्पावधित मिळवलं आहे त्याचं सर्व श्रेय निश्चितपणे फ़िरोजा यांना जातं. आता भारतात हे तंत्रज्ञान नविन राहिलं नसलं तरीही अजूनही त्याचा म्हणावा असा वापर वाढलेला नाही. सोहराब याचं कारण सांगताना सांगतात की, भारत हा किंमतीच्या दृष्टीनं संवेदनशील असा देश आहे. कोणतीही आरोग्य सुविधा खिशाला परवडणारी असेल तरच ती घेतली जाते. महागड्या आणि अत्यावश्यक नसणार्‍या सुविधा शक्यतो टाळण्याकडेच कल असतो. याचा विचार करूनच ॲण्टोनिमिझनं आपल्या किंमती सामान्यांनाही परवडू शकतील इतपत ठेवल्या आहेत.

आजच्या घडीला साधारण १२०० प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये या तंत्रज्ञानाची मदत घेता येऊ शकते

या तंत्रज्ञानाचा सर्वांत जास्त वापर अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडा या देशांत केला जातो. यासाठी लागणारा बहुतांश कच्चा माल चीनमधून येतो. या तंत्रज्ञानाची किंमत एक लाखापासून चालू होऊन दहा कोटींपर्यंत जाते. यामुळेच ही रूग्णालाही ही सुविधा महाग पडते.

करोना काळात कंपनीने त्यांच्या उत्पादनांत थोडा बदल केलेला आहे. काळाची मागणी आणि गरज लक्षात घेऊन फ़ेस मास्क आणि शिल्डचं उत्पादन ॲण्टोनिमिझनं चालू केलेलं आहे. सतत मास्क वापरून त्या इलास्टिकचा कानामागे त्रास होतो. हे लक्षात घेऊन तसे मास्क बनवले जात आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एवढा मोठा माणूस असूनही ‘जॅक मा’चा नेमका काय कार्यक्रम झालाय कळायला मार्ग नाही

Next Post

याने माफीचा साक्षीदार बनून अमेरिकेतल्या माफियांची सिक्रेट दुनिया उघड केली होती, पण…

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
Next Post

याने माफीचा साक्षीदार बनून अमेरिकेतल्या माफियांची सिक्रेट दुनिया उघड केली होती, पण...

एका पोरीसाठी या कार्यकर्त्याने हि*टल*रला सॅल्यूट ठोकायला नकार दिला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.