The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

साबू दस्तगीर – ‘हॉलीवूड वाॅक ऑफ फेम’मध्ये नाव कोरणारा एलिफंट बॉय

by द पोस्टमन टीम
5 December 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


प्रियांका चोप्रा, ओम पुरी, इरफान खान, यांच्याही आधी भारतातील एका कलाकाराने आंतरराष्ट्रीय चित्रपटांत आपल्या अद्भुत कलाकारीचा ठसा उमटवला होता. उलट, असे म्हणता येईल की, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अभिनयाच्या माध्यमातून भारताचे नाव उज्ज्वल करणारे ते पहिले भारतीय होते.

या पहिल्या आंतरराष्ट्रीय भारतीय कलाकाराचे नाव होते, दस्तगीर साबू. वयाच्या तेराव्या वर्षीच यांना थेट हॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचे सोने केले. साबू दस्तगीरचे मूळ नाव होते सेलर शेख साबू. परंतु, हॉलीवूडमध्ये तो फक्त साबू याच नावाने ओळखले जायचे.

साबुंचा जन्म १९२४ साली म्हैसूर प्रांतात झाला. म्हैसूरच्या संस्थानिकांच्या हत्तींची देखभाल करण्याची जबाबदारी साबुंच्या वडिलांकडे होती. अर्थातच, वारसाहक्काने साबूही म्हैसूरच्या महाराजांकडे माहूत म्हणून काम करू लागले.

त्यावेळी पाश्चिमात्त्य चित्रपट निर्देशक रॉबर्ट जे. फ्लॅहर्टी भारतात आले होते. त्यांना रूडयार्ड किप्लिंगच्या “Toomai of the Elephants” या पुस्तकावरून फिल्म बनवायची होती. यासाठी त्यांना हत्तीची सवारी करता येणारा एक छोटा मुलगा हवा होता. त्यांची नजर म्हैसूरच्या महाराजांकडे माहूत म्हणून काम करणाऱ्या ‘साबू’वर पडली आणि या चित्रपटासाठी त्यांनी साबूचेच नाव निश्चीत केले.



साबू नऊ वर्षांचा असतानाच त्याचे आई-वडील स्वर्गवासी झाले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने फ्लॅहर्टीने त्याला आणि त्याच्या छोट्या भावालाही स्वतः सोबत इंग्लंडला नेले. कारण, या चित्रपटाचे चित्रीकरण तिकडेच केले जाणार होते.

१९३७ साली आलेला ‘एलीफंट बॉय’ हा साबू दस्तगीर यांचा पहिला हॉलीवूड चित्रपट. हा चित्रपट त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाला. यातील साबुची भूमिका तर प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली होती. समीक्षकांनीही पूर्णतः नैसर्गिक अभिनय म्हणत या भूमिकेचे कौतुक केले होते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

या चित्रपटाचे निर्माते अलेक्झांडर कोर्दा यांनी साबूतील उपजत अभिनय गुण ओळखला. शिवाय, साबूमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे आणि त्यांना आकर्षित करण्याचेही अनोखे कौशल्य होते.

त्यांनी साबूबरोबर आणखी काही चित्रपटांची निर्मिती करायचे ठरवले. त्यानंतर १९३८ साली कोर्दा यांचा ड्रम हा पहिला रंगीत सिनेमा आला. यामध्येही साबुने काम केले. त्यानंतर १९४० साली कोर्दा यांनी साबुला घेऊन ‘द थीफ ऑफ बगदाद’ हा चित्रपट केला.

हा काळ दुसऱ्या महायु*द्धाच्या सुरुवातीचा होता. या चित्रपटाच्या निर्मितीत खूप अडचणी आल्या. शिवाय, यु*द्धात इंग्लंडचा थेट सहभाग असल्याने हा चित्रपट अमेरिकेत जाऊन चित्रित करायचे ठरले. इतक्या अडचणी पार केल्यानंतर ‘द थीफ ऑफ बगदाद’ने यशाचा एक इतिहास घडवला.

यानंतर आलेल्या अरेबियन नाईट्स आणि जंगल बुक या चित्रपटांनी देखील भरपूर यश मिळवले. साबू यांनी जंगल बुक मधील मोगलीच्या भूमिकेला चांगला न्याय दिला. ॲनिमेटेड मोगली येण्याआधीच्या काळात साबू हाच आपला खरा मोगली होता.

‘द थीफ ऑफ बगदाद’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्याकाळी बराच पैसा खर्च करण्यात आला होता. पण, या चित्रपटाला स्पेशल इफेक्ट्स, सिनेमॅटोग्राफी आणि आर्ट डिरेक्शनसाठी अकॅडमी अवार्ड्सदेखील मिळाले. या चित्रपटातील साबुची भूमिकाही संस्मरणीय ठरली.

अरेबियन नाईट्स (१९४२), व्हाईट सॅव्हेज (१९४३), कोब्रा वूमन (१९४४) आणि टँगीअर (१९४६) या चित्रपटांनी साबूची फिल्म इंडस्ट्रीत एक वेगळी इमेज बनली.

१९४४ साली त्याला अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. त्याकाळी अनेक हॉलीवूड स्टार यु*द्धात सरकारला मदत करत होते. साबूने देखील अमेरिकन सैन्यात प्रवेश केला.

या सगळ्या गदारोळात त्याचे अभिनयाचे काम मागे पडत गेले. त्याच्या आशियाई असण्याने आणि दिसण्याने त्याला अमेरिकन चित्रपटात मुख्य भूमिका मिळणे अगदी मुश्कील होते.

चित्रपटात पुन्हा एकदा नशीब आजमावण्याच्या हेतूने तो इंग्लंडला परत आला. १९४७ मध्ये त्याचा ब्लॅक नार्सिसस हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याने राजकुमाराची भूमिका वठवली होती. लागोपाठ आलेल्या “द एंड ऑफ द रिव्हर (१९४७)” मध्ये त्याला लीड रोल मिळाला. या चित्रपटाची कथा ब्राझीलच्या पार्श्वभूमीवर बेतलेली होती. यामध्ये साबुने ॲमेझॉनियन व्यक्तीची भूमिका वठवली होती.

५० च्या दशकात त्याच्या चित्रपट कारकिर्दीला ओहोटी लागली. तरीही त्याला मिळालेल्या संधी पाहता चित्रपटात त्याने चांगलेच यश कमावले होते, असे म्हणता येईल. चित्रपट क्षेत्र त्याला हुलकावणी देत असले तरी, आपल्या भावासोबत मिळून त्याने रिअल इस्टेट क्षेत्रात चांगला जम बसवला होता.

द मॅन-इटर ऑफ कुमाऊँ हा त्याचा आणखी एक चित्रपट, १९४८ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या सेटवर त्याची भेट अभिनेत्री मार्लिन कुपर हिच्याशी झाली. त्याच वर्षी दोघेही विवाहबंधनात अडकले.

१९५० मध्ये साबू भारतात आला. असे म्हटले जाते, की मेहबूब खान यांनी मदर इंडियातील बिरजूच्या भूमिकेसाठी साबूचा विचार केला होता. साबूलाही ही भूमिका करण्याची मनापासून इच्छा होती. पण, तो अमेरिकेचा नागरिक असल्याने त्याला भारतात काम करण्यासाठी लागणारे वर्क परमिट न मिळाल्याने तो या चित्रपटात काम करू शकला नाही. नंतर सुनील दत्त यांना ही भूमिका मिळाली.

भारतीय चित्रपटात काम करण्याची त्यांची इच्छा कधीच पूर्ण झाली नाही.

भावासोबतच्या रिअल इस्टेटच्या व्यवसायातही त्यांना काही काळ नुकसान सहन करावे लागले. एकेकाळी हॉलीवूड स्टार असलेल्या या कलाकाराचे नाशिब अगदी उलट दिशेने फिरले होते. यावेळी साबू यांनी सर्कशीतही काम केले. अशा कठीण परिस्थिती पत्नी कुपर हिने त्यांना भक्कम साथ दिली. त्यानतंर १९६० मध्ये मिस्ट्रेस ऑफ द वर्ल्ड आणि १९६३ रॅम्पेज हे दोन चित्रपट मिळाले.

वयाच्या ३९ व्या वर्षी म्हणजे ऐन तारुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच वर्षी त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचा अ टायगर वॉक्स हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला.

यामध्ये त्यांनी भारतीय प्राणी प्रशिक्षकाची भूमिका वठवली आहे, जो एका बंगाली वाघाला माणसाळण्याचा प्रयत्न करत असतो. वयाच्या तेराव्या वर्षी ‘इलेफंट बॉय’पासून सुरु झालेल्या या प्रवासाचा इथे शेवट झाला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: sabu dastagir
ShareTweet
Previous Post

सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली बॉलीवूडने आजवर इतिहासाची बरीच वाट लावलेली आहे

Next Post

दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

दोन भावांच्या टोकाच्या वादातून 'आदिदास' आणि 'पुमा' या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

MX प्लेयर वर फुकट असलेल्या या मराठी वेब सिरीज आवर्जून पाहा

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.