The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंजे, मुसोलिनी आणि रा.स्व.संघ…

by Nachiket Shirude
9 June 2020
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

डॉ. बळीराम शिवराम मुंजे हे हिंदू महासभेच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यांनी १९२७ ते १९३७ या काळात हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेत त्यांनी एक मोठी भूमिका बजावली होती. ते डॉ. हेडगेवारांचे वैचारिक गुरु होते. त्यांनीच डॉ. हेडगेवारांना हिंदूंचे सांस्कृतिक संघटन करण्याची प्रेरणा दिली होती.

स्वातंत्र्यपूर्व भारतातील राजकारणात डॉ. मुंजे हे नाव विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी आणलेला राजा-मुंजे पॅक्ट असो, नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाच्यावेळी घेतलेली भूमिका असो, गांधीशी हिंदू हिताच्या केलेल्या गुजगोष्टी असो अथवा गोलमेज परिषदेत आंबेडकरांची घेतलेली बाजू असो, सर्वच बाबतीत डॉ. मुंजे यांचे कार्य हे अगदी ठळकपणे दिसून येते.

justdial.com

त्यांनी नाशिकच्या सुप्रसिद्ध भोसला मिलिटरी स्कुलची स्थापना केली. तसेच डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडेमीच्या स्थापनेत डॉक्टर मुंजेंनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.



एकंदरीत डॉ. मुंजे यांचे चरित्र हे विविध छटांनी व्यापलेलं आहे. डॉ. मुंजेंनी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान भारतीय नेत्यांसोबत कामकाज केलेलं आहे.

या सर्व व्यक्तींच्या चरित्रात डॉ. मुंजे यांचा उल्लेख हमखास येत असतो. पण इतिहासातील अजून एक व्यक्ती आहे, जिच्या चरित्रात डॉ. मुंजे यांचा उल्लेख येतो. फरक इतकाच आहे ही व्यक्ती, आपल्या क्रूरतेसाठी आणि विध्वंसासाठी प्रसिद्ध होती.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

ती व्यक्ती म्हणजे इटलीचा दिवंगत हुकूमशहा आणि फॅसिस्ट तत्वाचा प्रचारक बेनिटो मुसोलिनी होय..!

बेनिटो मुसोलिनी हा इटलीतल्या प्रसिद्ध फॅसिस्ट पार्टीचा प्रमुख होता. त्याने हिटलरसोबत एकत्र येऊन दुसऱ्या महायुद्धात नरसंहार केला होता. पुढे त्याला त्याचाच देशातल्या लोकांनी मारलं होतं. मुसोलिनीच्या क्रूरतेचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. पण डॉ. मुंजे यांनी त्यांची भेट घेतली होती. इतकंच नाही, ते रोम शहरात काही काळ वास्तव्यास होते.

Amar Ujala

अनेक इतिहासकारांच्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राष्ट्रव्यापी संघटन उभारण्यासाठी त्यांनी युरोपात दौरा केला होता. त्यांनी त्या दौऱ्यात युरोपातल्या काही महत्वपूर्ण शहरांना भेटी दिल्या होत्या. त्यांनी अनेक शिक्षणसंस्थांना भेटी दिल्या होत्या. यादरम्यान त्यांनी इटलीला देखील भेट दिली.

त्यांनी आपल्या इटली प्रवासाचे आणि मुसोलिनीच्या भेटीचे वर्णन आपल्या डायरीत करून ठेवले आहे. ही डायरी नेहरू मेमोरियलला उपलब्ध असून यात तब्बल १३ पानांचा मजकूर इटलीभेटी संदर्भातला खासकरून मुसोलिनी भेटी संदर्भातला आहे.

डॉ. मुंजे हे १५ मार्च ते २४ मार्च १९३१ या कालावधीत इटलीत निवासाला होते. त्यांनी आपल्या इटलीतील निवासादरम्यान मुसोलिनीच्या फॅसिस्ट पक्षाच्या कवायती आणि शिस्तीचे बारीक निरीक्षण  केले आणि त्यांनी आपले निरीक्षण वहीत नोंदवले होते.

Making India ⋆ Making India

काही डाव्या इतिहासकारांच्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कवायती शिस्तीमागे फॅसिस्ट इटलीची प्रेरणा असून, डॉ. मुंजेनी मुसोलिनी भेटीत संघाच्या रचनेचा गाभा तयार केला. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी डॉक्टर मुंजेनी संघाची रचना तयार केली, या गोष्टीचा इन्कार केला असून, त्यांनी संघरचनेचं श्रेय डॉ. हेडगेवारांचेच असल्याचं म्हटलं आहे.

परंतु डॉ. मुंजेंनी आपल्या डायरीत केलेल्या नोंदीनुसार तरी त्यांचा मनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फॅसिस्ट पक्षाच्या रचनेनुसार तयार करण्याची इच्छा होती. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं होतं, ‘येथील फॅसिस्ट पक्षाची संघटना, बांधणी आणि राष्ट्रापतीचा समर्पण भाव हा खूप प्रेरणादायी असून, नागपूरमध्ये डॉक्टर हेडगेवारांनी चालवलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला याच दिशेने घेऊन जाण्याचा माझा मानस आहे’

The Indian Express

पुढे तिथल्या सैनिकी गणवेशावर ही डॉ. मुंजे फार भुलले होते. त्यांनी स्पष्ट शब्दात लिहले होते की , ‘इटलीतील या रम्य प्रभात समयि, रस्त्यावर लष्करी गणवेशात असलेले हे युवक आणि युवती, त्यांची सुरु असलेली कवायत, हे सर्वच विलोभनीय असून एका राष्ट्रप्रेमी चैतन्यमय वातावरणात मी वावरत आहे.

१९ मे १९३१ रोजी डॉ. मुंजे यांनी मुसोलिनीची भेट घेतली. मुसोलिनी भेटीचं वर्णन करताना डॉक्टर मुंजे म्हणतात की मुसोलिनीने त्यांचं स्वागत केले. त्यांना खुर्चीवर बसवले. मुसोलिनीच्या मनात महात्मा गांधींविषयी आदर होता, असं नमूद करायला देखील डॉक्टर मुंजे विसरत नाहीत. डॉक्टर मुंजे आणि मुसोलिनी दरम्यान ब्रिटिश साम्राज्य आणि भारतीय स्वराज्य याविषयावर बराच काळ चर्चा झाली.

मुसोलिनीच्या मते भारताने आता लष्करी क्रांतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे होता, मुंजेंनी देखील त्यांना दुजोरा देत, त्यांनी पाहिलेल्या फॅसिस्ट संघटनेच्या कवायती आणि लष्करी शिस्त याविषयी मुसोलिनीजवळ कौतुक केले होते. या स्वरूपाचीच संघटना भारतात उभारण्याचा त्यांचा मानस असल्याचं त्यांनी मुसोलिनीला सांगितलं होतं.

DNA India

डॉ. मुंजे यांनी मुसोलिनीची भेट घेतल्यानंतर भारतात परतल्यावर रा. स्व. संघाच्या लष्करीकरणाचा आग्रह धरला होता. त्यांनी त्यात भूमिका ही बजावली असे म्हणतात. रा. स्व. संघाचा सुरुवातीच्या काळातील गणवेश हा लष्करी पद्धतीचा होता आणि त्या गणवेशाबरोबरच आजची संघाची कवायती पद्धत आणि विविध पद्धती ह्या मुसोलिनीच्या फॅसिस्ट संघटनेशी साधर्म्य साधतात.

हा योगायोग नक्कीच नसावा. डावे इतिहासकार या प्रकाराला लष्करी हिंदुत्वाची सुरुवात मानतात. स्वातंत्र्यवीर सावरकर जे डॉ. मुंजेंनंतर हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले होते, त्यांनी देखील हिंदूंच्या सैनिकीकरणाचा घाट घातला होता.

सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेमागे देखील सावरकर-मुंजेंची प्रेरणा असल्याचे म्हटले जाते.

डॉ. मुंजे यांनी केलेली भोसला मिलिटरी स्कुलची आणि इंडियन मिलिटरी अकॅडेमीची स्थापना, हे देखील मुसोलिनीच्या सैनिकीकरणाच्या सूत्रावर आधारलेले होते. डॉ. मुंजे यांचे कार्य हे भारताच्या तत्कालीन राजकीय क्षितिजावर मोठे होते.

त्यांनी ज्यावेळी इटलीला भेट दिली होती, तेव्हा मुसोलिनीला एक उत्तम शासक म्हणून जग बघत होतं. पण दुसऱ्या महायुद्धावेळी त्याने आपले रंग दाखवले. महायुद्धानंतर डॉ.मुंजे यांचे मुसोलिनीविषयीचे मत काय होते, हे दुर्दैवाने कोणी नोंदवू शकले नाही.

सुभाषबाबूंनी घेतलेली हिटलरची भेट ही राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी होती पण डॉ. मुंजे यांनी घेतलेली मुसोलिनीची भेट ही स्वातंत्र्याचा उद्देशाने होती की हिंदुत्वाच्या सैनिकीकरणासाठी हे मात्र निश्चितपणे सांगता येणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

 

Tags: Benito Mussolini
ShareTweet
Previous Post

पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे वाघांच्या जीवनचक्रावर होतोय ‘हा’ गंभीर परिणाम

Next Post

‘स्त्रीत्वाचाच’ त्याग करून, पुरुषाप्रमाणे राज्य करणारी ‘राणी रुद्रमादेवी’

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

'स्त्रीत्वाचाच' त्याग करून, पुरुषाप्रमाणे राज्य करणारी 'राणी रुद्रमादेवी'

तुर्की कॉफीमुळे एका साम्राज्याचा अस्त होऊन एक स्वतंत्र देश अस्तित्वात आला होता !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.