The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या माणसाने तब्बल ७७ वर्षं एकच रोल्स रॉयस चालवली..!

by द पोस्टमन टीम
19 August 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आपल्याजवळ असलेल्या काही वस्तूंचा आपल्याला खूप लळा असतो. त्यांना जपण्यासाठी आपण जीवाचा आटापीटा करतो मात्र, त्यांना काही होऊ देत नाही. पण, माझा एक प्रश्न आहे. एखादी वस्तू तुम्ही किती दिवस सांभाळू शकता? ती तुम्हाला कितीही आवडत असली, तिच्यावर तुमचा कितीही जीव असला तरी एक दिवस ती खराब होणार किंवा आपल्यालाच तिचा कंटाळा येईल. मात्र, आज मी तुम्हाला अशा व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे, जिनं दहा नाही वीस नाही तर तब्बल ७७ वर्ष आपली आवडती गाडी सांभाळली. फक्त सांभाळलीच नाही तर ती चालवली देखील! मॅथ्यू ॲलन स्विफ्ट, असं या हौशी माणसाचं नाव आहे. त्यांनी आपल्या मृत्यूपर्यंत रोल्स रॉयस ही गाडी अगदी व्यवस्थित सांभाळली.

मॅथ्यू ॲलन स्विफ्ट हे अमेरिकेतील वेस्ट हार्टफोर्डचे रहिवासी होते. स्विफ्ट कुटुंब सोन्याच्या व्यवसायात होतं आणि मॅथ्यू ॲलन या कुटुंबाच्या पाचव्या पिढीतील होते. ग्रॅज्यूएशन पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या वडिलांना त्यांना पिढीजात सोन्याचा व्यवसाय चालवण्याची गळ घातली. जर ॲलन यांनी व्यवसायात हातभार लावला तर त्याला हवी असलेली कार देण्याचं वचन पालकांनी दिलं. ॲलन यांनी कौंटुबिक व्यवसायात प्रवेश करत, पालकांकडून रोल्स रॉयस कारचं ‘१९२८ स्प्रिंगफील्ड फँटम I, एस २७३ एफपी’ हे मॉडेल घेतलं. त्यावेळी या गाडीची किंमत १० हजार ९०० डॉलर्स इतकी होती.

त्यांनी ७७ वर्षे ही गाडी सांभाळली. इतक्या प्रदीर्घ काळ स्प्रिंगफील्ड रोल्स रॉयस कारचा मालक असल्याचा रेकॉर्ड ॲलन यांच्या नावावर आहे. १ लाख ७० हजार मैल चाललेली या गाडीला त्यांनी अगदी आपल्या पोटच्या मुलांप्रमाणं जीव लावला. आपल्या मृत्यूनंतर गाडीचं काय होईल या चिंतेतून त्यांनी मृत्यूच्या दोन महिने अगोदर गाडी आणि दहा लाख डॉलर्सची रक्कम ‘स्प्रिंगफील्ड संग्रहालयाला देऊन टाकली.

मॅथ्यू ॲलन स्विफ्टचे आजोबा १८६४ मध्ये इंग्लंडमधील शेफिल्ड येथून अमेरिकेत आले होते. तेव्हा सोन्याचा व्यवसाय हा हार्टफोर्डमधील एक सुरक्षित उद्योग होता. एक कुशल कारागीर म्हणून त्यांना जे एम नेय अँड कंपनीमध्ये नोकरी मिळाली. त्यावेळी सोने प्रक्रिया उद्योगातील ती सर्वात मोठी कंपनी होती. त्याठिकाणी प्रामुख्यानं सोन्याचे लहान लहान आकाराचे पत्रे तयार केले जात.

ॲलनच्या आजोबांनी त्या कंपनीत २५ वर्षे काम केलं. यादरम्यान, त्यांनी स्टेट कॅपिटल इमारतीच्या घुमटासाठी ४ हजार चौरस फूट सोन्याचा पत्रा पुरवण्याचं महत्त्वाचं काम केलं. १८८७ मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला, लव्हलेनमध्ये खरेदी केलेल्या जमिनीच्या प्लॉटवर बांधलेल्या क्लॅपरबोर्ड हाऊसमध्ये त्यांनी एम स्विफ्ट अँड सन्स नावाची कंपनी स्थापन केली. १९०२ मध्ये स्विफ्ट अँड सन्स ही परिसरातील सर्वात मोठी सोन्याची कंपनी झाली होती. कंपनीत ३२ कामगार होते त्यापैकी अर्ध्या महिला होत्या.



आजोबांच्या मृत्यूनंतर १९१२मध्ये कंपनीची सर्व सुत्रे ॲलनचे वडील आणि काकाकडे आले. त्यानंतर तीनच वर्षात त्याच्या काकाचा देखील मृत्यू झाला. मग मात्र, कंपनीचा सर्व भार ॲलनच्या वडिलांच्या खांद्यावर आला. त्यांनी आपल्या व्यवसाय कौशल्याच्या बळावर कंपनीला एका नवीन उंचीवर नेऊन ठेवलं. कंपनीला मिळालेल्या यशामुळे, त्यांनी लहानशा वर्कशॉपच्या जागी एक मोठा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारला.

त्यावेळी २५ वर्षीय मॅथ्यू ॲलन स्विफ्ट कंपनीच्या तीन संचालकांपैकी एक होते. १९३० मध्ये कंपनीनं १५० हून अधिकजणांना नोकऱ्या दिल्या. तेव्हा कंपनीला अर्जेंटिनाकडून दोन महिन्यांच्या काळात १० हजार सोन्याची पाने पुरवण्याचं काम मिळालं होतं. उत्तर अमेरिकेतील एखाद्या कंपनीनं दक्षिण अमेरिकेतील असं काम मिळवण्याची ती पहिलीच वेळ होती. कारण त्यावेळी दक्षिण अमेरिकन बाजारपेठेत युरोपियन पुरवठादारांचा वरचष्मा होता.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

कंपनीतील घडामोडींवर मॅथ्यू ॲलन स्विफ्टचा मोठा प्रभाव होता. दुसऱ्या महायु*द्धाच्या अखेरीस त्यांची कंपनीचे मुख्य कार्यकारी म्हणून निवड झाली. साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली. त्यांनी फॉइल्सची निर्मिती करण्यासाठी इन्फ्रा-रेड तंत्रज्ञानाला सुरुवात केली होती. ज्यामुळे ‘गोल्डन टच’ डिकल्स तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

१९६८ पर्यंत त्यांचा कारखाना ६१ हजार चौरस फूटांवर विस्तारला होता आणि त्यात ५०० ​​हून अधिक कामगार होते. परंतु, त्याच वर्षी सुवर्ण-मानक काढून टाकण्यात आले, हा निर्णय सोन्याच्या उद्योगासाठी मारक ठरला. त्यात पॉलिमर व अन्य संमिश्र धातुंची प्रगती, आणि सौंदर्य अभिरुचीतील बदलांमुळं, सोन्याच्या मागणीमध्ये हळूहळू घट होत गेली. २००३ मध्ये त्याच्या १०० व्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्थानिक वृत्तपत्रानं मॅथ्यू ॲलनची मुलाखत घेतली होती, तोपर्यंत त्यांची कंपनी जवळपास अकार्यक्षम झाली होती.

ॲलन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सोन्याचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला. आता त्यांचे वारस दुसऱ्या व्यवसांयांमध्ये व्यस्त आहेत. २०१० मध्ये स्विफ्ट कुटुंबानं कंपनीची साइट स्थानिक समुदायाला दिली. ही जागा आता राष्ट्रीय ऐतिहासिक ठिकाण म्हणून सूचीबद्ध केली गेली आहे. २०११ मध्ये, ॲलनचं जुनं घर आणि वर्कशॉपसह इतर इमारतींच्या रिस्टोरेशनचं काम सुरू करण्यात आलं होतं.

आपल्या व्यवसायाव्यतिरिक्त आपल्या गाडीवर अ‌ॅलनचा प्रचंड जीव होता. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ते आपल्या लाडक्या रोल्स रॉयसमधूनचं ऑफिसला गेले. २५ ऑक्टोबर २००५ रोजी वयाच्या १०२व्या वर्षी मॅथ्यु ॲलन स्विफ्ट यांचं निधन झालं. हार्टफोर्डमधील सीडर हिल स्मशानभूमीत त्यांचा दफनविधी केला गेला.

आपल्या मृत्यूच्या दोन महिन्यांपूर्वीच मॅथ्यू ॲलन स्विफ्टनं हार्टफोर्डच्या उत्तरेस असलेल्या स्प्रिंगफील्ड संग्रहालयाला आपली कार आणि देणगी दिली. त्यांना खात्री होती त्या संग्रहालयामध्ये त्यांची प्राणप्रिय गाडी सुरक्षित राहिल. गंमत म्हणजे आता जिथे संग्रहालय आहे त्या स्प्रिंगफील्डमध्ये १९२० ते ३१च्याकाळात रोल्स रॉयसच्या गाड्यांचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट होता. त्याठिकाणी जवळजवळ ३ हजार कार तयार झाल्या होत्या. सध्या अ‌ॅलन यांची कार पहिल्या संग्रहालयाच्या मजल्यावरील ऑटोमोबाईल गॅलरीमध्ये डौलात उभी आहे.

सोन्याचे व्यावसायिक असलेल्या अ‌ॅलन यांच्याकडे पैशाला कमी नव्हती. पाहिजे तेव्हा ते जगातील सर्वोत्तम गाडी आपल्या दारात उभी करू शकले असते. मात्र, त्यांचा जीव आपल्या पहिल्या गाडीमध्ये अडकलेला होता. आपल्याला एखादी गोष्ट वर्षभर देखील नीट सांभाळता येत नाही. त्यांनी मात्र, ७७ वर्ष गाडी व्यवस्थित सांभाळली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

इतिहासाच्या पानात लपवून ठेवलेलं वंचिनाथनचं क्रांतिकार्य सर्वांसमोर येणं गरजेचं आहे..!

Next Post

हावर्ड ह्युजने आयुष्यभर विमानं बनवली, उडवली आणि विमानातच जीव सोडला..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

हावर्ड ह्युजने आयुष्यभर विमानं बनवली, उडवली आणि विमानातच जीव सोडला..!

हॉलिवूड सुपरस्टार 'सिल्व्हस्टर स्टॅलोन'ने हरिद्वारमध्ये त्याच्या मुलाचं श्राद्ध घातलं होतं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.