The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘ऋषी’ आणि ‘मुनी’ : नेमका फरक काय? जाणून घ्या.

by द पोस्टमन टीम
19 April 2025
in ब्लॉग, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


२०२०-२१ मध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी सरकारने रामायण आणि महाभारत या दोन्ही गाजलेल्या मालिकांचे पुन्हा प्रक्षेपण केले. अशा परिस्थितीत रामायण व महाभारताच्या पौराणिक कथांमध्ये अनेक ऋषी- मुनी आपल्याला आढळून येत असतात. जे जंगलात आपल्या आश्रमात वास्तव्यास असतात.

या ऋषि मुनींकडे प्रमुख पात्र विद्यार्जनासाठी जात असतात. अनेकदा आपल्याला ऋषी आणि मुनी हे एकच असतात असं वाटतं. पण धर्मशास्त्राच्या आधारावर बघायला गेलं तर ऋषी आणि मुनी या दोघांमध्ये फरक आहे. तो फरक काय आहे ते आपण जाणून घेऊया.

धर्मशास्त्रानुसार मुनी म्हणजे तो व्यक्ती जो सदैव स्वतःचा शोध घेत असतो आणि आपला बहुतांश वेळ विचार करण्यात घालवत असतो. मुनी ही विचारवंत आणि तत्त्वज्ञाला प्रदान करण्यात आलेली उपाधी आहे. ते निसर्गाच्या संबंधातील उत्कट मानवी धाग्यांचा शोध घेत असतात. त्यांना ज्ञानाच्या कसोटीवर उच्च स्थान प्राप्त असते. त्यांनी अनंत काळ तपश्चर्या आणि साधनेच्या माध्यमातून ज्ञानार्जन केलेले असते.

वेद हे ज्ञानाचा अगम्य असा स्रोत असून वेद म्हणजेच ज्ञान असा अर्थ पुर्वापार सांगण्यात आला आहे. संस्कृतमधील विद (अर्थात काही जाणून घेण्याची महत्त्वाकांक्षा) या शब्दापासून वेद या शब्दाची निर्मिती झाली आहे.

वेद हे अजस्त्र ज्ञानाचा स्रोत असून त्यात असंख्य ऋषी व मुनींचा उल्लेख आढळून येतो. परंतु वेद ज्यांच्या ध्यानी मनी नाही अशा लोकांना ऋषी व मुनी यांच्यातील फरक लक्षात येत नसतो. ऋषी मुनी कोण आहेत आणि त्यांच्यातील फरक काय, हे जाणून घेणे रोचक आहे.



खरंतर ऋषी मुनी दोघांमध्ये बऱ्यापैकी समानता असते. मुनी हा ऋषी बनण्याचा एक टप्पा आहे. मुनी हा ऋषींचा एक प्रकार आहे, असं देखील नमूद करण्यात आलं आहे. मुनी हा असा मनुष्य असतो सदैव आत्मचिंतन आणि साधनेत गुंग असतो. विश्वातील सूक्ष्म तत्त्वज्ञान व गूढाची उकल करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. मुनींकडे सामान्य गोष्टींकडे असामान्यपणे बघण्याचा दृष्टिकोन असतो.

ऋषी मात्र एका बाजूला एक तपस्वी असतो जो अनेक सहस्त्रके तप करण्यात घालवतो व त्याला ज्ञानाच्या पातळीवर उच्च स्थान प्राप्त असते. तपश्चर्येच्या माध्यमातून ऋषींचं एकच लक्ष असतं ते म्हणजे आत्मनुभूती मिळवणे. या सर्व प्रक्रियेत त्यांना त्यांच्या इष्ट देवतांकडून वरदान देखील प्राप्त होते. त्यांच्या तपस्येवर आणि त्यांच्या समर्पणावर देव प्रसन्न होत असतात.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

ऋषी हे कवी असतात. शेकडो हजारो वर्षांच्या तपातून त्यांना जी ऊर्जा व ज्ञान प्राप्त होते, ते ज्ञान काव्यमय पद्धतीने समाजापर्यंत पोहचवण्याचे काम ऋषी करतात. त्यांच्या या काव्य रचनांचे एकत्रिकरण वेदांमध्ये करण्यात आलेले आहे.

वेदांच्या अनुसार ऋषींचे चार प्रकार पडतात:-

१) राजर्षी :– तब्बल १००० वर्ष राज्यकारभार करणारे राजे आपली गडगंज संपत्ती व ऐश्वर्याचा त्याग करून संन्यास स्वीकारून साधना व तपश्चर्येचा मार्ग स्विकारतात त्यावेळी त्यांना राजर्षी म्हणून ओळखले जाते.

२) देवर्षी :- देवर्षी हे त्रिकालदर्शी असतात. त्यांना भविष्याचं संपूर्ण ज्ञान असतं व त्यांना त्रिलोकात विहार करण्याचे स्वातंत्र्य असते. त्यांचावर आपल्या ज्ञानाचा प्रसार करण्याचे दायित्व असते. नारद मुनी हे देवर्षी म्हणून ओळखले जातात.

३) महर्षी:- ही एका अत्यंत प्रतिभावान आणि ज्ञानी ऋषिला प्राप्त होणारी उपाधी आहे. ब्रम्हर्षी या सर्वोच्च स्थानाच्या प्राप्तीच्या अगदी काही पावलं अंतरावर असलेल्या लोकांना ही उपाधी मिळते. महर्षी हे असंख्य सहस्त्रकं तपोसाधना केल्यानंतर प्राप्त होणारे मोठे स्थान आहे.

केवळ एका अधर्मी कृत्यामुळे व मनाचा ताबा गमवल्यामुळे महर्षी पद गमावण्याचा धोका असतो, त्यामुळे महर्षी हे फार काटेकोर नियमांचे पालन करतात. याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे विश्वामित्र, त्यांनी आपल्या राज वैभवाचा त्याग करून तब्बल ३००० वर्ष तपश्चर्या करून त्यांनी महर्षी होण्याचा मान मिळवला होता.

४) ब्रम्हर्षी :- हे ज्ञानाच्या क्षेत्रातील परमोच्च स्थान समजलं जातं. एक ऋषी म्हणून गाठायचं सर्वोच्च स्थान म्हणजे ब्रम्हऋषीपद होय. ब्रम्हर्षी हा एक असा साधू असतो ज्याने तपश्चर्या करून आपल्या आयुष्यातील परमोच्च ज्ञानाची व आध्यात्मिक शक्तीची प्राप्त केली असते. ब्रम्हर्षी हे आत्मज्ञानी असतात. विशिष्ठ व विश्वामित्र या रामायणकालीन ऋषींना ब्रम्हर्षी पदाची प्राप्ती झाली होती.

मुनी ही ऋषी बनण्याची पहिली पायरी असते आणि ब्रम्हर्षी पद हे सर्वोच्च ज्ञान प्राप्तीचा बिंदू असते. प्रत्येक व्यक्ती मुनी पदापासून आत्मज्ञान प्राप्ती करून ऋषी पदांची प्राप्ती करत असतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 

 Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: rishi and muni
ShareTweet
Previous Post

जालियानवाला बाग ह*त्याकांडाचा बदला एका हॉलीवूड कलाकाराने घेतला होता..!

Next Post

अवघ्या १२० सैनिकांना घेऊन १२०० चिनी सैनिकांचा फडशा पाडणाऱ्या मेजरची थरारक कथा

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

अवघ्या १२० सैनिकांना घेऊन १२०० चिनी सैनिकांचा फडशा पाडणाऱ्या मेजरची थरारक कथा

गिर्यारोहकांचा जीव की प्राण असणारा कोकणकडा काय आहे? कसा बनला? जाणून घ्या.

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.