The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या दुर्मिळ नोटेच्या बदल्यात कमावू शकाल लाखो रुपये! पण जपून, कारण…

by ऋजुता कावडकर
15 March 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आपल्यापैकी अनेकांना जुनी नाणी आणि नोटा जमवण्याचा छंद असतो. मात्र या छंदातून आपल्याला घरबसल्या पैसे कमावण्याची संधी असते, हे अनेकांना ठाऊक नसतं. जुनी नाणी आणि नोटा यांची ऑनलाईन लिलावातून विक्री करून अनेक जण लाखो रुपये कमावत असतात. अर्थात, त्यासाठी आवश्यक ती माहिती आणि योग्य माहिती घेऊनच व्यवहार करणं गरजेचं ठरतं. अन्यथा, ‘तेलही गेलं आणि तूपही गेलं…’ अशी अवस्था होण्याचीच शक्यता अधिक.

सध्या एका जुन्या नोटेला खूप मागणी आहे. ज्यांच्याजवळ ही नोट असेल त्यांना त्या एका नोटेच्या बदल्यात लाखो रुपये मिळू शकतात. तर जाणून घेऊ या या नोटेबद्दल आणि तिच्या बदल्यात लाखो कमावण्याच्या प्रक्रियेबद्दल…

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या काळातली एक रुपयाची जुनी नोट तुम्हाला ७ लाख रुपये मिळू शकते. जर अशा नोटा तुमच्या घरात पडून असतील तर त्या तुम्हाला लाखो रुपये मिळवून देऊ शकतात. 

ऐतिहासिक, पुरातन, दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करणार्‍यांसाठी अशा दुर्मिळ जुन्या नोटा हा एक खजिनाच असतो. जुन्या नोटा आणि नाण्यांसाठी मोठी किंमत मोजण्याची त्यांची तयारी असते. अशा जुन्या नोटा आणि नाणी यांचा ऑनलाईन आणि ऑफलाईन लिलाव केला जातो. त्यामध्ये त्यांना मोठी किंमत मिळू शकते. या लिलावांमध्ये केवळ भारतातलेच नाही तर जगभरातले संग्राहक बोली लावत असतात. त्यामुळे या लिलावातील बोली वाढत जाते.

असं काय खास आहे या नोटेत?

तब्बल ७ लाख रुपये मिळवून देऊ शकणाऱ्या नोटेचं वैशिष्ट्य हे आहे की ही नोट स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे. ती तब्बल ८० वर्ष जुनी आहे. सन १९३५ मध्ये ब्रिटीशशासित भारतात छापण्यात आलेल्या या नोटेवर ब्रिटिश सम्राट किंग जॉर्जचे छायाचित्र आहे. त्यावर तत्कालीन गव्हर्नर जे डब्ल्यू केली यांची स्वाक्षरी आहे. अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया स्थापन होण्यापूर्वी चलनात आलेली ही नोट आहे.



रिझर्व बँक अस्तित्वात आल्यानंतर आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या नोटेची छपाई बंद करण्यात आली. त्यामुळे ही नोट आज अत्यंत दुर्मिळ आहे. त्यामुळेच या एक रुपयाच्या नोटेला लाखांचं मोल प्राप्त झालं आहे.

दुर्मिळ नाण्यांच्या आणि नोटांच्या लिलावात केवळ हे एकाच न नव्हे तर इतर अनेक प्रकारच्या जुन्या नोटांची आणि नाण्यांवरही बोली लावण्यात येते. सन १९५७ आणि १९६६ मध्ये छापण्यात आलेल्या नोटांनाही लिलावात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या नोटांनाही आकर्षक मोबदला मिळत आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

ही नोट कुठे विकली जाते?

ई-कॉमर्स वेबसाइट OLX वर किंग जॉर्जचे छायाचित्र असलेल्या एक रुपयाच्या जुन्या नोटा विकल्या जात आहेत. या नोटेची लिलावातली किमान किंमत ७ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या नोटेबरोबरच आपल्याकडे असलेल्या जुनी आणि दुर्मिळ नोटा आणि नाणी olx च्या वेबसाइटवर विकू शकतो.

ऑनलाइन प्लॅटफॉर्म OLX वर विक्रेता म्हणून नोंदणी करून आपण आपल्याकडच्या दुर्मिळ नोटा आणि नाण्यांसाठी ऑनलाइन बोली आमंत्रित करू शकतो. अशा दुर्मिळ नाण्यांसाठी आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षाही मोठी किंमत मिळू शकते. 

वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर त्यावर विनामूल्य जाहिरात पोस्ट करून लिलाव पुकारता येतो ज्यांना त्या नोटा, नाणी खरेदी करण्यात स्वारस्य आहे, ते आपल्याशी संपर्क करून व्यवहार पक्का करू शकतात.

दुर्मिळ चलनाची विक्री कशी करावी?

OLX वर नाणी, नोटा विकण्यासाठी विक्रेता म्हणून नोंदणी केल्यावर नोटेच्या किंवा नाण्यांच्या दोन्ही बाजूंचे छायाचित्र काढून ते साईटवर अपलोड करावे लागेल. त्या सोबत त्या नाण्यांचा किंवा नोटेचा तपशील असेल. यानंतर संपर्कासाठी आपला मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी तपशील साईटवर द्यावा लागेल. हा सर्व तपशील बरोबर असल्याची पडताळणी करून तो साईटवर अपलोड झाल्यानंतर तो साईटवर प्रसिद्ध होईल आणि आपल्या नाणी, नोटांमध्ये स्वारस्य असलेले संग्राहक आपल्याशी संपर्क करू शकतील. त्यांच्याशी बोलून आपल्याला आपला सौदा पक्का करता येईल.

असे सौदे करताना काही काळजी घेणंही आवश्यक आहे

जुन्या नोटा, जुनी नाणी यांच्या खरेदी-विक्रीचे तसेच लिलावाचे व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेच्या परवानगीची आवश्यकता नसते आणि शिखर बँकेने कोणत्याही खासगी व्यक्ती, संस्था अथवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मला असे अधिकार किंवा परवानगी दिलेली नाही.

हे व्यवहार करण्यासाठी शुल्क आकारण्याचे अथवा दलाली घेण्याचे अधिकारही रिझर्व बँकेने कोणालाही दिलेले नाहीत. तरीही अनेक जण जुन्या नोटा, जुनी नाणी यांच्या खरेदी-विक्रीच्या अथवा लिलावाच्या व्यवहारांसाठी शुल्क अथवा दलाली घेता असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. त्यांच्याकडून ही आकारणी रिझर्व बँकेच्या परवानगीने केली जात असल्याचे दावेही केले जातात. प्रत्यक्षात त्यात कोणतेही तथ्य नाही.

मुळात अशा व्यवहारांशी रिझर्व बँकेचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे असे व्यवहार प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर करणे आवश्यक आहे. या संबंधीच्या वादात रिझर्व बँक कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही. अशा व्यवहारात फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार उघडकीस आल्यानंतर रिझर्व बँकेने मुद्दाम प्रसिद्धीपत्रक काढून संबंधितांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. हे ४ ऑगस्ट २०२१ रोजी काढण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक रिझर्व बँकेच्या ट्विटर हँडलवर उपलब्ध आहे.

तुम्हाला अशी नोट कुठे सापडली आणि तुम्हाला ती विकायची असेल तर तुम्ही ती विकून लखपती होऊ शकता. पण सांभाळून, तुम्हाला कोणी फसवत नाही ना, याची काळजी नक्की घ्या!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

Explainer: भारताची रशिया-युक्रेन यु*द्धातील तटस्थ भूमिका आपल्यावरच उलटते आहे का?

Next Post

पहिला ‘आयफोन’ ॲपलने नाही तर सिस्कोने बनवला होता!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

पहिला 'आयफोन' ॲपलने नाही तर सिस्कोने बनवला होता!

या चोऱ्यांच्या पुढे मनी हाईस्ट पण फिकं पडेल!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.