The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतातील याठिकाणी आजही पंतप्रधान, राष्ट्रपती यांना मानवंदना दिली जात नाही

by द पोस्टमन टीम
12 July 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


भारतात असे एक स्थान आहे ज्याठिकाणी सैनिक पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री अथवा इतर कोणालाच सलाम करत नाही. भारतातील याठिकाणी आजही पंतप्रधान, राष्ट्रपती यांना मानवंदना दिली जात नाही फक्त भगवान श्रीरामाला मानवंदना दिली जाते कारण भगवान श्रीराम त्या ठिकाणचे राजे आहेत. हे ठिकाण मध्य प्रदेशात असून, ओरछा असे या ठिकाणाचे नाव आहे.

ओरछा, मध्यप्रदेश येथे राम राज सरकार हे भव्य राम मंदिर आहे.

एका दंतकथेनुसार १४ व्या शतकात जेव्हा मधुकर शहा या राजाचे ओरछाच्या राजपूत साम्राज्यावर शासन होते. मधुकर राजा हा वैष्णवपंथातील सखी परंपरेचा श्रध्दाळू होता. ह्या परंपरेतील लोक हे श्रीकृष्णाचे निस्सिम भक्त असतात. त्यांना वैष्णव संप्रदायात कृष्णप्रेमी म्हणून संबोधले जाते.

ते कृष्णासाठी विविध गीत तसेच नृत्याची देखील रचना करत असतात. एकीकडे राजा श्रीकृष्ण भक्त होता तर त्याची राणी गणेशी कुंवर मात्र भगवान श्रीरामाची मोठी भक्त होती. मधुकर राजाच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्वयं भगवान श्रीकृष्ण त्याला दर्शन देण्यासाठी प्रकट झाले होते.

एकदा राजा मधुकर आणि राणी गणेशीमध्ये वृंदावनला जायचं की अयोध्येला, यावरून वाद निर्माण झाला. राजा त्यावेळी राणीला म्हणाला की मला भगवान श्रीकृष्णाने स्वतः दर्शन दिलं आहे, श्रीराम कुठे आहेत? त्याने आपल्या सैनिकांना राणीला अयोध्येला सोडण्याचे आदेश दिले व राणीला सूचना दिली की जोवर प्रभू श्रीरामाना सोबत आणत नाही तोपर्यंत पुन्हा परत येऊ नको.



राणीने अयोध्येला तब्बल १२ वर्ष घोर तपश्चर्या केली, परंतु प्रभू श्रीरामाने दर्शन दिले नाही. यामुळे व्याकुळ होऊन राणीने आत्मह*त्या करण्याचा निर्णय घेतला व शरयू नदीत राणीने उडी मारली. त्या नदीच्या प्रवाहात राणीला एक मूर्ती सापडली. जी बाल्यावस्थेतील श्रीरामाची होती.

राणीने त्या मूर्तीला हृदयाशी कवटाळले आणि काही क्षणांत मूर्ती सजीव होऊन त्या राणीच्या हातात बाल श्रीराम होते. राणीने श्रीरामाला त्यांच्या बरोबरीने ओरछाला येण्यास विनंती केली. त्यावेळी बाल श्रीराम राणीला म्हणाले जर ओरछाचा राजा मला त्याचं सिंहासन देईल तरच मी ओरछाला येईल. मधुकर राजाने श्रीरामांच्या विनंतीला मान देत आपलं सर्वस्व श्रीरामांच्या नावी केलं. एका भव्य दिव्य मंदिराची निर्मिती करण्यात आली. राजाने आपल्या मुलाप्रमाणे बाल श्रीरामाचा सांभाळ केला. श्रीराम राणीच्या निवासात वास्तव्यास होते, राणीने श्रीरामाची मोठी काळजी घेतली. तेव्हापासून प्रभू श्रीराम हे ओरछाचे राजे आहेत. आजही त्यांची प्रतिष्ठा राजासारखीच आहे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

इतिहासकारांच्या मते अयोध्येत राम जन्मभूमी मंदिराचा विनाश ज्यावेळी बाबरच्या हातून चालू होता त्यावेळी त्या मंदिराच्या पुजाऱ्याने मंदिरातील मूर्त्यांना शरयू नदीत सोडून दिले होते, ज्या पुढे जाऊन तीर्थ यात्रेला निघालेल्या महाराणी गणेशीच्या हाती लागल्या. महाराणी गणेशीने त्या मूर्तीची स्थापना सिंहासनावर करून राज्याचा कारभार बघितला होता.

इतिहासकारांच्या मते ओरछाचा राजा हा नेहमी साधनेत मग्न असायचा त्यामुळे त्याचा जागी श्रीरामाला राज सिंहासनावर बसवून राणीने कारभार बघितला. हा तो काळ आहे ज्यावेळी भारतात मुघलांचे राज्य होते. 

प्रभू श्रीराम त्याकाळापासून आजपर्यंत ओरछाचे स्वामी असून त्यांच्या माध्यमातून राज्य कारभार चालवला जातो म्हणूनच त्यांना राम राज सरकार म्हणतात, तसेच त्यांना रोज सकाळी स्थानिक पोलीस प्रशासनातर्फे सलामी दिली जाते. याशिवाय ओरछा येथे कोणताही नेता अथवा राजकीय व्हीआयपी आल्यास त्याला तशी वागणूक दिली जात नाही. 


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: orchha
ShareTweet
Previous Post

या चीनी राणीने परीक्षा घेऊन अधिकारी नेमायची सुरुवात केली होती

Next Post

बालविवाहानंतर सासूरवास भोगल्यानंतर या ताई आता एक यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post
kalpana saroj story in marathi

बालविवाहानंतर सासूरवास भोगल्यानंतर या ताई आता एक यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत

भारताचा पराकोटीचा द्वेष करणारा ब्रिटीश पंतप्रधान

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.