The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जेव्हा राणी एलिझाबेथच्या ड्राइव्हिंगने सौदी अरेबियाच्या राजकुमाराला घाम फुटला होता

by द पोस्टमन टीम
8 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


सौदी अरेबिया म्हटले की आपल्याला मुख्यतः आठवते ते खनिज तेल आणि त्यासंबंधी उद्योगावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था. सौदी अरेबिया हा मध्यपूर्वेकडील राजसत्ताक देश आहे. सौदी अरेबियाचा संस्थापक राजा अब्दुल अझीझ अल् सौद याच्या नावावरून यास सौदी अरेबिया असे संबोधण्यात येते.

येथे राजा प्रमुख असून त्याच्याकडे कार्यकारी आणि वैधानिक अधिकार असतात. परंतु येथे लिखित स्वरूपातील संविधान नाही. राजा हाच पंतप्रधान असतो, आणि दोन उपपंतप्रधान व मंत्रिमंडळ असते. प्रशासनाच्या सोयीसाठी देशाचे चार विभाग व तेरा प्रांत केलेले आहेत. कायदा करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हे काम राजा व मंत्रिमंडळाच्या अखत्यारीत येते.

देशात खू*न, बला*त्कार, लूटमार, घातपाती कृत्य, मादक पदार्थांचा व्यापार, जारकर्म, धर्मत्याग यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. इथला राज्यकारभार आणि न्यायव्यवस्था मुख्यतः शरियत कायद्यानुसार चालतात. त्यामुळे कदाचित महिलांना अगदी कालपरवापर्यंत पुरेसे अधिकार दिलेले नव्हते. 

या देशांमध्ये स्त्रियांवर अनेक प्रकारची बंधने आहेत. त्यापैकीच एक म्हणजे गाडी चालवण्याची परवानगी नसणे. पूर्वी सौदी अरेबियामध्ये महिलांना ड्रायव्हिंगची परवानगी नव्हती. आता मोहम्मद बिन सलमान यांच्या राज्यात ही बंदी हटवण्यात आली आहे. मात्र त्या काळात महिलांनी गाडी चालवणे हा अनुभवच न घेतलेल्या सौदी राजपुत्राला एका विचित्र प्रसंगाचा सामना करावा लागला होता. हा प्रसंग थेट ग्रेट ब्रिटनची महाराणी असलेल्या राणी एलिझाबेथ द्वितीय हिच्यामुळे ओढवला होता.

ज्या साम्राज्यावर सूर्य कधीही मावळत नाही अशी कुख्याती असलेले साम्राज्य म्हणजे ग्रेट ब्रिटन. तिच्या मृत्यूपर्यंत ब्रिटनची राणी असलेली एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी म्हणजेच दुसरी एलिझाबेथ ही प्रत्यक्षात कॉमनवेल्थ परिषदेतील भारतासह सोळा सार्वभौम देशांची राणी होती. ब्रिटनचे राजे जॉर्ज यांची ही मुलगी. राजे जॉर्ज राज्यपदावर असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ०६ फेब्रुवारी १९५२ रोजी एलिझाबेथ ब्रिटनची राणी बनली. तेव्हापासून तिच्या मृत्यूपर्यंत ब्रिटनच्या राजघराण्यावर राणी एलिझाबेथची सत्ता होती.



या राणीचे व्यक्तिमत्व अनेक पैलूंचे मिश्रण आहे. राणी एलिझाबेथ ही प्रतिष्ठा आणि सभ्यता यांचे प्रतीक मानली जाते. शिवाय ती एक उत्तम ड्रायव्हर होती. युनायटेड किंगडमवर सर्वांत जास्त काळ राज्य करणारी ती राणी ठरली. पदरी कोर्गी जातीचे कुत्रे पाळणाऱ्या राणी एलिझाबेथने ऑलिंपिक स्टंट्समध्येही आपला करिष्मा दाखवला. तिचा धीटपणा, आव्हाने झेलण्याची तयारी, अंगी मुळातच असलेला खंबीरपणा, आणि सगळ्यात खास म्हणजे तिची लष्करी कारकीर्द या सगळ्या गोष्टी अनेकांसाठी कुतूहलाचे विषय ठरल्या.

ही सगळी परिस्थिती सौदीसारख्या इस्लामिक देशाच्या विरुद्ध आहे. पाश्चात्त्य देशांत जी कामे स्त्रिया लीलया करतात, ज्या प्रकारचे बंधनरहित मुक्त जीवन जगतात त्या तुलनेत सौदी अरेबियासारखे देश खूपच मागे आहेत. दोन्ही देशांच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीमध्ये जमीन-अस्मानाचे अंतर आहे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

तर आज आम्ही जी गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ती गोष्ट आहे त्या काळातील जेव्हा अब्दुल्ला बिन अब्दुल अझीझ हा सौदी अरेबियाचा राजपुत्र होता आणि तो राणी एलिझाबेथला भेटायला आला होता. राणी एलिझाबेथ हिच्या मालकीची स्कॉटलंडमध्ये बाल्मोरल येथे शेकडो एकरांची इस्टेट आहे. तिथेच तिचा राजवाडाही आहे. सौदी राजकुमार आणि राणी एलिझाबेथ यांची याच इस्टेटीत भेट झाली.

दुपारचे जेवण झाल्यानंतर राणीने तिच्या शाही पाहुण्यापुढे एक प्रस्ताव ठेवला. तिची ही अतिप्रचंड इस्टेट तिला सौदी राजपुत्राला दाखवायची होती. खरेतर सुरुवातीला अब्दुल्ला यासाठी फारसा तयार नव्हता. पण त्याच्या परराष्ट्रमंत्र्यांनी त्यावेळी त्याला ही विनंती मान्य करावी असे सुचवले. त्यामुळे शेवटी अब्दुल्लाने होकार दिला. मग सुरू झाली सवारीची तयारी. त्यासाठी शाही लँड रोव्हर गाड्या राजवाड्यासमोर सज्ज झाल्या. निर्देश केल्याप्रमाणे राजकुमार स्वतः लँड रोव्हरच्या पुढच्या सीटवर बसला. त्याचा दुभाषा त्याच्यामागेच बसला आणि त्यानंतर या गोष्टीतला ट्विस्ट आला.

या लँड रोव्हरचे सारथ्य खुद्द राणी एलिझाबेथ करणार होती. होय! राणी स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसली आणि तिने इग्निशन सुरू करत गाडी चालवायला सुरुवात केली. तीही वाऱ्याच्या वेगाने. गाडी अक्षरशः सुस्साट सुटली होती, राणी मोठ्या कुशलतेने आणि सहजपणे ती हाताळत होती, पण हा अनुभव राजकुमारसाहेबांसाठी फारच थरारक होता.

परंपरेनुसार सौदी अरेबियामध्ये तोपर्यंत महिलांना गाडी चालवण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे अब्दुल्लाला आतापर्यंत कधीही महिलेने त्याच्या गाडीचे ड्रायव्हिंग करण्याचा अनुभव नव्हता. त्याहून वरची कडी म्हणजे खुद्द राणीचे ड्रायव्हिंग, ज्यामुळे अब्दुल्लाचे हृदय धडधडू लागले. राणीचा वेग झेपलाच नसावा त्याला!

क्वीन एलिझाबेथ हिने यापूर्वी दुसऱ्या महायु*द्धादरम्यान यु*द्धाच्या आघाडीवर आर्मी ड्रायव्हर म्हणून काम केले होते. जसजशी तिने आपली गाडी अरुंद अशा स्कॉटिश इस्टेटच्या रस्त्यांवरून चालवायला सुरुवात केली आणि एकीकडे गप्पा मारणे सुरूच ठेवले, तसतसा सौदी राजपुत्राचा अस्वस्थपणा वाढू लागला. एका बाईकडून एवढी आक्र*मकता त्याला अपेक्षित नव्हती. शेवटी आपल्या दुभाष्याच्या माध्यमातून त्याने राणीला गाडीचा वेग थोडा कमी करायला आणि समोरच्या रस्त्याकडे लक्ष द्यायला सांगितले. 

यु*द्धकाळात मिलिटरी ड्रायव्हर म्हणून काम केलेले असल्यामुळे राणीला स्कॉटलंडमधील वळणावळणाच्या रस्त्यांवरून गाडी कशी चालवावी याची व्यवस्थित माहिती आणि अनुभव होता. यातला विशेष भाग म्हणजे इंग्लंडच्या या राणीकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते. ती राणी असल्यामुळे तिला कधी परवान्याची आवश्यकताही भासली नव्हती.

पुढे २०१५ साली सौदी राजपुत्र अब्दुल्ला यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी निधन झाले. सौदीमधील ब्रिटिश राजदूत असलेल्या शेरार्ड कूपर यांनी “Ever the Diplomat: Confessions of a Foreign Office Mandarin” या पुस्तकात राणीचा हा किस्सा सांगितला आहे.

आज ही घटना मजेशीर वाटते, मात्र त्यावेळी त्या गोष्टीने प्रत्यक्ष राजकुमारालाच घाम फोडला होता हे खरे!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

शिवनारायण चंदरपॉल आपल्या पिढीच्या लक्षात राहिला तो त्याच्या डोळ्याखालील काळ्या पट्ट्यांमुळे

Next Post

ब्रिटनने हि*टल*रला ‘बाई’ बनवण्याचा सिक्रेट प्लॅन बनवला होता, जो फ्लॉप झाला

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

ब्रिटनने हि*टल*रला 'बाई' बनवण्याचा सिक्रेट प्लॅन बनवला होता, जो फ्लॉप झाला

या क्रिकेटरने दिवसा देशासाठी क्रिकेट खेळून रात्री कुटुंबासाठी विमा विकलाय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.