The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपण युट्युबवर रात्रभर जागून घरं बांधणाऱ्या लोकांचे व्हिडीओ बघतो ते कोण आहेत..?

by द पोस्टमन टीम
13 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


युट्युब ही एक अद्भुत दूनिया आहे. इथे इतक्या प्रकारचे व्हिडिओज आहेत की ज्याची तुम्हाआम्हाला गणनाही करता येणार नाही. गाणी, सिनेमे, विविध विषयांवरल्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओज, ‘हाऊ टू डू’ टाईप व्हिडिओज्, रेसिपीज्, विणकाम, भरतकाम शिकवणारे व्हिडिओज्, टिप्स आणि ट्रिक्स, मोटिवेशनल व्हिडीओज् इथपासून ते विविध ट्रॅव्हल डेस्टिनेशन्सचे vlog, आयुष्य सोपे करणाऱ्या लाइफ हॅक्स इथपर्यंत जगातील जवळपास प्रत्येक विषयावर येथे असंख्य व्हिडिओज मिळतात. थोडक्यात इथे प्रत्येकासाठी काहीतरी आहेच.

त्याव्यतिरिक्तही इथे असे काही आहे की जे तुम्हाला जुन्या काळात घेऊन जाईल. गतकाळाची, त्या काळातील जीवनशैलीची, सांस्कृतिक जीवनाची झलक दाखवणारे हे व्हिडिओज् म्हणजे कन्टेन्ट क्रिएशनचा एक अनोखा प्रकार. हे प्रिमिटिव्ह टेक्नॉलॉजीवरचे व्हिडीओज् अतिशय प्रसिद्ध आहेत.

अगदी उदाहरण बघायचे झाले तर जमिनीच्या खाली असलेले आणि कॅण्डल लाईटची सुविधा असलेले स्विमिंग पूल या विषयी तुम्हाला माहिती शोधायची असेल, तर या माहितीच्या आधारे समोर येणारा व्हिडिओ म्हणजे केवळ हिमनगाचे टोक असेल. या एका विषयाबद्दलचे अक्षरश: शेकडो व्हिडीओज् आणि डझनावारी चॅनेल्स आज युट्युबवर उपलब्ध आहेत. एकाच विषयावरील व्हिडिओज् असले तरी त्यांनी त्यामधून दिलेले कन्टेन्ट थोड्याफार फरकाने वेगळे आणि म्हणूनच त्या त्या चॅनेलसाठी युनिक असे आहेत.

ही कलाकारी तुमच्या-आमच्यासमोर साकारणारे कलाकार मात्र काहीसे रहस्यमय वाटतात. अर्थात म्हणून त्या व्हिडीओचे मनोरंजनात्मक मूल्य कमी होत नाही. आदिमानवा समान भासणारे काही कलाकार तुमच्यासमोर येतात आणि काहीतरी भव्यदिव्य बनवून जातात. बरेचदा हे व्हिडिओज् टाईमलॅप्स प्रकारचे असतात.

यामध्ये जी गोष्ट प्रत्यक्षात करायला काही तास लागू शकतात, ती फास्ट स्पीडने तुमच्यासमोर केवळ पंधरा मिनिटात सादर होते. या कारागिरांनी हाताने उभ्या केलेल्या अप्रतिम शैलीच्या वास्तू आणि त्यांच्या बांधणीचा तपशील पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. ही कलाकारी बघणे हा अनेक युट्युब प्रेक्षकांच्या आवडीचा विषय आहे. शर्ट काढून सज्ज झाल्यावर ऊन-पाऊस-वारा यांची तमा न बाळगता माती खणण्यापासून सुरुवात करत हे कारागीर जेव्हा अप्रतिम असे वॉटर पार्क किंवा मेझ किंवा पॅराडाईज व्हिला साकारतात तेव्हा तोंडात बोटे घालणेच बाकी राहते.



असाच एक माणूस म्हणजे जॉन प्लांट हा कारागीर. त्याला जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे आणि त्याच्या फॅन्समध्ये तो ‘द मॅन’ या नावाने परिचित आहे. त्याचे प्रिमिटिव्ह टेक्नॉलॉजी नावाचे युट्युब चॅनेल आहे. हा मनुष्य राहतो ऑस्ट्रेलियामध्ये क्वीन्सलँड या प्रदेशाच्या उत्तरेकडे कुठेतरी. तो २०१५ पासून व्हिडिओज् बनवून युट्युबवर अपलोड करत आहे. जिवंत राहण्यासाठी आवश्यक साधने कशी बनवावीत आणि निसर्गात उपलब्ध असलेल्या सामग्रीपासून हाताने निवारा कसा तयार करावा याबद्दलचे प्रात्यक्षिक या व्हिडीओज्-मध्ये असते. यामध्ये असलेले त्याचे कौशल्य बघून अनेक लोक प्रभावित होतात.

हा मनुष्य केवळ निळ्या रंगाची रंगाच्या शॉर्ट्स परिधान करतो. अश्मयुगातील जीवनशैली म्हणजेच स्टोन एज लाइफ या विषयावरचा तो इंटरनेटवरचा गुरु आहे. वर्षभरात त्याच्या चॅनलला ९५० मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळून, जाहिरातींमधून त्याला वर्षाला पाच लाख डॉलर्स एवढे प्रचंड उत्पन्न मिळाले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

या चॅनेलवर तुम्हाला जॉन प्रत्यक्ष चिखलापासून घरे बनवताना किंवा स्विमिंग पूल बांधताना दिसत नाही. खास लोकांना आकर्षित करण्यासाठी म्हणून त्याच्या चॅनेलवर कोणत्याही गिमिक्सचा आधार घेतलेला नाही. मात्र त्याच वेळी तो जे करतो ते अस्सल, पारदर्शक, आणि ओरिजिनल आहे हे त्याने तयार केलेल्या अजोड कलाकृतीमधूनच लक्षात येते. त्यामुळे त्याचे चॅनेल हिट ठरले आहे. 

जॉनच्या या युट्युब चॅनेल पासून प्रेरणा घेत आज साधारण त्याच धर्तीवर चालणाऱ्या अनेक युट्युब चॅनेल्सचे पेव फुटले आहे. प्रिमिटिव्ह स्किल्स, प्रिमिटिव बिल्डिंग, सर्व्हायवल टूल, प्रिमिटिव्ह टेक्नॉलॉजी आयडिया अशा नावांनी ही चॅनेल्स आज प्रसिद्ध होत आहेत; नवनवीन प्रयोग करत आहेत.

यूट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये अंडरग्राउंड स्विमिंग पूल टेम्पल असे टाइप केल्यास व्हिडिओची एक अख्खी साखळीच समोर येते. त्यात कुठल्याशा जंगलात काम करणारी माणसे असतात, ती अनवाणी आणि केवळ शॉर्ट्स घालून फिरत असतात. एवढेच नव्हे तर काम करताना घशातून माकडांप्रमाणे आवाजही काढतात. ‘जंगल बुक’मधील मोगलीप्रमाणे वावरणाऱ्या या माणसांना आणि त्यांच्या कारामतींना अक्षरशः लाखांनी व्ह्यूज असतात आणि त्या चॅनेलला जाहिरातींमधून चांगले घसघशीत उत्पन्नही मिळते.

कोकोनट डॉट कॉम नावाच्या आशियाई चॅनेलने या सगळ्या चॅनेल्सचा मूळ मालक कोण हे शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना म्हणावे तितके यश आले नाही. त्यांना फक्त एवढेच कळले की यातली बरीशी अकाऊंट्स कंबोडियामधून आलेली आहेत आणि २०१८ पासून ॲक्टिव्ह आहेत. मात्र ही निर्मिती करणाऱ्या मूळ कन्टेन्ट क्रिएटरला त्यांना शोधून काढता आलेले नाही. अजून एका अंदाजानुसार ही सर्व अकाऊंट्स एकाच क्रिएटरच्या मालकीची असावीत. कदाचित हे सर्व करणारा कंबोडीयाच्या जंगलातला एखादा स्टुडिओही असावा. अर्थातच यापैकी काही चॅनेल्स युट्युबने अनेक तक्रारी आल्याने बंद केली आहेत.

यात अजून एक मुद्दा येतो तो म्हणजे नैतिकतेचा. अशा प्रकारे अद्भुत कलाकृती साकारणाऱ्या लोकांना वाजवी मेहनताना तरी मिळतो का? की त्यांच्या कौशल्याचा फायदा घेत दुसराच कोणी या व्हिडीओज्-चा क्रिएटर म्हणून गबर होतोय? हे प्रश्न आहेत.

युट्युब एखाद्या महासागरासारखे आहे. अथांग, विशाल, गहन आणि खोल. इथे प्रत्येकाला जागा आहे, वाव आहे. फक्त तुम्हाला इच्छा हवी. जेवढे तुमचे कन्टेन्ट ओरिजिनल आणि अस्सल तेवढा तुमचा भाव जास्त असा हा साधा सरळ व्यवहार आहे. मात्र त्याचबरोबर काम करणाऱ्याला त्याचा वाजवी मोबदला मिळणे ही काळाची गरज आहे. या लेखाने याच प्रश्नावर नेमके बोट ठेवले आहे. तुम्हाला काय वाटते?, कमेंट्स करून नक्की सांगा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

कपिल देव आणि ‘झी’च्या सुभाष चंद्रांनी सुरु केलेली ‘ICL’ BCCI ने दमदाटी करून बंद पाडली

Next Post

काही लोकांच्या मते जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या मागे या कुटुंबाचा हात असतो

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

काही लोकांच्या मते जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या मागे या कुटुंबाचा हात असतो

काल गडचिरोलीत पोलिसांनी खात्मा केलेला माओवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडे कोण होता..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.