The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हेन्रीएट लॅक्स या खऱ्या अर्थाने अमरत्वाला पोचलेल्या व्यक्ती आहेत

by Heramb
13 October 2025
in विज्ञान तंत्रज्ञान, आरोग्य, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आपण सर्वांनीच लहानपणी ‘दो बुंद जिंदगी के’, म्हणजेच पोलियोची लस नक्कीच घेतली असेल. ही लस तयार होण्यामध्ये ‘हेला’ नावाच्या विशिष्ट मानवी पेशींचे मोठे योगदान आहे. या पेशी १९५१ साली एका कॅन्सरच्या रुग्णाच्या शरीरातून तिच्या परवानगीविनाच काढून घेतल्या गेल्या होत्या.

हेन्रीएटा लॅक्स या महिलेला ‘हेला’ लाईनमधील पेशींचे स्रोत म्हणून ओळखले जाते. हेन्रीएटा लॅक्स या वैज्ञानिक किंवा डॉक्टर नव्हत्या. त्यांना गर्भाशयाच्या कर्करोगामुळे जॉन हॉपकिन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १९५० च्या दशकापासून वैद्यकीय क्षेत्रात ‘हेला’ लाईनमधील पेशींचा मोठ्या प्रमाणात वापर आणि संशोधन होत आहे.

हेन्रीएटा लॅक्सचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी व्हर्जिनियामधील रोनोक येथे झाला होता. १९२४ साली तिच्या आईच्या मृत्यूनंतर, हेन्रीएटाला तिच्या आजोबांबरोबर लॉग केबिनमध्ये राहण्यासाठी पाठवण्यात आले. हेन्रीएटा लॅक्स तिच्या पहिल्या चुलत भावाबरोबर एका खोलीत राहू लागली. त्यानंतर तिचा विवाह झाला आणि ती ५ मुलांची आई होती.

२९ जानेवारी १९५१ रोजी तिच्या पोटातील असामान्य वेदना आणि रक्तस्त्राव याचे निदान करण्यासाठी ती जॉन्स हॉपकिन्स हॉस्पिटलमध्ये गेली. डॉक्टर हॉवर्ड जोन्सने त्वरीत गर्भाशयाचा कर्करोग असल्याचे सांगितले. या कर्करोगावरील विकिरण उपचारांदरम्यान (रेडिएशन ट्रीटमेंट), डॉक्टरांनी तिच्या नकळत दोन गर्भाशयातील दोन नमुने काढून घेतले. वयाच्या ३१ व्या वर्षी, ४ ऑक्टोबर १९५१ रोजी जॉन्स हॉपकिन्स येथे तिचे निधन झाले. हेन्रीएटाच्या प्रकरणामुळे एखाद्या व्यक्तीचा त्याच्या जिनेटिक मटेरियल्सच्या हक्कांवर कायदेशीर आणि नैतिक वादविवाद सुरू झाले आहेत. 



लॅक्सच्या ट्यूमरमधील पेशींना वैद्यकीय संशोधक डॉ. जॉर्ज ओटो गे यांच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. या पेशींमध्ये एक असामान्य गुणवत्ता असल्याचं डॉ. जॉर्ज ओटो गे यांच्या लक्षात आले. कॅन्सरपीडित असलेल्या बहुतेक पेशी काहीच दिवस टिकू शकतात पण लॅक्सच्या या पेशी मोठ्या प्रमाणात टिकाऊ असल्याचं निरीक्षण डॉ. जॉर्ज ओटो गे यांनी नोंदवलं. त्यानंतर डॉ. जॉर्ज ओटो गे याने एक विशिष्ट पेशी वेगळी करून एक सेल लाईन तयार केली. त्याने या सेल लाईनला हेन्रीएटा लॅक्सच्याच नावावरून ‘हेला’ असे नाव दिले.

हेला स्ट्रेनने वैद्यकीय संशोधनात क्रांती केली आहे. पोलियोची लस विकसित करण्यासाठी जोनास साल्कने हेला स्ट्रेनचा वापर केला. याकारणामुळेच सगळीकडे हेला पेशींमध्ये मोठ्या प्रमाणात रस निर्माण झाला. मागणी वाढत असताना, शास्त्रज्ञांनी १९५५ साली या पेशींचे क्लोन तयार केले. अर्थात, अशाच प्रकारच्या पेशी कृत्रिमरित्या पुन्हा तयार करण्यात आल्या. या पेशींबद्दल कळल्यापासूनच हेला पेशींचा समावेश असलेले दहा हजारांहून अधिक पेटंट नोंदणीकृत आहेत. संशोधकांनी या पेशींचा वापर रोगाचा अभ्यास करण्यासाठी आणि नवीन उत्पादने तसेच पदार्थांबद्दल मानवी संवेदनशीलता तपासण्यासाठी केला आहे.

लॅक्स कुटुंबाला १९७० च्या दशकात हेला पेशींविषयी माहिती मिळाली. १९७३ साली एका शास्त्रज्ञाने कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधला. त्याने या कुटुंबाकडे रक्ताचे नमुने आणि इतर अनुवांशिक साहित्य मागितले. पण हेला पेशींच्या वापराविषयी आणि त्यांच्याच अनुवांशिक माहितीचा वापर करण्याविषयी कुटुंबाकडून कोणत्याही शास्त्रज्ञाने, संस्थेने किंवा त्या रुग्णालयानेसुद्धा परवानगी मागितली नाही. 

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

जॉन हॉपकिन्स रुग्णालयाच्या मते, १९५१ साली एखादी पेशी रुग्णाच्या शरीरातून काढून टाकण्यासाठी रुग्णाची संमती घ्यावी लागते हे कोणाला माहितीही नव्हते. तर त्यावेळी तसा कायदाही नव्हता. हेली पेशींचा उपयोग हा सर्वस्वाने संशोधनासाठी करण्यात आलेला असून रुग्णालयाने हेली पेशींसंदर्भात कोणतेही पेटंट घेतले नाही किंवा कोणत्याही आर्थिक कारणांसाठी त्या पेशींचा वापर केला नाही. 

१९९८ साली बीबीसीने लॅक्स आणि हेला पेशींवर आधारित पुरस्कारप्राप्त माहितीपट दाखवला, तेव्हा या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. कालांतराने रेबेका स्क्लूट लिखित ‘द इममोर्टल लाईफ ऑफ हेन्रीएटा लॅक्स’ हे पुस्तक प्रदर्शित झाले. ओप्रा विनफ्रे आणि एचबीओने स्क्लूटच्या २०१० साली प्रकाशीत झालेल्या या पुस्तकावर आधारित चित्रपट विकसित करण्याची योजना जाहीर केली आणि २०१७ साली त्यांनी संयुक्तरित्या बायोपिक प्रसारित केले. हेन्रीएटा लॅक्सची दोन मुलं, डेव्हिड लॅक्स, जूनियर आणि झकारिया रहमान तसेच नात जेरी लॅक्स यांनी चित्रपट निर्मात्यांना वेळोवेळी आवश्यक ते सल्ला देण्याचे काम केले. रेबेका स्क्लूट या चित्रपटाच्या सह-कार्यकारी निर्माता होत्या.

हेला पेशींमधून नफा मिळवणाऱ्या संस्थांनी संशोधनामध्ये हेन्रीएटा लॅक्सचे योगदान सार्वजनिकरित्या मान्य केले आहे. ‘स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन आणि नॅशनल फाउंडेशन फॉर कॅन्सर रिसर्च’मध्ये लॅक्स कुटुंबाचा सन्मान करण्यात आला आहे. ‘मॉर्गन स्टेट युनिव्हर्सिटी’ने हेन्रीएटा लॅक्स यांना मरणोत्तर मानद पदवी दिली. २०१० साली मोरेहाऊसचे डॉ.रोलँड पॅटिलो यांनी लॅक्सच्या चिन्हांकित स्मृतिस्थळासाठी हेडस्टोन दान केले.

हेला प्रकरणाने अनुमतीशिवाय अनुवांशिक साहित्य वापरण्याच्या कायदेशीरपणाबद्दल प्रश्न उपस्थित केले. लॅक्स किंवा तिच्या कुटुंबियांनी तिच्या पेशींची कापणी करण्याची परवानगी दिली नाही. हीच पेशी नंतर क्लोन करून विकली गेली. कॅलिफोर्निया सुप्रीम कोर्टाने १९९० सालच्या प्रकरणात ‘मूर विरुद्ध कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या रीजेंट्स’मध्ये टाकाऊ पेशींचे व्यापारीकरण करण्याचा अधिकार कायम ठेवला. २०१३ साली, जर्मन संशोधकांनी लॅक्स कुटुंबाच्या परवानगीशिवाय हेला पेशींच्या स्ट्रेनचा जीनोम प्रकाशित केला. हेक्स स्ट्रेनवर नियंत्रण मिळवण्यात लॅक्स कुटुंबाला मर्यादित यश मिळाले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भटकंती – छत्रपती संभाजीनगर शहरातला गरिबांचा ताजमहाल ‘बीबी का मकबरा’

Next Post

शोएब अख्तरने मैदानावरच हरभजन सिंगला घरात घुसून मारायची धमकी दिली होती

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

शोएब अख्तरने मैदानावरच हरभजन सिंगला घरात घुसून मारायची धमकी दिली होती

'ग्रीन टी'चे चाहते असाल तर तुम्हाला या महिलेबद्दल माहिती असायलाच हवं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.