The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

CD चा काळ संपला आणि ‘प्लॅनेट एम’चं दिवाळं निघालं

by द पोस्टमन टीम
11 April 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


संगीत ऐकायला आवडत नाही, असा माणूस विरळंच! बहुतेकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारची गाणी ऐकण्याची आवड असतेच. अनेकांच्याकडे आवडत्या गाण्याची कॅसेट, सीडी, ऑडीओ यांचा संग्रह असतोच.

आज संपूर्ण जग डिजिटल झाल्याने आवडते गाणे शोधणे आणि ते आपल्या संग्रही ठेवणे खूप सोपे काम झाले आहे. पण, जोपार्यंत हे डिजिटायझेशन नव्हते तोपर्यंत तरी शहरातील कॅसेटची दुकाने शोधणे, तिथे जाऊन आपल्या आवडत्या गायकाची असेल किंवा अल्बमची असेल, जी हवी ते कॅसेट शोधणे आणि मग ती घरी आणून टेपरेकॉर्डर किंवा सीडी प्लेअरमधून ऐकणे असे बरेच उद्योग करावे लागत.

आज तुमची आवडती गाणी तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा काम्पुटरवर डाऊनलोड करून घेण्याची सोय आहे. घर बसल्या काम होते. पण, वीस वर्षांपूर्वी हा गाण्यांचा संग्रह करण्यासाठीही बरीच खटपट करावी लागत असे. पण, या खटपटीतही एक वेगळाच आनंद असायचा, मजा असायची.

अशातच नव्या सहस्त्रकाची चाहुल लागण्याआधी काही काळ प्लॅनेट एम नावाच्या म्युझीकल स्टोअरची साखळी भारतात उदयास आली. या स्टोअरमध्ये आवडत्या गायकाची, आवडत्या भाषेतील, हवी त्या काळातली, आपल्याला आवडेल त्या गाण्यांची कॅसेट मिळत असे.

सर्व प्रकारच्या आणि सर्व वयोगटातील संगीतप्रेमी लोकांसाठी हे दुकान म्हणजे आनंदाची एक पर्वणीच. प्लॅनेट एमचे हे म्युझीकल स्टोअर सुरुवातीला भारतातील मोठमोठ्या शहरातून सुरु झाले. शहरी तरुणाईला आवडेल, रुचेल, असे संगीत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे हमखास माध्यम बनले प्लॅनेट एम.



सुमारे दोन दशके तरी, या स्टोअरने शहरातील संगीत रसिकांसाठी एक अद्भुत खजाना उपलब्ध करून दिला होता. या स्टोअरने शहरातील तरुणाईची आवड अचूक ओळखली होती. मावळत्या सह्स्त्रकातून उगवत्या सहस्त्रकाकडे वाटचाल करू लागलेल्या या पिढीची संगीतातील जाण, रुची आणि आवड अधिकाधिक वाढवण्यास या स्टोअरने खूप हातभार लावला, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

पृथ्वीच्या पृष्ठभागावर जांभळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर केशरी रंगाचा भला मोठा एम हे चित्र म्हणजे प्लॅनेट एम स्टोअरचा लोगो होता. भडक रंगामध्ये बनवलेला हा लोगो प्रत्येकाचे लक्ष चटकन वेधून घेत असे. अशा या भडक रंगाचा लोगो असणाऱ्या या संगीतमय दुकानाशी तरुणांची नाळ अधिक घट्टपणे जोडली गेली होती. या स्टोअरने त्यांच्यातील संगीताच्या गोडीला खतपाणी घातले होते. प्लॅनेट एमचे नाव काढताच अनेकांच्या मधूर, नादमय, जुन्या आठवणी जाग्या होतील.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत नव्याने सामावत चाललेल्या भारतीय तरुणांमध्ये या ब्रँडने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. टाईम्स समूहाने १९९९साली या संगीत स्टोअर चेनची स्थापना केली. २००७ मध्ये व्हिडीओकॉन कंपनीने स्टोअर्सची ही चेन खरेदी केली.

२०१८ पर्यंत ही संगीत स्टोअर चेन व्हिडीओकॉनच्याच मालकीची होती. २०१८ मध्ये विडिओकॉनने हे स्टोअर्स कायमचे बंद केले.

संगीत रसिकांसाठी प्लॅनेट एमकडे अनेकविध पर्याय होते. कोणत्याही स्थानिक कॅसेट किंवा ऑडीओच्या दुकानात जे सहसा ऐकायला मिळणार नाही असे दुर्मिळ आणि महाग संग्रह देखील प्लॅनेट एममध्ये नक्की मिळत असे. संगीताच्या विविध प्रकारातील गीतांच्या वारेमाप सीडीज प्लॅनेट एम स्टोअरमध्ये अगदी वर्गीकरण पद्धतीने रचलेल्या असत. जसे वाचनालय किंवा ग्रंथालयात सूचीनुसार, प्रकारानुसार, लेखकानुसार पुस्तकांचे वर्गीकरण केलेले असते अगदी तसेच.

प्लॅनेट एम म्हणजे एक संगीत ग्रंथालयच होते. पाश्चात्य संगीताकडे झुकू लागलेल्या या नव्या पिढीला त्या संगीतातील विविध प्रकार जाणून घेण्यास आपल्या आवडत्या बँडचे, कलाकाराचे संगीत समजून घेण्यास, पाश्चात्य संगीताबद्दलची खोलवर अभिरुची तयार होण्यास या स्टोअरने हातभार लावला.

पाश्चात्य संगीताच्या दुनियेत मुशाफिरी करू इच्छिणाऱ्या संगीत रसिकांना या स्टोअरने योग्य तो मार्ग दाखवला. आपापली वैयक्तिक अभिरुची अधिकाधिक संपन्न आणि समृद्ध करण्यासही याची मदत झाली.

एवढ्या मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची संगीतमय सेवा देणारी ही भारतातील पहिलीच स्टोअर चेन होती. भारतात आंतरराष्ट्रीय संगीताची आवड निर्माण करण्याचे आणि अशा संगीताचा पुरवठा करण्याचे अशी दोन्ही कामे करणारे हे एकमेव स्टोअर होते.

कॅसेट, व्हिसीआर, किंवा सीडी विकणारी छोटी दुकाने आणि प्लॅनेट एममधला फरक अधिक स्पष्टपणे सांगायचा तर हेच असेच म्हणता येईल की ही छोटी दुकाने म्हणजे किरकोळ किरणा दुकाने आणि प्लॅनेट एम म्हणजे डिपार्टमेंटल स्टोअर.

या दुकानात भरपूर, पर्याय उपलब्ध असत. याच स्टोअरमुळे भारतीयांना बॅकस्ट्रीट बॉईज, कोल्डप्ले, लिंकीन पार्क आणि ग्रीनडे सारख्या म्युजिकल बँडशी ओळख झाली.  म्युझीकल रिटेल ही संकल्पना भारतात रुजवण्यात आणि तिची वाढ करण्यात प्लॅनेट एमने मोठी भूमिका बजावली.

शिवाय, या स्टोअरने लाइव्ह परफॉर्मन्सचाही अनोखा अनुभव भारतीय संगीत रसिकांसाठी उपलब्ध करून दिला. रविवारच्या दिवशी तर याप्रकारच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी लोकांनी या स्टोअरच्या बाहेर लांबलचक रांगा लावलेल्या असत.

एखादा नवा अल्बम रिलीज झाल्याची बातमी कळताच लवकरात लवकर त्याची सीडी मिळवण्यासाठीही अशीच गर्दी होत असे. सोनू निगम, शान सारख्या कलाकारांनी प्लॅनेट एमच्या स्टोअरमध्ये अनेकदा असे लाइव्ह परफॉर्मन्स केलेले आहेत. रसिकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी या संधीचा फायदा घेत त्यांच्याशी प्रश्नोत्तरांच्या रुपात संवादही साधला आहे.

स्वत: दुकानात जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या सीडीज बघणे, त्या हाताळून त्यांच्यावर दिलेली माहिती वाचणे, जसे की ही गाणी कुणी लिहिली, कुणी गायली, त्याला कुणी संगीत दिले, त्या अल्बमची निर्मिती कुणी केली, या सगळ्या माहितीमुळे संगीताच्या ज्ञानात अधिकाधिक भर पडत असे. काही संगीत रसिक तर प्लॅनेट एमच्या स्टोअरमध्ये या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यात अख्खा दिवस घालवत. काही जण तिथेच बसून संगीत ऐकत.

एकाच ठिकाणी इतक्या प्रकारच्या सीडीज पाहूनच काहींचे भान हरपून जाई. या सीडीज ठेवलेल्या रॅक्सच्या मोकळ्या जागेतून फक्त फिरत राहण्यातही अनेकांना अद्भुत आनंद मिळत होता.

एखाद्या रॅकमध्ये बॉलीवूड हिट असे तर त्याच्याच पुढच्या रॅकमध्ये त्या दशकातील प्रसिद्ध भक्तीसंगीत असे, अशा संगीताच्या विविध प्रकारांची मेजवानी एकाच ठिकाणी उपलब्ध होणे ही कित्तीतरी आश्चर्याची आणि आनंदाची बाब होती. प्लॅनेट एम हे नुकतेच लॉंच झालेले म्युझीकल स्टोअर होते तरीही प्रत्येक वयोगटातील ग्राहक या स्टोअरकडे आकर्षिले जात.

सध्या एका क्लिकवर संगीत डाऊनलोड करणे शक्य असले तरी, त्यावर चर्चा करणे, संगीताच्या सीडीजची देवाणघेवाण करणे अशा अनुभवांना आजची पिढी मुकते आहे.

हळूहळू प्लॅनेट एमने सीडीजकडून व्हिडीओ गेम, त्याच्याशी संबधित डिव्हाइसेस यांची विक्री सुरु केली. पण, इंटरनेट युगात संगीत आणि चित्रपटाच्या क्षेत्रात बरेच बदल होत गेले. या बदलांमुळे हळूहळू ग्राहकांची आवड बदलत गेली.

सगळे काही एका क्लिकवर उपलब्ध होण्याच्या काळात स्टोअरमध्ये जाऊन सीडी, ऑडीओ खरेदी करण्याची आवश्यकता उरली नाही. ग्राहकांनी पाठ फिरवल्याने अवघ्या वीस वर्षातच या ब्रँडला टाळे ठोकण्याची वेळ आली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या एका आजारामुळे अमेरिका सुपरपॉवर बनलाय

Next Post

चीनला धडा शिकवण्यासाठी अटलजी ८०० मेंढ्या घेऊन चीनी दुतावासासमोर जाऊन उभे राहिले होते

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

चीनला धडा शिकवण्यासाठी अटलजी ८०० मेंढ्या घेऊन चीनी दुतावासासमोर जाऊन उभे राहिले होते

टाईप रायटरचा काळ संपलाय पण आठवणी अजूनही ताज्या आहेत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.