The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मांजरीला मारल्याच्या खोट्या आरोपाखाली या कुत्र्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती

by द पोस्टमन टीम
4 December 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आपल्या भावना, संवेदना, सगळं काही आपला मेंदू नियंत्रित करत असतो. मेंदूचे अनेक छोटे-छोटे भाग एकमेकांशी समन्वय साधून परिस्थितीनुसार प्रतिक्रिया देतात. उदा. वाईट घटना घडली की अचानक डोळ्यात पाणी येतं, थरारक गोष्ट बघितली की शहारे उभे राहतात, संताप येतो वगैरे वगैरे. पण या भावनांची सीमासुध्दा मेंदूने ठरवली आहे. जेव्हा ही सीमा सांभाळण्यात मेंदू असमर्थ ठरतो तेव्हा मानसिक विकाराला सामोरे जावे लागते.

असं म्हणतात की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमधे हा भाग राग आणि आक्र*मकतेवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ ठरतो. अर्थात अशा प्रकारची समस्या असणारा व्यक्ती गुन्हेगारच बनतो असं नाही. ज्या वातावरणात तो व्यक्ती वाढला, संगत यांवर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. थोडक्यात सांगायचं तर गुन्हेगारी प्रवृत्ती एक मानसिक विकारातून वर आलेली प्रवृत्ती आहे.

जी पुन्हा बरी होऊ शकते. पण यातसुद्धा समोरच्या व्यक्तीची प्रचंड इच्छाशक्ती हवी. याच दृष्टिकोनातून अमेरिकेमधील तुरुंगाची बांधणी केली आहे व तशी व्यवस्था देखील करण्यात आली आहे. कडक शिक्षेसोबत त्यांच्या मानसिक प्रवृत्ती सुधारण्यावर भर दिला जातो. प्रत्येक गुन्हेगाराला सुधारण्यासाठी संधी दिली जाते. त्यांना पुन्हा एकदा सामान्य व्यक्तींप्रमाणे संवेदनशील करण्यासाठी थेरपी दिली जाते.

या थेरपीचा एक भाग म्हणून गोंडस प्राण्यांना कोठडीत सोडलं जातं, कैदी त्यांच्यासोबत खेळतात, वेळ घालवतात. त्यांच्यातील संवेदना जागी करणं हा या मागील मूळ हेतु आहे. प्राणी मुख्यतः कुत्रे खुप लळा लावतात. त्यांच्या याच कसबीचा असा उपयोग केला जातो. ही संकल्पना रूढ होण्यामागे देखील गमतीदार किस्सा आहे .



१९२० साली फिलाडेल्फिया येथील एक आलिशान, त्यावेळची सर्वांत सुंदर इमारत तुरुंग म्हणून वापरली जायची. इथे अनेक कैद्यांना शिक्षा म्हणून एकटं ठेवलं जात असे. ही शिक्षा फाशीपेक्षाही कडक मानली जायची.

तत्कालीन सरकारने ही पद्धत बदलण्याचं ठरवलं. त्यांना एकटं ठेऊन त्यांचं मानसिक संतुलन आणखी बिघडेल. यावर सखोल विचार करून अमेरिकेतील तुरुंग व त्यांच्या व्यवस्थेचा कायापालट करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यावेळेस कुत्र्यांना घेऊन तिथल्या कोठडीत प्रयोग सुरू होता. पेनिसल्व्हेनियाचे गव्हर्नर गिफ्फोर्ड पिंचोट यांनी या कोठडींना भेट देताना ही कुत्री बघितली. त्यांच्या घरी पेप नावाचा लाब्रोडॉर कुत्रा होता. पेप कृष्णवर्णीय, देखणा कुत्रा होता. तो थोडा खोडकर होता . लहान असताना सर्वांचाच तो लाडका होता. पण मोठं होता होता त्याला उश्या फाडण्याची वाईट सवय लागली. घरातील सगळ्यांना त्यामुळे त्रास होऊ लागला.

कोठडीतील थेरपीसाठी वापरण्यात येणाऱ्या कुत्र्यांकड़े बघून त्यांना एक कल्पना सुचली. ‘प्रयोगासाठी पेपला कोठडीत पाठवण्याचं त्यांनी ठरवलं. पण माध्यमांनी या गोष्टीला वेगळंच स्वरूप दिलं. गव्हर्नरच्या पत्नीच्या मांजरीला मारण्याच्या आरोपाखाली त्याला अटक झाली अशी बातमी वृतपात्रांमधे आली. ही अत्यंत खोटी व हास्यास्पद बातमी होती.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

पण गव्हर्नर आपला कुत्रा प्रयोगासाठी कोठडीत पाठवतो आहे, ही बातमी तेवढीशी मजेदार वाटली नाही. म्हणून पत्रकारांनी ही बातमी तयार केली असावी. पण अंतत: तो कुत्रा एका विशिष्ठ प्रयोगासाठी गेला होत हे सिद्ध झालं.

‘पेप’ च्या गळ्यात C2559 या आकड्याचा बिल्ला अडकवलेला असायचा. तो सगळीकडे मोकळेपणाने फिरायचा , खेळायचा, बागडायचा. सगळ्या कैद्यांना त्याने लळा लावला होता. तो येताच वातावरणातला ताण नाहीसा व्हायचा. या थेरपीमुळे जे बदल कैद्यांमधे जाणवले त्यावर पुढे भरपूर अभ्यास करण्यात आला. या प्रयोगावर ‘जर्नल ऑफ फेमिली सोशल वर्क’मध्ये छापून आलं. या प्रयोगातून कैद्यांमधे बरीच सुधारणा बघायला मिळाली.

त्यांची सहनशक्ती वाढली, आक्र*मकता कमी झाली व स्वभावतः देखील बरेच बदल दिसायला लागले. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून तो बदल जाणवत होता.

एका सर्वेक्षणानुसार जवळपास ५० टक्के गुन्हेगार पुन्हा एकदा गुन्हेगारीकडे वळतात. पण ही थेरपी देऊन हा आकडा १२-१३ टक्क्यांनी घसरला आहे, अशी माहिती हाती आली आहे. पुढे पेपचा काही नैसर्गीक कारणास्तव मृत्यू झाला. त्याचा अंत्यविधी त्याच जेलमध्ये झाला. पण या प्रयोगानंतर या थेरपीवर शिक्कामोर्तब झाला.

आज तो तुरुंग एक प्रेक्षणीय स्थळ आहे. 

ही थेरपी किती परिमाणकारक आहे, कशा प्रकारे काम करते, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेऊन ‘प्राणी’, विशेषतः पाळीव प्राणी किती उपयोगी असतात याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी येतो. प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात प्राणी पाळण्याची हौस असते. काही ठिकाणी तर वाघ, अस्वल, अजगर असे विविध प्राणी पाळलें जातात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रकाश आमटेंचं कुटुंब.

प्राण्यांवर जितकं प्रेम कराल त्याच्या दुप्पट ते आपल्यावर प्रेम करतात. नकळतपणे ते आपल्या घरातले सदस्य बनून जातात. एक वेगळाच भावनिक संबंध त्यांच्यासोबत निर्माण होतो. प्राणीसुद्धा घरातल्या सदस्यांना तितक्याच आपुलकीने प्रेम करतात.

म्हणून घरात एक तरी पाळीव प्राणी असावाच!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

असामान्य कर्तृत्व असणारी सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेची महिला गुप्तहेर

Next Post

“साला ये दुख…” : प्रेम, जातवास्तव आणि अगतिकतेचं परफेक्ट चित्रण करणारा ‘मसान’

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post
masaan feature

"साला ये दुख..." : प्रेम, जातवास्तव आणि अगतिकतेचं परफेक्ट चित्रण करणारा 'मसान'

पुण्याच्या फिल्म इंस्टिट्युटमधून शिकून सुभाष घईंनी बॉलीवूड गाजवलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.