The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तब्बल साठ वर्षे रस्त्यांवर राज्य करणारी फोक्सवॅगनची बीटल खऱ्या अर्थाने पीपल्स कार होती

by Heramb
26 October 2024
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आपण सर्वांनीच वोल्क्सवॅगन किंवा फोक्सवॅगन कारच्या कंपनीचे नाव नक्कीच ऐकले असेल. बीटल ही फोक्सवॅगनची अनेक जुन्या आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्सपैकी एक. छोटी, हलकी आणि आपल्या विशिष्ट ‘कर्वी’ एरोडायनॅमिक्समुळे प्रत्यक्षातसुद्धा प्रचंड वेगवान असलेल्या बीटलला मात्र सुमारे ५ ते ६ दशकांचा इतिहास आहे.

बीटल कधीकाळी ‘पीपल्स कार’ म्हणूनही प्रसिद्ध होती. या ‘गिनीज रेकॉर्ड’ब्रेकिंग ऑटोमोबाईलचा पाया हि*टलरने घातला होता. पोर्शच्या इतिहासात फोक्सवॅगन बीटलचे नाव प्रामुख्याने घेण्यात येते. जगभरात इतर कोणतीही कार एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादित केले गेली नाही. शिवाय या कारने जगभरात सर्वांत जास्त मैल प्रवास केला आहे. त्यामुळे ही कार जगभरात चाहत्यांच्या आवडीची बनली आहे.

फोक्सवॅगन – लोकांची कार, लोकांच्या आवडीची कार. हे याआधीच ॲ*डॉल्फ हिट*ल*रच्या लक्षात आले होते. म्हणूनच त्याने फर्डिनांड पोर्श यांना १९३४ साली फोक्सवॅगनच्या बीटलचा पहिला, मूळ प्रकार बीटल सेडान किंवा केडीएफ-वॅगन विकसित करण्यास सांगितले. जर्मनीमध्ये कारद्वारे त्याने सार्वजनिकरित्या “क्राफ्ट डर्च फ्रायड” हे ब्रीदवाक्य तयार केले. म्हणजेच आनंदाद्वारे शक्ती.

हिट*लरच्या आवडीची कार

२००७ साली प्रकाशित ‘व्होकॅब्युलर डेस नॅशनल सोझिअलिझमसच्या (व्होकॅब्युलरी ऑफ नॅशनल सोशालिजम)’ लेखिका कॉर्नेलिया स्मिट्झ-बर्निंग यांच्या मते, ‘ना*झी जर्मनीने फोक्सवॅगनची पायाभरणी केली आणि फोक्सवॅगनला नाव दिले: ‘क्राफ्ट-डर्च-फ्रुएड-वॅगन.’ केडीएफ-वॅगन नावाच्या कारद्वारे शक्ती आणि आनंदाला चालना देण्याचा यापेक्षा चांगला मार्ग कोणता असेल!



हिट*लर*ला जर्मन कुटुंबातील ५ जणं कारमध्ये आरामात बसून प्रवास करू शकतील, कारचा वेग ६२ मैल प्रति तास (१०० किमी प्रति तास) असावा असे वाटत होते. जर्मनीच्या सामान्य माणसाच्या मते ती कार केवळ एखाद्या सर्कसमधील कारसारखी होती. हिट*लरने कार तयार करण्यासाठी जे निकष मांडले ते अगदी सुलभ आणि सोपे होते: लोकांना ही कार आर्थिकदृष्ट्या परवडणारी पाहिजे होती, 

पोर्शला सुद्धा टिकाऊ आणि जागेच्या बाबतीत कार्यक्षम अशी स्वतःची उत्तम निर्मिती करायचीच होती. अमेरिकेत विकल्या गेलेल्या सरासरी २१ मैल प्रति गॅलन कारच्या तुलनेत सरासरी ४० मैल प्रति गॅलन मायलेज देणारी कार आता पोर्शला तयार करायची होती. याशिवाय जर्मनीची गोठवून टाकणारी थंडी सहन करण्यासाठी आणि इतर प्रकारच्या सर्व वापरांसाठी ‘एअर-कुल्ड’ इंजिन या नव्या ‘पीपल्स कार’मध्ये बसवण्यात येणार होते.

पोर्शने या सर्व आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी तसेच ‘पीपल्स कार’च्या बॉडीची रचना तयार करण्यासाठी मर्सिडीजच्या डेमलर-बेंझ एजी येथील प्रकल्पांवर काम करणारे ऑस्ट्रियाचे मुख्य डिझायनर एरविन कोमेंडा यांना नियुक्त केले. कोमेन्डाचे पहिले स्केच १९३६ साली पूर्ण झाले. त्यांनी केडीएफ-वॅगनच्या फेंडरचा भाग कारच्या मुख्य भागाशी जोडला. अशा प्रकारे त्यांनी कारला एक सर्वोत्कृष्ट ‘सिग्नेचर लुक’ दिला आणि ‘२९ १९३७ डब्लू-३०’ हे पहिले प्रोटोटाइप तयार केले गेले.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

या प्रकल्पाची सुरुवात तर चांगली झाली. कारचा आकारही कमी झाला. पण पीपल्स कार ही जर्मनीमधील लोकांना तसेच जगभरातील नेत्यांना प्रभावित करण्यासाठी तयार केली गेली होती. दीड लाख किलोमीटरच्या टेस्ट ड्राइव्हमध्ये, केडीएफ-वॅगन १०० किलोमीटर प्रति तास वेगाने चालू शकली. हिट*लर*ची इच्छा पूर्ण झाली होती.  मात्र टेस्ट ड्राईव्हनंतर कारला थोड्या दुरुस्तीची आवश्यकता भासली. या कारने फक्त खराब रस्त्यावरही निर्विघ्नपणे प्रवास केला.

“द हिस्ट्री ऑफ द फोक्सवॅगन बीटल ऍज इट टर्न्स ८०”चे लेखक प्रिस्किला पेज यांच्या मते, “हिट*लरने खरं तर फोर्ड-एस्क्यूच्या मास मोटरायझेशनची कल्पना केली होती. कारण मोठ्या प्रमाणात विकली जाणारी ती एक लहान कार होती.” हिटलरने काही वर्षापूर्वीच कारची किंमत एक हजार जर्मन रीचपेक्षा कमी ठेवली होती. सुमारे ९९० जर्मन रीच. अमेरिकन डॉलर्सच्या भाषेत बोलायचं झालं तर सुमारे १४० अमेरिकन डॉलर्स. ही किंमत साधारण जर्मन कामगारांचे सुमारे ३१ आठवड्यांचे वेतन होते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या आधीच्या कोणत्याही कारच्या तुलनेत ‘पीपल्स कार’ खूप स्वस्त होती.

पण ऑटोमोबाईल क्षेत्राशी आणि उद्योगाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला हिट*लरने ठरवलेली किंमत संपूर्णतः अवास्तवच वाटेल. पण कार पाहिजे त्या किंमतीत का विकता येत नाही हे मात्र हिट*लरला समजत नव्हते. परिणामी, जर्मनीच्या जर्मन लेबर फ्रंट, डॉइश आर्बिट्सफ्रंटने पोर्शकडून हा प्रकल्प ताब्यात घेतला आणि एक वर्षानंतर १९३८ साली  केडीएफ-वॅगनची प्रोडक्शन लाइन बंद करण्यास सुरवात केली. १९३९ साली दुसरे महायु*द्ध सुरु झाल्यामुळे कारच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. 

महायु*द्धाचा परिणाम

आत्तापर्यंत केवळ २१० मॉडेल्सची निर्मिती केली गेली होती आणि यानंतर ऐतिहासिक कार कारखानाच्या इमारतीचे हिट*लरसह इतर श्रीमंत ना*झी लोकांसाठी एका लष्करी इमारतीमध्ये रूपांतर झाले. अर्थातच यानंतर अगदी प्रथम परिवर्तनीय ‘केडीएफ-वॅगन’ कार तयार करण्यात आली. उत्पादन प्रक्रियेत बदल झालेला असूनही या केडीएफ-वॅगनने बरीच मूळ वैशिष्ट्ये जशीच्या तशी ठेवली. उदाहरणार्थ. एक फ्रंट-एंड सामान स्टोरेज आणि स्प्लिट-रियर-विंडो.

उत्पादन गटाच्या बदलाने आणखी एक फायदा झाला, तो म्हणजे केडीएफ-वॅगन अधिक हलके झाले. तसेच या नव्या केडीएफ-वॅगनमध्ये कुबेलवॅगन आणि श्विमवॅगनची कार्यक्षमता एकत्र करण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे केडीएफ-वॅगन आता ‘अँफिबियस’ वेहिकल होती. म्हणजेच भूभागावर अत्यंत दमदार परफॉर्मन्स देणारी कार आता पाण्यावर तरंगणारही होती. काहीच दिवसांत बीटलचे एका ‘बुल-फ्रॉग’मध्ये रूपांतर झाले.

भीषण दुसऱ्या महायु*द्धानंतर आणि हिटलरच्या पराभवानंतर, १९४५ साली, ब्रिटिशांनी फोक्सवॅगन कारखाना ताब्यात घेतला. पण ब्रिटिश लोक जगातील कोणत्याही ब्रिटीशेतर गोष्टीला हीन समजतात, त्याप्रमाणे ते या जर्मन ब्रँडलासुद्धा तुच्छ मानत असत. “क्वाईट अनॲट्रक्टिव्ह टू द ऍव्हरेज मोटरकार बायर.. टू अग्ली अँड नॉयसी” (एका सरासरी मोटार खरेदीदालाही अप्रिय, कुरूप आणि गोंगाट करणारा) असे म्हणून त्यांनी केडीएफ-वॅगनचा अपमान केला. कोणालाही अशी कार खरेदी करायची नव्हती, पण ब्रिटिशांना जर्मन अर्थव्यवस्थेला पुनर्स्थापित करण्याची किल्ली ऑटोमोबाईल उद्योग आहे हे समजले.

ब्रिटिश आर्मी ऑफिसर मेजर इव्हान हर्स्टला फोक्सवॅगनमध्ये काहीतरी अतिशय नाविन्यपूर्ण कल्पना साकारली असल्याचे वाटले.  पण खरंतर ब्रिटीशांना स्वतःची यु*द्धात उ*ध्वस्त झालेली वाहने बदलून त्या ठिकाणी दुसरी वाहने पाहिजे होती. फोक्सवॅगनकडून त्यांना ही नवी वाहने माफक किमतीत मिळणार होती. म्हणूनच, ब्रिटिश सैन्याने २० हजार कार्सची ऑर्डर दिली. एक वर्षापेक्षा कमी वेळात, “फोक्सवॅगन” नवीन अधिकृत नावाखाली, महिन्याला एक हजारपेक्षा जास्त प्रकार-१च्या केडीएफ-वॅगन कार्सचे उत्पादन करत होते. ज्याठिकाणी फोक्सवॅगनचा कारखाना होता त्याठिकाणाला केडीएफ-वॅगनच्या पुनरुत्पादनाच्या सन्मानार्थ, वुल्फ्सबर्ग शहर म्हणून ओळखले जाऊ लागले.

..आणि बीटल पुन्हा रस्त्यावर आली!

१९४७ पर्यंत, फोक्सवॅगनने पुन्हा एकदा सिव्हिलियन (लष्करेतर) वापरासाठी गाड्या तयार करण्यास सुरुवात केली. यामध्ये क्रोमड बंपर, एक सुरक्षित सुटे चाक आणि फडफडलेल्या खिडक्या यांचा समावेश होता. कंपनीने त्या वर्षी ८ हजार ९८७ पेक्षा जास्त बीटल मॉडेल्स तयार केले. यापैकी नेदरलँडला ५६ मॉडेल्स निर्यात करण्यात आल्या होत्या. १९४८ साली, उत्पादन संख्या १९ हजार २४४ पर्यंत पोहोचली.

जनरल मोटर्सच्या ओपलचे माजी कार्यकारी अधिकारी हेनरिक नॉर्डहॉफ यांना या प्रकल्पात आणण्यासाठी हर्स्टने नवोदित ऑटोमेकर्सची उपस्थिती वाढविण्यास मदत केली. नॉर्डहॉफने पुन्हा पोर्शशी भागीदारी करायला सुरुवात केली. हा संबंध पाहिल्यान्दा अमेरिकन्सनी आणि नंतर फ्रेंचांनी पोर्श ताब्यात घेतले तेव्हा प्रस्थापित केला गेला होता पण जेव्हा ब्रिटिशांनी फोक्सवॅगन कारखाना ताब्यात घेतला तेव्हा तो तोडण्यात आला. 

दोन कार डीलरशिपमधील चर्चेमुळे पोर्शने फोक्सवॅगनशी स्पर्धा न करण्याचे आश्वासन दिले. जर्मन निर्मात्याला आवश्यकतेनुसार प्रकार-१वर सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची परवानगी दिली. १९४९ सालापर्यंत, म्हणजे पुढच्याच वर्षी, कारची पहिली निर्यात अमेरिकेत आली. परिणामी अमेरिकेत दोन मॉडेल्सची विक्री झाली. एक वर्षानंतर, ही विक्री १५० टक्क्यांहून अधिक वाढून ३२८ टक्के झाली.

पुढे १९५० च्या दशकात फोक्सवॅगन प्रकार १ अनेक प्रकारे विकसित होत होती. स्प्लिट ओव्हल आकाराची मागील खिडकी एका नवीन युनिफाइड खिडकीसह बदलण्यात आली तसेच क्रोम ट्रिमसह स्प्लिट-विंडो बॉडीशेल, व्हेंट विंडो आणि डॅशबोर्ड इत्यादी बदल नव्या बीटलमध्ये करण्यात आले होते. पुढे १९५३ आणि १९५९ सालीसुद्धा बीटलमध्ये अनेक बदल झाले..

१९५३ सालची बीटल

मेक्सिकोमध्ये टॅक्सीसाठी वापर

१९७२ सालापर्यंत, सुपर बीटलची सेडान म्हणून ओळख निर्माण होऊन आणि मेक्सिको सिटीमध्ये ‘फोक्सवॅगन बीटल टॅक्सी’च्या प्रारंभासह, बीटल टाइप-१ ने ‘फोर्ड मॉडेल टी’च्या एकूण विक्री रेकॉर्ड्सनासुद्धा मागे टाकले. बीटल टाइप-१ चे जर्मन उत्पादन १९७८ साली थांबलेले असताना, अनेक दशकांपासून बीटलचे उत्पादन लॅटिन अमेरिकेत उत्पादन रेषांमध्ये होत राहिले. २००३ साली १९६७ च्या पदार्पणानंतर सुमारे ३७ वर्षांनी बीटल टाइप-१ चे २,१५,२८,४८० युनिट्स तयार केले गेले. त्यानंतर मेक्सिकोमध्ये उत्पादन लाइन बंद केली.

या घटनेचे स्मरण अत्यंत स्मरणीय कार्यक्रमाने केले गेले. कारच्या विंडशील्डवर स्पॅनिशमध्ये शब्द लिहिलेले होते, “Volkswagen of Mexico: The Last Sedan of the World, 30th of July 2003.” म्हणजेच “मेक्सिकोची शेवटची फोक्सवॅगन: जगातील शेवटची सेडान, ३० जुलै २००३”. प्रॉडक्शन लाईन बंद करताना फॅक्टरीच्या बाहेर येणाऱ्या या ऐतिहासिक वाहनाची मेक्सिकन परंपरेतील मारियाची बँडच्या साहाय्याने कामगार आणि चाहत्यांनी प्रशंसा केली आणि हा क्षण साजरा केला.

‘फोक्सवॅगन बीटल सेडान’चे उत्पादन १८ वर्षांपूर्वी बंद झाले असले तरी आजही जगभरातील कोट्यवधी लोकांनी अनेक कार शोद्वारे फोक्सवॅगन केडीएफ-वॅगनचे ‘पीपल्स कार’ हे नाव सार्थ ठरवले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

स्पॉट फिक्सिंग – मोहम्मद आमिरचा तो नो बॉल आजही पाकिस्तान क्रिकेटवरचा कलंक आहे

Next Post

चार्ल्स डार्विनच्या आधीही उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला गेला होता..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

चार्ल्स डार्विनच्या आधीही उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला गेला होता..!

ब्रिटनने वसाहतींवर केलेल्या अत्याचाराचे कागदपत्रं-पुरावे पद्धतशीरपणे नष्ट केले होते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.