The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या वारीचा इतिहास आपल्याला माहिती असायलाच हवा

by द पोस्टमन टीम
16 July 2024
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


लेखिका- सौ. मीरा चित्तरंजन कावडकर


पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता समाजाभिमुखता स्पष्ट होते.

स्नान करुन गोपीचंदनाचा टिळा लावावा. नित्यनियमाने हरिपाठ म्हणावा. संतांचे ग्रंथ वाचावेत. देवाच्या मुर्तीचे दर्शन घ्यावे, भजन किर्तनात सहभाग घ्यावा, पंढरपूरी वारी करावी, तसेच एकादशी व्रत करावे. सात्विक आहार, सत्त्वाचरण, परोपकार व परमार्थ करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून मुक्त होऊन पांडुरंगाशी एकात्म व्हावे, नामस्मरण करावे असा साधा परमार्थ वारकरी संप्रदायात सांगितला जातो .

पायी केल्या जाणाऱ्या या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचा उल्लेख सापडतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालविली.



आळंदी-पुणे -सासवड-लोणंद-फलटण-नातेपुते-माळशिरस-वेळापूर-भंडीशेंगाव-वाखरी-पंढरपूर अशा मार्गाने पालखी जाते. वाखरी येथे शेवटचे सर्व पालख्यांचे रिंगण असते.

असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाताना संत तुकाराम महाराजांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या कळसाचे दर्शन झाले व विठूरायाच्या ओढीने ते तिथून धावत निघाले. याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरला धावा करतात.

वारीच्या दरम्यान होणारे गोल रिंगण हे वारीचे आणखी एक वैशिष्ट्य मानले जाते. आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावरील सदाशिव नगर, खुडूस फाटा, बाजीरावाची विहीर याठिकाणी गोल रिंगणं होतात. रिंगण ही वारकऱ्यांसाठी अतिशय श्रध्देय संकल्पना आहे. मोकळ्या मैदानात वारकरी गोलाकार उभे राहतात. यातून मोकळ्या जागेतून माऊलींचा व स्वराचा अश्व धावतो.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरुढ होतात, अशी वारकरी संप्रदायात श्रध्दा आहे.

हैबतबाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख, तसेच ग्वाल्हेर दरबारी सरदार. त्यांच्या प्रेरणेने या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून राजशाही थाटामाटाने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली. तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे, वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) तसेच अंकलीकर शितोळे सरकार यांच्याकडून येत असे. या खर्चास सहाय्य त्या त्या वेळचे व राजे श्रीमंत पेशवे सरकार करीत असे. आज जरी माउलींच्या सोहळ्यात गजलक्ष्मी (हत्ती) नसले तरी दैनंदिन नैवेद्य, अश्व, पालखी तळावरील शामियाना, इत्यादी लवाजमा शितोळे सरकार पुरवतात.

वारीच्या वेळी निरनिराळ्या फडांवर किर्तन प्रवचन आदी कार्यक्रम होतात. फड म्हणजे दिंड्यांचा व दिंड्यांमधील गुरु-शिष्य मंडळींचा सुसंघटित समुदाय. वारकऱ्याने ज्यांच्याकडून माळ स्वीकारली असेल, त्यांचा तो शिष्य असतो. वार आल्यावर नियमाने तो त्या त्या फडावर किर्तन भजनादी श्रवण करतो.

आषाढी कार्तिकी विसरु नका मज। सांगतसे गुज पांडुरंगा।।

माझ्या जिवाची आवडी। पंढरपूरा नेईन गुढी।।

वारीची आवड ही आपल्या जिवाची आवड आहे हे सांगताना संत ज्ञानेश्वर म्हणतात ‘भेटेन माहेरा आपुलिया।।’

माहेर या विशेषणात पंढरीचे अवघे माहात्म्य सामावलेले आहे. पंढरी माहेर आणि भक्तवत्सल विठोबा ही सर्व संतांची विठूमाऊली होय. पंढरीची वारी एकट्याने नव्हे तर सामूहिकपणे करण्याची वारी आहे. इथे वैयक्तिक नव्हे तर सामुहिक भक्तीला विशेष महत्त्व आहे.

हरि तेथे संत, संत तेथे हरी
ऐसे वेद चारी बोलताती।।

अनाथांच्या नाथ असलेल्या पंढरिनाथाच्या भेटीची आस हरिभक्तांना वर्षभर लागून राहिलेली असते. दुःख विसरून मनामध्ये आनंदरुपी चैतन्याचा ठेवा निर्माण करते ती वारी, त्यातून मिळालेला सुखाचा समाधानाचा ठेवा जनमानसात वाटला जातो.

कुंचे पताकांचे भार घेऊन असंख्य वैष्णव टाळ म्रुदुगांच्या गजरात नाचत गात विठ्ठलाच्या गावी आपल्या माहेरा जातात आणि त्या निर्गुण निराकार अशा विठ्ठलाचे पायी नतमस्तक होऊन काय मागतात तर प्रेम, अखंड विश्वाचे कल्याण, संपूर्ण मानवजातीचे कल्याण.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मानसिक आजार म्हणजे भूतबाधा ही अंधश्रद्धा या माणसाने दूर केली आहे

Next Post

वसंतरावांनी कृषीक्षेत्रात खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आत्मनिर्भर केलंय

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

वसंतरावांनी कृषीक्षेत्रात खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आत्मनिर्भर केलंय

विजय अगदी काही पावलावर असताना या खेळाडूने जे केलं ते पाहून कोणालाही अभिमान वाटेल

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.