The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देश कोरोनाशी लढत असताना काश्मीरमध्ये आपल्या जवानांनी एक महत्वाचं ऑपरेशन केलंय

by द पोस्टमन टीम
15 June 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


बुधवारी, १ एप्रिल २०२० ला उत्तर काश्मीरमध्ये प्रचंड बर्फवृष्टी सुरू होती. कुपवाडा जिल्ह्यातील केरान सेक्टरमध्ये सैनिकांना आपल्या केंद्रातच थांबण्याचे आदेश होते. पण सीमेवर ड्रोनद्वारे करडी नजर ठेवण्यात आली होती आणि LOC वरील परिस्थितीचे फोटो नियमितपणे कमांड सेंटरला पाठवले जात होते. अचानक जुमागुंडजवळ काही हालचाल निदर्शनास आली. काही दहशतवाद्यांनी सीमेपलीकडून घुसखोरी केल्याचे संकेत मिळाले. कंट्रोल रूमने लगेचच चिनार फोर्सचे लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांना या घटनेची माहिती दिली. राजू यांनी तात्काळ आठ जाट रेजिमेंट तयार ठेवण्याचे आदेश दिले.

सैनिक कामाला लागले. LOC पासून काही अंतरावर भारतीय जवानांना चार ते सहाजणांच्या पावलांचे ठसे दिसले. सैनिकांनी लगेचच पावलांचा माग काढण्यास सुरुवात केली. दूर बर्फाच्छादित झाडीमध्ये ५ दहशतवादी जड उपकरणं घेऊन जाताना दिसली. दुपारी एक वाजता त्यांच्यावर गोळीबार सुरु करण्यात आला. गोळीबारानंतर दहशतवाद्यांनी आपल्याजवळच्या जड बॅगा तिथेच टाकल्या आणि ते खोल दरीमध्ये उतरले. लवकरच त्यांना उत्तरेकडून LOC आणि दक्षिणेकडून शमशबरी पर्वतांमध्ये अडकवण्यात सैनिकांना यश आले. आवा, कुमकाडी, जुरहुमा, सफवली, बटपोरा आणि हैहमा या गावांमध्ये सैनिक तैनात करण्यात आले.

२ एप्रिलच्या पहाटे ४१ आणि ५७ नॅशनल रायफल या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले. दुपारी ४:३० वाजता परत दहशतवादी दिसल्यावर पुन्हा एकदा त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यावेळी दोन्ही बाजुंनी बराच वेळ फायरिंग चालू होती आणि शेवटी एक एक करत खडकावरून उड्या मारत दहशतवादी बर्फाच्छादित पर्वतांमध्ये नाहीसे झाले.

सतत दोन दिवस दहशतवाद्यांचा पाठलाग सुरू होता. सततचा पाऊस आणि बर्फवृष्टी यामुळे सैनिकांच्या शोधकार्यात सतत अडचणी येत होत्या. या सगळ्यामध्ये अजून दोन वेळा चकमक झाली पण दहशतवादी काही हाती लागत नव्हते. चांगली बाब एकच होती की ते आता कुपवाडाच्या जंगलामध्ये अडकले होते. तो भाग जुमागुंड गावापासून जास्त दूर नव्हता.

त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी शनिवारी, ४ एप्रिलला रात्री उशिरा चौथी पॅराशूट रेजिमेंट आणि 4-पॅरा SF बटालियन यांना बोलवण्यात आले. या भारतीय सेनेच्या विशेष तुकड्या आहेत. कुप्रसिद्ध उरी हल्ल्यानंतर याच तुकड्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला होता.



ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे या विशेष तुकड्यांना आधी जवळच्या बटालियन मुख्यालयात नेण्यात आले आणि मग तिथून राणदोरी, गुगुलदरा आणि बेहक हाय या तीन क्षेत्रांमध्ये तैनात करण्यात आले. या ऑपरेशनचे लक्ष्य होते उंचीचा फायदा उचलत त्यांना एखाद्या कोपऱ्यात अडकवण्यात यावे. क्वाडकॉप्टर ड्रोन्स हे सुद्धा दहशतवाद्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवून होते.

५ खास पॅराट्रुपर्स १०,००० फुट उंचीवरून ‘एअर ड्रॉप’ करण्यात आले. या टीमचे नेतृत्व सुभेदार संजीव कुमार यांच्याकडे होते. कमांडो अगदी सावधगिरीने आणि काळजीपूर्वक आगेकूच करत होते. पण रविवारी पहाटे एक दुर्दैवी घटना घडली सुभेदार संजीव कुमार, पॅराट्रुपर अमितकुमार आणि हवालदार छत्रपाल सिंह चुकून एका बर्फाच्या टोकावर चढले. इतका भार न पेलवल्याने बर्फाचे टोक तुटले आणि तिन्ही सैनिक १५० खोल दरीमध्ये कोसळले. अजून दुर्दैव हे की हे तिघे नेमके दहशतवादी दडून बसले होते तेथून अगदी काही फुटांवर जाऊन कोसळले होते. इतक्या उंचावरून पडल्यामुळे त्यांची अनेक हाडे तुटली होती.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

त्यांना सावरण्याची कसलीही संधी न देत दहशतवाद्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आपल्या प्रचंड वेदना बाजूला सारत आपल्या तिन्ही सैनिकांनी त्यांच्यावर उलट हल्ला चढवला दहशतवादी आणि सैनिक यांच्यामध्ये केवळ ६ फूट इतके अंतर होते. त्यात अजून दहशतवादी खडकाआड दडलेले होते. अंतर खूप कमी असल्यामुळे सैनिकांना लक्ष्यभेद करणे देखील जमत नव्हते. याउलट दहशतवाद्यांनी प्रचंड गोळीबार चालवला होता.

पॅराट्रुपर्स अमितकुमार यांना १५ गोळ्या लागल्या, तर सुभेदार संजीवकुमार आणि हवालदार छत्रपाल यांच्यावर तर अक्षरशः गोळ्यांचा पाऊस पडला होता. पण आपल्या जवानांनी हार मानली नाही आणि अशा स्थितीमध्ये सुद्धा त्यांनी ५ पैकी २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

याच दरम्यान मोर्च्यात वर राहिलेले हवालदार दविंदरसिंह आणि पॅराट्रुपर्स बालाकृष्ण यांनी उतारावरून सरळ खाली उड्या घेतल्या आणि ते चकमकीमध्ये सामील झाले. त्यांना अजून २ दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यास यश आले. एक दहशतवादी मात्र त्यांच्या हातून निसटला पण आठव्या जाट बटालियने त्याची शिकार केली.

अतिशय गंभीर जखमी दोघांना ‘एअर लिफ्ट’ करण्यात आले. श्रीनगर मधील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ३ जवान घटनास्थळीच शहीद झाले. हे सगळे चित्तथरारक ऑपरेशन क्वाडकॉप्टर ड्रोन्स च्या साहाय्याने रेकॉर्ड केले गेले होते. चौथ्या पॅरा मुख्यालयात अनेक सैनिक व अधिकाऱ्यांनी आपल्या सैनिकांनी गाजवलेल्या पराक्रमाला पाहिले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

अझरबैजान या मुस्लीम राष्ट्रातील एका मंदिरात संस्कृत शिलालेख कसे काय आहेत?

Next Post

चीन त्यांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर रोबोट्सची भरती करतोय, हे आपल्यासाठी धोकादायक आहे.

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

चीन त्यांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर रोबोट्सची भरती करतोय, हे आपल्यासाठी धोकादायक आहे.

चीनी सरकारवर प्रश्नचिन्ह उभा करू शकेल अशा शब्दांवर तिथे बंदी आहे. वाचा संपूर्ण यादी.

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.