The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हायजॅक झालेल्या विमानातील प्रवासी इस्त्राईलने सोडवून आणल्याची चित्तथरारक कथा

by Tushar Damgude
29 December 2025
in इतिहास, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


२७ जुन १९७६ साली एअर फ्रान्सचं विमान २४६ प्रवाशांना घेऊन इज्रायलची राजधानी ‘तेल अवीव’हून उडालं. त्यात प्रामुख्याने इज्राईली यहुद्यांचा भरणा होता. पुढे विमानात अथेन्समध्ये आणखी ५८ प्रवासी बसले त्यात दोन अरब आणि दोन जर्मनांचा समावेश होता.

विमान उडाल्यावर काही वेळातच दोन अरब आणि दोन जर्मनांनी विमान हायजॅक करुन लिबीयाच्या दिशेनं वळवलं. तिथे विमानात इंधन भरून विमान युगांडामध्ये एंटीबी एअरपोर्टवर दाखल झालं. तिथे अपहरणकर्त्यांचे स्वागत केले युगांडाचा हुकूमशहा इदी अमिनने.

युगांडा मधुन अपहरणकर्त्यांनी इज्राईल सरकारपुढे काही मागण्या ठेवल्या त्या अशा-

१) पन्नास लाख डॉलर्स रोख

२) इज्राईली आणि इतर देशांच्या ताब्यात असलेल्या ५३ पॅलेस्टानियन कैद्यांची मुक्तता. मागण्या पूर्ण न झाल्यास १ जुलैपासून बंधक प्रवाशांच्या ह*त्येस सुरुवात.

दुसरीकडे इदी अमिनच्या सैनिकांनी यहुदी आणि इतर धर्मिय प्रवाशांना वेगवेगळे केले. आधी ४७ आणि नंतर १०० इतक्या इतर धर्मिय प्रवाशांची मुक्तता केली गेली, मागे उरले ८४ यहुदी आणि १२ विमान कर्मचारी.



इकडे इज्राईलने राजकीय दबाव आणून बंधकांची मुक्तता करण्याचे प्रयत्न सुरू केले. इदी अमिनशी मित्रत्वाचे संबंध असणाऱ्या एका माजी IDF सदस्याने अमिनशी संपर्क साधुन प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले. अमेरिकेकडुन इजिप्तचे राष्ट्रपती अन्वर सादात, यासर अराफात यांची मध्यस्ती करण्याचे प्रयत्न देखील अयशस्वी झाले. इज्राईलने वाटाघाटीची मुदत ४ जुलैपर्यंत वाढवून घेतली.

वाटाघाटींचा मार्ग निष्फळ ठरतोय हे लक्षात आल्यावर इज्राईलने बळाचा मार्ग अवलंबण्याचे ठरवून तयारी सुरू केली. एकदा हे ठरल्यावर वेगवेगळे पर्याय समोर आले. बोटीने लेक व्हिक्टोरीयामधून कमांडो पाठवून द*हश*तवाद्यांचा खात्मा करायचा आणि इदी अमिनकडून  परवानगी घेऊन बंधकांची सुटका करून घ्यायची असा प्रस्ताव आला, पण लेक व्हिक्टोरीयामध्ये मगरी असल्याने आणि इदीअमिनचा भरोसा नसल्याने तो प्रस्ताव बारगळला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

होत होत विमानातून कमांडो पाठवून ऑपरेशन करण्याचे सर्वांना पटले पण परतीच्या प्रवासासाठी पुरेसे इंधन क्षमता असलेली विमानं तेव्हा इज्राईलकडे नव्हती म्हणजे कुठल्या तरी आफ्रिकन देशाची मदत गरजेची होती. केनिया हा देश इज्राईलप्रती सहानुभूती बाळगून असल्याकारणाने गुप्त चर्चा करून तत्कालीन केनियन कृषिमंत्री मॅकेंझी यांनी इज्राईल विमानांना आसरा आणि इंधन भरण्याची परवानगी दिली. (ज्याची किंमत म्हणजे पुढे इदीअमिनच्या एजंटनी त्यांचा खु*न केला.)

मोसादने सुटका झालेल्या एका प्रवाशाकडुन द*हश*तवाद्यांची ठिकाणं, संख्या, ह*त्यारं आदी सर्व माहिती गोळा केली. योगायोगाने बंधक ठेवलेल्या इमारतीच्या कामात एक इज्राईल बांधकाम कंपनी असल्याने त्या जागेचा इत्थंभूत नकाशा देखील मोसादला मिळाला.

बंधकांची सुरक्षा, रनवेची सुरक्षा, गोळीबार करून लक्ष गुंतून ठेवणारे लोक अशी वेगवेगळी जबाबदारी असणारी टिम जवळपास शंभर लोक घेऊन चार इज्राईल विमानं एंटीबीच्या दिशेनं उडाली. कुणाच्या डोळ्यांवर येणार नाही असा मार्ग घेऊन एंटीबीत ३ जुलैला दाखल झाली. एका विमानातुन इदीअमिनच्या काळ्या मर्सडीससारखी मर्सडीस बाहेर पडली. त्याच्या मागे अमिनचे बॉडीगार्ड असणारी रेंज रोव्हर बाहेर पडली त्या दोन्ही गाड्यात इजरायली कमांडो लपुन बसले.

दोन्ही गाड्या बंधक असलेल्या ठिकाणी निघाल्या. दोन्ही गाड्या युगांडन चेक पॉइंट वर पोहचल्या. परंतु तिथे असलेल्या चौकीदाराला इदीअमिनने नुकतीच पांढरी मर्सडीस घेतल्याचे माहिती होते. त्याने गाड्या अडवल्या त्याबरोबर इज्राईल कमांडोंनी त्यांना गोळ्या घालुन ठार केले आणि दहशतवादी सावध होऊ नयेत म्हणुन त्वरेने हालचाली करून बंधक असलेले टर्मिनल गाठले.

बंधक टर्मिनलच्या मुख्य हॉलमधे होते तिथे पोहचुन “जागेवर रहा, आम्ही इज्राईल कमांडो आहोत” अशी हिब्रु आणि इंग्रजी भाषेत घोषणा केली. एका १९ वर्षीय बंधकाने संशयास्पद हालचाल केल्यामुळे त्याला गोळ्या घातल्या गेल्या. अचानक एक द*हश*तवादी कुठूनतरी हॉलमधे अवतरला त्याला देखील गोळ्या घातल्या गेल्यावर “इतर (द*हश*तवादी) कुठे आहेत?” हे विचारलं गेलं. प्रवाशांनी बोट दाखवलेल्या दिशेकडे कमांडोनी आधी हातबॉ*म्ब फेकले आणि आत घुसुन गोळीबार करुन इतर तीन द*हश*तवाद्यांना ठार केलं.

तोवर कमांडोंच्या दुसऱ्या तुकडीने युगांडन फायटर विमानं उध्वस्त करून हवाईह*ल्ल्याचा धोका नष्ट केला. आता सुटका झालेल्या बंधकांना विमानात भरण्याची प्रक्रीया सुरू झाल्यावर युगांडन सैनिकांनी प्रतिह*ल्ला सुरू केला. एकच धुमाकुळ उडाला, त्यात बेंजामिन नेतान्याहु या भविष्यकालीन इजरायली पंतप्रधानांचा सैनिक असलेला योनाथन नावाचा भाऊ मृत्युमुखी पडला. इज्राईल कमांडोनी देखील तोडीस तोड उत्तर देऊन इदीअमिनच्या पुतण्याला ठार केलं. तोवर इकडे सर्व बंधक सुरक्षित विमानात बसल्यावर निघण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

सर्व ऑपरेशन ५३ मिनिटं चाललं त्यात ३० मिनिटं गोळीबार झाला. सात हायजॅकर्स, ४०/४५ युगांडन सैनिक, अकरा लढाऊ विमानं एवढं इदीअमिनचं नुकसान झालं तर एक सैनिक, तीन बंधक एवढं इज्राईलचं नुकसान झालं.

एक ७५ वर्षीय बंधक महिला मागेच राहिली जिचा खु*न इदीअमिनने निघृणपणे केला.

ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झालं. युगांडाने इज्राईलने केलेल्या ह*ल्ल्याची तक्रार युनोकडे केली आणि युनोने इज्राईलकडे जाब मागितला पण इज्राईलने त्याला कचऱ्याची टोपली दाखवली.

काळ बराच पुढे गेला, त्या कालचक्रात ४३ मुलांचा बाप असलेला आणि जवळपास पाच लाख लोकांच्या ह*त्येस जबाबदार असणारा इदीअमिन युगांडा टांझानिया यु*द्धात हार पत्करल्यावर सौदी अरेबीयात पळून गेला आणि तिकडेच मृत्युमुखी पडला, तर ऑपरेशन एंटीबी घडलं त्या विमानतळावर इज्राईल-युगांडा मैत्रीचं प्रतिक दिमाखात उभं आहे.

या सगळ्याचा सारांश काढायचा म्हटलं तर कणखर राजसत्ता, राजसत्तेला साथ देणारी नोकरशाही आणि स्वातंत्र्याची कुठलीही किंमत अदा करण्यास तयार असलेली जनता ज्या देशात असते त्या देशाचा झेंडा कधीही कुणासमोर झुकू शकत नाही.


लेखक: तुषार दामगुडे


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: IsraelOperation EntebbeUN
ShareTweet
Previous Post

एका शिष्यानं ओशोंना विचारलं – ‘श्रद्धा म्हणजे काय?’

Next Post

च*रस, गां*जा आणि अ*फू हे अंमली पदार्थ भारतात येतात तरी कुठून..?

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

च*रस, गां*जा आणि अ*फू हे अंमली पदार्थ भारतात येतात तरी कुठून..?

ब्राह्मणाला शेतीतलं काय कळतं असं म्हणणाऱ्या समाजात शरद जोशी शेतकऱ्यांचे नेते झाले

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.