The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा मानसिक आजार तुम्हालाही असू शकतो, वाचा काय आहेत लक्षणं

by द पोस्टमन टीम
3 April 2025
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


लेखक – रोहित साळुंके


वारंवार हात धुणे, एकच गोष्ट वारंवार तपासून पाहणे (गॅस बंद आहे का?, कुलूप लावले आहे का?), विशिष्ट पॅटर्नमध्ये वस्तूंची मांडणी करणे, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करण्याची इच्छा अशा गोष्टी आपण कधी कधी अनुभवतो किंवा कुणाला तसे करताना पाहिले असेल. पण जर याच गोष्टीमध्ये रोज तासनतास वेळ जात असेल आणि तसे केल्याशिवाय चैनच पडत नसेल  तर हे ऑब्सेसिव कम्पल्सिव डीसॉर्डर (OCD) चे लक्षण असू शकते.

काय आहे OCD?

OCD हा एक मानसिक आजार आहे. तो एक anxiety disorder (चिंतेचा आजार) आहे. ज्यामध्ये व्यक्तीच्या मनात बेचैनी निर्माण करणारे विचार (Obsessions) सतत येत राहतात. (जसे की हात अस्वच्छ असल्याचे वाटणे) व त्यातून सुटका करण्यासाठी ती व्यक्ती काही गोष्टी पुन्हा पुन्हा करत राहते (जसे की वारंवार हात धुत राहणे) त्याला compulsion म्हटले आहे. या गोष्टी केल्याने त्या व्यक्तीला तात्पुरते बरे वाटते. यामध्ये त्या व्यक्तीचा दिवसातील खूप वेळ वाया जातो.

OCDची लक्षणे?

मनात हात अस्वच्छ असल्याची भावना व त्यामुळे हात धूत राहणे. कुलूप लावल्याची किंवा गॅस बंद असल्याची वारंवार खात्री करणे. गोष्टी परफेक्ट झाल्या पाहिजेत याचा कमालीचा आग्रह. एका विशिष्ट पॅटर्नमध्ये वस्तू ठेवण्याची सवय. वारंवार देवाला नमस्कार करणे किंवा एखादी प्रार्थना पुन्हा पुन्हा मनात पुटपुटणे. नंबरप्लेट वरील अंकांची बेरीज करणे किंवा रस्त्यावरील पाट्या वाचत जाणे. स्वतःला किंवा इतरांना इजा करू अशी मनात भीती वाटणे. ही काही लक्षणे आहेत.



या गोष्टी न केल्यास ती व्यक्ती बेचैनी अनुभवते. Psychiatric व  psychologist OCD ची ट्रीटमेंट करतात. एका वर्षात सरासरी १.२% लोक या आजारापासून त्रस्त असतात. २.३% लोकांना आयुष्यात कधीतरी या आजाराचा सामना करावा लागतो. अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना हा आजार वयाच्या विसाव्या वर्षाआधी उद्भवतो. स्त्री वा पुरुषांमध्ये याचे प्रमाण सारखे आहे.

OCD होण्यामागची कारणे

या आजाराचे नेमके कारण ज्ञात नाही. अशा व्यक्तीच्या मेंदूमध्ये serotonin नावाच्या केमिकलची खूप कमतरता असते. लहानपणी झालेला शारीरिक छळ तसेच एखादा धक्कादायक अनुभव हा आजार होण्याची शक्यता वाढवतो. हा आजार मोठ्या प्रमाणावर आनुवंशिक आहे. त्यामुळे हा आजार कुटुंबातील एकपेक्षा जास्त व्यक्तीमध्ये आढळतो.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

उपचार

या आजारावर औषधे तसेच समोपचार (counselling) आणि psychotherapy ने उपचार केले जातात. सेरोटनिन हे केमिकल वाढवणारी औषधे (SSRI) तसेच antidepressant उपचारासाठी वापरतात. Cognitive Behavioral therapy (CBT) ही यावर अतिशय परिणामकारक therapy Psychotherapist वापरतात.

उपचारामध्ये अशा व्यक्तीला त्याच्या भीतीचा सामना करणे व वारंवार गोष्टी करण्यापासून थांबवले जाते. या आजारामुळे त्रस्त लोक तासनतास रोजची अंघोळ, ब्रश करण्यामध्ये घालवतात. दिवसातील खूप वेळ यात वाया जाण्याने त्रस्त लोकांच्या सामाजिक तसेच आर्थिक जीवनावर परिणाम होतो.

पौगंडावस्थेत हा आजार उद्भवल्यामुळे मुलांच्या शालेय जीवनावर तसेच अभ्यासावर विपरीत परिणाम होतो. आजारी व्यक्तींना आपण करत असलेल्या गोष्टी निरर्थक असल्याची जाणीव असूनही नाईलाजास्तव बळजबरी करत राहतात. खूप लोकांना माहिती अभावी आपण आजारी आहोत हेच माहिती नसते.

या आजारामुळे त्रस्त व्यक्ती खूप वेळा नैराश्याचा शिकार होतात. अशा व्यक्तीमध्ये आत्मह*त्येचेच विचार पाहायला मिळतात तसेच अनेक लोक याला कंटाळून आत्मह*त्येचा प्रयत्नही करतात.

हा आजार झालेल्या व्यक्तीमध्ये खूप नामांकित व्यक्तीही आहेत. यामध्ये हॉलिवूड अभिनेता डॅनियल रेडक्लिफ, लिओनार्डो डीकॅप्रीओ यांचा समावेश आहे. गायक जस्टीन टिंबरलेक आणि केटी पेरी यांनीही हा आजार असल्याचे सांगितले आहे. विसाव्या शतकातील नामवंत उद्योजक आणि वैमानिक हावर्ड ह्युजेस यामध्ये समाविष्ट आहेत.

बॉलिवूडमधील दीपिका पदुकोण, आयुष्मान खुराणा तसेच विद्या बालन यांनीही आजार झाल्याचे सांगितले आहे. मानसिक आजार हा शारीरिक अजाराप्रमाणेच त्रासदायक असतो. परंतु समाजातील मानसिक आजारांबाबत असलेला स्टिग्मा आजाराबद्दल मोकळेपणाने बोलण्यामध्ये येतो.

लोकांच्या भीतीने अशा व्यक्ती खूपवेळा आपल्या त्रासाविषयी बोलत नाहीत. भारतात तर या आजाराबद्दल खूप कमी जागरूकता असल्याचे पाहायला मिळते. मानसिक आजाराची कमी माहिती आणि जागरूकतेचा कमालीचा अभाव खूप जणांना या आजाराच्या उपचारापासून वंचित ठेवतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: OCD
ShareTweet
Previous Post

नवीन रोगाला नाव कसं दिलं जातं..?

Next Post

रोज कानावर पडणारा ‘क्वारंटाईन’ हा शब्द नेमका आला कुठून..?

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
Next Post

रोज कानावर पडणारा 'क्वारंटाईन' हा शब्द नेमका आला कुठून..?

सीमेवरच्या एका टरबूजासाठी राजस्थानमधील दोन राज्यांत घनघोर यु*ध्द झालं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.