The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विक्रेत्यांची यशोगाथा ग्राहकापर्यंत पोहोचवणारी, ‘ॲमेझॉन’ची अफलातून मार्केटिंग स्ट्रॅटेजी

by द पोस्टमन टीम
28 May 2025
in मनोरंजन
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


कुठल्याही व्यवसायाला मोठं करायचं असल्यास ग्राहकांशी असलेले संबंध मजबूत करणे हे कुठल्याही कंपनीचे पहिले काम असते. यासाठी या कंपन्या विविध प्रकारचे प्रयोग करत असतात जेणेकरून ग्राहक आणि विक्रेते यांच्याशी असलेले संबंध मजबूत होऊ शकतील आणि आपलं उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकेल.

ॲमेझॉन ही भारतातील अग्रगण्य ऑनलाईन रिटेलिंग कंपनी असून आपल्या ग्राहकांशी असलेल्या संबंधांच्या बाबतीत या कंपनीने तिच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना धोबीपछाड केले आहे. ॲमेझॉनने भारतात पॅकेजिंगमध्ये एक नवीन संशोधन केले असून या संशोधनानुसार त्यांनी त्यांच्या पॅकेजिंग सिस्टमला ग्राहकांच्या आणि विक्रेत्यांच्या दृष्टीने आकर्षक बनवले आहे.

या पॅकेजिंगला त्यांनी एक भावनात्मक रंग प्रदान करून ग्राहकांसोबत जिव्हाळ्याचं नातं निर्माण करण्याचा एक प्रयत्न केला आहे. या नव्या पॅकेजिंग बॉक्सेसला त्यांनी अमेझॉन स्टोरी बॉक्सेस असे नाव दिले आहे.

amazon the postman

या स्टोरी बॉक्सच्या मदतीने ॲमेझॉन आपल्या भारतीय विक्रेत्यांच्या कथा आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवू पाहत आहे, जे स्वतःच्या अनोख्या उत्पादनांची निर्मिती करत आहेत. हे उत्पादन बनवण्यापासून त्याच्या विक्रीपर्यंतचा संघर्ष हा या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचा हा प्रयत्न असणार आहे.



याबरोबरच ग्राहक जे उत्पादन आज विकत घेत आहेत, त्याचा त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा संघर्ष या माध्यमातून सांगितला जाणार आहे. आपल्या कर्मचारी आणि विक्रेते यांच्यासह ग्राहकांशी असलेली बांधिलकी दाखवून देण्याचा हा एक प्रयत्न आहे.

आपल्या ग्राहकांशी असलेल्या संबंधांना अजून उजाळा देण्यासाठी ॲमेझॉनने पहिल्यांदाच त्यांच्या स्टोरी बॉक्सेसवर विक्रेत्यांचे चेहरे बार कोडिंगच्या माध्यमातून प्रिंट केले आहेत.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

हे चेहरे आपल्या मोबाईलवर स्कॅन केल्यावर आपण सरळ www.amazon.in/storyboxes या संकेतस्थळावर जातो आणि त्यात आपण अमेझॉनवर आपल्या उत्पादनांची विक्री करणाऱ्या अजून काही लोकांच्या स्टोरीज वाचता येतात.

आपल्या योजनेचा भाग म्हणून अमेझॉनने एक नवीन जहिरात काढली आहे, ह्या जाहिरातीच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांना  विकत घेतलेल्या उत्पादनाच्या विक्रेत्याची कथा ऐकून होणारा आनंद दाखवला आहे.

सोबतच त्यांनी आपल्या विक्रेत्यांच्या आणि उत्पादनाच्या निर्मितीच्या संघर्षगाथा दाखवल्या आहेत. त्यांनी अशा ६ विक्रेत्यांची कथा लिहली असून अमेझॉनने त्यांच्या आयुष्याला बदलण्यात कशी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे, हे दाखवण्यात आले आहे.

story boxes the postman

 

रविंद्रन सिल्क कॉटनच्या राणी रविंद्रन, हस्तिकाचे बिस्वजीत सेन, सिरीमिरीच्या विजया राजन, झिझीराच्या इब्न्शारा शुल्लाई, ट्रेडीशनल रोग्नाआर्टचे अब्दुल गफार खत्री आणि वॉव स्कीन सायन्सच्या अश्विनी सोक्के ह्या विक्रेत्यांचा आणि विक्रेत्यांचा उत्पादनाच्या प्रवासाचा समावेश ह्यात करण्यात आला आहे.

आपल्या पॅकेजिंग आयडियाप्रमाणे ॲमेझॉनने या जहिरातीच्या निर्मितीत ग्राहकाला पुढे करण्याची किमया साधली आहे.

ह्या जाहिरातीत त्यांनी ग्राहक जो त्याने घेतलेल्या उत्पादनाच्या निर्मितीची कथा ऐकून आनंदी झाला असल्याचं चित्र दाखवलं आहे.

ऑनलाईनप्रमाणे ऑफलाईन स्तरावर देखील अमेझॉन ग्राहकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी आणि त्यांची अनुभूती अजून अविस्मरणीय बनवण्यासाठी ॲमेझॉनने ऑन ग्राऊण्ड मार्केटिंगचा मार्ग निवडला आहे.

ॲमेझॉनने भारतातील विविध पब्लिक प्लेसेसवर विविध जाहिराती लावल्या आहेत, त्यासाठी पोस्टर्स, बॅनर्स आणि आउटडोअर मार्केटिंगचा आसरा घेतला आहे.

उदाहरणार्थ बंगलोर विमानतळावर अमेझॉनने आपले एक विक्रेते आणि प्रसिद्ध कलावंत अब्दुल गफार खत्री यांचं पोट्रेट लावलं आहे. खत्री यांनी रोगण आर्टची स्थापना केली असून ते अमेझॉनवरचे एक प्रसिद्ध विक्रेते आहेत.

 

storybox the postman

खत्री यांच्या ह्या पोट्रेटचे वैशिष्टय असे आहे की हे पोट्रेट ३०० वेगवेगळ्या ॲमेझॉन बॉक्सेसचा वापर करून साकारण्यात आले आहे. हे आउटडोअर मार्केटिंगचे उत्तम उदाहरण आहे. या कलात्मक पद्धतीचा वापर केल्याने लोकांचे लक्ष त्याकडे आकर्षिले जात आहे.

ॲमेझॉनच्या ह्या जहिरातीच्या संपूर्ण योजनेच्या यशामागे ॲमेझॉनच्या क्रिएटिव्ह एजन्सीच्या लियो बर्नेट ऑर्चर्ड  यांचा मोठा वाटा आहे.

शबँग नावाची जहिरात कंपनी देखील ह्या अत्यंत यशस्वी अशा कॅम्पेनमध्ये डिजिटल मार्केटिंगची महत्वपूर्ण भूमिका बजावते आहे. त्यांनी ॲमेझॉनच्या ह्या अत्यंत महत्वपूर्ण मोहिमेला लोकांपर्यंत विविध मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून पोहचवण्याचे काम केले आहे.

ॲमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष गोपाल पिल्लई यांनी या कॅम्पेन आणि जहिरात मोहिमेविषयी मत व्यक्त करताना म्हटलं आहे की विक्रेते हे अमेझॉनच्या व्यवहाराचा महत्त्वपूर्ण भाग आहेत.

आमच्याकडे ५ लाखापेक्षा जास्त लहान मोठे बिझनेसमन, कलाकार, महिला उद्योजक तसेच अनेक नवे ब्रॅण्ड्स विक्री करतात. त्यांना व त्यांच्या प्रॉडक्टसला लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आमची आहे.

आम्ही स्टोरीबॉक्सेसच्या माध्यमातून त्यांची जीवनगाथा जगासमोर आणतो आहोत. आम्ही आतापर्यंत ६ विक्रेत्यांच्या कथा आमच्या बॉक्सेसच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या आहेत आणि आम्ही अजून काही कथा तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत.

आम्हाला अशी आशा आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहकांशी आणि विक्रेत्यांशी चांगले संबंध निर्माण करण्यात यशस्वी होऊ.

ॲमेझॉनने आपल्या ह्या नव्या कॅम्पेनच्या माध्यमातुन त्यांची ग्राहक व विक्रेत्यांच्या प्रतीची भूमिकाच समोर आणली नसून भारतातील ग्राहकांसोबत एक भावनिक नातं तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांच्या ह्या प्रयत्नांना किती यश मिळेल हे येणार काळच सांगेल. पण त्यांच्या माध्यमातून ग्राहक विक्रेत्यात एक अनोखं नातं निर्माण होईल हे मात्र नक्की!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: amazon
ShareTweet
Previous Post

भारतीय चहावर ब्रिटिशांनी कर लावला आणि अमेरिकन राज्यक्रांतीला तोंड फुटले

Next Post

रस्त्यावर संत्रे विकणाऱ्या एका व्यक्तीने यंदा ‘पद्मश्री’ हा बहुमान मिळवलाय!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

रस्त्यावर संत्रे विकणाऱ्या एका व्यक्तीने यंदा 'पद्मश्री' हा बहुमान मिळवलाय!

अस्पृश्यतेविरोधातल्या लढ्यात आंबेडकरांच्या बाजूने उभा राहिलेला राजा : राजर्षी शाहू

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.