The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फेसबुकवर आपण ज्याचे १ मिनिटांचे असंख्य व्हिडिओज पाहिलेत तो ‘नॅस डेली’ कोण आहे..?

by द पोस्टमन टीम
23 July 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


आधुनिक समाजात शिक्षण, करिअर आणि कमाई यानुसार मुलांचं यश मोजलं जातं. ‘त्यानं’ योग्य वयात या तिनही गोष्टी मिळवल्या होत्या. अमेरिकेसारख्या देशात ‘त्याला’ वर्षाकाठी १ लाख अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त पैसा देणारी नोकरी होती. मात्र, त्यात ‘त्याला’ आनंद वाटत नव्हता. असंच एक दिवस त्यानं आपली नोकरी सोडून जगभरात फिरण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याला तरी कुठं माहित होतं, नोकरी सोडूनही तो कोट्यवधी रुपयांचा मालक होईल! तुम्ही काहीही चुकीचं वाचलेलं नाही.

हा मुलगा फक्त फिरून पैसे कमवतो. त्याला तुम्ही ‘नॅस डेली‘ या नावानं ओळखता. नासिर यासिन असं त्याचं पूर्ण नाव आहे. २९ वर्षांचा हा मुलगा फेसबुकचा सर्वांत प्रसिद्ध आणि यशस्वी व्लॉगर आहे.

९ फेब्रुवारी १९९२ रोजी इस्त्रायली-पॅलेस्टाईन मध्यमवर्गीय कुटुंबात नासिरचा जन्म झाला. त्याचे आई-वडील इस्त्राईलमधील ‘अराबा’ या छोट्याशा शहरात राहतात. लहान असताना तो अतिशय लाजरा-बुजरा होता. नासिरची आई शिक्षिका तर वडील सायकोलॉजिस्ट होते. त्यामुळं घरातच त्याला शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळालं. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यानं इस्त्राईलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतील आव्ही लीग कॉलेजमध्ये त्यानं प्रवेश घेतला. त्याला एखाद्या प्रख्यात विद्यापीठात शिक्षण घेण्याची ‘भूक’ होती. त्यानं हार्वर्ड विद्यापीठात एरोस्पेस इंजिनिअरिंगसाठी अर्ज केला होता. त्याला स्कॉलरशिपही मिळाली होती. मात्र, तो ते पूर्ण नाही करू शकला. २०१४ साली त्यानं अर्थशास्त्रात पदवी मिळवली आणि कॉम्प्युटर सायन्सचा एक कोर्स देखील पूर्ण केला.

विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच नासिर एका सोशल मीडिया सर्च इंजिनचा आणि ‘पे इट फॉरवर्ड’ या रजिस्ट्रेशन सर्व्हिसचा सह-संस्थापक होता.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो न्यूयॉर्कला गेला. त्यानं पे-पालची मालकी असलेल्या ‘व्हेन्मो’ या मनी ट्रान्सफर ॲपसाठी कोडिंग करण्यास सुरुवात केली. या नोकरीतून त्याला वर्षाकाठी १ लाख अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम मिळत होती. मात्र, दररोज एका जागी बसून कॉम्प्युटरचा किबोर्ड बडवण्यात काहीही अर्थ नाही. यापेक्षा ठिकठिकाणी प्रवास करून नवनवीन लोकांना भेटणं कधीही चांगलं, असा विचार त्याच्या डोक्यात आला.



२०१६ मध्ये त्यानं आपली नोकरी सोडली. त्यानं एक कॅमेरा विकत घेतला आणि भटकंती सुरू केली. आपल्या नावातील काही अक्षरांपासून तयार होणारं ‘नॅस’ हे नाव त्यानं स्वीकारलं आणि ‘नॅस डेली’ नावाचं एक फेसबुक पेज सुरू केलं. नॅसचा अरेबिक अर्थ ‘पीपल’, असाही होतो. आपल्या प्रवासादरम्यान दररोज एक व्हिडिओ फेसबुक पेजवर टाकत असे. त्याचे व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरत होते. यातूनच त्याला ‘१००० minute videos’ ची कल्पना सुचली. १ हजार दिवस प्रवास करून १ हजार व्हिडिओ पोस्ट करण्याचा त्यानं निर्णय घेतला.

त्याचं पहिलं डेस्टिनेशन केनिया होतं. नैरोबीमध्ये काम करणार्‍या रशियन मालकीच्या एका मीडिया कंपनीने त्याचा पहिला व्हिडिओ पाहिला. त्याच्या स्टोरीटेलिंग कौशल्यावर कंपनी प्रभावित झाली आणि त्यांच्या फेसबुक पेजसाठी कंन्टेट देण्याची ऑफर नासिरला दिली. त्याला त्यांच्या कामासाठी कंपनी त्याला महिन्याला ३ हजार डॉलर्स देणार होती. यामुळं नॅसला आरामात प्रवास करता येणार होता. त्यामुळे त्यानं कंपनीही ही ऑफर स्वीकारली.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

‘आपलं प्रत्येकाचं आयुष्य खूप धकाधकीचं आहे. कित्येकांना तर आपल्या आवडी-निवडी जोपासण्यासाठीही वेळ मिळत नाही. अशांना निदान एक मिनीट तरी विरंगुळा मिळावा म्हणून मी ‘वन मिनीट’ व्हिडिओ तयार केले. मला नवीन लोकांना आणि ठिकाणांना भेटायला आवडतं. म्हणून माझे बहुतेक व्हिडिओ हे एखाद्या व्यक्तीबाबत किंवा ठिकाणाबाबत आहेत,’ असं नॅस सांगतो.

२०१८ मध्ये नॅस, फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गलाही भेटला. त्यानंतर त्याच्या ‘नॅस डेली’ एका शोचं स्टेटसं मिळालं इतका तो प्रसिद्ध झाला. सप्टेंबर २०१८ मध्ये त्याचे ८ मिलीयन फॉलोअर्स होते. पुढील दोन महिन्यातच ही संख्या १० मिलीयनवर गेली होती. २०१९ मध्ये त्यानं आपलं अधिकृत युट्यूब चॅनल सुरू केलं. त्याचा प्रत्येक व्हिडिओ हा एसएलआर कॅमेऱ्यात शूट केलेला असतो. सरासरी एक व्हिडिओ शूट करण्यासाठी सहा तास लागतात आणि एडिट करण्यासाठी तीन तास. एका मिनिटाच्या प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी नॅस ‘That’s one minute, see you tomorrow!’ ही टॅगलाईन वापरतो. त्याला या कामात त्याची व्हिडिओ मेकर गर्लफ्रेंड आयलिन तामिर आणि एक पोलिश ब्लॉगर व संगीतकार ऍगन हारे हे दोघे मदत करतात. विशेष म्हणजे नॉन-इंग्लिश लोकांमध्ये देखील नॅसचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत.

नॅस रवांडा, टांझानिया आणि माल्टा यासारख्या कमी लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेटी देतो. त्याच्या मते, जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांच्या समोर आलेल्या नाहीत. त्या जागा आपल्या प्रेक्षकांना दाखवता याव्यात म्हणून तो अशा जागांना भेटी देतो. ५ जानेवारी २०१९ रोजी नॅसनं त्याचा शेवटचा एक मिनीट व्हिडिओ पोस्ट केला. ‘That’s one minute, see you soon’, अशी त्या शेवटच्या व्हिडिओची टॅगलाईन होती. १ फेब्रुवारी २०१९पासून त्यानं आठवड्याला एक व्हिडिओ पोस्ट करण्यास सुरुवात केली. २०२१ पर्यंत १०० व्हिडिओ पोस्ट करण्याचा त्याचा मानस होता.

५ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यानं ‘अराउंड द वर्ल्ड इन ६० सेकंड : द नॅस डेली जर्नी’ हे मेमॉयर प्रसिद्ध केलं. २०२० मध्ये, त्यानं व्हिडिओ निर्मात्यांसाठी ‘नॅस अ‍ॅकॅडमी’ नावाची एक अकॅडमी सुरू केली आणि नॅस स्टुडिओ नावाचा एक व्हिडिओ-प्रोडक्शन स्टुडिओ सुरू केला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

विश्वास बसणार नाही पण जगातला सर्वांत लहान सीरिअल कि*लर अवघ्या आठ वर्षांचा आहे

Next Post

जगभरातील फॅन्सनी जेव्हा एकत्र येत एका स्टुडिओला चित्रपट पुन्हा बनवायला लावला..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

जगभरातील फॅन्सनी जेव्हा एकत्र येत एका स्टुडिओला चित्रपट पुन्हा बनवायला लावला..!

रोमन साम्राज्याला धक्का देणारी पामायराची राणी झेनोबिया

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.