The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना बद्दल तुम्हाला ही असलेली माहिती सत्य नव्हे अफवा आहे

by द पोस्टमन टीम
28 March 2020
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

कोरोनावरच्या अनेक खऱ्याखोट्या पोस्ट्स, विडीओज्, प्रेझेंटेशन्स, पोस्टर्स या सगळ्या गाठोड्यात मी आणखी माझ्या हातची पुरचुंडी करून टाकणार नाही, हे ठरवलं होतं; पण कालपासून एक व्हिडीओ किंवा त्याच अर्थाचं लिखाण वेगवेगळ्या मार्गाने पहायला/वाचायला मिळालं आणि आता काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत असं वाटलं.

सदर पोस्ट्स फॉरवर्ड करताना हे KEM हॉस्पिटलचे डीन, श्वसनविकारतज्ञ किंवा अमुकतमुक अशी माहिती चिकटवली जाते. तरी मी मुळ स्त्रोतापर्यंत जाण्याचा प्रयत्न केल्यावर एका युट्युब चॅनेलने घेतलेल्या या मुलाखतीत माहिती देणारी व्यक्ती एक प्रतिष्ठीत व प्रथितयश डॉक्टर आहेत हे लक्षात आलं. वैद्यकीय शिष्टाचारास अनुसरून, या डॉक्टरांचे नाव, फोटो, मुळ विडीओ किंवा पोस्ट असं काहीही मी आता जाहीर करणार नाही. केवळ सामान्यजनांच्या माहितीखातर काही गोष्टींचं स्पष्टीकरण देत आहे.

सदर व्यक्ती कोरोनाच्या संसर्गाबद्दल लोकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नसल्याचे सांगून, त्यांनी ‘आपल्या देशात टीबी, मलेरिया, लहान मुलांचे श्वसनविकार, हगवण या अधिक गंभीर समस्या आहेत’ असे म्हटले आहे, ते बरोबरंच आहे. पण त्यानंतर ‘कोरोना’बद्दल माहिती देताना गडबड झाली आहे.



‘कोरोना’बद्दलची माहिती सदर व्यक्ती आपल्या मोबाईलमध्ये बघून देते. या मोबाईलमधल्या माहितीचा स्त्रोत आपल्याला कळणे अशक्य आहे, परंतू काही दिवसांपासूनंच ‘युनिसेफ’च्या (unicef) नावाने अतिशय चुकीची व विपर्यस्त माहिती सोशल मिडीयावर शेअर केली जात आहे. या प्रकरणात अखेर ‘युनिसेफ’लाच लक्ष घालून ‘आमच्या नावाने चुकीची माहिती पसरवू नका’ असे आवाहन करावे लागले. युनिसेफचं स्पष्टीकरण – https://www.unicef.org/…/statement-charlotte-petri-gornitzk…

युनिसेफच्या नावावर खपवली जाणारी माहिती आणि सदर विडीओत दिलेली माहिती, यात बरेच साधर्म्य आहे. काय आहे ही माहिती ? त्यातील तथ्य काय ? मिथ्या काय ? तर त्याची उत्तरे –

हे देखील वाचा

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

१. असत्य – कोरोना हा विषाणू ४०० ते ५०० मायक्रोमीटर इतका मोठा आहे.
सत्य – वरील विधान पुर्णत: चुकीचे आहे. विषाणू इतके मोठे कधीच नसतात. वैद्यकियदृष्ट्या महत्वाच्या विषाणूंपैकी सर्वात मोठा विषाणू हा पॉक्सवायरस (Poxvirus) समजला जातो. तोसुद्धा केवळ ०.२ मायक्रोमीटर असतो. कोरोनाबाबत बोलायचं, तर ‘कोरोना’ कुटुंबातील विषाणू केवळ ०.१२ मायक्रोमीटर इतक्याच आकाराचे आहेत (खालील लिंक पहा). डोक्यावरचे केस १७ ते १०० मायक्रोमीटर इतके असतात. विषाणू चारशे मायक्रोमीटरचा कसाकाय असेल ?
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4369385/

२. असत्य – आकाराने इतका मोठा वा वजन असल्याने हा विषाणू ‘पडतो’ (ग्राउंडेड आहे !)
सत्य – मुळात हा विषाणू इतका मोठा नाही, हे आधीच स्पष्ट केले आहे. शिवाय कोरोना हा हवेतूनही पसरतो. जागतिक आरोग्य संघटनेची माहिती –
https://www.who.int/news-room/q-a-detail/q-a-coronaviruses (how does Covid-19 spread ?)

३. असत्य – कोरोना विषाणू हा २५° -२७°से. वातावरणातच टिकू शकतो. आपल्याकडील वातावरणात तो टिकणार नाही. मेटल सरफेसवर बारा तास, कपड्यावर नऊ तास कोरोना टिकतो असे ठाम आकडेही या विडीओ/पोस्टमध्ये दिलेले आहेत

सत्य – कुठलाही विषाणू उष्ण तापमानात विशेषतः ४०° पासून पुढे निष्प्रभ होत जातो हे खरे आहे. पण मानवी शरीराचे तापमान कायम ३६° ते ३७°से. राखले जाते. त्यामुळे बाहेरील वातावरणाचा कोरोनावर काय परिणाम होणार आहे ? विषाणू शरीराच्या बाहेर येऊन एखाद्या पृष्ठभागावर पडला, तर बाहेरच्या वातावरणाचा विषाणूवर परिणाम होईल; तिथे तो विषाणू किती काळ टिकेल हे असं कोणालाही ठामपणे सांगता येणार नाही. तापमानाचा कोरोनासंसर्ग व प्रादुर्भाव यावर फारसा परिणाम होत नाही, असेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.
पुढील दोन लिंक पहा –
1. https://www.who.int/news-room/q-a-detail/q-a-coronaviruses (How long corona survives on surface?)
2. https://www.who.int/…/novel-…/advice-for-public/myth-busters

४. असत्य – मिठाच्या पाण्यामुळे ‘कोरोना’ला अटकाव होईल.

सत्य – मिठाच्या पाण्याने नाक वगैरे धुतल्याने सामान्यत: सर्दीला (कॉमन कोल्ड) अटकाव होऊ शकतो. कोरोनावर याचा परिणाम होतो, असा कोणताही पुरावा नाही. (वरच्या प्रश्नातील दुसऱ्या क्रमांकाची लिंक पहावी).

५. पुढे याच विडीओत गोमुत्र, शेण खावे (??) का, या प्रश्नाला त्यात अँटीऑक्सिडंट्स, अँटीबायोटीक्स असतात, असे उत्तर दिले. ‘अँटीबायोटीक्स’ची संज्ञा एका डॉक्टरने अशी अगदीच ढोबळपणे वापरावी, हे आश्चर्यकारक आणि खेदजनक आहे.

असो, सदर पोस्टचा उद्देश कोणावरही टिका वा बदनामी नसून, चुकीच्या माहितीचे निराकरण करणे हा आहे, हे लक्षात घ्यावे. समजा, माझी ही पोस्ट उपरोल्लेखित चुकीची माहिती देणारे विडीओ वा पोस्ट्स शेअर करणारी पेजेस्, यु ट्यूब चॅनल्स, फेसबुक वा ट्विटर अकाऊंट्स इ. च्या वाचनात आली, तर कृपया त्यांनी ही चुकीची माहिती आणखी पसरवणे टाळावे.

(याशिवाय इतर विविध पोस्ट्समधील लसूण खाणे, गरम पाण्याने आंघोळ करणे, क्रोसिनच्या दोन गोळ्या खाणे वगैरेही अफवा जागतिक आरोग्य संघटनेने धुडकावून लावलेल्या आहेत. सद्यस्थितीत कोरोनावर कोणतेही निश्चित उपचार उपलब्ध नाहीत. कोणी तसा दावा करत असल्यास ती थाप समजावी !)

आम्ही कोरोनाबद्दलची माहिती कुठून घ्यावी, असा प्रश्न पडत असल्यास –

शक्य असल्यास www.who.int या जागतिक आरोग्यसंघटनेच्या किंवा www.unicef.org या युनिसेफच्या किंवा भारत सरकारच्या स्वास्थ व परिवार कल्याण मंत्रालयाच्या www.mohfw.gov.in या अधिकृत वेबसाईट्सवरून माहिती घ्यावी. मराठी/हिंदीतून माहिती हवी असल्यास बृहन्मुंबई व वसई-विरार महानगरपालिकेच्या वेबसाईटवर विश्वसनीय माहिती उपलब्ध आहे. हेसुद्धा शक्य नसेल, तर किमान ज्या माहितीचा स्त्रोत माहित नाही, अशी माहिती फॉरवर्ड करणं टाळावे ही विनंती !

===

डॉ. सागर पाध्ये
drsagarp12@gmail.com

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Corona VirusCoronavirus ChinaCOVID19
ShareTweet
Previous Post

तेराव्या शतकात संजीवनी शोधून काढणारा ‘अल्केमिस्ट’

Next Post

ब्रिटिशांनी तिला गर्भवती असताना तुरुंगात डांबले, पण तिने माघार घेतली नाही

Related Posts

आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
आरोग्य

या पेयांमुळे शरीरातील जळजळ वाढू शकते, त्यामुळे सांभाळूनच!

15 March 2024
Next Post

ब्रिटिशांनी तिला गर्भवती असताना तुरुंगात डांबले, पण तिने माघार घेतली नाही

राजीव गांधींना ऑफर झालेल्या या चित्रपटाने अमिताभचं आयुष्य बदलून टाकलं होतं!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.