The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अस्तित्वात नसलेल्या देशातून जपानच्या विमानतळावर आलेला ‘तो’ माणूस कोण होता, अचानक कुठे गायब झाला..?

by द पोस्टमन टीम
17 July 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


आयरिश लेखक जोनाथन स्विफ्टचं ‘गलिव्हर्स ट्रव्हल्स’ पुस्तक जगप्रसिद्ध आहे. आपल्यापैकी काहींनी ते वाचलं असेल किंवा त्याबद्दल ऐकलेलं असेल. आपल्या समुद्रसफरी दरम्यान गलिव्हरचं जहाज एका बेटावर वसलेल्या देशात येतं. लिलीपूट असं त्या देशाचं नाव असतं. त्या ठिकाणची सगळीच माणसं ६ इंचापेक्षा लहान होती. त्यांच्या समोर सामान्य उंचीचा असलेला गलिव्हर महाकाय राक्षसासारखा दिसत होता. लिलीपूटचे रहिवासी त्याला बंदी बनवतात आणि त्याची चौकशी करतात. गलिव्हर जेव्हा त्यांना सांगतो तो इंग्लंडमधून आलेला आहे आणि त्याठिकाणी त्याच्यासारखेच हजारो लोक आहेत, तेव्हा लिलीपूट्स विश्वास ठेवतं नाहीत. कसे ठेवणार ना? त्यांनी कधीच इंग्लंड हे नाव ऐकलेलं नसत आणि गलिव्हरसारखी माणसंही पाहिलेली नसतात.

ही तर एक गोष्टच होती. मात्र, आताही प्रत्यक्षात जर आपल्याला माहित नसलेल्या ठिकाणावरून एखादी व्यक्ती आली तर आपण तिच्यावर सहसा विश्वास ठेवणार नाहीत.

जुलै १९५४ मध्ये जपानच्या हानेडा (टोकिया) विमानतळावरील कर्मचाऱ्यांना असाच काहीसा अनुभव आला होता. त्यांची भेट एका अशा व्यक्तीशी झाली होती, जिच्याकडे पृथ्वीवर अस्तित्त्वातच नसलेल्या देशाचा पासपोर्ट होता. नंतर ती व्यक्ती अचानक गायबही झाली. हे प्रकरण ‘टाइम ट्रॅव्हल’ किंवा ‘पॅररल वर्ल्ड’च्या लोकप्रिय उदाहरणांपैकी एक आहे.

१९५४ साली टोकियो विमानतळावर नेमकं काय झालं होतं?

एकदम नीटनेटका पोषाख घाललेला आणि अगदी उद्योगपतीच्या ॲटीट्यूडमध्ये असलेला एक व्यक्ती टोकियो विमानतळावर आला होता. फ्रेंच कट दाढी असलेली ती व्यक्ती कॉकेशियन दिसत होती. इतर प्रवाशांप्रमाणं तो कस्टम विभागाच्या तपासणीला सामोरा गेला. त्याच्याकडे असलेला पासपोर्ट पाहून तपासणी अधिकारी गोंधळात पडला. कारण, त्या व्यक्तीचा पासपोर्ट टॉर्ड (Taured) नावाच्या देशातील होता. कस्टम अधिकाऱ्याच्या माहितीप्रमाणं असला कुठला देश अस्तित्त्वात नव्हता. त्यानं आपल्या वरिष्ठांशी देखील चर्चा केली. त्यांनी देखील देशाच्या नावाची शाहनिशा करून पाहिली मात्र, त्यांना ‘टॉर्ड’ काही सापडला नाही. आपण ‘टॉर्ड’ या देशातून तिसऱ्यांदा जपानला आलो असल्याचं त्यानं अधिकाऱ्यांना सांगितलं. विशेष म्हणजे त्याला जापनिज आणि इतरही काही भाषा येत होत्या.



गोंधळलेल्या विमानतळ कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान अधिकाऱ्यांनी जगाचा नकाशाच त्या व्यक्तीसमोर मांडला आणि त्याला त्याचा देश दाखवून देण्यास सांगितलं. क्षणाचाही विलंब न करता त्यानं फ्रान्स आणि स्पेनच्या सीमाभागात असलेल्या अँडोरा या प्रदेशावर बोट ठेवलं. त्याच्या म्हणण्यानुसार हजारो वर्षांपासून त्याच ठिकाणी ‘टॉर्ड’ हा देश अस्तित्त्वात आहे. आपला देश जगाच्या नकाशावर नसल्याचं त्यानेही आश्चर्य व्यक्त केलं. त्यानं कस्टम अधिकाऱ्यांशी बराच वेळ वाद घातला मात्र, अधिकाऱ्यांनी त्याला सोडलं नाही.

कुठेही फिरायचं असलं की पैसा लागतोच. व्यक्तीकडे असलेल्या पैशांवरून तो कुठल्या देशाचा आहे, हे ओळखणं सर्वात सोप आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीची आणि त्याच्या सामानाची झडती घेतल्यानंतर ते बिचारे आणखी गोंधळून गेले. कारण त्या महाशयांकडं वेगवेगळ्या देशांचं चलन सापडलं. वरकरणी पाहता त्यानं अनेक देशांना भेटी दिल्याचं दिसत होतं. त्या गूढ व्यक्तीनं तो ज्या कंपनीसाठी काम करत होता आणि ज्या हॉटेलमध्ये तो राहिला होता त्यांची देखील माहिती दिली.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

अधिक तपास केला असता त्यानं सांगितलेली कंपनी टॉर्डमध्ये नाही तर जपानमध्येच असल्याचं समोर आलं. याशिवाय त्यानं नाव सांगितलेल्या हॉटेलमध्ये देखील चौकशी करण्यात आली. मात्र, असा कुठला व्यक्ती आपल्याकडे कधी राहिलाच नाही, असं हॉटेल कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

या सर्व प्रकारानंतर ती व्यक्ती खोटं बोलत असून, नक्कीच तो कुणी मोठा गुन्हेगार असल्याचा संशय कस्टम अधिकाऱ्यांना आला. त्यांनी त्या व्यक्तीला पुढील चौकशीसाठी विमानतळापासून जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये बंदी केलं.

हॉटेलमध्ये स्थानबद्ध केलेल्या व्यक्तीवर नजर ठेवण्यासाठी त्याच्या खोलीबाहेर सुरक्षा रक्षकही ठेवण्यात आले होते. ज्या हॉटेल रुममध्ये त्याला ठेवलं होतं तिला फक्त एकच दरवाजा होता. दुसऱ्या दिवशी तपास अधिकारी पुन्हा चौकशीसाठी आले असता ती व्यक्ती नाहीशी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. हा सर्वांसाठी मोठा आश्चर्याचा धक्का होता. विशेष म्हणजे त्याचे जे कागदपत्र चौकशीसाठी घेतलेले होते, ते देखील नाहीसे झाल्याचं आढळलं.

संपूर्ण शहरभर त्याला शोधण्यासाठी शोधमोहिम राबवण्यात आली मात्र, काहीही उपयोग झाला नाही. बाल्कनी नसलेल्या आणि वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीमधून तो व्यक्ती नाहीसा झालाच कसा? याचं उत्तर आजपर्यंत मिळालेलं नाही.

या प्रकरणाविषयी अनेक ‘कॉन्स्पिरसी थिअरिज्’समोर आल्या. ही घटना ‘पॅररल वर्ल्ड’ थेअरीची असल्याचं काहींचं म्हणणं होतं. आपल्या पृथ्वीसारखीचं आणखी एक पृथ्वी अस्तित्त्वात आहे. तेथील भौगोलिक परिस्थिती कदाचित वेगळी असू शकते, अशी ही थिअरी आहे. हा गुढ व्यक्ती त्या ठिकाणावरूनच आला होता, असं मत मांडलं गेलं. काहींच्या मते, हा व्यक्ती ‘टाइम ट्रॅव्हल’ करत होता आणि अनावधानानं तो टोकियो विमानतळावर आला.

काहींच्या मते, तो सीआयएचा एजंट होता. हिरोशिमा आणि नागासाकी प्रकरणानंतर अमेरिकन व्यक्तीला सहज जपानमध्ये प्रवेश दिला गेला नसता म्हणून हा अस्तित्वात नसलेल्या देशाचा बनाव रचण्यात आला होता.

या रहस्यमयी व्यक्तीसोबत त्याची कागदपत्रेही गायब झाल्यामुळं त्याचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पुरावे राहिले नाहीत. मात्र, तरीही भौतिकशास्त्रज्ञ आणि इतर शास्त्रज्ञांमध्ये हा व्यक्ती बर्‍यापैकी लोकप्रिय आहे. या घटनेशी जे लोक जोडले गेलेले होते त्यांनी सांगितलेल्या माहितीमध्ये देखील भिन्नता आढळते. ४ डिसेंबर २०१५रोजी, अमेरिकन लेखक ब्रायन डब्लू. अलॅस्पा यांनी या प्रकरणावर आधारित एक पुस्तक प्रकाशित केलं. ‘द मॅन फॉर्म टॉर्ड’, असं या पुस्तकाचं नाव आहे. २०१५मध्येच दिग्दर्शक निक क्रिस्टनसेन यांनी यावर एक लघूपट तयार केला होता.

टोकियो विमानतळावर घडलेल्या या प्रकरणाला अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. त्याचं गूढ मात्र, आजही कायम आहे!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

चित्रपट, वेबसिरीज डाउनलोड करायला टोरंट वापरणे गुन्हा आहे का..? जाणून घ्या..!

Next Post

गोष्ट तोंडाला पाणी आणणाऱ्या लोणच्याची !

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

गोष्ट तोंडाला पाणी आणणाऱ्या लोणच्याची !

या टिकटॉक स्टारकडे आहे जगातील सर्व अडचणींचं ‘सोल्युशन’!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.