The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हातपाय नसलेला ‘निक’ जगभरातील लोकांना मोटिवेट करतोय..!

by द पोस्टमन टीम
7 May 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आयुष्यात बऱ्याचदा निराश वाटते. काही अर्थ नाही जगण्यात. आपण काही करू शकत नाही, असे नकारात्मक विचार डोक्यात घर करून राहतात. पण, खरे तर हे विचारच आपल्याला कृतीशून्य बनवत असतात. कुठल्याही यशस्वी व्यक्तीचे जीवनचरित्र वाचून पाहिल्यास हे कळेल की सगळ्यांनीच आपली सुरुवात शून्यातून केली होती. पण, एखाद्याकडे हा शून्यही नसेल तर? तरीही जे आहे त्यासोबतच लोक सुरुवात करतात आणि चालत राहतात आपल्या प्रवासाचा अंतिम टप्पा येईपर्यंत.

यशस्वी व्यक्ती म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर कोणते चेहरे उभे राहतात? अमिताभ बच्चन, किरण बेदी, अब्दुल कलाम, मलाला युसुफजाई, असे कितीतरी. ही यादी खूप मोठी आहे, पण याच यादीत आणखी एका नावाचा समावेश होतो.

ते नाव आहे, निक युजीसिक. जन्मत:च दोन्ही हात आणि पाय नसलेल्या युजीसिकने आज ते करून दाखवले आहे, जे भलेभलेही करू शकत नाहीत. 

हातापायाने धडधाकट असणारेही आपल्या दुर्दैवी नशिबाचे खापर कोणावर फोडता येईल याचे निमित्त शोधत असतात. निकने मात्र आपल्या कमजोरीचा बाऊ न करता तिचा स्वीकार केला आणि त्या कमजोरीसह तो आत्मविश्वासाने आणि आनंदाने जगत आहे. सगळे अवयव व्यवस्थितरित्या काम करत असतानाही आपण मात्र, इतरांच्या मदतीची अपेक्षा करतो. कुणी मदत करत नाही, कुणाला आमची कदरच नाही, अशी कितीतरी गाऱ्हाणी मांडतो. निक युजीसिकने मात्र सगळ्या निसर्गदत्त अडचणींवर मात करून आपण आपल्या अडचणींपेक्षा मोठे असतो, अडचणी आपल्यापेक्षा मोठ्या नसतात हे दाखवून दिले.



३४ वर्षांचा निक जेव्हा स्टेजवर उभा राहून विचारतो की, “मी हात-पाय नसताना जर सुखी राहू शकत असेन तर तुम्ही का नाही?,” हे ऐकल्यावर समोर बसलेल्या सर्वांना नक्कीच स्वतःच्या तक्रारी कशा कस्पटासमान आहेत याची जाणीव होत असेल. 

निकला जेव्हा लोक आधी पाहत तेव्हा त्यांच्या नजरेत खूप दयानियता असे. म्हणजे कसं जगणार हा? कसं होईल याचं पुढं? लोकांच्या नजरेतील ही सहानुभूतीच निकला जास्त त्रासदायक वाटत असे. अपंग असण्याचा त्रास काय असतो त्यातील वेदना काय असतात हे निकपेक्षा चांगलं कुणाला दुसऱ्या कुणाला माहित असणार, पण लोक त्याच्यासाठी हळहळून त्याच्या या वेदनेवर आणखीनच मीठ चोळत असत.

सुरुवातीला तर निकला स्वतःची कामे देखील स्वतःला करायला जमत नव्हते. तो पूर्णतः दुसऱ्यावर अवलंबून होता. असं सतत दुसऱ्यावर अवलंबून राहणं त्याला नको वाटायचं. दररोजच त्याच्यासमोर एक नवे आव्हान उभे राहत असे. या सगळ्या आव्हानांवर मात करता करता एक दिवस त्याला कळालं की आपण आपल्याच आव्हानांवर मात करू शकतो.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

तो शाळेत जायला लागला. त्याच्या अशा विचित्र दिसण्यामुळे आणि असण्यामुळे त्याच्या वर्गातील इतर मुले त्याला चिडवत असत. त्याला कोणीही आपल्यासोबत खेळायला घेत नसे. मुलांच्या चिडवण्याने निक खूपच निराश झाला होई. आजूबाजूच्या लोकांची सतत दया भावनेने भरलेली नजर आणि मुलांचे हे चिडवणे त्याला अधिकच हताश करत होते.

आपण काहीच करण्याच्या लायक नाही आहोत असेच त्याला वाटत असे. याच निराशेतून त्याने आत्मह*त्येचाही प्रयत्न केला, पण सुदैवाने तो त्यातून वाचला. पण यानंतर मात्र त्याने मरण्याचा विचार डोक्यातून काढून टाकला आणि तो आनंदी जगण्याचे स्वप्न पाहू लागला. त्यानंतर मात्र निकने मागे वळून पहिलेच नाही.

वयाच्या सतराव्या वर्षी त्याला त्याच्या एका मित्राने सार्वजनिक व्याख्यानासाठी आमंत्रण दिले. बस तिथूनच निकच्या खऱ्या प्रवासाला सुरूवात झाली. त्यावेळी त्याला खऱ्या अर्थाने आपण काय करू शकतो याचा अंदाज आला. तिथेच त्याने ठरवले की इथून पुढे आपण इतरांना जगण्याची प्रेरणा द्यायची.

कालपर्यंत ज्याच्याकडे पाहून लोक, “याचं कसं होणार हा विचार करायचे,” ज्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करायचे, तोच आज जगाला कसं जगायचं आणि कसं आनंदी राहायचं याचे धडे देत होता.

इतर लोकांप्रमाणे निकला वाटत होतं की आपल्यालाही आयुष्यभर साथ देणारा कोणी जोडीदार भेटायला हवा. परंतु आपल्यासारख्या मुलाशी कोणती मुलगी लग्न करण्यास तयार होईल असंही वाटायचं आणि एक दिवस त्याची भेट कायने मियाहाराशी झाली. निक असाच एकदा एका कार्यक्रमासाठी बाहेर गेला होता आणि तिथेच कायने त्याचे भाषण ऐकण्यासाठी आली होती. दोघांच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि एक दिवस निकने कायनेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. कायने ही निकशी लग्न करण्यास तयार झाली.

निकच्या कामाची दखल अनेक संघटनांनी घेतली आहे. त्याला ऑस्ट्रेलियातील सन्मानजनक समजला जाणारा ‘ऑस्ट्रेलियन यंग सिटीजन ॲवार्ड’ही मिळाला आहे. २०१० साली निकने एका शॉर्ट फिल्ममध्ये लीड रोल केला होता. या फिल्ममधील त्याचा अभिनय चाहत्यांना खूपच भावला.

निकने आतापर्यंत जगातील ४४ देशांना भेट दिली आहे. तिथल्या लोकांमध्ये प्रेरणा जागवली आहे. अपंग असूनही निक सामान्य लोकांप्रमाणेच जीवन जगतो. त्याला पोहता येते, त्याला फुटबॉल, गोल्फ खेळण्याची आवड आहे. स्कायडायव्हिंग आणि सर्फिंग देखील करता येते. आहे त्या स्थितीतही आनंदाने जगण्याची एकही संधी तो गमावत नाही.

निकने “ॲटिट्यूड इज ॲटिट्यूड” नावाची एक कंपनी स्थापन केली आहे. लोकांना प्रेरणा आणि सकारात्मकतेने जगण्याचा संदेश देण्यासाठी लाइफ विदाऊट लिंब्ज नावाची एक एनजीओदेखील स्थापन केली आहे.

निकच्या आयुष्याचा हा प्रवास पाहिल्यावर आपल्यालाही नक्कीच जगण्याची प्रेरणा आणि अडचणींवर मात करण्याचे बळ मिळते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आपल्या मालकाची दहा वर्षे वाट पाहणारा हा आहे जगातला सगळ्यात इमानदार कुत्रा

Next Post

शेन वॉर्नच्या करिअरची सुरुवातच गुरु रवी शास्त्रींची विकेट घेऊन झाली होती

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

शेन वॉर्नच्या करिअरची सुरुवातच गुरु रवी शास्त्रींची विकेट घेऊन झाली होती

ही संस्था 'मासिक पाळी'विषयी प्रबोधन अभियान राबवत आहे, त्यात तुम्हीही सहभागी होऊ शकता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.