The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका चिम्पान्झीने निवडलेल्या शेअर्सनी ३६५.४ टक्के इतका परतावा दिला होता

by द पोस्टमन टीम
16 September 2025
in मनोरंजन, गुंतवणूक
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


स्टॉक मार्केट ही अनेकांची भवितव्ये घडवणारी आणि बिघडवणारी अनोखी जागा आहे. इथे कधी रंकाचा राव किंवा रावाचा रंक होईल हे सांगता येत नाही. स्टॉक मार्केटसारख्या संस्थेशी निगडीत असंख्य कथा असतात, कारण ही जागा मानवी भावभावना, व्यक्तीच्या आयुष्यातील चढउतार या सगळ्या गोष्टींची साक्षीदार असते. जगभरात चालणाऱ्या या स्टॉक मार्केट गेममध्ये अनेकदा काही प्राणीही त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे हिरो ठरले आहेत. ‘रॅवन थोरोगुड III’ ही त्यावेळी पाच वर्षांचे वय असलेली मादी चिंपँझी यापैकीच एक.

चिंपँझी हा वानरकुलातील एक कपी आहे. या कुलात मानव, ओरँगउटान व गोरिला यांचाही समावेश होतो. पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील वर्षावनांत चिंपँझी मोठ्या प्रमाणात आढळतात.

चिंपँझीच्या सर्व शरीरावर (चेहरा सोडून) दाट व काळे केस असतात. चेहरा काळसर तांबूस असून डोळे तपकिरी असतात. ते माणसाप्रमाणे काही अंतर पायावर चालू शकतात. ते पायांनी वस्तू पकडू शकतात. माणसाप्रमाणेच हाताला आंगठा असतो. आंगठा व इतर बोटे यांनी ते लहान वस्तू पकडू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही जमात बुद्धिमान म्हणून गणली जाते.

चिंपँझीचा मेंदू मानवी मेंदूच्या तुलनेत आकाराने अर्धा असतो. चिंपँझी माणसांप्रमाणे आवाज काढून, हातवारे व खाणाखुणा करून एकमेकांशी संवाद साधतात. त्यांच्या भाषेत २४ वेगवेगळे ध्वनी असतात आणि त्यातील प्रत्येक ध्वनीला एक विशिष्ट अर्थ असतो. विशिष्ट प्रकारे आवाज करून ते समूहातील इतरांशी संवाद साधू शकतात. त्यांना एक ते नऊ पर्यंतच्या संख्या ओळखता येतात असे सिद्ध झाले आहे.



चिंपँझी हा बुद्धिमान, चिकित्सक, लवकर शिकणारा व खेळकर प्राणी आहे. एकमेकांना मिठी मारणे, मुके घेणे व पाठीवर थाप मारणे अशा क्रिया चिंपँझी माणसासारख्याच करतात. तसेच त्यांच्या कुटुंबात ते एकमेकांना आधार देतात, समजून घेतात आणि आयुष्यभर सोबत राहतात. चिंपँझीचे भौतिक गुणधर्म आणि सामाजिक जीवन यांबाबतीत माणसाशी साधर्म्य असल्याने त्यांचा उपयोग वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय संशोधनासाठी केला जात आहे. चिंपँझी व मानव यांचे पूर्वज एकच असावेत, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. संशोधनानुसार, मानव व चिंपँझी यांच्या डीएनएमध्ये जवळपास ९६% समानता आढळली आहे.

तर १९९९ साली या पाच वर्षांच्या चिंपने डार्टबोर्डवर रँडम डार्ट्स फेकून जो पोर्टफोलिओ निवडला होता तो सुरुवातीला अतिशय तगडा ठरला. इतका, की त्याने निवडलेल्या स्टॉक्सवर त्याला वर्षभरात ३६५.४ टक्के इतका अगडबंब परतावा मिळाला होता. त्याने वॉल स्ट्रीटवरील सर्वात यशस्वी चिंपँझी म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आपले नाव नोंदवले. हे नेमके कसे झाले?

७ जानेवारी १९९९ या दिवशी रॅवनने डार्टबोर्डवर दहा वेळा डार्ट फेकले. या बोर्डवर १३३ कंपन्यांच्या स्टॉक्सची नावे होती. या सर्व इंटरनेटशी संबंधित कंपन्या होत्या. रॅवनला अर्थातच या कंपन्यांनी भूतकाळात काय कामगिरी केली आहे याविषयीची कल्पना नव्हती. त्यामुळे आयोजकांनी त्याचे दहा थ्रोज निवडले, आणि त्या स्टॉक्सच्या किमती वर्षाच्या सुरुवातीला बॅकडेट केल्या. यामुळे पारंपरिक बाजारातील निर्देशांकांशी तुलना करणे सोपे झाले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

यानंतर सहा ट्रेडिंग व्यापार दिवसांच्या आत तिने निवडलेल्या एका स्टॉकची किंमत तब्बल ९५ टक्‍क्‍याने वाढली. इंटरनेट स्टॉक रिव्यूचा संपादक असलेल्या पेरी याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्याने लिहिले, “तिच्यामध्ये इतकी प्रतिभा आहे, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही आणि तिने निवडलेले स्टॉक्स वॉल्स स्ट्रीटवरच्या अनेक जणांना तोंडात बोटे घालण्यास भाग पाडतील अशी आम्हाला खात्री आहे. तिने निवडलेले स्टॉक्स किती योग्य आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या फायद्याचे किंवा तोट्याचे आहेत हे येणारा काळच ठरवेल; परंतु आज तरी ती यशस्वी आहे.” त्या वर्षभरात रॅवननेही उत्तम कामगिरी केली. तिची कामगिरी ६००० इंटरनेट आणि टेक्नॉलॉजी मनी मॅनेजर्सपेक्षा उत्तम ठरली.

बुल मार्केटमध्ये नवीन प्रवेश करणाऱ्यालाही काही हमखास युक्त्या वापरून पैसे मिळवता येतात. इथे तर केवळ एक माकड आणि एका डार्टच्या मदतीने एवढी मोठी उलाढाल झाली होती. मार्केट उसळी घेत असताना रँडम स्टॉक निवडणे हे आकर्षक प्रलोभन वाटू शकते, पण ही युक्ती अगदी कमी कालावधीसाठी काम करते.

दुसरी गोष्ट म्हणजे अशाप्रकारे स्टॉक निवडण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या प्रशिक्षणाची आणि स्ट्रॅटेजी ठरवण्याची गरज नसते. त्यामुळे याकडे बहुतेकदा मनोरंजनाचा भाग म्हणून पाहिले जाते. त्यावेळी रॅवनचा करिश्मा इतका होता, की तिच्या नावाने मंकीडेक्स नावाचा निर्देशांकही निर्माण करण्यात आला होता. शिवाय तिने निवडलेल्या स्टॉक्सचे भविष्यात काय झाले यावर देखरेख ठेवण्यासाठी मंकीडेक्स डॉट कॉम या नावाने एक वेबसाइटही तयार करण्यात आली होती. पण कुठलीही गोष्ट शाश्वत नसते. तेच रॅवनने निवडलेल्या स्टॉक्सच्या बाबतीतही झाले. त्याला कारणीभूत ठरला इसवी सन २००० चा डॉट कॉम बूम.

ऑगस्ट २००० मध्ये मनी मॅगझिनने दिलेल्या अहवालानुसार मंकीडेक्स ३४ टक्क्याने खाली आला होता तर त्याच वर्षात नॅझडॅकने ३.३७ टक्क्याने उसळी मारली होती. ज्या स्टॉकने एकेकाळी ९५ टक्क्याने वाढून किमया केली होती, त्याच स्टॉकची प्रति शेअर १६५ डॉलर्स ही किंमत २००० च्या सुरुवातीला झपाट्याने घसरली होती. २००२ च्या अखेरपर्यंत दहापैकी दोन मंकीडेक्स स्टॉक्स नाहीसे झाले होते, तीन स्टॉक्सची किंमत एका डॉलर पेक्षाही कमी झाली होती आणि एका स्टॉकची किंमत तीन डॉलर्सच्या आसपास होती.

रॅवनची ही स्टोरी अनमानधपके शेअर बाजारात उतरून आपले नशीब आजमावणाऱ्या प्रत्येकासाठी दिशादर्शक आहे. आजही अनेकजण झटपट पैसा कमावण्यासाठी बाजारात उडी मारतात. कधी ती अचूक लागतेही, पण त्यात पूर्णपणे नशिबाचा भाग असतो. अशा प्रकारच्या नशिबावर अवलंबून केलेल्या व्यवहारांत अपयश येण्याचीच शक्यता जास्त असते.

उलटपक्षी संपूर्ण अभ्यासांती, विचारपूर्वक नियोजन करून जेव्हा शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक केली जाते, तेव्हा ती नक्कीच योग्य परतावा देते. हा वाढणारा पैसा बोगद्याच्या दुसऱ्या टोकाशी दिसणाऱ्या प्रकाशासमान असतो. योग्य व्यक्ती संयम ठेवत हळूहळू त्याकडे वाटचाल करतात.

येणारा प्रत्येक दिवस त्यांना या प्रकाशाच्या दिशेने घेऊन जात असतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

राधाकृष्णन यांचं १६ वेळा साहित्य आणि ११ वेळा शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झालं होतं

Next Post

फुटबॉल टीमचे शेअर्स ‘शॉर्ट सेल’ करून नफा कमावण्यासाठी खेळाडूंचा जीव धोक्यात घातला होता

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
गुंतवणूक

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

20 November 2024
गुंतवणूक

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

4 November 2024
गुंतवणूक

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

5 November 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
गुंतवणूक

लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट केली नसती तर आज वॉरेन बफेच्या तोडीस तोड असता..!

7 October 2023
Next Post

फुटबॉल टीमचे शेअर्स 'शॉर्ट सेल' करून नफा कमावण्यासाठी खेळाडूंचा जीव धोक्यात घातला होता

'पच्चीस दिन में पैसा डबल'ची सगळ्यात मोठी स्कीम या कार्यकर्त्याने केली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.