The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पारंपरिक यु*द्धं मागे पडून आपली आता जैव-यु*द्धाकडे वाटचाल सुरु आहे..!

by द पोस्टमन टीम
15 June 2025
in आरोग्य, विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


विज्ञानाच्या सहाय्याने मानवाने अनेक शोध लावले. यातील काही शोध हे मानवासाठी हितकारक आहेत तर काही अपायकारक. स्फो*टके, दारुगोळा, विषारी वायू, बॉ*म्ब, अणुबॉ*म्ब असे कितीतरी मानवी शोध हे माणसासाठी घातकच ठरले आहेत.

असाच एक अत्यंत घातक आणि संहारक शोध म्हणजे बायोवेपन्स म्हणजे जैविक अस्त्रे. तुम्हाला असे वाटत असेल की, जैविक अस्त्रांचा वापर करून यु*द्ध लढण्याची कल्पना अगदी अलीकडची आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. माणसाच्या नागरी संस्कृतीचा इतिहास जितका जुना आहे, जैविक अस्त्रांच्या वापराचा इतिहासही तितकाच जुना आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या संज्ञेनुसार, मोठ्या प्रमाणात लोकसंख्येला संपवण्यासाठी किंवा त्यांना दुबळे करून सोडण्याच्या मनसुब्याने वापरण्यात आलेला जीवाणू, विषाणू, कवक किंवा इतर विषारी पदार्थांना जैवास्त्र म्हणून संबोधले जाते. 

म्हणूनच कोव्हीड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर चीनने या विषाणूचा वापर जैवास्त्र म्हणूनच केल्याच्या चर्चानांही अनेकदा उत येत असतो. चीनने वूहानमधील प्रयोगशाळेत हा विषाणू तयार केल्याचा सिद्धांत आजवर अनेकांनी मांडला आहे, पण शास्त्रज्ञांना हे सिद्ध करण्यात यश आलेले नाही. हा विषाणू नैसर्गिक आहे की मानवनिर्मित हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत हे एक जैवास्त्र आहे असे छातीठोकपणे म्हणता येणार नाही.

खरे तर अनेकदा महान विचारवंतानी आणि शास्त्रज्ञांनीही असा जैवास्त्रांचा वापर करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे, पण यु*द्धात सगळं काही माफ असतं असं म्हणत सत्तापिसासू लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. दुसऱ्या महायुद्धा*त जपानने चीन विरुद्ध याचा वापर केला होता.



हे झालं अगदी अलीकडचं उदाहरण, पण जैविक अस्त्रांचा वापर नेमका कधी पासून सुरू झाला, त्याचा प्रयोग कसा करण्यात आला या आणि अशाच प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा लेखनप्रपंच!

जैविक अस्त्राचे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे विष. पूर्वीच्या काळी राजे महाराजे एकमेकांचा काटा काढण्यासाठी याचा वापर करत असत. मात्र त्याकाळात हा वापर एकट्या-दुकट्या व्यक्तीविरुद्ध करणेच शक्य होते. मोठ्या जनसमूहावर याचा कधी प्रयोग झाला नाही. दुसऱ्या महायु*द्धात जपानने देखील चीनमधल्या पाण्याच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात विष मिसळले होते. चीनमधील विहीरी, नद्या-तलाव अशा पाण्याच्या साठ्यात विष सोडले होते. ज्यामुळे चीनच्या खेड्यापाड्यात कॉलरा आणि टायफॉइडचा उद्रेक झाला होता.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

लुईस पाश्चर आणि रॉबर्ट कोच यांनी मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र शाखेची स्थापना केल्यानंतर जैविक अस्त्रांच्या निर्मितीचे एक व्यापक क्षेत्र निर्माण झाले. जैविक अस्त्रांमध्ये जीवाणू, विषाणू, कवक, अशा कुठल्याची माध्यमाचा शास्त्रासारखा वापर केला जाऊ शकतो. हे जीवाणू किंवा विषाणू एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होणारे असू शकतात किंवा सरळ सरळ हवेतही याचा वापर केला जाऊ शकतो. अन्न-पाण्याच्या माध्यमातूनही यांचा फैलाव होईल हे पाहिले जाते.

या सगळ्या जीवाणूंमध्ये अँन्थ्रॅक्स नावाचा जीवाणू खूपच घातक समजला जातो. या अँन्थ्रॅक्समुळेच कधी काळी प्लेग सारखा महभयानक साथीचा आजार उद्भवला होता. ज्यामुळे गावेच्या गावे, शहरेच्या शहरे उ*द्ध्वस्त झाली होती. 

इतिहासात याच जीवाणूचा अधिक वापर झाल्याचे आढळून येते. आता अँन्थ्रॅक्सला प्रतिबंध करणाऱ्या प्रतीजैविकाचा शोध लागला आहे, त्यामुळे त्याचा फारसा धोका राहिलेला नाही.

इतिहासातही एकमेकांच्या सैन्याला निष्प्रभ करण्यासाठी असा जैवास्त्रांचा वापर झाल्याची उदाहरणे मिळतात. ११५५ मध्ये बार्बारोसाने इटलीतील टोर्टोनामधील विहिरीत सैनिकांचे मृतदेह टाकून तिथले पाणी विषारी करण्याचा प्रयत्न केला होता. इतिहासातील जैवास्त्राच्या वापराचे हे पहिले उदाहरण.

त्यानंतर १३४६ मध्ये मंगोल सैनिकांनीही याचा प्रयोग केला होता. युरोपवर कब्जा मिळवण्याच्या हेतूने मंगोलांनी कैफा शहराला जिथून पाणी पुरवठा होतो त्या मुख्य जलाशयातच प्लेगने मेलेल्या लोकांची प्रेते नेऊन टाकली. त्यामुळे संपूर्ण शहरात प्लेग फोफावला आणि पाहता पाहता हजारो लोक मृत्युमुखी पडले. १४९५ मध्ये स्पेनने आपल्या शत्रू प्रदेशात वाईनच्या बाटल्यातून कुष्ठरोग्यांचे रक्त मिसळून त्या आयात केल्या होत्या.

सोव्हिएत संघ आणि अमेरिकेनेही मागे याचा प्रयोग केलेला आहे. अठराव्या शतकात अमेरिकेने ब्रिटनमध्ये देवीचे विषाणू सोडले होते. देवी, पीतज्वर अशा साथीच्या विषाणूंचा जैविक अस्त्रासारखा वापर केला गेला आहे.

जैविक अस्त्रांच्या वापराचा एक भयावह परिणाम म्हणजे याचा एकदा वापर केला आणि त्याचा फैलाव सुरु झाला तर खुद्द वापरकर्त्यालाही त्यावर नियंत्रण मिळवणे निव्वळ अशक्य आहे! म्हणूनच जैविक अस्त्रांचा वापर करण्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर बंदी घालण्यात आली आहे. १९७२ साली १८० देशांच्या नेत्यांनी मिळून जैविक अस्त्र विरोधी परिषद भरवली.

या परिषदेत करण्यात आलेल्या ठरावानुसार अशा विनाशक आणि संहारक जैविक अस्त्रांची निर्मिती, त्यांचे उत्पादन आणि साठा करणे अशा कृत्यांवर बंदी लादण्यात आली. अर्थात बंदी लादली गेली असली तरी यामुळे जैविक अस्त्रांचा धोका पूर्णतः नाहीसा झाला आहे असे नाही.

सध्या इराक, इराण, लिबिया, चीन, रशिया आणि उत्तर कोरिया या सहा देशात जैविक अस्त्रे निर्मितीची प्रक्रिया सुरू असल्याचे मानले जाते. चीनकडे तर अशी आधुनिक जैवास्त्रे तयार करण्याचा प्रकल्पच असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. या प्रकल्पात अशा जैवास्त्रांची निर्मिती, त्यांचे उत्पादन आणि त्यांचे सशस्त्रीकरण करण्याचे तंत्र असून चीनने एक सुनियोजित रासायनिक यु*द्धाची रणनीती आखली असल्याचेही अमेरिकेचे म्हणणे आहे.

एका अहवालानुसार चीन जनुकीय बदलाच्या तंत्रज्ञानाकडेही अधिक लक्ष देत आहे. जनुकीय बदलाच्या तंत्रज्ञानामुळे अशा जैवास्त्रांची संहारकता आणखी घातक होत जाणार आहे. क्लोनिंग आणि ट्रान्सप्लांटसारख्या तंत्राच्या सहाय्याने अधिकाधिक घातक युद्धे खेळली जाऊ शकतात, असेही काही तज्ज्ञांचे मत आहे.

खरे तर सूक्ष्मजीव शास्त्रच्या सहाय्याने निसर्गत: निर्माण होणाऱ्या जीवाणू आणि विषाणू विरोधात प्रतीजैविके निर्माण करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. या शास्त्राचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठीही होऊ शकतो. मात्र, लोभ, ईर्ष्या, मत्सर या मानवी दुर्गुणांमुळे चांगल्या गोष्टींचा वापर हा वाईट हेतूनेच करण्यात येऊ लागला आहे. यातून नेमके कोणाचे हित साध्य होणार आणि कोणाला नाहक बळी जावे लागणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

१९६५ पर्यंत भारतात एकाच वेळी दोन पंतप्रधान असायचे..!

Next Post

आंतरराष्ट्रीय करार मोडून रशियाने अंतराळात तोफ उडवली होती..!

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
Next Post

आंतरराष्ट्रीय करार मोडून रशियाने अंतराळात तोफ उडवली होती..!

एका चहावाल्याने गरज म्हणून बनवलेला बर्म्युडा आता फॅशन झाला आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.