The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१४ वर्षाचा हा मुलगा मिनी ‘ब्रूस ली’ म्हणून जगभर फेमस झालाय

by द पोस्टमन टीम
12 October 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


त्याच्या हातात विजेच्या चपळाईने फिरणारे नुंचाकू (मार्शल आर्ट्समध्ये वापरलं जाणारं एक साधन) आपल्या डोळ्यांचे पारणे फेडतात. भल्या-भल्या आणि कसलेल्या व्यायामवीरांचा पुशअप्स मारताना जीव निघतो. हा पठ्ठ्या मात्र, फक्त पायाच्या आणि हाताच्या बोटांवर आपला तोल सांभाळत असे काही पुशअप्स मारतो की, पाहणाऱ्यांची बोटे तोंडात गेल्यावाचून राहत नाहीत.

कार्टव्हिल, वन हॅन्ड कार्टव्हिल, स्प्लिट तर जणू काही त्याच्या डाव्या हाताचा मळ आहे. हे वर्णन ऐकून नक्की तुमच्या समोर ब्रुस ली किंवा आपला बॉलीवुड हिरो टायगर श्रॉफ या दोघांपैकी एक जण आला असेल. पण, वरती सांगितलेल्या सगळ्या गोष्टी एक १४ वर्षांचा मुलगा करतो असं म्हटलं तर? आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. मात्र, ही गोष्ट एकदम खरी आहे. जपानमध्ये ‘युसेई इमाई’ नावाचा हा मुलगा आहे. त्याला “मीनी ब्रुस ली” म्हणून ओळखलं जातं! नेमका हा मुलगा आहे तरी कोण हे जाणून घेणं नक्कीच औत्सुकत्याचं आहे.

युजी असं नाव असलेला आणि इंटरनेटवर ‘युसेई इमाई’ नावानं प्रसिद्ध असलेला हा मुलगा जपानी आहे. तो एक मार्शल आर्टीस्ट, जिमनॅस्ट आणि युट्युबर आहे. त्याचा जन्म जपानमधील नारा याठिकाणी त्याचा १६ एप्रिल २०१० रोजी झाला. जपानच्या अलिकडील काळातील समाज जीवनाचा अभ्यास केला तर लक्षात येतं की, तिथे बहुतेक घरांमध्ये केवळ एकच मुल आहे.

आपल्या एकुलत्या एक मुलाच्या आवडी-निवडी, त्याचं शिक्षण या गोष्टींकडे अतिशय काळजीपूर्वक लक्ष दिलं जातं. युजीचं देखील याच वातावरणामध्ये संगोपन झालेलं आहे. तीन ते चार वर्षांच्या युजीला मार्शल आर्ट्सचं आकर्षण वाटत असल्याचं त्याच्या वडिलांच्या लक्षात आलं. त्यांनी आपल्या मुलाची आवड लक्षात घेता, त्याला प्रोत्साहन दिलं.



परिणामी वयाच्या अगदी चौथ्या वर्षापासून युजीनं मार्शल आर्ट्सचा सराव सुरू केला. त्याचे आई-वडील कोण आहेत आणि काय करतात, याबाबतची माहिती माध्यमांसमोर आलेली नाही. मात्र, त्यांनी आपल्या मुलाची आवड जोपासण्याचं आणि त्याला पाठिंबा देण्याचं कौतुकास्पद काम केलेलं आहे.

युजीच्या कारनाम्यांविषयी जाणून घेण्याअगोदर मार्शल आर्ट्सबद्दल थोडसं जाणून घेऊया. मार्शल आर्ट्स ही एक कोडिफाईड सिस्टीम आहे. स्वसंरक्षणासाठी ही यु*द्ध कला वापरली जाते. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकास, मनोरंजन आणि अमूर्त सांस्कृतिक वारशाचे जतन म्हणून जगातील अनेक देशांमध्ये विशेषत: पूर्व आशियाई देशांमध्ये मार्शल आर्ट्सचा सराव केला जातो. जरी मार्शल आर्ट हा शब्द पूर्व आशियातील लढाऊ कलांशी निगडित समजला जात असला तरी, १५५० च्या दशकाच्या सुरुवातीला युरोपच्या लढाऊ प्रणालींमध्ये देखील त्याचा उल्लेख आढळतो.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

मार्शल आर्टस् म्हणजे ‘मार्सची अर्थात मंगळाची कला’. मंगळाला रोमन साहित्याबरोबरच भारतीय शास्त्रांमध्येही यु*द्धाची देवता मानले गेले आहे. मात्र, पूर्व आशियातील देशांमध्ये या कलेचा मोठ्या प्रमाणात प्रसार आणि विकास झालेला आहे. विशेषत: एकोणिसाव्या शतकामध्ये मार्शल आर्टचे विविध प्रकार विकसीत झाले. पुढे तर त्यांना व्यावसायिक स्वरूप देखील प्राप्त झालं. इतकचं काय ऑलिम्पिकसारख्या जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये या प्रकारांचा समावेश झाला. जपानमध्ये, ज्युदो, जुजुत्सु, कराटे आणि केंडो या प्रकारांचा उदय झाला. या सर्व प्रकारांना मार्शल आर्टची पार्श्वभूमी आहे.

मार्शल आर्टचे विविध प्रकार रुजलेल्या देशात जन्मलेला युजीच्या अंगात देखील जणू हे गुण उपजतचं आलेले होते. युजी हा मार्शल आर्ट लीजेंड ‘ब्रुस ली’ चा मोठा चाहता आहे. अगदी लहान वयापासून तो ब्रुस लीचे चित्रपट पहायचा. त्यातूनचं त्याला मार्शल आर्टमध्ये अधिक रूची निर्माण झाली. लहानगा युजी टीव्हीवर ब्रुसलीला पाहून त्याचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करत असे.

म्हणूनच त्याच्या वडिलांनी त्याला प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. वयाच्या चौथ्या वर्षीच तो वेगवेगळ्या चित्रपटांतील ब्रूस लीच्या मार्शल आर्टच्या दृश्यांचं अनुकरण करण्यास शिकला होता. ज्या वयात सामान्य मुलं आपल्याच विश्वात रममाण होऊन आपलं बालपण अनुभवतात, त्या वयात युजी ब्रुस लीच्या ‘गेम ऑफ डेथ’ चित्रपटातील नुंचाकूचा सीन अगदी हुबेहुब करण्याचं शिकला होता!

‘जीत कुन डो’मध्ये प्रशिक्षण घेत असताना युजीनं मैदानावर मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले. आपल्या मार्शल आर्ट कौशल्यात सुधारणा करण्यासाठी दररोज प्रयत्न करत आहे. तो दररोज सकाळी सहा वाजता उठतो आणि दीड ते दोन तास सराव करतो. मात्र, हे सर्व करत असताना त्यानं आपल्या अभ्यासाकडे कधी दुर्लक्ष केलं नाही.

न चुकता शाळेत जाण्याचा त्याचा नियमच आहे. शाळेतून आल्यानंतर देखील तो अतिरिक्त दोन तास प्रशिक्षण घेतो. त्याची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्यानं सिक्स पॅक ॲब्ज कमावले होते! नियमित सराव करून त्याच्या कौशल्यांमध्ये परिपूर्णता आली.

ही बाब लक्षात आल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याचा एक व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. अपलोड केल्यानंतर तो व्हिडिओ अल्पावधितचं व्हायरल झाला. ‘ब्रूस ली किड’, ‘मिनी ब्रुस ली’ आणि ‘द वर्ल्डस् स्ट्रॉन्गेस्ट किड’ अशा नावांनी त्याला प्रसिद्धी मिळाली.

त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याच्या सरावाचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केले. त्यामुळे तो कमालीचा लोकप्रिय झाला. २०१६ आणि २०१७ साली त्याला आंतरराष्ट्रीय टीव्ही शो, ‘द लिटल बिग शॉट’मध्ये आमंत्रित करण्यात आलं. त्या व्यासपीठावर त्यानं आपलं कौशल्य दाखवलं. ‘ब्रूस ली’ सारखे बनण्याचं आपलं स्वप्न असल्याचं त्यानं या शोमध्ये सांगतिलं होतं. त्यानंतर तो स्टीव्ह हार्वेच्या टीव्ही शोमध्येही दिसला. त्याला ‘वन चॅम्पियनशिप’नं आपला ब्रँड ॲम्बेसेडर बनवलं.

वन चॅम्पियनशिपसाठी प्रचार करताना युजी जॉन्सन आणि शिन्या औकी या जपानी मिक्स मार्शल आर्टिस्ट, व्यावसायिक कुस्तीपटू आणि ग्रॅपलरला भेटला. सध्या अवघ्या ११ वर्षांचा असलेला युजी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. त्याचे सर्व अकाउंटस् त्याचे वडील हाताळतात.

मार्शल आर्टमुळं लहानगा युजी प्रचंड श्रीमंत झाला आहे. २०२० पर्यंत, त्याचं मुल्य अंदाजे ५० लाख डॉलर्सपेक्षा जास्त होतं. आता युजी ज्या एकाग्रतेनं सराव करतो ती एकाग्रता त्याने कायम ठेवली तर एक दिवस तो नक्की आपला आदर्श असलेल्या ब्रुस लीप्रमाणं उच्च दर्जाचा मार्शल आर्टपटू होईल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

केबीसीत ५ करोड जिंकूनही सुशील कुमार दिवाळखोर बनला

Next Post

एकेकाळी कैद्यांना छळण्यासाठी बनवलेल्या ‘ट्रेडमील’ आता वजन कमी करण्यासाठी वापरल्या जातात

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

एकेकाळी कैद्यांना छळण्यासाठी बनवलेल्या 'ट्रेडमील' आता वजन कमी करण्यासाठी वापरल्या जातात

आपण पुरुष असल्याचं भासवून या महिलेने व्हॅटिकनच्या पोपची गादी सांभाळली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.