The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हात आणि केस रंगवणाऱ्या मेहंदीचा रंजक इतिहास जाणून घ्या

by द पोस्टमन टीम
20 June 2025
in ब्लॉग, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


सण असो वा घरातील कोणतेही समारंभ मेहंदी शिवाय खरी रंगत कशातच येत नाही. ईद असो दिवाळी असो की ख्रिसमस प्रत्येक सणाला हिच्यामुळेच आनंदात गहिरे रंग भरले जातात. विशेषत: प्रत्येकच धर्मातील विवाह कार्यात मेहंदी काढण्याचा परंपरा आढळून येते. अशा सर्व विशेष प्रसंगी घरातील लहान मुलींपासून अगदी प्रौढ स्त्रियांपर्यंत सर्वांच्या हातापायांवर मेहंदीचे सुंदर सुंदर नक्षीकाम केलेले असते.

सुंदरता वाढवण्यासोबतच आनंद वाढवण्यातही मेहंदीचा वाटा मोठा असतो. एखादीला जितकी हौस मेहंदी लावून सजण्याधजण्याची असते तर दुसरीला इतरांच्या हातावर मेहंदी काढून आपल्यातील हुन्नर दाखवण्याची तितकीच हौस असते. भारतीय स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधनाच्या साधनात मेहंदीला विशेष महत्व आहे.

खरे तर मेहंदी नेमकी कधी पासून वापरत आली?

याचा माग काढायचा म्हटल्यास आपल्याला ९ हजार वर्षांचा इतिहास काढून पाहावा लागेल. खरे तर याची सुरुवात कधी आणि कशी झाली याविषयी नेहमीप्रमाणेच मतमतांतरे असली तरी, सुरुवातीला इजिप्तमध्ये मेहंदीच्या वापरला सुरुवात झाली असे म्हटले जाते.



इजिप्तची राणी क्लिओपात्रा हिला मेहंदीची फार आवड होती. इजिप्तमधूनच मेहंदीच्या वापराला सुरुवात झाली. इजिप्तमध्ये फक्त राणीच नाही तर सामान्य लोक देखील याचा वापर करत. विशेषत: प्रेतांचे दफन करताना इजिप्तमध्ये मेहंदीचा वापर करत असत. प्रेताच्या नखांवर मेहंदी लावली जाई. उत्खननात सापडलेल्या अनेक अवशेषांवरूनही हे सिद्ध झाले आहे.

बाराव्या शतकात मुघलांकडून भारतात मेहंदीचा प्रवेश झाला. तरीही अलीकडच्या काळात याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असलेला दिसून येतो. मेहंदी तयार करण्यापासून ते मेहंदी काढण्यापर्यंत कित्येक रोजगार यामुळे भारतात निर्माण झाले. भिजवलेली मेहंदी कोनात भरली जाते आणि त्यापासून डिझाईन काढल्या जातात.

मेहंदीची झाडे ८ ते १० फुटाची असतात. विशेषत: उष्ण हवामान असणाऱ्या देशांत ही झाडे मोठ्याप्रमाणात आढळून येतात. यात भारत, इराण, पाकिस्तान, सिरीया या देशांचा समावेश होतो.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

मेहंदीचे अनेक उपयोग आहेत. मेहंदी शरीरातील उष्णता शोषून घेते. त्यामुळे सनस्ट्रोक आणि डोकेदुखीपासून बचाव करण्यासाठीही मेहंदीचा वापर केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसात मेहंदीच्या वापराने शरीराचे तापमान संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. शिवाय, नखांची झीज झाली असल्यास ती भरून काढण्यासाठीही मेहंदी वापरली जाते. कदाचित नेलपेंटची कल्पना मेहंदीच्या वापरातूनच पुढे आली असावी.

कावीळसारख्या अनेक आजारांवरसुद्धा मेहंदी गुणकारी असल्याचे मानले जाते. केसांना रंग देण्यासाठीही मेहंदीचा वापर होतो. शिवाय, मेहंदीमुळे केस मऊमुलायम होतात आणि त्यांचे चांगले पोषण होते. केस अधिक दाट, मजबूत आणि चमकदार बनतात. केस गळतीवरही मेहंदी उपयोगी ठरते. एवढेच नाही तर, केसांत कोंडा झाला असल्यास मेहंदीचा वापर करतात. पोटाच्या विकारातही मेहंदीच्या पानांचे सेवन केले जाते.

आत्ता जरी बाजारात तयार मेहंदीचे कोन मिळत असले तरी पूर्वी मात्र मेहंदीची पाने सुकवून तिची भुकटी केली जायची. यामध्ये कात, चुना आणि पाणी टाकून हे मिश्रण किमान दिवसभर भिजवले जायचे आणि रात्री हातांवर मेहंदीची नक्षी काढली जायची. आज मिळणाऱ्या रेडीमेड कोनामुळे मेहंदी भिजवण्याचे हे श्रम बरेच वाचले आहेत.

नवरीच्या हातावर काढलेल्या मेहंदीचा रंग जितका अधिक गडद तितके तिच्या नवऱ्याचे प्रेम जास्त असते अशा काही श्रद्धादेखील समाजात पाहायला मिळतात. नवरीला मेहंदी लावण्याचा कार्यक्रम तर अगदी उत्साहात केला जातो. यावेळी प्रौढ स्त्रिया पारंपारिक लोकगीते गातात. नवरीला मेहंदी लावणे हा एक पवित्र शकून समाजाला जातो. मेहंदी हे आनंदाचे, सौंदर्याचे, सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. मेहंदीद्वारे बनवली जाणारी अनेक चित्रे देखील प्रेम, समृद्धी, प्रामाणिकता, शुभ संकेताचे प्रतिक मानले जातात.

मेहंदीच्या माध्यमातून हातावर काढलेले हत्तीचे चित्र हे प्रजनन आणि शुभेच्छांचे प्रतिक मानले जाते. कमळाचे चित्र विचारांची शुद्धता आणि निष्पापपणा टिकवून ठेवण्यास मदत करते. हातावर काढलेले मोराचे चित्र दीर्घायुष्यासोबतच निरोगी आणि आनंदी जीवन प्रदान करते. हातावर काढलेले भगवान गणेशाचे चित्र जीवनातील अडथळ्यांवर मात करण्याचे सामर्थ्य देते, असे मानले जाते. हातावर मेहंदी काढल्याने जीवनात समृद्धी, प्रेम आणि कीर्ती मिळते असेही मानले जाते.

देशोदेशींच्या श्रद्धेत मेहंदीला वेगळे स्थान आहे. मोरक्को देशात दरवाजावर मेहंदी लावली जाते. असे केल्याने लोकांच्या वाईट नजरा दूर राहतात आणि घरातील दुष्ट शक्ती पळून जातात, अशी तिथे श्रद्धा आहे. दरवाजावर मेहंदी लावल्याने घरात समृद्धी येते असेही मानले जाते.

स्थापत्य कलेत जशा निरनिराळ्या शैली आढळतात, तसाच काहीसा प्रकार मेहंदीच्या बाबतीतही आहे. मेहंदीच्या डिझाईनमध्येही वेगवेगळ्या शैलींचा वापर केला जातो. फुलांचे आकार काढून बनवलेली मेहंदीचे डिझाईन ही मेहंदीमधील अरबी शैली आहे. याला अरेबियन मेहंदी म्हणतात. मोठमोठ्या भरलेल्या गोळ्यांची नक्षी काढणे ही बदायुनी शैली आहे.

भारतीय शैलीत मेहंदी एकाच वेळी दाट आणि विरळही असते. भारतीय शैलीत चंद्र, सूर्य, अशा नैसर्गिक प्रतीकांचा वापर जास्त केला जातो. कधी या वेगवेगळ्या प्रतीकांच्या माध्यमातून एक सुंदर कथाही हातावर रचली जाते.

पाकिस्तानी मेहंदीमध्ये घुमटाकार नक्षीच्या वापर जास्त केला जातो. शिवाय पानाफुलांचाही वापर केला जातो. पाकिस्तानी मेहंदीमध्ये गोलाकार मंडलापासून सुरुवात करून मेहंदीचा आकार वाढवला जातो. तर पाश्चिमात्त्य शैलीत त्रिकोण, चौकोन असे विविध भौमितीय आकार वापरून नक्षी काढली जाते. प्रत्येक शैलीत त्यांच्या त्यांच्या संस्कृतीनुसार काही आकार किंवा प्रतिक हे विशेष गोष्टींसाठी शुभ असल्याचे समजले जाते.

मेहंदीची रचना, आकार, प्रतीकांची मान्यता याबाबत वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या श्रद्धा असल्या तरी, मेहंदीने सौंदर्य खुलवण्याबाबत कोणत्याच संस्कृतीत दुमत नाही, हे मात्र नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आणीबाणीत जॉर्ज फर्नांडीस यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबलं होतं

Next Post

घटनेने दिलेले आरोग्याधिकार आपल्याला माहित असायलाच हवेत..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

घटनेने दिलेले आरोग्याधिकार आपल्याला माहित असायलाच हवेत..!

चीनच्या युवकांमध्ये रवींद्रनाथ टागोर एवढे प्रसिद्ध का आहेत..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.