The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ज्यावेळी पुरुष पत्रकार वॉ*र फ्रंटवर जायला घाबरत होते तेव्हा तिने तिथे जाऊन बातम्या दिल्या होत्या

by द पोस्टमन टीम
21 June 2025
in मनोरंजन, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


बायकांनी फक्त चूल आणि मुल सांभाळावं या पारंपारिक विचारसरणीला छेद देणाऱ्या कित्येक स्त्रियांनी येणाऱ्या काळातील महिलांसाठी एक व्यक्तिगत आकाश खुलं केलं, ज्यात त्यांना स्वतःच्या इच्छेनुसार भराऱ्या मारता येतील. अशा स्त्रियांच्या यादीत कधीही आपल्या आणि परक्या असा भेद करता येत नाही कारण त्यांनी बाईपणाच्या सगळ्या सीमांना आव्हान देऊन आपलं अस्तित्व सिद्ध केलेलं असतं. अशा स्त्रिया सदैवच येणाऱ्या पिढ्यांसाठी दीपस्तंभाचे काम करतात.

आपल्या जगण्यातून इतर स्त्रियांनाही आपली स्वप्नं कवेत घेण्याची प्रेरणा देणारी अशीच एक स्त्री म्हणजे मार्था गेलहॉर्न. मार्था गेलहॉर्न म्हटले की काही लोकांच्या डोक्यात फक्त अर्नेस्ट हेमिंग्वेची तिसरी पत्नी एवढंच येतं. पण मार्थाचं यापलीकडेही एक स्वतंत्र आणि तेजस्वी अस्तित्व होतं.

मार्था फक्त अर्नेस्टची बायको नव्हती, ती एक धडाडीची पत्रकार होती, कादंबरीकार आणि प्रवासवर्णने लिहिणारी लेखिका होती.

मार्थाचे आयुष्य सर्वसाधारण स्त्रियांपेक्षा वेगळे होते. ८ नोव्हेंबर १९०८ रोजी अमेरिकेतील मिसुरी राज्यातील सेंट लुईस येथे तिचा जन्म झाला. तिचे वडील डॉक्टर होते आणि आई एक स्त्रीवादी कार्यकर्ती, जिने महिलांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. सेंट लुईमधील शाळा संकुचित वृत्तीच्या आहेत असा त्यांच्या आई वडिलांचा समज होता. म्हणून मार्थाला त्यांनी शिक्षणासाठी युरोपला पाठवले.

शिक्षणाच्या निमित्ताने मार्थाने लहानपणीच जग पाहिले. मार्थाला पत्रकार व्हायचे होते आणि यासाठी तिने आपले शिक्षण अर्धवट सोडले. अल्बनीमधील एका छोट्या वृत्तसंस्थेत ती काम करू लागली. इथे तिचे काम होते महिलांच्या क्लबच्या बातम्या देणे आणि क्राईम रिपोर्टिंग करणे. सहा महिने तरी तिने हे काम केले. शेवटी तिने आपली बॅग भरली आणि न्यूयॉर्क शहरात आली. इथे तिने आणि जहाजावरील प्रवासाचे अनुभव सांगणारे लेख लिहिले.



एका बाईने पत्रकारीतेच्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणे हा त्याकाळी थट्टेचा विषय होता. तसेही कोणतीही महिला जेव्हा एका नव्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करू पाहते तेव्हा तिची हेटाळणी ठरलेलीच असते. मार्थालाही हे चुकले नाही. १९३० मध्ये तिने पॅरीस गाठले. इथे काही तरी नवे शिकायला मिळेल अशी तिला अपेक्षा होती. पॅरीसमध्ये तिने फॅशन संदर्भात लेखन केले. याच काळात तिने एक कादंबरीही लिहिली. प्रवासाची अत्यंत आवड असलेल्या एका स्त्रीवर ही कादंबरी बेतलेली होती.

याच काळात ती फ्रेंच तत्त्वज्ञ बर्ट्रांड दि ज्युवेनलच्या संपर्कात आली. बर्ट्रांड विवाहित होता आणि मार्थाला या नात्यात स्वतःचे स्थान निर्माण करता आले नाही. तेव्हा तिने बर्ट्रांडपासून फारकत घेतली. पॅरीसमधील त्या छान-छौकीच्या जीवनातील तिचा रस कमी झाला. आता पुन्हा काहीतरी नाविन्य शोधण्याच्या उद्देशाने तिने पॅरीस सोडले. ती पुन्हा अमेरिकेला परतली आणि फेडरल इमर्जन्सी रिलीफ ॲडमिनिस्ट्रेशनसाठी रिपोर्टिंग करू लागली. हे काम करताना तिने पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडणाऱ्या लोकांचे जीवन काय असते याचा जवळून अनुभव घेतला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

अमेरिकन नागरिक समजून घ्यायचे असतील तर आधी या लोकांचे जीवन समजून घेतले पाहिजे असे ती म्हणत असे. या काळात तिने गिरणी कामगार, शिक्षक, डॉक्टर, अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामान्य लोकांच्या मुलाखती घेतल्या.

कुपोषणाने रोडावलेली मुले, टीबीने खंगत चाललेली अख्खी कुटुंबं बघितली. कुठल्या न कुठल्या भयंकर आजाराने ग्रस्त झालेले हे लोक जीवनाबद्दल मात्र अजिबात निराश नव्हते. उलट त्यांच्या इतके जीवनावर प्रेम करणारी माणसं तिला कुठेच भेटली नाहीत. या सगळ्या यातनामय जीवनातही त्यांच्यातील विनोदबुद्धी शाबूत होती.

माणसाच्या जगण्याचे हे भयाण चित्र पाहिल्यावर मार्थ व्यथित झाली. या सगळ्यांचा सरकार काही भूमिका घेणार का नाही हा जाब विचारण्यासाठीही तिने अनेकदा आपल्या लेखणीचा वापर केला. या सगळ्यातून तिच्या मनात व्यवस्थेबद्दल एक चीड निर्माण झाली होती. या अनुभवांनी तिच्यातील धाडसी पत्रकाराला जन्म दिला. यातूनच पुढे तिने यु*द्ध पत्रकारितेतही पाऊल रोवले आणि त्यात ती यशस्वीही झाली. यु*द्धभूमीवरील अनुभवांनी तिला नेहमीच समृद्ध केले. तिच्या लेखणीला अधिकाधिक धार येत गेली.

दुसऱ्या महायु*द्धावर आधारित ‘अ स्ट्राईकन फिल्ड’सारखी कादंबरी ती यामुळेच लिहू शकली.

तिची पत्रकारिता सामान्य जनतेसाठी होती, सत्तेसाठी नव्हे. तिच्या पत्रकारितेने अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांनाही प्रभावित केले. त्यांचे सल्लागार असलेल्या हॅरी हॉपकिन्स यांनीही मार्थाला आपल्यासोबत काम करण्याची संधी दिली. रूझवेल्ट यांची पत्नी एलेनॉरने तर मार्थाला घरी बोलवून तिच्याशी ओळख करून घेतली. तिला जेवणाचे आमंत्रणही दिले. दोघींची मैत्री नंतर फुलत गेली. मिसेस रूझवेल्ट नेहमी तिच्या पाठीशी उभ्या राहिल्या.

१९३७ साली मार्थाला स्पेनमधील नागरी यु*द्धाचे रिपोर्टिंग करण्याचे वेध लागले. इथेच तिची ओळख अर्नेस्ट हेमिंग्वेशी झाली. हेमिंग्वेने तिच्या पत्रकारितेला नवे पैलू पाडले.

पुढे १९४० मध्ये दोघेही विवाहबद्ध झाले.

यु*द्धभूमीवरील प्रत्यक्ष अनुभवांचे कथन करण्यात मार्थ गढून गेली होती. व्हिएतनाम यु*द्ध, दुसरे महायु*द्ध, अरब-इस्राईल यु*द्ध अशा कितीतरी मोठमोठ्या यु*द्धभूमीवर जाऊन तिने प्रत्यक्ष रिपोर्टिंग केले. सैनिकांशी गप्पा मारल्या. त्यांचे अनुभव, त्यांच्या भावना ऐकून घेतल्या. मार्था एक चांगली पत्रकार होती त्यापेक्षाही ती एक चांगली श्रोता होती. कुणाच्याही व्यथा ऐकताना ती कधीही कंटाळत नसे, वैतागत नसे. उलट आपल्या विनोदी शैलीने आणि हास्याच्या फवाऱ्यांनी ती समोरच्या व्यक्तीला आपलेसे करून घेत असे.

तिच्या पत्रकारितेमुळे यु*द्धभूमीवरील वास्तव चित्र डोळ्यांसमोर उभे राहण्यास मदत झाली. जे सामान्य लोकांपासून लपवून ठेवले जाते तेही तिने आपल्या लेखणीतून उघड केले. आयुष्यातील साठ वर्षे सलग तिने याच कामाला दिली. यु*द्धभूमीवर पाऊल ठेवणे म्हणजे साक्षात मृत्युच्या दाढेत जाणे. अनेकदा तिने ही जोखीम पत्करली. यु*द्धभूमीवरील घटनांवर आधारित अनेक कादंबऱ्याही लिहिल्या.

मार्थाचे वैयक्तिक आयुष्यही अशाच उलथापालथींनी भरलेले होते. आयुष्याच्या शेवटी आलेले एकाकीपण आणि सोबत कॅन्सरसारख्या आजाराच्या भयानक वेदनांनी ती खचून गेली. यातून सुटका करून घेण्यासाठी १५ फेब्रुवारी १९९८ रोजी वयाच्या नव्वदाव्या वर्षी तिने आत्मह*त्या करून स्वतःच स्वतःच्या धगधगत्या आयुष्याला पूर्णविराम दिला.

संपूर्ण जीवन पत्रकारितेला वाहून घेणारी मार्था पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक तेजस्वी तारा आहे, जी आज अनेकांसाठी मार्गदर्शक ठरू शकते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अंतराळात जाणारा पहिला कृष्णवर्णीय ठरणार होता पण नासाने अचानक त्याला मोहिमेतून वगळलं

Next Post

मॅकीयावेलीचे विचार ऐकून हि*टल*र, मुसोलिनीचे पण फ्युज उडाले असते..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

मॅकीयावेलीचे विचार ऐकून हि*टल*र, मुसोलिनीचे पण फ्युज उडाले असते..!

डिप्थेरियाच्या साथीत या 'स्लेड डॉग'ने दहा हजार लोकांचा जीव वाचवला होता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.