The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मार्लबोरो सिगारेट्सची जाहिरात करणाऱ्या चार ‘मार्लबोरो मॅन’चा लंग कॅन्सरने मृत्यू झालाय

by द पोस्टमन टीम
30 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


तुम्हाला ‘मार्लबोरो‘ माहितीये? हो सिगरेटचा तोच ब्रँण्ड जो एकेकाळी फक्त महिलांसाठी आहे, असा समज होता. पुढे सिगरेटमुळं कॅन्सर होत असल्याचं संशोधन पुढे आलं आणि प्रकृतीच्या बाबतीत जास्त चौकस असलेल्या महिलांनी सिगरेट ओढणं अचानक कमी केलं. याचा मोठा फटका मार्लबोरोला बसला आणि यावर उपाय म्हणून जाहिरांतींमधून ‘मार्लबोरो मॅन’ प्रसिद्ध करण्यात आला.

१९५० च्या दशकात सुरू झालेली आणि २० व्या शतकातील सर्वांत प्रसिद्ध जाहिरात मोहिमांमध्ये त्याचा समावेश केला जातो. नेहमीच तोंडाजवळ मार्लबोरो सिगारेट असणारा आणि सर्व कष्टाची कामं करणारा राकट, पण देखणा माणूस या जाहिरातींमध्ये दाखवण्यात आला होता. त्यानंतर अमेरिकेत प्रदीर्घ काळासाठी ‘मार्लबोरो मॅन’ हा कणखर, स्वयंपूर्ण आणि कष्टकरी व्यक्तीसाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जात होता. मात्र, या मार्लबोरो मॅनबद्दलच वास्तव काहीतरी वेगळंच आहे.

जाहिरातींमध्ये मार्लबोरो मॅन साकारलेल्या किमान चार कलाकारांचा धूम्रपानाशी संबंधित आजारांमुळे मृत्यू झाला आहे, ही बाब तुम्हाला माहिती आहे का?

१९५४ पासून मार्लबोरो सिगारेटच्या जाहिरातींमध्ये काऊबॉयची वेशभुषा असलेला ‘द मार्लबोरो मॅन’ दाखवण्यात आले आहेत. गेल्या ७० वर्षांमध्ये टेलिव्हिजन जाहिराती, मासिकं आणि वृत्तपत्रांच्या जाहिराती, होर्डिंग आणि मार्लबोरो ब्रँडचा प्रचार करणाऱ्या इतर जाहिरातींमध्ये आतापर्यंत अनेक कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. त्यापैकी काहीजण दीर्घकाळ धूम्रपान करणारे होते आणि फुफ्फुसाच्या आजारपणामुळं मरण पावलेले आहेत.



प्रसिद्ध मॉडेल डेव्हिड मिलर १९५० च्या दशकात, सिगारेट ब्रँडसाठी मार्लबोरो मॅन म्हणून जाहिरातींमध्ये दिसला होता. १९८७ मध्ये वयाच्या ८१व्या वर्षी त्याचा एम्फिसेमामुळं (एम्फिसेमा ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये फुफ्फुसांच्या एअर सॅक डॅमेज होतात) मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाला त्याच्या २० वर्षांपूर्वीचं त्यानं सिगारेट सोडली होती. मात्र, त्या अगोदर जवळपास ४० ते ४५ वर्षं त्यानं धुम्रपान केलं होतं. कामातून निवृत्ती घेतल्यानंतर डेव्हिड आपल्या पत्नीसह न्यू हॅम्पशायरमध्ये राहत होता. तिथे त्यानं अनेक सेवाभावी कामांमध्ये सहभाग देखील घेतला होता. त्याचा अशा प्रकारे मृत्यू होईल यावर अनेकांचा विश्वास बसला नाही.

१९७६ मध्ये मार्लबोरोच्या काही प्रमोशनल जाहिरांतीमध्ये वेन मॅकलॉरेन दिसला होता. २२ जुलै १९९२ रोजी वयाच्या ५१ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. त्याला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. मॅकलॉरेन हा एक माजी व्यावसायिक रोडिओ रायडर होता. १९६० आणि ७० च्या दशकात विविध टेलिव्हिजन मालिका आणि चित्रपटांमध्ये त्यानं लहान-मोठ्या भूमिका केल्या होत्या. या दरम्यानच त्यानं मार्लबोरोसाठी मॉडेल म्हणून काम केलं होतं.

त्याला सतत धूम्रपान करण्याची सवय होती. दिवसाला तो दीड पॅकेट सिगारेट संपवत असे. परिणामी वयाच्या ४९ व्या वर्षी त्याला फुफ्फुसाच्या कर्करोगाचं निदान झालं. उपचारादरम्यान त्याच्या फुफ्फुसाचा काही भाग काढून टाकावा लागला होता. त्यानंतरही रेडिएशन थेरेपी करूनही शेवटी कर्करोग त्याच्या मेंदूपर्यंत पसरला आणि त्याचा जीव गेला. 

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

मृत्यूपूर्वी काही महिने अगोदर मॅकलॉरेन मॅसेच्युसेट्सच्या विधीमंडळासमोर हजर झाला होता. तेव्हा विधीमंडळात आरोग्य शिक्षणासाठी निधी म्हणून सिगारेटवर कर लावण्याच्या विधेयकावर चर्चा सुरू होती. मार्लबोरो कंपनीचा मालक फिलिप मॉरिसच्या स्टॉकहोल्डर्सच्या वार्षिक बैठकीत देखील मॅकलॉरेन बोलला होता. कंपनीच्या जाहिरातींवर मर्यादा घालण्याच्या ठरावाचं त्यानं समर्थन केलं होतं. या प्रकरणानंतर, मॅकलॉरेन कधी मार्लबोरोच्या जाहिरातीत दिसलाच नसल्याचा दावा सुरुवातीला फिलिप मॉरिसनं केला होता. परंतु, कंपनीच्या प्रवक्त्यानं नंतर कबूल केलं की मॅकॉरेनचे फोटो मार्लबोरो टेक्सन पोकर कार्ड्ससाठी रिटेल डिस्प्लेमध्ये वापरले गेले होते.

१९६०च्या दशकात डेव्हिड मॅक्लीन हा मार्लबोरो मॅन होता. त्यानं मार्लबोरोच्या अनेक टेलिव्हिजन आणि प्रिंट जाहिरातींमध्ये काम केलं होतं. १२ ऑक्टोबर १९९५ रोजी वयाच्या ७३व्या वर्षी त्याचा देखील कॅन्सरनं मृत्यू झाला. मॅक्लिननं १९६०मध्ये एका टेलिव्हिजन वेस्टर्न टेटमध्ये अभिनय केला होता. त्यानंतर त्याला मार्लबोरोनं ऑफर दिली. मार्लबोरोच्या जाहिरातींमधून त्याला कमालीची प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर त्याला असंख्य दूरचित्रवाणी मालिका आणि वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांमध्ये भूमिका मिळाल्या होत्या. त्याला वयाच्या बाराव्या वर्षापासून सिगारेट पिण्याची सवय होती. १९८५ मध्ये त्याला एम्फिसेमाचं निदान झालं होतं. १९९३ मध्ये त्याच्या उजव्या फुफ्फुसातून कर्करोगाची गाठ काढण्यात आली होती.

शस्त्रक्रिया करूनही त्याची तब्येत सुधारली नाही. मेंदू आणि मणक्यापर्यंत त्याचा कॅन्सर पसरला आणि १९९५ मध्ये मॅक्लिनचा मृत्यू झाला. ऑगस्ट १९९६ मध्ये मॅक्लिनच्या पत्नी आणि मुलानं फिलिप मॉरिस आयएनसी विरोधात दावा ठोकला. मॅक्लिनच्या मृत्यूसाठी मार्लबोरोचं निकोटीन कारणीभूत असल्याचं या दाव्यात म्हणण्यात आलं होतं. 

या खटल्यात इतर मुद्द्यांवर देखील युक्तिवाद करण्यात आला. जाहिरातींसाठी पोझ देताना योग्य लुक मिळावा यासाठी मॅक्लिनला प्रति टेक पाच पॅक धूम्रपान करणं बंधनकारक होतं. याशिवाय त्याला फिलिप मॉरिसकडून भेट म्हणून मार्लबोरो सिगारेटचे कार्टन मिळत होते. या गोष्टींमुळेच त्याचं व्यसन वाढत गेलं असं त्याच्या पत्नीचं म्हणणं होतं.

१९७८ ते ८१ दरम्यान मार्लबोरोच्या जाहिरातींमध्ये दिसणाऱ्या आणखी एका टेलिव्हिजन अभिनेत्याचा मृत्यू झाला. २०१४ मध्ये अभिनेता एरिक लॉसनचं वयाच्या ७२ व्या वर्षी क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) मुळे मृत्यू झाला. वेन मॅकलॉरेनप्रमाणेचं लॉसन देखील लहान वयातच धूम्रपान करत होता. नंतरच्या मात्र, त्यानं धूम्रपानाच्या धोक्यांबाबत जनजागृती केली. अनेक धूम्रपानविरोधी व्यावसायिक जाहिरातींच्या निर्मितीमध्ये देखील त्यानं योगदान दिले.

या सर्व मृत्यूंमुळे हळूहळू अनेक आरोग्य संघटना आणि मानवी हक्क संघटनांनी सिगारेटच्या जाहिरातींमध्ये मानवाचा वापर करण्यास विरोध केला. त्यामुळं सिगारेटच्या जाहिरांतीमध्ये आता अगोदरसारखं मॉडेल्सचा वापर होत नाही शिवाय पॅकेट्सवर देखील कॅन्सरग्रस्त फुफ्फुसाचं चित्र दाखवून निर्वाणीचा इशारा दिलेला असतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आफ्रिकेत मांत्रिकाच्या सल्ल्याने एका भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा नर*बळी दिला होता..!

Next Post

२००० वर्षे वय असलेल्या ‘महावतार बाबाजी’चा सुपरस्टार रजनीकांतसुद्धा भक्त आहे..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

२००० वर्षे वय असलेल्या 'महावतार बाबाजी'चा सुपरस्टार रजनीकांतसुद्धा भक्त आहे..!

अमेरिकेच्या दीड कोटी नागरिकांना बेरोजगार आणि ८ हजार बँकांना टाळं लावणारं ग्रेट डिप्रेशन काय होतं?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.