The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘रेड बुल’ पिऊनही पंख फुटले नाहीत म्हणून एका कार्यकर्त्याने कंपनीला कोर्टात खेचलं होतं

by द पोस्टमन टीम
16 July 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


काही वर्षांपूर्वी एशियन पेंटची एक जाहिरात आली होती. त्या जाहिरातीवर महाराष्ट्रातील लोकांनी आणि प्रामुख्यानं कोल्हापूरकरांनी आक्षेप घेतला होता. नागरिकच नाही तर कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील यांनी देखील नाराजी व्यक्त करून ही जाहिरात हटवण्याची मागणी केली होती. एशियन पेंटची ही जाहिरात यूट्यूबवर अपलोड करण्यात आली होती. त्या जाहिरातीमध्ये एक लहान मुलगा आपल्या मित्रांना घराला केलेलं रंगकाम दाखवत असतो. बोलताबोलता आपण सिंगापूरला फिरायला जाणार असल्याचंही आपल्या मित्रांना सांगतो. नेमकं त्याचवेळी त्याचे वडिल घरी येतात आणि आपल्याला कोल्हापूरला जाण्यासाठी तिकिट मिळाल्याचं सांगतात. यामुळे मुलाला सर्वजण चिडवायला लागतात. या जाहिरातीतून कोल्हापूरचा अपमान झाला आहे, एशियन पेंट्सनं ही जाहिरात मागे घेऊन माफी मागावी, अशी मागणी कोल्हापूरकरांची होती.

कोल्हापूरकरांनी कंपनीला फक्त माफी मागण्यास सांगितलं हे कंपनीचं नशीब नाहीतर काही ग्राहक तर असेही असतात की, थेट कंपनीविरोधात न्यायालयात दावाच ठोकतात. आतापर्यंत अनेक कंपन्यांना अशा प्रकारे भुर्दंड बसला आहे. यात एनर्जी ड्रिंक बनवणाऱ्या ‘रेड बुल’ कंपनीचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागेल.

आपल्यापैकी अनेक जण कितीतरी वेळा रेडबुल पितात. टेलीव्हीजन जाहिरातीत असो, किंवा होर्डिंग्जवर असो, तुम्ही एकदा तरी ‘रेड बुल गिव्ज यु विंग’, ही टॅगलाईन ऐकलेली आहे. या टॅगलाईनला कधी आपण फार गांभीर्यानं किंवा शब्दश: घेतलं नाही.

मात्र, एक व्यक्ती अशी आहे जिनं रेडबुलच्या जाहिरातीतील टॅगलाईनला गांभीर्यानं घेतली. फक्त एवढंच नाही तर, थेट कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. २०१३ साली बेंजामिन केरॅथर्स या व्यक्तीमुळं रेडबुलला १.३ करोड डॉलर्सचा भूर्दंड बसलेला आहे.

रेडबुलची निर्मिती कशी झाली आणि नेमकं काय होतं हे ‘रेडबुलच्या पंखांचं प्रकरण’?



‘रेड बुल’ ही एनर्जी ड्रिंक्सची निर्मिती करणारी एक ऑस्ट्रियन कंपनी आहे. ऑस्ट्रियन उद्योजक डायट्रीच मॅटशिट्झ आणि थायी उद्योगपती चालो योविध्या यांनी १९८४ साली या कंपनीची स्थापना केली. हे दोघेही आपापल्या देशातील ‘टॉप २’ श्रीमंत व्यक्ती आहेत. रेड बुलव्यतिरिक्त कंपनी ‘कोला’चं देखील उत्पादन घेते मात्र, रेड बुल निर्मिती हा कंपनीचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

‘रेड बुल’चा जन्म थायलंडमध्ये झाला. त्याचं मूळ नाव ‘क्रेटिंग डाएंग’ असं होतं. रात्रीच्या वेळी वाहनं चालवताना झोप येऊ नये म्हणून थायी ट्रक ड्रायव्हर क्रेटिंग डाएंग पित असत. १९८७ साली पहिल्यांदा हे पेय युरोपियन मार्केटमध्ये आणण्यात आलं. युरोपमधील नागरिकांनी आणि विशेषत: तरुणांनी याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजेच १९९७ साली कंपनीनं अमेरिकन बाजारपेठेत पाऊल ठेवलं आणि एका वर्षाच्या आतच अमेरिकेतील तब्बल ७५ टक्के बाजारपेठ हस्तगत केली.

तेव्हापासून कंपनीनं कधीही मागे वळून पाहिलं नाही. जगभरातील १७१ देशांतील बाजारपेठांमध्ये रेडबुलनं आपली उत्पादनं उतरवलेली आहेत. २०१२ साली कंपनीने तब्बल ५.२ अब्ज रेडबुल कॅनची विक्री केली होती. २०१९ साली जेव्हा जगाची लोकसंख्या ७.७ अब्ज झाली तेव्हा कंपनीनं ७.५ अब्ज कॅनची विक्री केली होती. म्हणजेच “जवळपास प्रत्येक व्यक्तीला त्यांनी रेडबुल विकली” असं म्हणता येईल. याच गोष्टीनं कंपनीला ‘एनर्जी ड्रिंक’ निर्मिती आणि विक्री क्षेत्रात अव्वल बनवलं. निर्मिती आणि विक्री दोहोंच्यामध्ये जाहिरातींची महत्त्वाची भूमिका असते.

रेडबुलच्या जाहिराती क्रिएटीव्ह आणि हटके असतात. अगदी त्यांची टॅगलाईन देखील हटकेच होती. मात्र, या टॅगलाईनमुळं आपल्याला १.३ करोड डॉलर्सचा भूर्दंड बसेल असं कंपनीला स्वप्नातही वाटलं नसेल.

२०१३ साली बेंजामिन केरॅथर्स या अमेरिकेतील व्यक्तीनं रेडबुल विरोधात फसवणुकीचा दावा ठोकला. बेंजामिनला देखील खरोखर आपल्याला पंख फुटावेत अशी अपेक्षा नव्हती. एनर्जी ड्रिंकची टॅगलाईन ही फक्त रूपक म्हणून वापरण्यात आली आहे याची देखील त्याला कल्पना होती. त्याचं असं म्हणणं होतं की, एनर्जी ड्रिंक तितकी उर्जा देत नाही जितकी जाहिरातीमध्ये सांगितली जाते.

रेड बुलच्या जाहिरातीनुसार, रेड बुलच्या एका कॅनमध्ये एक कप कॉफी इतकेच कॅफिन आहे. रेड बुलच्या २५० मिली वजनाच्या कॅनमध्ये सुमारे ८० मिलीग्रॅम कॅफिन असते. तर, २०७ मिली कॉफीमध्ये साधारण १५० मिलीग्रॅम कॅफिन असते. म्हणजेच रेड बुलच्या २५० मिली कॅनमध्ये कॉफीच्या एका कपपेक्षाही कमी कॅफिन असतं, हे स्पष्ट होतं. त्यामुळं रेडबुलची जाहिरात भ्रामक आणि दिशाभूल करणारी आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून एक कप कॉफीच्या तुलनेत एका रेडबुल कॅनसाठी जास्त पैसे मोजत आहे. त्यामुळे कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी, असा दावा बेंजामिननं केला होता.

या प्रकरणात कोर्टानं बेंजामिन व अन्य फिर्यादींच्या बाजूने निकाल दिला. रेड बुल कंपनीने सर्व पीडितांना नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले. गेल्या दशकभरात एनर्जी ड्रिंक पिऊन फसवणूक झालेल्या ग्राहकांना भरपाई म्हणून एकूण १.३ करोड डॉलर्स देण्याचं कंपनीनं मान्य केलं. कंपनीनं प्रत्येक पीडित ग्राहकाला १० डॉलर्स रोख रक्कम किंवा १५ डॉलर्स किंमतीचे दोन रेडबुल कॅन देण्याचं घोषित केलं.

जरी रेड बुलनं नुकसान भरपाई देण्याचं मान्य केलं असलं तरी त्यांनी आपली चूक मान्य केली नाही. या खटल्यानंतर कंपनीनं अधिकृतपणे सांगितलं की, ‘खटल्याचा खर्च आणि मनस्ताप टाळण्यासाठी आम्ही दावे करणाऱ्यांना पैसे देण्यास तयार झालो. पण, आमचं मार्केटींग आणि लेबलिंग नेहमीच खरं आणि अचूक होतं’. या प्रकरणातून कंपनीने मात्र धडा घेतलेला नाही. पुढे २०१९ मध्ये दाखल झालेल्या अशाच दुसर्‍या एका प्रकरणात रेडबुलला आणखी हजारो डॉलर्सचा भुर्दंड भरावा लागला.

बिल गेट्स यांच्या म्हणण्यानुसार, ‘आपला सर्वांत असमाधानी ग्राहक आपला सर्वात मोठा शिक्षक असतो’.

त्यामुळं दुसऱ्या खटल्यानंतर रेडबुलनं धडा घेत त्यांनी टॅगलाईनमध्ये थोडा बदल केला. ‘Wing’ या शब्दाचं स्पेलिंग बदलून ‘Wiiing’, असं केलं. हे अतिशय हुशारीचं काम होता कारण ‘Wiiing’ शब्दाला कुठलंही डिक्शनरी मिनींग नाही.

ग्राहकांनी दावा ठोकलेली रेडबुल ही काही पहिली कंपनी नाही. अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांविरोधात ग्राहकांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केलेले आहेत. २०१७मध्ये ‘डाबर’च्या तेलाविरोधात कोर्टात फरवणुकीचा दावा करण्यात आला होता. त्यापूर्वी ‘लोरियाल’च्या ‘सात दिवसात तरुण त्वचा’ या टॅगलाईनविरोधात न्यायालयात दावा ठोकण्यात आला होता.

प्रत्येक उत्पादन जास्तीत-जास्त ग्राहकांपर्यंत पोहचवता यावं म्हणून जाहिरात करण्याचा कंपन्यांना अधिकार आहे. कधी-कधी क्रिएटिव्हीच्या नावाखाली या जाहिराती अतिशय फसव्या होतात. अनेकदा ग्राहक यांना बळी पडतात. मात्र, ‘ग्राहक हा राजा’ असतो ही गोष्ट कंपन्यांनी विसरता कामा नये!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

पैलवान नरसिंह यादवचं करियर संपवण्यासाठी सुशील कुमारने त्याच्या जेवणात भेसळ केली होती

Next Post

गुडइयरचा हिशोब चुकला, नाहीतर आपल्या गाड्यांना अंधारात चमकणारे टायर्स दिसले असते

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

गुडइयरचा हिशोब चुकला, नाहीतर आपल्या गाड्यांना अंधारात चमकणारे टायर्स दिसले असते

हॉंगकाँगमधील या 'कॉफिन होम्स'मध्ये माणसं अगदी किड्यामुंगीसारखं जगतायत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.