The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मालेगाव फिल्म इंडस्ट्री उभी करणारा पडद्यामागचा नायक

by द पोस्टमन टीम
28 October 2021
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

मॉलिवूड ही एक कथा आहे एका तरुणाच्या संघर्षाची व त्या संघर्षातून उभ्या राहिलेल्या ख्याती प्राप्त लोकल सिने इंडस्ट्रीची, ही कथा आहे नासिर शेख ह्या तरुणाची..

नासिर शेख हा तरुण मालेगावमध्ये व्हिडिओ पार्लर चालवायचा, तो विविध हॉलीवूड आणि बॉलीवूड चित्रपटांच्या सीडी डीव्हीडी विक्रीचा व्यवसाय करायचा, तेव्हा त्याच्या मनात स्वतः च्या चित्रपटांची निर्मिती करण्याची कल्पना आली.

 



त्यावेळी भांडवल उभं करणं हा त्याचासमोरचा एक मोठा प्रश्न होता, त्याने मेहनत करून एक व्हिडिओ कॅमेरा विकत घेतला आणि चित्रपट निर्मितीच्या कामाला सुरुवात केली.

त्याने आधी बऱ्याच छोट्या मोठया शॉर्ट फिल्मची तयारी म्हणून निर्मिती केली पण नंतर त्याने खऱ्या अर्थाने कमर्शियल शॉर्ट फिल्म निर्मितीला सुरुवात केली ती ” मालेगाव के शोले” ह्या चित्रपटापासून..

मालेगाव के शोले हा लघुपट हिंदी सिनेमाच्या इतिहासात सर्वात जास्त गाजलेल्या “शोले” ह्या सिनेमाचं स्पुफ व्हर्जन होतं. ह्याची कथा लिहली होती. फारुख जाफरी ह्या नासिरच्याच एका मित्राने आणि ह्यात काम करणारे कलाकार सर्व नासिरचे मित्र आणि मालेगावचेच होते. हा पहिला लघुपट लोकल लेव्हलला प्रचंड हिट झाला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

ह्या सिनेमाला सीडी डीव्हीडीच्या माध्यमातून नासिर ने खान्देशाच्या घरा घरात पोहचवले.

नासिर ने तयार केलेल्या ह्या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या चित्रपटाच्या मूळ कथेत फेरबदल करत तिला दिलेला लोकल अंदाज, ह्यासाठी फारुख जाफरी ह्या नासिरच्या मित्राने महत्वाची भूमिका बजावली होती.

त्याने मूळ पटकथेच्या आधारावर एक नवी पटकथा लिहली ज्यात त्याने जय आणि विरु ह्या कॅरेक्टरला वेगळी विनोदी छटा दिली. ह्या चित्रपटात गब्बर वगैरे पात्र पण होती.

हे चित्रपट उर्दू मिक्स हिंदी भाषेत होते. चार्ली चॅप्लिनचा प्रभाव देखील नासिर वर असल्याने तो विनोदी चित्रपट निर्मती करतो.”विनोद” हा खान्देशी चित्रपट सृष्टीचा आत्मा आहे.

भले मग चित्रपट आहिराणी असो व हिंदीत, जर तो विनोदी नसेल तर लोकल प्रेक्षक वर्गात त्याला स्थान मिळवणं मुश्किल होतं.

ह्या चित्रपटासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची निर्मिती मालेगावात केली जायची, अगदी लागणाऱ्या प्रत्येक पोशाखा पासून शूटिंगच्या लोकेशन पर्यंत सर्व काही मालेगावमध्येच तयार केलं जायचं. मालेगाव मध्ये जणू प्रति फिल्म सिटी साकारली होती. ह्यामुळेच कदाचित लोकल फिल्म कंपनी असलेल्या खान्देशाला मॉलिवूडच्या रूपाने स्वतःची फिल्म इंडस्ट्री देखील मिळाली होती.

“मालेगाव के शोले” नंतर नासिर शेख यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. जे लोकल लेव्हलला प्रचंड हिट ठरले. नासिर ने दिग्दर्शित केलेले हे सिनेमे हिट ठरले होते. काही चित्रपटांना लोकल थिएटरमध्ये झळकण्याची संधी देखील मिळाली होती.

नासिरचा अजून एक महत्वकांक्षी प्रोजेक्ट होता, ज्याने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली तो होता “मालेगाव का सुपरमॅन”, ह्या चित्रपटात सुपरमॅन ह्या अजरामर हॉलीवूड सुपरहिरोचे स्पुफ करून, लोकल लेव्हलला सुपरमॅन तयार करण्यात आला होता.

ह्या चित्रपटाची कथा पण अगदी वेगळ्या धाटणीची होती. तिचं लेखन पण फारुख जाफरीने केलं होतं.

ह्या चित्रपटाच्या निर्मिती दरम्यानची खास बाब म्हणजे ह्या चित्रपटाचा निर्मिती बरोबरच मालेगाव फिल्म इंडस्ट्री वर फयाज अहमद खान याने “सुपरमॅन ऑफ मालेगाव” नावाची डॉक्युमेंटरी बनवली होती.

ह्या डॉक्युमेंटरीने मॉलिवूडला देशभरात पोहचवले. ह्या डॉक्युमेंटरीला ऐशियाटिक सोसायटीचे 15 जुरी अवॉर्डस भेटले होते.

कुठल्याही आधुनिक साधनांचा मदतीशिवाय मालेगाव मध्ये एक वेगळी फिल्म इंडस्ट्री उभी करणाऱ्या नासिर शेखचं आणि त्याचा मित्रांचं सर्वत्र कौतुक होऊ लागलं.

ह्यातून “मालेगाव का सुपरमॅन” आणि ” मालेगाव का क्रिश” हे चित्रपट बऱ्यापैकी यशस्वी ठरले.

नासिरचं काम बघून नासिरला सब टीव्ही कडून “मालेगाव का चिंटू” ह्या मूक अभिनय असलेल्या विनोदी मालिकेच्या निर्मितीची ऑफर आली आणि त्याने त्यानुरूप मालिका दिग्दर्शित केली होती. यामुळे मालेगावच्या ह्या लोकल इंडस्ट्रीला प्रचंड उभारी भेटली होती.

परंतु कालांतराने ह्या मालेगावच्या फिल्म इंडस्ट्रीला देखील ग्रहण लागलं, पाच वर्षांच्या काळात मीडिया क्षेत्रात प्रचंड फेरबदल झाले. पायरसी, ऑनलाइन स्ट्रिमिंग ह्या गोष्टीचा सामना करणं नासिर ला असह्य झालं होतं. त्याचाकडे भांडवल देखील उपलब्ध नव्हतं, सोबतचं परिवाराच्या आणि समाजाच्या प्रचंड विरोधाला नासिर सामोरं जात होता अखेरीस नासिर ने फिल्म मेकींगचं स्वप्न सोडून दिलं आणि मालेगाव फिल्म इंडस्ट्रीला उतरती काळ लागला.

एकेकाळी प्रचंड मोठ्या ध्यासाने एका वेगळ्या खान्देशी चित्रपट सृष्टीत वेगळ्या आध्यायाची सुरुवात करणारा हा तरुण नासिर शेख, मालेगावच्या एका भागात हॉटेल चालवतो आहे.

त्याचा दुर्दैवाने म्हणा आता त्याला कळून चुकलं आहे की फिल्म मेकिंग हे त्याचं क्षेत्र राहिलेलं नाही आहे.

ही कथा नासिर शेख चीच नसून, खान्देशात लोकल लेव्हलला सिनेमा निर्मिती करू पाहणाऱ्या प्रत्येकाची आहे. लोकल इंडस्ट्रीमध्ये सिनेमाचा व्यवसाय हा पैसे मिळवून देत नसतो.

त्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागत असतो. संघर्ष करावा लागत असतो. हा संघर्ष मास्टर दत्ताराम चिंचोलेनी पण केला आणि नासिर शेख ने पण केला. आज येणारा प्रत्येक तरुण ह्या क्षेत्रात प्रत्येक तरुण करतोय.

दरवर्षी ह्यातून काही लोकल लेव्हलच्या चित्रपटांची निर्मिती होत असते. काही आहिराणीत असतात तर काही हिंदी ऊर्दू मिक्स भाषेत, काही फुल लेंथ देखील असतात तर काही शॉर्ट व्हिडिओजच्या फॉरमॅट मध्ये, आजच्या युगात ह्या इंडस्ट्रीला टिकवणं अवघड काम झालंय.

त्यात प्रेक्षक हा सिनेमा कडे वळला आहे. सध्या हजारो टीव्ही चॅनेल्स, वेब सिरीज आणि युट्युब च्या विश्वात ही खान्देशी लोकल इंडस्ट्री तग धरू पाहत आहे.

ह्या इंडस्ट्रीला गरज आहे ती फक्त प्रेक्षकांच्या पाठबळाची आणि आर्थिक मदतीची, आज जर ही इंडस्ट्री टिकली तर खान्देशातल्या लोकल कलावंतांना मोठं होण्याची संधी भेटणार आहे.

यातून  रोजगार निर्माण होणार आहे आणि उद्या जाऊन खान्देशची मानबिंदू असलेल्या आहिराणी भाषेचं , संस्कृतीचं जतन होणार आहे व ती जगाच्या काना कोपऱ्यात पोहचणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या स्त्रीने गोऱ्या व्यक्तीसाठी सीट रिकामी करायला नकार दिला आणि एक आंदोलन पेटलं

Next Post

कोण आहेत चीनचे उईगर मुस्लीम ? जाणून घ्या त्यांचा इतिहास आणि भीषण वर्तमान

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

कोण आहेत चीनचे उईगर मुस्लीम ? जाणून घ्या त्यांचा इतिहास आणि भीषण वर्तमान

आपला लाडका 'लक्ष्या' आपल्यातून गेलाय यावर आजही विश्वास बसत नाही..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.