The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चल मेरी लुना : आज धूळ खात पडलेली लुना एकेकाळी रस्त्यावर दिमाखात धावत होती

by द पोस्टमन टीम
16 July 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


लुना!

सायकल आणि मोटार सायकल या दोन्हींचं अद्भुत संगम असणाऱ्या लुनाला एकेकाळी भारतीय बाजारपेठेत प्रचंड मागणी होती. वजनाने हलकी आणि वेगाने पळणारी लुना चालवणे सोपे असल्याने नोकरदार महिलांची तर लुनालाच पहिली पसंती होती. लुनाने एकेकाळी भारतीय बाजारपेठेवर पूर्ण कब्जा मिळवला होता.

एक काळ असा होता जेव्हा जवळपास भारतातील घराघरात लुना पोचली होती. तेव्हा अजून भारतात उदारमतवादी आर्थिक धोरणाचा स्वीकार झाला नव्हता. त्याकाळात लुना म्हणजे प्रत्येक भारतीयाची ओळख बनली होती.

पुण्यातील कायनेटीक ग्रुपने सायकल आणि मोटारबाईक अशा दोन्हीचा मध्य साधत ही मोपेड बनवली होती. वजनाला हलकी आणि जास्त वेगवान असल्याने सर्वांकडूनच तिला पसंती मिळाली.

त्याकाळी मोटारबाईक वापरणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती. मोटारबाईकच्या किंमती सामान्य लोकांना परवडणाऱ्या नव्हत्या. मोटारबाईक ही श्रीमंत वर्गाची ओळख होती. त्यामुळे देशात मोटारबाईक वापरणारे आणि सायकल वापरणारे असे दोन भाग पडले होते. अशा वेळी लुनाने ही दरी भरून काढण्यात मोठा हातभार लावला.



लुना म्हणजे एक वजनाने हलकी सायकल, जिला मोटार बसवलेली असल्याने ती जास्त वेगाने पळू शकत होती. लुनातील इंधन संपल्यावर तिला पॅडलच्या सहाय्यानेही चालवता येत होते.

शहरात उद्योग व्यवसायांची सुरुवात होत होती, अशावेळी कारखान्यात काम करणाऱ्या नोकर वर्गाकडे सायकलशिवाय दुसरे कुठलेच साधन नव्हते. म्हणूनच मध्यमवर्गीय लोकांना डोळ्यासमोर ठेवूनच लुना बनवण्यात आली. मग स्त्री असो वा पुरुष, सर्वांनीच लुनाला पहिली पसंती दिली. हलकी आणि तरीही वेगवान अशी लुना महिलांसाठी तरी, वरदानच ठरली.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

भारतातील ओबडधोबड रस्त्यांवरूनही लुना विना अडथळा धावली पाहिजे अशी बनवणाऱ्यांची इच्छा होती. त्यासाठी लुना अगदी खडकाळ रस्त्यावरही कशी टिकेल याचे प्रयोग करण्यात आले. खडकाळ आणि खराब रस्त्यावरून लुना चालवल्यानंतर तिच्यात नेमके कोणते बदल केले पाहिजेत हे ठरवले जाई. भारतात अपघात होण्याची शक्यता नेहमीच जास्त असते. अशावेळी कोणत्याही प्रतिकूल रस्त्यावरून धावण्याची क्षमता लुनामध्ये असली पाहिजे अशा उद्देशानेच ती बनवण्यात आली. प्रत्येकवेळी लुनाची टेस्ट राईड घेऊन तिच्यात आवश्यक ते बदल केले जात.

वजनाने हलकी आणि तरीही मजबूत मोपेड बनवणे हे एक आव्हान होते. भारतातील रस्त्यांचे दर्जे आणि त्यावरून उडणारी धूळ याचाही मोपेडवर फार परिणाम होणार नाही, याचीही दक्षता घेण्यात आली.

कुठल्याही रस्त्यावरून जास्तीत जास्त वजन जरी लादले तरी तिच्या वेगात फरक होऊ नये, जास्त वजन पेलूनही ती आहे त्याच गतीने धावली पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी ध्यानात घेऊन दमदार लुनाची निर्मिती झाली.

देशातील पहिलीच मोपेड असल्याने देशात लुनाचा खप प्रचंड वाढला. या ब्रँडने क्रिकेट मालिकांचे प्रमोशन देखील केले. मॅन ऑफ द मॅचसाठी अवार्ड दिले. अभ्यासात अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बक्षिसेही ठेवली.

लुनाच्या जाहिरातीने सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण पात्रांना जन्म दिला. जसे की सरकारी नोकर असलेले आणि कामाच्या बोजाने थकलेले राम मुरारी, दीपक सेठसारखा तरुण, ज्याला प्रेयसीला भेटायला जाण्याची घाई आहे, आणि वैद्यकीय शिक्षण घेणारी राधा ही मुलगी. तिघेही वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून असले आणि तिघांचेही आयुष्य सारखे नसले तरी, तिघांची अडचण एकच आहे. निश्चित ठिकाणी पोहोचण्यास होणारा उशीर. म्हणूनच लुना खरेदी केल्यानंतर त्यांच्या या समस्येला कायमचा पूर्णविराम मिळतो. सामान्य लोकांना आपल्या प्रगतीचा आलेख उंचावायचा आहे पण त्यांना काही गोष्टींसाठी उशीर होत आहे, हीच नस पकडून लुनाचे ब्रँडिंग करण्यात आले.

‘चल मेरी लुना’ आणि ‘सफलता की सवारी’, यांसारख्या पंचलाईनमुळे लुनाने ग्राहकांना अजूनच आकर्षित केले. शिवाय, “लुना करती पक्का वादा, खर्चा काम मजबुती ज्यादा” या पंचलाईनमुळे तर लुनाच्या विक्रीचे गणित अजून स्पष्ट झाले.

लुना परवडणारी आणि विश्वासार्ह असल्याने मध्यमवर्गीय लोकांमध्ये लुनाची क्रेझ वाढली. लुनाची जाहिरात करण्याची जबाबदारी जाहिरात क्षेत्रातील दिग्गज पियुष पांडे यांच्याकडे होती. पियुष यांच्यासाठी ही पहिलीच संधी होती. पण, सामान्य माणसावर फोकस करून केलेल्या जाहिरातींमुळे सामान्य लोकांमधून या उत्पादनाला अधिकाधिक पसंती मिळत गेली.

अगदी प्रत्येक घरी एक तरी लुना होतीच. ज्यांच्या घरी लुना नाही असे एकही मध्यमवर्गीय कुटुंब या काळात नसेल. लुनाने प्रत्येक भारतीयाला आपलेसे केले होते आणि प्रत्येक भारतीयाने लुनाला, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

खाजगीकरणाच्या धोरणानंतर मोटारबाईक आणि स्कूटर यांची संख्या वाढत गेली. मोटारबाईकच्या किंमती सामान्यांच्या आवाक्यात आल्या तशी लुनाची क्रेझ कमी झाली. उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या धोरणानंतर या क्षेत्रातील स्पर्धक वाढले. परदेशी व्यावसायिकांची संख्या वाढल्यानंतर लुनाच्या लोकप्रियतेत घट होत गेली. भारतीय बाजारपेठेत मजबूत मोटार बाईक्स आणि स्कूटर्स यांची चलती वाढली. तीव्र स्पर्धेत टिकण्यासाठी बदलाची आवश्यकता होती.

मोपेडच्या बाबतीत बोलायचे तर टीव्हीएस५० ने लुनाला जबरदस्त मात दिली. अगदी महिला देखील लुनाऐवजी स्कूटरकडे वळू लागल्या. टीव्हीएस आणि आक्टिव्हासारख्या मोपेड आता लोकांच्या वाढत्या अपेक्षेवर खऱ्या उतरत होत्या. यामुळे ९०च्या दशकानंतर लुनाच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली.

९०च्या दशकानंतर भारतात आर्थिक बदलाचे वारे वेगाने वाहू लागले. लोकांच्या हातात पैसा खेळू लागला तसतशा त्यांच्या गरजा बदलत गेल्या. आता लोकांना मजबूत बाईक्सची गरज होती. शिवाय, घरातील वस्तू या घराच्या स्टेटस सिम्बॉल बनण्याचा हाच काळ होता. फक्त लुनाच नाही तर इतरही मोपेड काळाच्या ओघात भारतीय बाजारपेठेतून गायब झाल्या.

आजचा भारत आणि  भारतीयांच्या अपेक्षा तर त्याहून वेगळ्या आहेत. ग्रामीण भाग असो की शहरी, खरेदी करताना आपल्या स्टेटसचा विचार आधी केला जातो. मोपेड तर कालबाह्य झालीच पण, मोटारबाईक्समध्ये आता तीव्र स्पर्धा सुरु आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक ,युट्युब|
Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

लाखो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या या भारतीय शास्त्रज्ञाच्या वाट्याला आयुष्यभर उपेक्षाच आली

Next Post

‘या’ दगडावरील मजकुरामुळे प्राचीन इजिप्तच्या इतिहासाचा उलगडा झाला होता

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

'या' दगडावरील मजकुरामुळे प्राचीन इजिप्तच्या इतिहासाचा उलगडा झाला होता

भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक पदक कोल्हापूरच्या मातीनं मिळवून दिलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.