The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्टॅनफोर्ड विद्यापीठाचा संस्थापक ‘लेलँड स्टॅनफोर्ड’ हा माणूस आजही अनेकांना पडलेलं कोडं आहे

by द पोस्टमन टीम
13 October 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


काही व्यक्तींचं आयुष्य आणि एकूणच त्यांचं व्यक्तिमत्त्व देखील एखाद्या कोड्यासारखं असतं. जगप्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना करणाऱ्या ‘लेलँड स्टॅनफोर्ड’ हा माणूस देखील असाच होता. अमेरिकन अभियांत्रिकीचा चेहरा बदलून ट्रान्सकॉन्टिनेंटल रेल्वेमार्गाची निर्मिती करणारा हा माणूस अगदी राजा-महाराजांसारखा समृद्ध जीवन जगला.

स्टॅनफोर्ड हा माणूस आजही अनेकांना पडलेलं कोडं आहे. अत्यंत महत्त्वाकांक्षी माणूस, उत्तम राजकारणी, प्रभावी उद्योगपती, समाजकार्यात पुढे असण्यापासून ते दरोडेखोर व डिसप्ट्युटर अशी कितीतरी विशेषणं स्टॅनफोर्डला मिळाली. स्टॅनफोर्डचं आयुष्य इतक्या विरोधाभासांनी का भरलेलं होतं, त्याबाबत हा विशेष लेख..

स्टॅनफोर्ट मुळात ब्रिटश वंशाचा होता. जेव्हा ब्रिटिशांनी अमेरिकेत वसाहतींची स्थापना करण्याची सुरुवात केली तेव्हा त्याचे पूर्वज अमेरिकेतील न्यू इंग्लंडमध्ये दाखल झाले होते. नंतर मात्र, स्टॅनफोर्ड कुटुंबानं क्रांतिकारी अमेरिकन यु*द्धात भाग घेतला. काही काळानंतर स्टॅनफोर्डचे पूर्वज न्यूयॉर्कमधील अल्बानीला गेले. तिथे त्यांनी ‘बुल्स हेड टॅव्हर्न’ नावाचा एक बार चालवला. याच ठिकाणी ९ मार्च १८२४ रोजी लेलँड स्टॅनफोर्डचा जन्म झाला.

लेलँडचं खरं नाव ‘अमासा लेलँड स्टॅनफोर्ड’ असं होतं. मात्र, त्यानं आपलं खरं नाव वापरणं सोडून दिलं होतं. पूर्ण नाव वापरण्याऐवजी तो फक्त लेलँड स्टॅनफोर्ड हे नाव वापरत असे. तारुण्यात त्यानं स्वतःमध्ये सतत बदल केले. तो सतत ठिकठिकाणी स्थलांतर करत राहिला. हातात घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत तो अयशस्वी ठरत होता.



एक विद्यार्थी म्हणून त्याची कामगिरी तर अतिशय सुमार होती. विविध शाळांमधून तो वारंवार ड्रॉपआउट झाला होता. स्टॅनफोर्डनं आपण न्यूयॉर्क स्टेट बार पास केल्याचं सांगितलेलं होतं. तसं डिग्री प्रमाणपत्रही त्याच्याकडं होतं. मात्र, जुन्या रेकॉर्ड्सचा अभ्यास केला असता त्याचा दावा फोल असल्याची माहिती समोर येते.

२८ वर्षांचा होईपर्यंत स्टॅनफोर्ड बिनकामाचाच फिरत होता. नंतर १८५२ साली तो कॅलिफोर्नियाला गेला. तिथे त्याच्या भावांनी रिटेल व्यवसाय सुरू केलेला होता. भावाच्या हाताला काम द्यावं, या हेतूनं स्टॅनफोर्डच्या भावांनी त्याला ‘गोल्ड कंट्री’ परिसरात नवीन दुकान उघडण्यासाठी पाठवलं. त्याला त्यात यश येईल की नाही याबाबत मात्र, सर्वांना शंकाचं होती.

पण, आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी अयशस्वी झालेल्या स्टॅनफोर्डला दुकान चालवण्यात यश आलं. आपल्या जवळच्या डिग्रीच्या जोरावर त्यानं स्थानिक न्यायालयात नोकरी देखील मिळवली. यासोबतच त्यानं ‘एम्पायर सलून’ नावाचा एक बार देखील उघडला. पुढे जेव्हा स्टॅनफोर्डचे भाऊ आपला व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी सॅक्रॅमेन्टोतील मुख्य कार्यालयापासून दूर गेले तेव्हा त्याला गोल्ड कंट्रीतून माघारी बोलवण्यात आलं.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

परत आल्यानंतर भावांचा व्यवसाय सांभाळत असतानाच त्याला त्याचे भविष्यातील भागीदार भेटले. ज्याठिकाणी स्टॅनफोर्डच्या भावंडांचं दुकान होतं त्याच्या शेजारीच कॉलिस हंटिंग्टन आणि मार्क हॉपकिन्स नावाच्या दोन यशस्वी उद्योजकांची हार्डवेअर स्टोअर होती. चार्ल्स क्रॉकर नावाच्या व्यक्तीचा चटई आणि चपलांचा मोठा व्यवसाय होता.

या लोकांची आणि लेलँड स्टॅनफोर्डची घट्ट मैत्री झाली. त्यांच्या प्रोत्साहनामुळेचं स्टॅनफोर्डनं आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठा जुगार खेळला. अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठ्या आणि धाडसी ट्रान्स-कॉन्टिनेंटल रेल्वेमार्गाचा वित्तपुरवठा आणि बांधकामाच्या कामात त्यानं गुंतवणूक केली.

कॉलिस हंटिंग्टन, मार्क हॉपकिन्स, चार्ल्स क्रॉकर आणि लेलँड स्टॅनफोर्ड हे चौघेही ‘फिग फोर’ नावानं नावारुपास आले. इतर तिघांनी स्टॅनफोर्डला सेंट्रल पॅसिफिक रेल रोडच्या कामाचं प्रमुख बनवलं. तीस वर्षांत गुंतवलेले पैसे व्याजासह परत मिळतील असं आश्वासन स्टॅनफोर्डनं लोकांना दिलं होतं असं म्हटलं जातं.

स्टॅनफोर्ड एक व्यवसायिक म्हणून हुशार निघाला त्यानं रेल्वेमार्गाचं काम सुरू केलं. रेल्वेच्या कामानं त्याला प्रचंड पैसा आणि प्रसिद्धी मिळाली. तो इतका श्रीमंत झाला होता की, त्यानं १८६० साली अब्राहम लिंकन यांच्या निवडणूक प्रचारासाठी पैसा दिला होता. याशिवाय तो स्वत:देखील, १८६१ साली कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर म्हणून निवडून आला.

गव्हर्नर झाल्यानंतर तर त्यानं आपली दडपशाही आणखी वाढवल्याचं सांगितलं जातं. आपल्या पदाचा वापर करून त्यानं मोठ्या प्रमाणात वैयक्तिक नफ्याच्या गोष्टी करून घेतल्या. स्थानिक काउंटी प्रशासन आणि शहर प्रशासनांना धमकावून त्याच्या रेल्वेरोडच्या कामासाठी आणखी निधी गोळा करण्यास सुरुवात केली.

अगोदरची चौकशी आणि मोठ्या प्रमाणात जमा झालेला निधी यांमुळं रेल्वेमार्गाच्या कामाचा जगभर गाजावाजा झाला होता. या कामासाठी आशियातून प्रामुख्यानं चीनमधून अनेक स्थलांतरित मजूर आणण्यात आले होते. श्वेतवर्णीय मजूरांपेक्षा चीनी मजूरांना स्टॅनफोर्डनं जास्त छळलं आणि मोबदला देखील कमी दिला, असे आरोप देखील स्टॅनफोर्डवर करण्यात आले होते.

अमाप पैसा आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर मात्र, लेलँड स्टॅनफोर्ड घोटाळ्यांमध्ये अडकला. ट्रान्सकॉन्टिनेंटल रेल्वेमार्गाचा पूर्व भाग १८६९ साली पश्चिम टोकाला उटाह येथे जाऊन मिळाला. त्यानंतर स्टॅनफोर्ड आणि त्याच्या भागीदारांनी कॅलिफोर्निया आणि पश्चिमेकडील प्रत्येक रेल्वेमार्गाचं काम मिळवण्यासाठी प्रयत्न केले. रेल्वेवर त्यांची मक्तेदारी निर्माण झाली. मालवाहतूकदार, प्रवासी आणि ग्राहकांचं त्यांनी आर्थिक शोषण केलं.

त्यानंतर मात्र, रेल्वेमार्गाची चौकशी करण्याच्या पहिला प्रयत्न झाला. पण, स्टॅनफोर्डनं पैशाचा वापर करून तथाकथित तपास अधिकाऱ्यांनाच विकत घेतलं. मात्र, स्टॅनफोर्डच्या प्रकल्पांची चौकशी झालीच पाहिजे, या मागणीनं जोर धरला. वारंवार होणाऱ्या मागणी लक्षात घेता शेवटी फेडरल सरकारनं एका चौकशी आयोगाची स्थापना केली. चौकशी आयोगानं जवळजवळ एक वर्षभर शेकडो साक्षीदार आणि त्यांची सुमारे ६ हजार पानांच्या साक्षी तपासल्या. स्टॅनफोर्ड आणि त्याच्या साथीदारांनी अमेरिकन लोकांची फसवणूक केल्याचं समोर आलं.

हळूहळू त्यांचे सर्व घोटाळे बाहेर आले आणि स्टॅनफोर्डला न्यायालयात खेचण्यात आलं. या प्रकरणातून स्टॅनफोर्डनं कशीबशी सुटका करून घेण्यात यश मिळवलं. मात्र, इंग्रजीमध्ये सर्रास वापरला जाणारा ‘Karma is Bitch’ हा वाक्प्रचार स्टॅनफोर्डच्या बाबतीत खरा ठरला. त्याचा एकुलता एक मुलगा वयाच्या १५व्या वर्षी एका अपघातात मरण पावला. आपल्या मुलाच्या स्मरणार्थ त्यानं आणि त्याच्या पत्नीनं आपल्या इस्टेटमध्ये एका विद्यापीठाची स्थापना केली.

आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यानं अनेक समाजकार्ये केली. त्यानंतर काही वर्षांतच स्टॅनफोर्डचा व्यावसायिक भागीदार आणि मित्र हंटिंग्टननं त्याचा विश्वासघात केला. त्यानं इतर भागीदारांशी मिळून स्टॅनफोर्डला रेल्वेमार्ग कंपनीचा प्रमुख म्हणून पदच्युत केलं आणि स्वतः अध्यक्षपद स्वीकारलं.

त्यानंतर साधारण आठ वर्षांनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला लेलँड स्टॅनफोर्ड आपल्या पालो अल्टो कंट्री परिसरातील घरी मरण पावला. त्याची विधवा पत्नी जेनीनं, सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन स्टॅनफोर्ड विद्यापीठ बंद होण्यापासून वाचवलं. मात्र, नंतर तिचा देखील खू*न झाला.

महत्त्वाकांक्षा, व्यवसायिक यश, फसवणूक आणि परोपकार अशा विरोधाभासांनी भरलेलं आयुष्य जगलेला स्टॅनफोर्ड अमेरिकन इतिहासामध्ये अमर झाला आहे. काही लोक त्याला आपला आदर्श मानतात तर काही लोक त्याच्यावर टीका देखील करतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

‘ग्रीन टी’चे चाहते असाल तर तुम्हाला या महिलेबद्दल माहिती असायलाच हवं..!

Next Post

भारतातील ब्रिटिश राज संपवण्यासाठी प्रेसिडेंट रुझवेल्ट चर्चिलच्या विरोधात गेले होते..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

भारतातील ब्रिटिश राज संपवण्यासाठी प्रेसिडेंट रुझवेल्ट चर्चिलच्या विरोधात गेले होते..!

मॅकडोनाल्ड जगातली सगळ्यात मोठी फूड चेन आहे, त्यामागे 'रे क्रॉक' यांची मेहनत आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.