The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मीम बनलेल्या या लहान मुलाने इंटरनेटवरुन मदत उभी करून वडिलांचं किडनी ट्रान्सप्लांट केलंय

by Heramb
23 September 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


सध्याच्या युगात मोबाईल आणि इंटरनेटबरोबरच अजून एक गोष्ट मोठ्या प्रमाणात ‘ट्रेंड’ करत आहे, ती म्हणजे मिम्स. कोणतंही सोशल मीडिया ॲप्लिकेशन मिम्स आणि स्टिकर्सशिवाय पूर्णत्वाला जाऊच शकत नाही. गेल्या तीन-चार वर्षांपासून जर तुम्ही इंटरनेटवर वेळ घालवला असेल, तर तुम्हाला  नक्कीच “सक्सेस किड” मिम माहित असेलच. एक लहान बाळ वाळूने भरलेल्या मुठीसह आत्मविश्वासाने भारलेलं दिसत आहे. ‘सॅमी ग्रिनर’, ज्याला “सक्सेस किड” असेही म्हटले जाते, त्याने आपल्या वडिलांच्या किडनी प्रत्यारोपणासाठी निधी गोळा करण्यासाठी मिमच्या लोकप्रियतेचा वापर केला. 

२०१५ साली किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाल्यावर “सक्सेस किड”चे वडील घरी परतले. सॅमी ग्रिनर इंटरनेटवर प्रसिद्ध झाला, तेव्हा त्याचे वय केवळ ११ महिने होते. या फोटोत सॅमीने त्याची मुठ उचलली आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर एका विलक्षण आत्मविश्वासाचा भाव आहे. या फोटोचे लगेचच “सक्सेस किड” मिममध्ये रूपांतर झाले. या विनोदी व्हायरल मिमचा शेवट होईल असे कुटुंबीयांना वाटत असतानाच, सॅमीच्या वडिलांच्या किडनी ट्रान्सप्लान्टच्या ऑपरेशनसाठी निधी गोळा करण्याचे श्रेय हे कुटुंब त्या मिमलाच देते.

सॅमी आणि त्याचे पालक लेनी आणि जस्टीन ग्रिनर यांनी सॅमीची अनपेक्षित प्रसिद्धी त्यांच्या निधीसंकलनासाठी वापरली. या निधीसंकलनासाठी त्यांना जगभरातून पाठिंबा मिळाला. जस्टिनला प्रत्यारोपणासाठी आवश्यक असलेल्या ‘अँटी-रिजेक्शन’ औषधांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. या औषधांसाठी पैसे गोळा करण्याच्या दृष्टीने सॅमी ग्रिनर्सने क्राउडफंडिंग मोहीम सुरू केली. यामुळेच ‘सक्सेस किड’चे #SuccessKidney मध्ये रूपांतर झाले.

या कुटुंबाने एप्रिल २०१५ मध्ये ७५ हजार अमेरिकन डॉलर्स इतके फंड्स उभारण्याच्या आशेने ‘गो फंड मी’ नावाचं पेज सुरु केले. अपेक्षेपेक्षा जास्त फंडिंग उभी करत त्यांनी १ लाख डॉलर्सपेक्षा जास्त निधी गोळा केला. सर्वच निधीदात्यांनी त्या “तेजस्वी चित्रा”मधील मुलाला त्याच्या वडिलांसोबत आपलं बालपण आनंदाने घालवण्यासाठी मदत केली आहे. सगळ्यांनाच या गोष्टीचा अभिमान आणि आनंद असल्याचं दिसून येतं.



ऑपरेशननंतर मिळालेले मेसेजेस वाचून जस्टिन ग्रिनरला मोठे आश्चर्य वाटत होते. तो म्हणतो, “तुम्ही बातम्यांमध्ये दररोज कितीही वाईट गोष्टी पाहू शकता, तरी या जगात एकमेकांची काळजी घेऊ इच्छिणारे बहुतेक लोक चांगले आहेत आणि हे पाहून एक सुखद अनुभव येतो.”

इन्स्टाग्रामवर लेनी ग्रिनरने तिचा पती बरा झाला असल्याचे पोस्ट करून इतरांनाही अवयव दाता होण्याचे आवाहन केले आहे. लेनी ग्रिनर ट्विटरवर लिहिते, ” #SuccessKidney च्या कथेतून जर काही शिकायचं असेल, तर ते अवयव दाता होणे हे आहे, आमच्या आश्चर्यकारक #ट्रान्सप्लांट मोहिमेचा भाग बनल्याबद्दल धन्यवाद”.

हजारो लोक जीवघेणे रोग आणि अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय परिस्थितींबरोबर रोज लढत असतात. अपुऱ्या विमा संरक्षणामुळे कुटुंबांच्या सगळ्या सेव्हिंग्स संपतात आणि अनेकदा त्यांच्यावर मोठ्या व्याजदराने कर्ज घेण्याची वेळ येते. तर अनेकांकडे पैसे नसल्यानेच उपचारांना उशीर होतो आणि जीवन संपते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

ऑनलाईन फंडरेझरच्या मदतीने सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर करून अशा हॉस्पिटल एक्सपेन्सेससाठी निधी संकलन करणे सोपे जाते. यालाच क्राउड फंडिंगही म्हणतात. ऑनलाइन फंड रेझर्सच्या माध्यमातून मित्र, कुटुंब, सहकारी आणि अगदी अनोळखी लोकांकडून गरजू लोक देणग्या मिळवू शकतात. जेव्हा मेडिकल इमर्जन्सीने तुमच्यावर आर्थिक संकट ओढवण्याची वेळ येते त्यावेळी नक्कीच हे ऑनलाईन क्राऊडफंडिंग आजमावून पाहा. अशा काळात मेडिकल टिप्स, क्राउडफंडिंग आणि देणगी देणाऱ्या अनेक वेबसाईट्स आहेत.

काही संस्थांच्या मते, जीव वाचवणे ही एक सेवा आहे. कोट्यवधी देणगीदारांच्या मदतीने एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो. मित्र, सहकारी आणि अनोळखी व्यक्ती योगदान देऊन उदार हस्ते मदत करतात. पैशाच्या अभावामुळे कोणत्याही रुग्णाने जीव गमावू नये यासाठी क्राउडफंडिंग ही संकल्पना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवी.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अमेरिकेतलं प्रसिद्ध ‘येल विद्यापीठ’ भारतीय गुलामांच्या व्यापारावर उभं राहिलंय

Next Post

अमेरिकन तरुणांना सैन्यात भरती व्हायला सांगणारा अंकल सॅम नेमका कोण होता..?

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

अमेरिकन तरुणांना सैन्यात भरती व्हायला सांगणारा अंकल सॅम नेमका कोण होता..?

एका मोठ्या गैरसमजातून प्लेग डॉक्टर्स विचित्र चोचीच्या आकाराचे मास्क वापरायचे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.