The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या टिकटॉक स्टारकडे आहे जगातील सर्व अडचणींचं ‘सोल्युशन’!

by द पोस्टमन टीम
23 July 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


सोशल मीडियावर सर्फिंग करताना आपण बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ पाहतो. त्यामध्ये ‘लाईफ हॅक्स’ नावाचा एक प्रकार असतो. साध्या भाषेत सांगायचं, तर या व्हिडिओंमधून लोक आपल्याला विविध प्रकारचे ‘जुगाड’ करुन दाखवतात. यामध्ये मग ऐनवेळी गॅस संपला तर इस्त्रीवर चपाती कशी करायची, बाहेर फिरायला जाताना कमीत कमी सामान कसं न्यायचं, किंवा मग पैसे वाचवण्याच्या ‘निंजा टेक्निक्स’ दाखवलेल्या असतात. खरंतर हे व्हिडिओ आपल्या मदतीसाठी असतात.

कधीकधी यामध्ये ‘सोप्या पद्धतीने’ दाखवलेल्या गोष्टीच इतक्या अवघड असतात, की ‘रोगापेक्षा औषध भयंकर’ अशी गत होते. मात्र या व्हिडिओंचा कर्दनकाळ सध्या सोशल मीडियामध्ये फेमस होतोय. त्याचं नाव आहे – खबाने लामे!

‘लाईफ हॅक’च्या नावाखाली सोप्या गोष्टी अवघड करुन दाखवणाऱ्या व्हिडिओजना सडेतोड प्रत्युत्तर देऊन हा टिकटॉकर प्रसिद्ध होतोय. एवढंच नाही, तर खबाने हा सध्या जगातील सर्वात जास्त फॉलोअर्स असणारा दुसऱ्या क्रमांकाचा टिकटॉकर आहे!

विशेष म्हणजे, २०२० च्या मार्चपर्यंत त्याला कोणी ओळखतही नव्हतं. त्यापूर्वी तो इटलीमधील एका फॅक्टरीमध्ये कामाला होता. मात्र, २०२०च्या मार्चमध्ये कोरोना महामारीमुळे त्याची नोकरी गेली. त्यानंतर तो सेनेगलला, आपल्या आई-वडिलांसोबत राहू लागला. काही कामही नव्हतं, आणि घरी वडिलांची ‘नोकरी शोध’ म्हणून तणतण. यामुळे तो सोशल मीडियावर आपला वेळ घालवू लागला. मग त्यानं खबी लामे (Khaby Lame) नावाने ‘टिकटॉक’ व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. (टिकटॉक आपल्याकडं बंद असलं तरी जगभरात सुरू आहे.) त्याचे सुरुवातीचे व्हिडिओ हे इटालियन भाषेत होते. मात्र, त्याला खरी प्रसिद्धी मिळाली, ती त्याच्या मूक व्हिडिओंमुळे.

टिकटॉकच्या ड्युएट आणि स्टिच फीचर्सचा वापर करुन तो ‘लाईफ हॅक’ आणि ‘५ मिनिट्स क्राफ्ट’ प्रकारच्या व्हिडिओंमधील मूर्खपणा जगासमोर मांडू लागला. अर्थात – त्या व्हिडिओंमध्ये दाखवलेल्या “अडचणी” सोप्या पद्धतीने सोडवून.



उदाहरण द्यायचं झालं, तर एका ‘लाईफ हॅक’ व्हिडिओमध्ये चाकूच्या मदतीने केळ्याची साल कशी कापावी हे दाखवलं होतं. त्याला खबानेने आपला व्हिडिओ जोडला, ज्यामध्ये तो दाखवतोय की केळ्याची साल थेट सोलून काढता येते. त्यासाठी चाकूची गरज नाही. आता केळं सोलून खाता येतं हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, पहिल्या व्हिडिओमध्ये चाकू वापरण्याचा जो मूर्खपणा केला आहे, तो बरोबर टिपून खबानेने आपला कंटेंट बनवला. त्याचे व्हायरल झालेले बाकी व्हिडिओही अशाच मूर्खपणाच्या ‘ट्रिक्स’ची पोलखोल करणारे आहेत.

खबानेचे व्हिडिओ फेमस होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याचे हावभाव. एखादी गोष्ट करुन दाखवल्यानंतर, “घ्या! एवढं सोपं होतं ते!” हे सांगण्यासाठी ज्या प्रकारचे हावभाव आणि हातवारे तो करतो, ते अगदीच मजेशीर आणि रिलेटेबल आहेत. या हावभावांमुळेच खबानेचे व्हिडिओ तर व्हायरल होतातच, मात्र त्याचे फोटोही व्हायरल होत आहेत. लोक त्याच्या या चेहऱ्याचा स्क्रीनशॉट काढून त्याचा मीम्समध्ये वापर करत आहेत. खबानेचे व्हिडिओ लोकांना रिलेटेबल वाटण्याचं दुसरं कारण म्हणजे त्याच्या व्हिडिओंमधील साधेपणा.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

सध्या टिकटॉकवर जे टॉप ५ सेलिब्रिटी आहेत, त्यांच्या एका व्हिडिओच्या बजेटमध्ये खबानेचे शंभर-एक व्हिडिओ तर आरामात होतील. त्याच्या व्हिडिओंमध्ये ना सुंदर समुद्रकिनारे असतात, ना कुठल्या जंगलातलं पॉश फार्महाऊस. असतो तो केवळ खबाने आणि त्याचा तो “घ्या!” म्हणणारा चेहरा.

यासोबतच, तो त्या व्हिडिओंमध्ये जे दाखवतो ती खरंतर सर्वच सामान्य लोकांची भावना असते. उदाहरण द्यायचं झालं, तर एका ‘लाईफ हॅक’ व्हिडिओमध्ये कोणीतरी पायात सॉक्स घालण्यासाठीची मशीन दाखवत आहे. या मशीनच्या मदतीने पायात सॉक्स घालणं किती सोपं आहे, असं दाखवणारा हा व्हिडिओ आहे. याला उत्तर म्हणून खबाने त्याच्या व्हिडिओमध्ये हातानेच साध्या पद्धतीने पायात सॉक्स घालून दाखवतो; आणि म्हणतो – “घ्या!”. पहिला व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्यांच्याच मनात हेच सुरू असतं, की सॉक्ससाठी मशीन हा मूर्खपणा आहे. मात्र, खबाने त्या विचाराला व्हिडिओचं रुप देतो – आणि लोकांना ते आवडतं.

खबानेची प्रसिद्धी सध्या झपाट्याने वाढत आहे. केवळ इटलीमध्येच नाही तर, ब्राझील, अमेरिका, सेनेगल आणि जगभरातील कित्येक देशांमध्ये खबाने प्रसिद्ध आहे. खबाने त्याचे व्हिडिओ इन्स्टाग्राम हँडलवरुनही शेअर करतो. तसेच, कित्येक मीम पेजेसही त्याचे व्हिडिओ कॉपी करुन पोस्ट करतात. त्यामुळंच टिकटॉक बॅन असलेल्या भारतातही खबाने प्रसिद्ध आहे. टिकटॉककडून मिळणारे पैसे, आणि विविध ब्रँड्सच्या जाहिरातीसाठी मिळणारे पैसे हेच त्याच्या कमाईचं मुख्य साधन झालं आहे.

इन्फ्लुएन्सर मार्केटिंग हब या वेबसाईटवर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार, खबाने सध्या एका टिकटॉक पोस्टसाठी एक ते दीड लाख डॉलर्स एवढी रक्कम घेत असावा.

एप्रिल २०२१ मध्ये त्यानं १० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला होता. अवघ्या काही दिवसांमध्येच त्याचे फॉलोअर्स लाखोंच्या संख्येने वाढले. जून २०२१ च्या सुरुवातीला त्याने ६५ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला होता, आणि जुलै २०२१ मध्ये त्याचे ८६ मिलियन फॉलोअर्स झाले.

टिकटॉक स्टार चार्ली डी अमेलिओ ही जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणारी स्टार आहे. तिचे ११९ मिलियन फॉलोअर्स आहेत. खबानेची प्रसिद्धी अशीच वाढत राहिली, तर काही दिवसांमध्येच तो जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणारा स्टार होईल यात शंका नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

गोष्ट तोंडाला पाणी आणणाऱ्या लोणच्याची !

Next Post

नागार्जुनच्या प्रेमाखातर तब्बूने अजूनही लग्न केलं नाही..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

नागार्जुनच्या प्रेमाखातर तब्बूने अजूनही लग्न केलं नाही..!

कबुतरांनी प्रेम पत्र पोचवायचं काम करायच्या आधी दोन्ही महायु*द्धांत शौर्य गाजवलंय..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.