The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोमवार आवडत नाही म्हणून या “हुशार” मुलीने शाळेवरच अंधाधुंद गोळीबार केला

by Heramb
20 December 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


शालेय जीवनात आपल्याला अनेकदा शाळेत जायचा कंटाळा येतो. पण दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस शाळेत गेलोच नाही की अनेकदा घरीसुद्धा मन रमत नसायचं. शाळेत अभ्यास, शिक्षा, परीक्षा यांबरोबरच मित्रांबरोबरचं खेळणं आणि अनेक प्रकारची कांड करणंसुद्धा  असायचंच. पण काही मुलांना शाळेत जायचंच नसतं. त्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात.

कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीने तर ‘सोमवार’चा दिवस आवडत नाही म्हणून थेट प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर आणि काही कर्मचाऱ्यांवरच गोळीबार केला होता. नेमकं काय घडलं होतं तेव्हा आणि अवघ्या सोळा वर्षांच्या विद्यार्थिनीवर नेमकी अशी वेळ का आली, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

५ फूट उंची असलेली १६ वर्षीय ब्रेंडा स्पेन्सरच्या चेहऱ्यावर भयानक भाव कधीही नव्हते. तिचा चेहरा काहीसा कुरूप आणि डोळ्यांवर एक जाड, सिल्वर शेडचा चष्मा असायचा. तिचे वर्गमित्र तिला ‘कुरूप दिसणारी मुलगी’ म्हणायचे. ती फारशी कोणामध्ये मिळून-मिसळून राहत नसत. पालकांच्या घटस्फोटानंतर ब्रेंडा तिच्या वडिलांसोबत सॅन डियागोमधील एका अतिशय सामान्य घरात राहत असे. तिचे घर ग्रोव्हर क्लीव्हलँड प्राथमिक शाळेच्या समोर होते.

ब्रेंडाला फोटोग्राफी आणि गिर्यारोहणाची आवड होती. पण तिचा आवडता छंद म्हणजे ‘गन शूटिंग’! तिच्या वडिलांनी म्हणजेच, वॉलेस स्पॅन्सरने अगदी लहान वयातच तिला बिअर कॅनच्या सहाय्याने फायरिंगचे प्रशिक्षण दिले. तिने अनेकदा सर्वोत्तम फोटोग्राफीसाठी पुरस्कार जिंकले होते. एक्सट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत असली, तरी अभ्यासामध्ये मात्र ती लक्षणीयरित्या मागे होती. क्वचितच तिचा गृहपाठ पूर्ण असे, तिचे मार्क्स कमी असायचे आणि वर्गात काहीही शिकत असताना ती नुसती बसलेली असायची. कित्येकदा तिने वर्गात झोपा देखील काढल्या होत्या.



१९७९ च्या सुरुवातीला ब्रेंडा अनेक दिवस शाळेत गेलीच नाही. तिची अशी वागणूक पाहून तिला एका ‘युवकांच्या समस्यांवर उपाय शोधणाऱ्या संस्थे’मध्ये पाठवण्यात आले. ब्रेंडाची तपासणी केल्यानंतर, तेथील सदस्यांनी तिच्या वडिलांना ती फार नैराश्यात आणि आत्मह*त्या करण्याच्या मन:स्थितीत असल्याचे सांगितले. त्यांनी ब्रेंडाला मनोरुग्णालयात दाखल करण्याचा आग्रह केला. पण तिच्या वडिलांनी मात्र याला परवानगी दिली नाही.

काही अज्ञात कारणांमुळे, ब्रेंडाच्या वर्तवणुकीत बऱ्याच समस्या येऊ लागल्या. ब्रेंडाच्या मनात पोलीस अधिकाऱ्यांबद्दल टोकाचा द्वेष निर्माण झाला होता. एक चांगली स्नायपर बनून एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचे डोके उडवायला आपल्याला आवडेल असे तिने अनेकदा तिच्या वर्गमित्रांना सांगितले होते. त्याच उन्हाळ्याच्या मोसमात, ग्रोव्हर क्लीव्हलँड प्राथमिक शाळेच्या खिडक्यांवर ‘एअर गनने’ फायरिंग केल्याच्या आरोपावर ब्रेंडला अटक करण्यात आली.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

जरी ही एअरगन असली तरी ज्या हेतूने ‘शाळेच्या खिडक्यांवर’ फायरिंग केली गेली त्यासाठी तिला पोलिसांत प्रोबेशनमध्ये ठेवण्यात आले होते. तिच्या प्रोबेशन ऑफिसरने ब्रेंडाला मानसोपचार तपासणीची गरज असल्याचे सांगितले होते पण यावेळीही तिच्या वडिलांनी नकार दिला.

त्या वर्षी ख्रिसमससाठी, वॉलेसने ब्रेंडाला ५०० जिवंत काडतुसं आणि एक सेमी-ऑटोमॅटिक रायफल भेट दिली. ब्रेंडाच्या म्हणण्यानुसार मात्र, तिने तिच्या वडिलांना गिफ्ट म्हणून ‘रेडियो’ची मागणी केली होती. पण तिच्या भावंडं आणि कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, तिने तिच्या वडिलांकडे रायफलसाठीच हट्ट धरला होता. कारण काहीही असो, काही दिवसांनी याच भेटवस्तूच्या मदतीने एक भीषण घटना घडली.

सकाळची वेळ होती, नेहमीप्रमाणे ब्रेंडाला आज शाळेत जायचे नव्हते, तशी विनंती तिने आपल्या वडिलांना आजारपणाचं कारण देत केली आणि त्यांनीही आपल्या मुलीला घरीच थांबून आराम करण्याचा सल्ला दिला. वॉलेस स्पॅन्सर नेहमीप्रमाणे आपल्या कामावर निघून गेला. इकडे ब्रेंडा घरी एकटीच होती. स्पेन्सर कुटुंबाच्या घरासमोरच्या ग्रोव्हर क्लीव्हलँड एलिमेंटरी शाळेच्या गेटबाहेर, शाळेचे गेट उघडण्याच्या प्रतीक्षेत अनेक प्राथमिक शाळेचे विद्यार्थी रांगेत उभे होते.

ब्रेंडाने घराभोवती व्यवस्थित बॅरिकेडिंग करून घेतले आणि समोर रांगेत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांवर ‘रुजर सेमी-ऑटोमॅटिक .22 कॅलिबर रायफल’ने अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. शाळेचे ५३ वर्षीय मुख्याध्यापक बर्टन रॅग आणि सहाव्या इयत्तेत शिकवणारे शिक्षक डॅरील बार्न्स हे यावेळी आपल्या ऑफिसमध्ये बसले असताना त्यांना अचानक फटाक्यांचा आवाज आला. बाहेर आल्यावर त्यांना हा फटाक्यांचा आवाज नसून अज्ञात ह*ल्लेखोराने झाडलेल्या गोळ्यांचा आवाज आहे हे समजले.

जखमी झालेल्या एका विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी धावलेल्या मुख्याध्यापकाच्या छातीत गोळी लागली आणि त्याचा तत्क्षणी मृत्यू झाला. शाळेचा मुख्य संरक्षक, ५६ वर्षीय मायकल सुचर, मुख्याध्यापकाच्या मदतीला धावला आणि पण त्यालाही गोळी लागली, दुर्दैवाने मायकलचासुद्धा मृत्यू झाला.

डॅरील बार्न्सने शक्य तितक्या विद्यार्थ्यांना शाळेच्या आत नेले. बाहेर पळून जाण्यापूर्वी त्याने सेक्रेटरीला पोलिसांना फोन करण्याची ओरडत सूचना दिली, याचवेळी तो ब्रेंडाने फायर केलेल्या अनेक राउंड्सपासून तो वाचला. २८ वर्षीय रॉबर्ट रॉब हा घटनास्थळी पोहोचणारा पहिला पोलीस अधिकारी होता. मृत्युमुखी पडलेल्या बर्टन रॅग आणि मायकल सुचर यांना तपासताना त्याला मानेत गोळी लागली. पण तो यातून वाचला.

हे सगळं घडत असताना एका स्थानिक वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने ब्रेंडाच्या घरी फोन करून असे वाईट कृत्य करण्यास ती कशामुळे प्रवृत्त झाली? असे विचारले असता ब्रेंडाने उत्तर दिले “मला सोमवार आवडत नाही, आणि यामुळे दिवस चांगला जात आहे”. तिने विशेषतः जॅकेट्स घातलेल्या मुलांवर गोळीबार केला कारण तिला जॅकेट्समधील पंख उडताना पाहायला आवडत होते, असंही तिने सांगितलं. ‘पोलीस ऑफिसर रॉब’ला गोळी मारल्यानंतर ब्रेंडा आनंदाने म्हणाली, “आय शॉट ए पिग!” आणि आणखी मारते असं म्हणून तिने फोन ठेऊन दिला.

तब्बल वीस मिनिटे गोळीबार सुरूच होता. ‘टेड कासिनाक’ नावाच्या एका धाडसी पोलीस अधिकाऱ्याने एक कचऱ्याचा ट्रक ब्रेंडा आणि शाळेच्यामध्ये आणून उभा केला. या ट्रकमुळे ब्रेंडाला फायरिंगसाठी अडथळा निर्माण झाला होता. या आश्चर्यचकित करून टाकणाऱ्या प्रकारादरम्यान, एकूण ३६ गोळ्या झाडल्या गेल्या, दोन लोकांचा मृत्यू झाला, आठ विद्यार्थी जखमी झाले तर एक पोलीस अधिकारीसुद्धा जखमी झाला होता.

ब्रेंडाला आता तिच्या टार्गेट्सवर फायर करता येत नव्हते. तेव्हा तिची लढत पोलीस आणि एस.डब्लू.ए.टी (स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिस) टीमशी सुरु झाली. ही चकमक सुमारे सहा तास सुरु होती. तिला ‘बर्गर किंग’ येथे जेवण देण्याचे वचन दिल्यानंतरच ही चकमकसुद्धा संपली. अधिकारी ब्रेंडाला तिच्या घरातून घेऊन जात असताना, त्यांना अनेक बिअर कॅन आणि व्हिस्कीच्या बाटल्या अस्ताव्यस्त  पसरलेल्या आणि हॉलमध्ये फक्त एकच गादी आढळली.

तिच्या गुन्ह्याच्या भयानक स्वरूपामुळे, ब्रेंडावर “प्रौढ” म्हणून खटला चालवला गेला. तिला दोन मनुष्यवध आणि प्राणघातक शस्त्राने ह*ल्ला केल्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवले गेले. ४ एप्रिल १९८० रोजी, ब्रेंडा १८ वर्षांची झाल्यानंतर, तिला २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

ती अनेकदा इतरांचे लक्ष वेधण्यासाठी भाकड कथा बनवते असे ब्रेंडाच्या अनेक वर्गमित्रांनी सांगितले होते. तिने मांजरीच्या शेपटीला आग लावल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात तिचे प्राण्यांवर प्रेम होते आणि तिच्या कुटुंबाच्या मते, ती असे कधीही करणार नाही. केलेला गोळीबार हा पूर्वनियोजित नव्हता, असे ब्रेंडाचे म्हणणे होते. पण ती टेलिव्हिजनवर येण्यासाठी काहीतरी “मोठे” करणार आहे असे तिने आपल्या अनेक सहकाऱ्यांना शुक्रवारी सांगितल्याचे कळले. या घटनेनन्तर ती ‘पहिली अमेरिकन शालेय महिला नेमबाज’ बनली होती.

या घटनेच्या सुमारे दशकानंतर, तिच्या शरीरात पीसीपी ड्रग असल्याचे सांगून ब्रेंडाने तिला गोळीबाराचे स्मरण नसल्याचा दावा केला, त्याचप्रमाणे ज्यादिवशी गोळीबार झाला त्यादिवशी ती पूर्णतः नशेमध्ये असल्याने तिला त्यादिवशीची कोणतीही घटना आठवत नसल्याचे तिने सांगितले. पण, अनेक चाचण्यांमध्ये ब्रेंडाच्या शरीरमध्ये कोणतेही ड्रग्स किंवा अल्कोहोल आढळले नाही, शिवाय ज्या अधिकाऱ्यांना तिला ताब्यात घेतले होते, त्यांना ती दारूच्या अथवा कोणत्याही नशेत असल्याचं दिसून आलं नाही.

चाचणीचे खोटे निकाल फिर्यादी आणि तिच्या स्वत:च्या वकीलाने तयार केले असल्याचा तिने दावा केला. ब्रेंडाला एपिलेप्सी असल्याचे समजले होते. यामुळेच तिच्या टेम्पोरल लोबला हानी झाल्याचे दिसून आले होते तिचा गुन्हा ड्रग्ज आणि/किंवा अल्कोहोलच्या प्रभावाखाली न राहता ती “विभक्त” अवस्थेत असण्यामुळे झाला असावा, असा दावा वकीलाने केला. त्याच वर्षी ‘सीबीएस 8 सॅन डिएगो’ला दिलेल्या एका मुलाखतीत, तिला तुरुंगातून का सोडावे असे विचारले असता, ब्रेंडा म्हणाली, “प्रत्येकाला दुसरी संधी मिळायला हवी.”

तुरुंगवासाच्या सुमारे २२ वर्षांत ब्रेंडाने आपल्या या कृत्याचे कारण कोणालाही सांगितले नाही. २००१ साली पॅरोलच्या सुनावणीदरम्यान, तिच्या वडिलांनी ९ वर्षांच्या वयापासून ते १६ वर्षांची होईपर्यंत शारीरिक शोषण आणि विनयभंग केल्याचे ब्रेंडाने बोर्डला सांगितले. तर “गोळीबाराच्या वेळी माझ्या वडिलांनी माझ्यावर जवळपास ब*लात्कार केला” असेही तिने बोर्डला सांगितले. त्यानंतरच्या पॅरोल सुनावणीदरम्यान आरोपांची पुनरावृत्ती करताना, तिच्या वडिलांनी ९ वर्षांच्या वयापासून ते १४ वर्षांची होईपर्यंत तिच्यावर अ*त्याचार केले असे सांगितले. परंतु तिच्या मूळ विधानातील ‘वयोगट’ वेगळा होता.

तिच्या वडिलांनी (कथितपणे) अ*त्याचार आणि विनयभंग केल्याचा अहवाल देण्यासाठी तीस वर्षे का लागली, हा प्रश्न वारंवार तिला पॅरोल बोर्डाने केला. ‘यापूर्वी गैरवर्तनाची तक्रार केली नाही कारण ती घाबरली होती’ हे तिने दोन वेगळ्या पॅरोल सुनावणी दरम्यान स्पष्टपणे सांगितले. जेव्हा बोर्डाने या प्रकरणाचा तपास सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ब्रेंडाने पुन्हा तिची कथा बदलली. तीस वर्षांपूर्वी तिच्या समुपदेशकांना गैरवर्तनाची तक्रार केल्यावर तपास आधीच केला गेला होता, असा तिने दावा केला.

कालांतराने वॉलेस स्पेन्सरने आपल्या मुलीच्या सेलमेटशी, शीला मॅककॉय नावाच्या १७ वर्षीय मुलीशी लग्न केले. तिला तो तुरुंगात ब्रेंडाची भेट घेत असताना अनेकदा भेटला होता. शीला काहीशी ब्रेंडासारखीच दिसत होती. अनेकदा लोक शीलालाच ब्रेंडा समजत असत. काही काळात शीला गर्भवती राहिली आणि बाळाला जन्म दिल्यानंतर लगेचच तिने वॉलेसला घटस्फोट दिला. वॉलेसचे २०१६ साली वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले. त्याने शेवटच्या क्षणापर्यंत ब्रेंडाचे दावे नाकारले.

ब्रेंडाच्या कहाणीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बदल होत आले आहेत, तिच्या दाव्यांच्या वैधतेबद्दल गंभीर शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. निश्चितपणे, वॉलेस स्पेन्सरने आपल्या मुलीला जिवंत काडतुसे आणि रायफल भेट देण्यापासून ते अगदी हुबेहुब तिच्यासारख्याच दिसणाऱ्या एका तरुण मुलीशी लग्न करण्यापर्यंत आणि ब्रेंडाच्या मानसिक उपचारांना नकार देण्यात संशयास्पद वागणूक ठेवली आहे. पण, हे भयानक निर्णय वॉलेस स्पेन्सरला ‘खु*नी’ बनवतात की लहान मुलांवर लैंगिक अ*त्याचार करणारा हैवान?

कदाचित ब्रेंडाने तिच्या वडिलांच्या हातून अ*त्याचार आणि विनयभंगाची तक्रार काही पोलीस अधिकाऱ्यांना किंवा समुपदेशकांना केली असेल आणि याबद्दल तिला मदत करण्यात त्यांना आलेल्या अपयशामुळेच अधिकारी व्यक्तींबद्दलचा तिरस्कार तिच्या मनात उद्भवला असेल किंवा, कदाचित ब्रेन्डाला मायथोमॅनिया, म्हणजेच खोटे बोलण्याचा किंवा अतिशयोक्ती करण्याचा पॅथॉलॉजिकल आजार किंवा इतर निदान न झालेला मानसिक आजार आहे.

आजही अनेक अनुत्तरीत प्रश्न शिल्लक आहेत. पण दुर्दैवाने, या प्रकरणात दोन निष्पाप माणसांनी आपले प्राण गमावले, एक तरुण पोलीस अधिकारी त्या दिवसानंतर कधीच आपली सेवा देऊ शकला नाही. घटनेमागील सत्य कळण्याची शक्यता शून्य आहे. तिच्याच गोळीबाराच्या घटनेत पीडित असलेली मेरी रिंटौल म्हणते, “बंदूक धोकादायक नव्हती, पण त्या बंदुकीतून गोळी झाडणारी ‘व्यक्ती’ धोकादायक होती”.  हेतू काहीही असो, ट्रिगर खेचणारी शेवटी ब्रेंडाच होती.

‘ब्रेंडा स्पेन्सर’ सध्या चिनो येथील ‘कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूशन फॉर वुमन’मध्ये तुरुंगात आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

म्हणून ताजिकिस्तानसह नऊ देशांमध्ये असलेले भारतीय लष्करी बेस सामरिकदृष्ट्या महत्वाचे आहेत

Next Post

जहाज अपघातातून वाचलेल्या दर्यावर्दींनी वसवलेला देश म्हणजे बर्मुडा..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

जहाज अपघातातून वाचलेल्या दर्यावर्दींनी वसवलेला देश म्हणजे बर्मुडा..!

बंदु*कीची एकही गोळी न चालवता या यु*द्धात हजारो सैनिकांचा बळी गेला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.