The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दरोडेखोर जॉन डिलींजर इतकी लोकप्रियता हॉलीवूड अभिनेत्यालासुद्धा मिळाली नसेल

by द पोस्टमन टीम
9 June 2025
in मनोरंजन
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


४ मार्च १९३४ चा दिवस होता, अमेरिकन पोलीस दलावर सर्वत्र आरोप होत होते. अमेरिकन पोलीस गोंधळले होते आणि लज्जेने काळे-निळे झाले होते. त्या मागचे कारण देखील तसेच होते. अमेरिकन गुन्हा संशोधन संस्था एफबीआयचा मोस्ट वॉन्टेड अपराधी असलेला जॉन डिलिंजर पोलिसांना अक्षरशः लाकडी पिस्तुल दाखवून पळाला होता.

सामान्य लोक पोलिसांच्या या चुकीवर हसत तर होतेच, पण अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम व्यवहारावर टीका देखील करत होते. प्रत्येकाला आश्चर्य वाटत होतं की इतक्या कडक सुरक्षा व्यवस्थेला भेदून जॉन डिलिंजर पळाला तरी कसा? परंतु जे लोक जॉनला ओळखत होते, त्यांना मात्र याचं कवडीमात्र आश्चर्य वाटत नव्हतं. जॉन या आधी देखील तुरूंगातून पळाला होता. तो एक सराईत गुन्हेगार होता. तो मरेपर्यंत त्याने केलेलं प्रत्येक काम अमेरिकन लोकांच्या स्मृतीत जिवंत आहे, इतकं ते अचाट आहे. चला आज आपण जाणून घेऊ हा जॉन डिलिंजर कोण होता?

जॉन डिलिंजरचं आयुष्य गुन्हे करण्यात गेलं होतं. एका किराणा दुकानात चोरी करणे हा त्याच्या आयुष्यातील पहिला गुन्हा होता. खरंतर हा त्याचा पहिला अपराध होता, ज्यात त्याला शिक्षा झाली होती. या आधी देखील त्याच्या नावावर अनेक गुन्हे होते. त्यावेळी त्याचं वय फक्त २० वर्ष होतं. त्याला १० वर्षांची शिक्षा ठोठावली गेली होती. परंतु आठ वर्षांनी तो पॅरोलवर बाहेर आला पण पुन्हा कधी जेलमध्ये परतलाच नाही.

डिलींजर आधीपासूनच एक सराईत गुन्हेगार होता. तो जेलमध्ये जाऊन आणखी हुशार होऊन बाहेर पडला होता. त्याने अनेक समविचारी गुंडांशी मैत्री केली. जेलमध्ये सुधारण्या ऐवजी त्याने एक गँग तयार केली. यानंतर त्याने गुन्हेगारी विश्वात पाऊल टाकले, ते कायमचेच.



त्याने एक बँक लुटण्याची योजना आखली. २२ मे, १९३३ रोजी जेलमधून बाहेर आल्यानंतर केवळ तीन महिन्यांनी जॉनने ३ बँकांवर दरोडा टाकला. तब्बल ४० हजार अमेरिकन डॉलर लुटले. त्याकाळी हा आकडा खूप मोठा होता. त्याच्या टोळीच्या चर्चा सर्वदूर पसरल्या.

पोलीस आणि गुन्हेगारी विश्वात त्याच्या नावाच्या चर्चांना उधाण आले. दरोडे टाकल्यानंतर त्याने पोलिसांसोबत खेळ खेळायला सुरुवात केली. पोलीस त्याचा पाठलाग करायचे आणि तो त्यांच्या हातावर तुरी देऊन सटकायचा. २५ सप्टेंबर, १९३३ रोजी पोलिसांनी डिलिंजरला त्याच्या साथीदारांसोबत पकडले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

तीन बँक लुटण्याचा आरोपात त्याला आणि त्याच्या टोळीच्या लोकांना कारावास झाला. त्यांची रवानगी ओहियो या राज्याच्या लिमा कारावासात करण्यात आली. त्याला जेव्हा पकडण्यात आले, त्यावेळी तो आधी ज्या तुरुंगात होता, त्या तुरुंगाचे कर्मचारी त्याठिकाणी येऊन पोहचले. त्यांनी त्या ठिकाणी तुरूंगाधिकाऱ्याला त्याच्या आधीच्या पलायनाची हकीकत सांगितली गेली. त्याने ती शिक्षा पूर्ण केली नसल्यामुळे त्याची पुन्हा त्या तुरुंगात नेण्याची तयारी करण्यात आली. हे सगळं होत असताना अचानक तुरुंगाधिकाऱ्याला त्या दुसऱ्या कर्मचारी लोकांवर संशय आला, पण तो काही करणार इतक्यात त्या दुसऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर बंदूक ताणली.

खरं तर ते आधीच्या तुरुंगाचे कर्मचारी नव्हतेच, तर डिलींजरच्या मुक्ततेसाठी वेष बदलून आलेले तोतये आधिकारी होते. त्यांनी जॉनला शोधून त्याला घेऊन तुरूंगातून पळ काढायला सुरुवातच केली होती. खऱ्या पोलिसांत आणि त्यांच्यात चकमक उडाली आणि जॉन डिलींजरने चालवलेल्या गोळीमुळे एका पोलिसाचा मृत्यू झाला.

तुरूंगातून यशस्वी पलायन केल्यावर जॉनने दरोडे आणि गुन्हेगारीचे एक सत्रच सुरू केले. त्याने आपल्या साथीदारांसोबत इंडियाना आणि व्हिस्कोन्सिनमध्ये मोठे दरोडे टाकले. तिथून पैसे घेऊन तो दक्षिण फ्लोरिडाला गेला.

त्याने बँकेवर दरोडा टाकल्यानंतर अमेरिकन पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. अमेरीकन पोलिसांच्या जाचापासून वाचण्यासाठी तो कधीच एका स्थानावर राहत नसे. त्यामुळे फ्लोरिडाहून तो टेक्सासला गेला. तिथून अरिझोना येथे गेला. परंतु स्थानिक पोलिसांनी त्याला ओळखले आणि जेरबंद केले. त्यानंतर तो पुन्हा तुरुंगात गेला. इंडियाना येथे त्याची रवानगी करण्यात आली. परंतु याच ठिकाणी त्याने इतिहास घडवला. त्याने एक असं कृत्य केलं की तो अमेरिकन लोकांच्या कायम स्मरणात राहिल.

तुरुंगात आल्यावर त्याला शांत राहता येत नव्हतं. त्याने पालायनाची योजना आखायला सुरुवात केली. त्याने लाकडाच्या एका फळीला ब्लेडच्या सहाय्याने चांगलं तासून त्यापासून एका कृत्रिम बंदुकीची निर्मिती केली. त्याने बूट पॉलिशच्या सहाय्याने त्या बंदुकीला काळा रंग दिला. सगळं झाल्यावर तो आपल्या कोठडीत गेला. त्याच्यावर नजर ठेवायला तुरुंगाचे अधिकारी सदैव चकरा मारत असत.

एकदा असाच एक अधिकारी त्याच्यावर नजर ठेवायला आला आणि त्याच्या बेसावध अवस्थेचा फायदा घेऊन डिलींजरने त्याच्या डोक्यावर आपली लाकडी पिस्तुल धरली. त्याने त्या पोलिसाला बंदी बनवले आणि त्याचे कपडे घालून जेलमधून पालायन केले. दोन मशीनगनच्या सहाय्याने पोलिसांवर ह*ल्ला करत तो पसार झाला.

त्याचा हा प्रताप इतका भयंकर होता की अमेरिकन पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगली गेली. तो अमेरिकेचा सगळ्यात मोठा गुन्हेगार बनला आणि लोकांच्या मनात त्याची एखाद्या सेलिब्रिटीसारखी प्रतिमा निर्माण झाली होती. अमेरिकन पोलिस त्याचा मोठया प्रमाणावर शोध घेत होते.

डिलिंजर जसे दरोडे टाकायचा, त्यामुळे जनतेच्या मनात तो एखादा सुपरस्टार बनला होता. त्याला लोक रॉबिनहूड समजू लागले होते. तो त्याच बँक लुटायचा ज्यात श्रीमंत लोकांच्या ठेवी असायचा, त्यामुळे तो अमेरिकेतल्या लोकांना आवडायचा. हे मात्र खरंय की, त्यातला एक आणा पण तो या गरिबांना देत नव्हता.

त्याने पुन्हा दरोडा घालायचे सत्र सुरू केले. मग त्याच्याबद्दल लोकांचे कुतूहल संपुष्टात आले. पण त्याला प्रसिद्ध होण्याची लालसा होती, जी त्याच्या मृत्यूचे कारण बनली. त्याला ओळखू लागल्यामुळे मुक्त संचार त्याच्यासाठी दुरापास्त झाला होता. पोलिसांना त्याला पकडायला वेळ लागणार नव्हता. त्याचे साथीदार त्याला सोडून जाऊ लागले. कोणीही त्याची साथ द्यायला तयार होईना. सगळ्याना पकडले जाण्याची भीती होती. त्याला आणि त्याच्या सगळ्या साथीदारांना त्यांचा मृत्यू निकट आल्याची गोष्ट कळून चुकली होती.

एकदिवस पोलिसांना त्याच्या ठाव ठिकाण्याची टीप मिळाली आणि पोलिसांनी त्याला एका सिनेमागृहाच्या बाहेर गोळ्या घालून संपवले. त्याचा अंत तसाच झाला जसा एखाद्या पापी गुन्हेगाराचा होतो. पण त्याने केलेल्या गोष्टी असामान्य होत्या. त्याच्या आयुष्यावर पुढे हॉलीवूडमध्ये “पब्लिक एनिमिज” या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.


इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: John Dillinger
ShareTweet
Previous Post

बासू चॅटर्जी- अप्रतिम कलाकृती मागे ठेवून गेलेला दिग्दर्शक

Next Post

पेशवाईतही गणेशोत्सव साजरा व्हायचा का?

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

पेशवाईतही गणेशोत्सव साजरा व्हायचा का?

भारताच्या संविधान निर्मितीत या दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांचं योगदान बहुमूल्य आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.