The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जपानी लोकांना सगळ्यात जास्त भीती असते ती ‘योत्सुया कैदान’ची..!

by द पोस्टमन टीम
10 August 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


शांत, संयमी आणि कामसू लोकांचा देश म्हणून आपल्याला जपानची ओळख आहे. तिथला चेरी ब्लॉसम आणि सुमो कुस्ती जगप्रसिद्ध आहे. मात्र, याशिवाय जपानमधील भूतांच्या गोष्टी देखील प्रसिद्ध आहेत. विशेषत: ज्या लोकांना इतिहास, पुराणकथा आणि सुपरनॅचरल गोष्टींमध्ये रस आहे, अशांनी कदाचित जपानी भयकथा वाचल्याही असतील. जपानला ईडो काळापासूनच्या (१६०३ ते १८६७) भय कथांची परंपरा आहे. यातील ‘योत्सुया कैदान’ किंवा ‘योत्सुयाची भयकथा’ सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. खून आणि बदला भोवती दोन गोष्टींभोवती फिरणारी ही कथा आहे. यापासून असंख्य भयपट निर्मात्यांना प्रेरणा मिळाली आहे.

जपानमधील प्रत्येक व्यक्तीला माहिती असणारी ही भयकथा नेमकी आहे तरी काय?

शिंजुकू शहराजवळ असणाऱ्या योत्सुयातील ‘ओईवा इनारी तमिया’ मंदिरात तिचं मूळ असल्याचं सांगितलं जातं. ही कथा मूळतः १७२७ मध्ये लिहिली गेली होती आणि नंतर १८२५ मध्ये पारंपारिक जपानी थिएटर ‘काबुकी’साठी तिचं नाटकात रुपांतर करण्यात आलं. कथेची नायिका योत्सुया ओईवा ही एक सामान्य जपानी महिला होती. तिचा विवाह तामिया आयमन या समुराईशी झाला होता.

एक दिवस तिला, आयमनवर गुपचूप प्रेम करणाऱ्या ‘ओउम’कडून चेहऱ्याला लावण्यासाठी एक लेप मिळतो. त्यात ओउमनं विष मिसळलेलं असतं. विषारी लेप लाऊन ओईवाचा चेहरा विद्रूप होईल आणि त्यानंतर आयमन तिला घटस्फोट देईल, अशी ओउमची योजना असते. तिच्या योजनेप्रमाणं, विषारी लेप लावल्यानंतर योत्सुया ओईवाचा चेहरा अतिशय विद्रुप होतो. ते पाहून आयमनला तिच्यापासून वेगळं होण्याची इच्छा होते. मात्र, त्याला त्यासाठी ठोस कारणाची आवश्यकता असते. त्यामुळं तो आपल्या एका विश्वासू सेवकाला आपल्याच पत्नीवर अत्याचार करण्यास सांगतो.



तो सेवक असे न करता योत्सुयाला आरशामध्ये तिचं रूप दाखवतो. स्वत:ला आरशात पाहिल्यानंतर योत्युया ओईवाचं संतुलन ढासळत आणि अपघातानं तिचा मृत्यू होतो. पुढे ती ‘ओन्रीओ’ नावाच भूत बनून सूड घेण्यासाठी परत येते. कथेच्या शेवटापर्यंत बहुतेक पात्रांचा विविध अपघातांमध्ये मृत्यू होतो आणि योत्सुया ओईवा तिचा सूड पूर्ण करते.

‘ओईवा इनारी तमिया’ मंदिरात या भयकथेची मूळ असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे हे मंदिर देखील खूप प्रसिद्ध आहे. शिंतो धर्मातील समृद्धी आणि यशाची देवता ‘इनारी’ला हे मंदिर समर्पित आहे. मंदिरात इनारीचे संदेशवाहक असलेल्या पांढऱ्या कोल्ह्यांचे पुतळे आहेत. मंदिरासमोर लावण्यात आलेल्या फलकानुसार, काबुकी नाटक पहिल्यांदा सादर झालं त्याच्या २०० वर्षे अगोदर खरी-खुरी योत्सुया ओईवा त्याठिकाणी राहिली होती.

तमिया मंदिरात ती नियमित पुजेसाठी येत असे, म्हणून तिचं नाव मंदिराला देण्यात आलेलं आहे. मात्र, जी भयकथा सांगितली जाते त्यातील एकही घटना मंदिरातील फलकावर आढळत नाही. त्यामुळं कथेच्या सत्यतेबाबत प्रश्न निर्माण होतात. मात्र, मंदिराच्या परिसरात एका ठिकाणी ‘सावधान’ असा फलक लावलेला आहे. त्या फलकापासून पुढच्या भागामध्ये पर्यटक आणि भक्तांना जाण्यास परवानगी नाही. त्या जागेचा आणि भयकथेचा नक्कीच काहीतरी संबंध असावा, अशी जपानी लोकांची समजूत आहे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

काही लोकांच्या मते, हे मंदिर टोकियोमधील सर्वात भयानक झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक मानलं जातं. त्या ठिकाणी भूतांचा वावर असल्याच्या आजपर्यंत अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. मात्र, याठिकाणी जाण्यापूर्वी जर एखाद्यानं योत्सुया ओईवाची भयकथा पाहिली, वाचली किंवा ऐकली असेल तर कदाचित मनातून भीतीची शिरशिरी नक्की जाते. या जागेला झपाटलेली समजलं जात असलं तरी, जपानमधील कित्येक लोक याठिकाणी जातात. विशेष म्हणजे आठवडाभर याठिकाणी लोकांची वर्दळ असते. समृद्धी आणि यशाची देवता असलेल्या ‘इनारी’ देवतेला साकडं घालणाऱ्यांचीही याठिकाणी कमी नाही.

या कथेच्या सत्यतेबाबत आणि मंदिराबाबत अनेक मतभेद आहेत. असे असतानाही लोकांच्या मनात योत्सुया ओईवाच्या भूताबाबत इतकी भीती का आहे? असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो.

‘योत्सुया कैदान’ भयकथेच्या सादरीकरणामध्ये आणि चित्रपट तयार करताना अनेक विचित्र अपघात झाल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे चित्रिकरण किंवा सादरीकरणा अगोदर मुख्य कलाकार आणि दिग्दर्शक योत्सुयाच्या समाधीस्थळाला भेट देतात. सुगामोमधील मायोगोजी मंदिरात तिला दफन केलेले आहे.

आतापर्यंत कथेतील ओईवाचं वर्णन वाचून अनेक कलाकार आणि अभिनेत्रींनी तिला सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. कात्सुशिका होकुसाईनं(प्रसिद्ध जपानी वूड पेंटर) त्याच्या ‘वन हंड्रेड घोस्ट स्टोरीज’ या सिरीजमध्ये ओईवाची सर्वात आयकॉनिक प्रतिमा तयार केली आहे. त्याने मंदिरातील कंदिलाच्या प्रकाशात तिचा संतापलेला विद्रुप चेहरा रेखाटलेला आहे.

जपानमधील सर्वात प्रसिद्ध भयकथा लोकांसमोर पुन्हा पुन्हा आणण्याचा मोह अनेकांना आवरता आलेला नाही. आतापर्यंत या कथेवर कित्येक चित्रपट आणि मालिका तयार झाल्या आहेत. १९१२ मध्ये सर्वात प्रथम या कथेवर चित्रपट तयार करण्यात आला होता.

‘शिंपन योत्सुया कैदान’ नावाचा एक चित्रपट एकेकाळचे जपानमधील अग्रगण्य दिग्दर्शक इटो डेसुके यांनी तयार केला होता. तोहो या प्रोडक्शन हाऊसनं १९६५ मध्ये शिरो तोयोदा दिग्दर्शित आणि तात्सुया नाकादाई अभिनीत ‘घोस्ट ऑफ योत्सुया’कथेची आवृत्ती तयार केली. जगभरात ती ‘इल्यूजन ऑफ ब्लड’ म्हणून प्रसिद्ध झाली. १९९४ मध्ये, किंजी फुकासाकू यांनी भयकथेचं काबुकी व्हर्जन ‘सिंगल क्रेस्ट ऑफ बट्रेयल’ नावानं रिलिज केलं.

काळाच्या ओघात ओईवाची विषबाधा आणि मृत्यूच्या तपशीलांमध्ये बदल झाले मात्र, ‘सुड उगवणारं भूत’ कथेची ही मूलभूत रूपरेषा कायम राहिली आहे. जेव्हा-जेव्ही ही कथा नाटकाच्या रुपात स्टेजवर सादर केली गेली तेव्हा, विषबाधा झाल्यानंतर ओयवाचे गळून पडणारे केस, विद्रूप झालेल्या चेहऱ्याची दृष्ट खूप प्रसिद्ध झाली. त्याचीच भीती लोकांच्या मनात बसलेली आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

काश्मीरमधील १४० वर्ष जुन्या शिवमंदिराचा लष्कराने जीर्णोद्धार करून सर्वांसाठी खुलं केलं आहे

Next Post

हे आहेत शिखांचे पाच पवित्र तख्त, यातील एक महाराष्ट्रातही आहे..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

हे आहेत शिखांचे पाच पवित्र तख्त, यातील एक महाराष्ट्रातही आहे..!

देशभर महामार्गांचं जाळं विणण्यात या मराठी माणसाचा सिंहाचा वाट आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.