The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चिम्पांझीच्या संशोधन, संगोपन आणि संवर्धनासाठी खर्च केलंय

by द पोस्टमन टीम
28 June 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
1
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


मानव हा माकडाचा वंशज असल्याचं आपल्या सर्वांना माहित आहे. काळाच्या ओघात विकसित होऊन माकडापासून आताचा प्रगत मानव तयार झाला. त्यामुळेच मानवानंतर माकडाला सर्वांत हुशार प्राणी मानलं जातं. माकडांच्या अनेक प्रजाती आहेत. चिम्पांझी ही त्यातली सगळ्यात हुशार प्रजात आहे. याच माकडांचा अभ्यास करण्यासाठी १९६०च्या दशकात कुठलंही औपचारिक प्रशिक्षण न घेता एक ब्रिटिश मुलीनं टांझानियातील जंगलात प्रवेश केला. तिथे तिनं चिम्पांझीच्या वर्तनाबद्दल अनेक निरीक्षणं नोंदवली. तिने अभ्यासातून त्यावेळी अनेक पारंपरिक वैज्ञानिक सिद्धांतांना आव्हान दिलं. जेन गुडॉल असं या मुलीचं नाव होतं.

जेन या एक प्रायमेटॉलॉजिस्ट आणि ॲन्थ्रोपॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चिम्पांझीच्या संशोधन, संगोपन आणि संवर्धनासाठी खर्च केलं. 

आपल्यापैकी अनेकजण प्रायमेटॉलॉजी या संकल्पनेपासून अनभिज्ञ असतील. त्यामुळं सर्वात अगोदर नेमकं हे ‘प्रायमेटॉलॉजी’ प्रकरण आहे तरी काय ते आपण जाणून घेऊ.

प्रायमेटॉलॉजी म्हणजे मानव नसलेल्या प्राण्यांचा अभ्यास करणं होय! जे लोक प्रायमेटॉलॉजीचा अभ्यास करतात त्यांना प्रायमेटॉलॉजिस्ट म्हटलं जातं. ही एक वैविध्यपूर्ण शाखा आहे. जीवशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र आणि इतर विभागांमध्ये देखील प्रायमेटॉलॉजीचा अभ्यास करण्याला वाव आहे. बहुतेक प्रायमॅटोलॉजिस्टने विज्ञान शाखेतील एखादा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला असतो. या व्यक्ती विविध क्षेत्रातून येतात. वैज्ञानिक, शिक्षक, संरक्षक आणि संवर्धक, वैद्यकीय संशोधक आणि पशुवैद्यक क्षेत्रातही प्रायमेटॉलॉजिस्ट असतात.

जेन गुडॉल यापैकीच एक आहेत. १९६० साली जेन गुडॉलने जंगलात जाऊन चिम्पांझीचा अभ्यास केला. मानव आणि चिम्पांझींच्या वर्तनात किती साम्य आहे, हे सर्वप्रथम जेन यांनी जगाला दाखवून दिलं. प्राण्यांच्या दोन प्रजातींचं उत्क्रांतीवादात किती जवळचा संबंध आहे, याचे सिद्धांत त्यांनी मांडले.



३ एप्रिल १९३४ ला जेन गुडॉल यांचा जन्म झाला. लंडनमधील कार रेसिंग व्यावसायिक मोर्टिमर हर्बर्ट मॉरिस-गुडॉल हे त्यांचे वडील होते तर आई मार्गारेट मायफानवे जोसेफ या प्रसिद्ध कादंबरीकार होत्या. जेन एक वर्षाची होती तेव्हा लंडनच्या प्राणिसंग्रहालयात चिम्पांझीच्या पिलाचा जन्म झाला होता. त्यानंतर त्या पिलासारख्या दिसणाऱ्या खेळण्या बाजारात आल्या. जेनच्या वडिलांनी तिला ही चिम्पांझीच्या पिलाची खेळणी भेट म्हणून दिली. तिने त्याचं नाव ‘ज्युबिली’ असं ठेवलं होतं. आपल्या या छोट्याशा भेटवस्तूचा जेनच्या आयुष्यावर इतका सकारात्मक प्रभाव पडेल, असा विचारही तिच्या वडिलांच्या मनात तेव्हा आला नसेल.

लहानपणापासून जेनला प्राण्यांचं निरीक्षण करण्याची आवड होती. जेव्हा ती ४ वर्षांची होती तेव्हा तिला कोंबडीच्या पोटातून अंडं कसं बाहेर पडतं हे जाणून घ्यायचं होतं. त्यासाठी एक दिवस ती जवळजवळ चार तास कोंबड्यांच्या खुराड्यात बसून राहिली होती. त्या चार तासात पालकांनी मात्र, मुलगी बेपत्ता असल्याची थेट पोलीस तक्रार दाखल केली होती.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

गुडॉल यांनी लहान असताना ह्यू लोफ्टिंगचं ‘द स्टोरी ऑफ डॉक्टर डोलिटल’ हे पुस्तक वाचलं. आफ्रिकेत प्रवास करून प्राण्यांशी बोलणाऱ्या एका दयाळू डॉक्टरची ती गोष्ट होती. 

याशिवाय त्यांनी टारझनची देखील सर्व पुस्तकं वाचली होती. पुस्तकांमधील जंगलांचं आणि प्राण्यांच वर्णन वाचून आफ्रिकन जंगलांविषयी त्यांच्या मनात कायम कुतुहल होत. पुढे त्यांच्या आईने त्यांना आफ्रिकेतील प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

लुईस लेकी यांची भेट आणि आयुष्याला मिळालं वळण

१९५७ साली गुडॉल यांनी नैरोबीतील एका मैत्रीच्या घरी भेट दिली. त्यांना ती जागा इतकी आवडली की त्यांनी शहरात सचिव म्हणून एक नोकरी मिळवली. त्याच वेळी होमिनिन बोन्सचा अभ्यास करणारे प्रसिद्ध संशोधक लुईस लेकी आफ्रिकेत आले होते. प्राण्यांविषयी असलेल्या आकर्षणामुळं जेन यांनी लुईस यांच्याशी संपर्क साधला. जेनचा अभ्यास आणि आवड पाहून त्यांनी तिला सेक्रेटरी म्हणून कामावर घेतले. चिम्पांझीचा अभ्यास करण्यासाठी लुईस यांना एका साथीदाराची आवश्यकता होती. जेनच्या भेटीमुळे त्यांचा प्रश्न सुटला. त्यानंतर जेन प्रायमॅट्सचा अभ्यास करण्यासाठी लंडनच्या प्राणीसंग्रहालयात आली आणि लुईस यांनी तिच्या फिल्डस्टडीजसाठी फंड जमा केला.

१९६० साली वयाच्या २६व्या वर्षी जेन गुडॉल ‘गोम्बे स्ट्रीम चिम्पांझी प्रिझर्व्ह’ येथे दाखल झाल्या. तिथे २० ते ३० चौरस मैलांच्या क्षेत्रात जवळपास १५० चिम्पांझी वास्तव्याला होते. त्याठिकाणी राहण्यासाठी जेन यांना खूप संयम ठेवून कष्ट घ्यावे लागले. जवळपास एका वर्षानंतर चिम्पांझींना जेनची सवय झाली.

चिम्पांझींचा केला सखोल अभ्यास

प्राण्यांच्या अभ्यासाबाबत जेन यांना अतिशय थोडे व्यावसायिक प्रशिक्षण होते. असं असूनही त्यांनी न थकता अनेक गोष्टी शिकून घेतल्या. चिम्पांझींचा अभ्यास करताना अनेक नवीन गोष्टींचा अवलंब केला.

त्यांनी अंकांऐवजी चिम्पांझींना नावे देण्यास सुरुवात केली. केळीनं चिम्पांझींना स्वत:कडे लवकर आकर्षित करता येते हे देखील जेन यांच्या लक्षात आले. प्रत्येक चिम्पांझीचा त्यांनी वेगवेगळा अभ्यास केला. प्रत्येकाच्या सवयी, वर्तणूक याबाबत बारकाईने नोंदी ठेवल्या.

चिम्पांझी हे शाकाहारी असल्याचा सर्वांचा समज होता. मात्र, चिम्पांझींना शिकार करताना, लहान कोलोबस माकडं मारून खाताना जेन यांनी पाहिलं. १९७१ साली ‘शॅडो ऑफ मॅन’ या पुस्तकात ही गोष्ट त्यांनी जगासमोर ठेवली. जर जेनने पीएचडी पूर्ण केली तर त्यांच्या संशोधनाला भक्कम आधार तयार होईल, असं लुईस लेकी यांना वाटलं. त्यांनी फंड जमा करून जेनला केंब्रिज विद्यापीठात पाठवलं. त्याठिकाणी जेन यांनी एटीमॉलॉजी विषयात पीएचडी मिळवली.

चिम्पांझीसोबत केलं मुलाचं संगोपन !

लुईस लेकी यांनी व्यावसायिक छायाचित्रकार ह्युगो व्हॅन लॉलिक यांनाही गोम्बे येथे जेनसोबत पाठवलं. संशोधनादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि १९६४ साली त्यांनी लग्न केलं. १९६७ साली त्यांचा मुलगा ह्यूगो एरिक लुई व्हॅन लॉलिकचा जन्म झाला.

गोम्बे येथे चिम्पांझीसोबत जेननं आपल्या मुलाचं संगोपन केलं. आपल्या मुलाच्या बालपणावर त्यांनी १९७२ मध्ये एक पुस्तक प्रकाशित केलं. ‘ग्रब: द बुश बेबी’, असं त्या पुस्तकाचं नाव होतं. 

१९७४ साली जेन आपल्या पतीपासून वेगळ्या झाल्या. त्यानंतर त्यांनी डेरेक ब्रायसेन यांच्याशी लग्न केले. डेरेक टांझानियातील नॅशनल पार्कचे संचालक होते. लग्नानंतर पाच वर्षातच त्यांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला.

गोम्बे येथील संशोधन पूर्ण झाल्यानंतर जेन यांनी चिम्पांझी आणि इतर वन्य प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी काम सुरू केलं. लिखाण, भाषणे यांच्यामाध्यमातून त्यांनी वन्यप्राण्यांसाठी निधी उभारला. १९७६ मध्ये गुडॉल आणि त्यांच्या एका मित्रानं मिळून ‘जेन गुडॉल इन्स्टिट्यूटची’ स्थापना केली. जगभरात त्यांची अनेक कार्यालयं आहेत. त्यांना अनेक पुरस्कार, असंख्य मानद डॉक्टरेट आणि डिस्नेचा ‘अ‍ॅनिमल किंग्डम इको हीरो’ पुरस्कार मिळाले आहेत. २००२ साली संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव कोफी अन्नान यांनी जेन यांना ‘मेसेंजर ऑफ पीस’ घोषित केलं.

आपल्या कामामुळे जगभरात गुडॉलला यांना एक संशोधक आणि वैज्ञानिक म्हणून ओळख मिळाली. ज्या चिम्पांझींची विक्षिप्त प्राणी म्हणून जगानं हेटाळणी केली त्यांना जेन यांनी आपल्या मुलांप्रमाणं सांभाळलं. त्यांचं आणि मानवाचं किती घनिष्ट नातं आहे हे, आपल्या अभ्यासातून दाखवून दिलं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जगातली पहिली ह्युमनॉइड रोबोट ‘सोफिया’ जेव्हा भारतात आली होती..

Next Post

भारतीय सैनिकांनी आफ्रिकेत गाजवलेल्या पराक्रमाची साक्ष म्हणजे पुण्याच्या NDA मधला सुदान ब्लॉक

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

भारतीय सैनिकांनी आफ्रिकेत गाजवलेल्या पराक्रमाची साक्ष म्हणजे पुण्याच्या NDA मधला सुदान ब्लॉक

सगळीकडे चेटकिणी झाडूवर बसून उडताना का दाखवल्या जातात..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.