The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हॉलिवूड सुपरस्टार ‘जॅकी चॅन’चे वडील जासूस तर आई स्मग्लर होती

by द पोस्टमन टीम
23 July 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


‘त्यांनी आपल्या मुलांना असं कसं वाऱ्यावर सोडून दिली?’ हा एकच प्रश्न प्रसिद्ध दिग्दर्शिका मॅबेल चँगला एका पत्रकार परिषदेत वारंवार विचारला गेला होता. निमित्त होतं ‘ट्रेसेस ऑफ द ड्रॅगनः जॅकी चॅन आणि हिज लॉस्ट फॅमिली’ या माहितीपटाचं. या डॉक्युमेंट्रीमध्ये हाँगकाँगचा सुपरस्टार जॅकी चॅन याच्या कुटुंबाविषयी काही रहस्ये उघडकीस आली होती. विशेष म्हणजे यातील काही गोष्टी तर स्वत: जॅकीला देखील चित्रीकरणापर्यंत माहिती नव्हत्या.

जॅकीच्या कौटुंबिक रहस्यांविषयी जाणून घेण्याअगोदर जॅकीच्या प्रवासावर आपण एक नजर टाकू.

७ एप्रिल १९५४ रोजी जॅकी चानचा जन्म झाला. त्याचं खरं नाव चॅन काँग सँग, असं होतं. जगप्रसिद्ध असलेला जॅकी अभिनेता, दिग्दर्शक आणि मार्शल आर्टिस्ट आहे. आपलं लढाऊ कौशल्य, कॉमिक टाइमिंग आणि नाविन्यपूर्ण स्टंट्ससाठी तो ओळखला जातो. १९६०पासून तो चित्रपटसृष्टीत काम करत असून त्यानं आतापर्यंत १५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. पूर्व आणि पश्चिम या दोन्ही गोलार्धांमध्ये व्यापक कामगिरी करणारं एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. विविध पॉप गाणी, व्यंगचित्र, चित्रपट आणि व्हिडिओ गेम्समध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे. याशिवाय तो एक प्रशिक्षित गायक असून कॅन्टोपॉप आणि मॅन्डोपॉप स्टार देखील आहे. त्याच्या गाण्यांचे अनेक अल्बम रिलीज झालेले आहेत.

ज्या चित्रपटांमध्ये त्यानं अभिनय केला त्यांची थीम साँगदेखील जॅकीनंच गायलेली आहेत.

एक परोपकारी अभिनेता म्हणून त्याची जागतिक स्तरावर ओळख आहे. फोर्ब्स मासिकानं जगातील सर्वात १० दानशूर व्यक्तींमध्ये त्याचा समावेश केला आहे. २०१५ मध्ये फोर्ब्सनं जाहिर केलेल्या यादीमध्ये जॅकी चानच्या नावे ३५ करोड डॉलर्स इतकी संपत्ती होती. २०१६ पर्यंत तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता होता.



जागतिक स्तरावर इतक्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आणि मानसन्मान मिळालेल्या जॅकीचं वैयक्तीक आयुष्य काहीसं वादळी आहे असंच म्हणावं लागेल. त्याचं बालपण आणि त्याच्या आई-वडिलांची गोष्टी असामान्य आहे. २००३ पर्यंत जॅकी चॅन दत्तक असल्याची आणि त्याला आई-वडील असल्याची अफवा हाँगकाँगमध्ये होती. जॅकीनं देखील कधी याबाबत जाहिर भाष्य केलं नाही.

मात्र, २००३ मध्ये आलेल्या एका माहितीपटानं त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी उजेडात आल्या. त्याला दोन भाऊ असून ते चीनमध्ये अतिशय सामान्य जीवन जगत आहेत, ही बाब उघड झाली. सर्वात धक्कादायक आणि रंजक बाब म्हणजे जॅकीच्या आई-वडिलांची समोर आलेली खरी ओळख. या सुपरस्टारचे वडील एक गुप्तहेर होते तर आई एक स्मगलर होती. विशेष म्हणजे याबाबत जॅकीला देखील माहिती नव्हती.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

१८ डिसेंबर १९१४ रोजी जॅकीचे वडील चार्ल्स चॅन यांचा जन्म झाला. चार्ल्सचे वडील आणि चायनिज नॅशनल रिव्हॉल्युशनरी आर्मीचे जनरल कु चू त्युंग यांची चांगली मैत्री होती. आर्मी जनरलनं २० वर्षीय चार्ल्सला मित्राच्या आग्रहाखातर आपल्याकडे ठेवून घेतलं. मात्र, तिथे त्यांच्या हातून अपघातानं एका व्यक्तीचा खू*न झाला. त्यामुळं जनरल त्युंग यांनी चार्ल्सला घरी पाठवलं. त्यांनी मित्सुबिशी या कार्गो शीपवर नोकरी मिळवली. मात्र, जपानी सैन्यानं जहाज पकडून त्यांच्यावर तस्करीचा आरोप लावला आणि कैद केलं.

पुढे १९३७ मध्ये जपान आणि चीनच्या दुसऱ्या युद्धाला सुरुवात झाली. चार्ल्सच्या कुटुंबियांनी राजकीय संबंधांचा वापर करून त्याला सोडण्याची जपानला विनंती केली. त्यामुळं चार्ल्स चॅन तुरुंगातून बाहेर आले आणि पुन्हा आर्मी जनरल त्युंग यांच्याकडे गेले. जनरलनं चार्ल्सला इंटेलिजन्स ब्युरो विभागातील फर्स्ट वॉर झोनचा सिक्रेट एजंट म्हणून नोकरी दिली. या नोकरी दरम्यानच त्यांची आपल्या पत्नीशी, ली ली चॅन यांच्याशी ओळख झाली होती.

जॅकीची आई ली-ली चॅन यांचा जन्म १९१६मध्ये चीनच्या वुहान प्रांतात झाला होता. अतिशय कमी वयाच्या असतानाचं ली-ली चॅन यांचं लग्न लावून देण्यात आलं होतं. त्यांचा पहिला पती बूट तयार करण्याचं काम करत होता. वुहानमध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यांमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी ली-ली २८ वर्षांच्या होत्या आणि त्यांना युलान व गलियन नावाच्या दोन मुली देखील होत्या. पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी मुलींना आजीकडं ठेवलं व वुहान प्रांत सोडून ली-ली शांघायला गेल्या.

शांघायमध्ये आल्यानंतर अ*फूचा अवैध व्यापार करणे फायदेशीर असल्याचं ली-लीला समजले. म्हणून तिने धोका पत्करून काही अ*फू विकत घेतली. नेमकं त्याचं दिवशी, बंदराची तपासणी सुरू होती. प्रत्येक प्रवाशाची तपासणी करणारा अधिकारी होता चार्ल्स चॅन!

ली-ली अफू लपवत असल्याचं चार्ल्सच्या लक्षात आलं. तो तिला अटक करणारच होता मात्र, तपासणी करताना चार्ल्सचं लक्ष ली-लीच्या डोक्यावरील निळ्या फुलाकडं गेलं. चीन-जपान यु*द्धाच्या काळात, जर चीनमध्ये एखाद्या मुलीच्या डोक्यावर पांढरं फुल लावलेलं असेल तर तीचे आई-वडील मरण पावले आहेत आणि जर फुलं नीळं असेल तर मुलीनं पती गमावला आहे, असं मानल जाई. चार्ल्सनं ली-लीकडं तिच्या परिस्थितीविषयी चौकशी केली आणि तिला सोडून अटक न करता सोडून दिलं.

पुढे ली-ली जुगारकडे वळली. अल्पावधीतच ती यात पटाईत झाली. शांघायमध्ये ती ‘बिग सिस्टर’ म्हणून ओळखली जाई. काळे धंदे करणारे लोक तिला आदरानं वागवतं. मात्र, एक दिवस पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकून सर्व संपत्ती जप्त केली. दरम्यानच्या काळात तीची आणि चार्ल्स चॅनची जवळीक खूप वाढली होती. त्यानं आपलं वजन वापरून तिचे पैसे तिला परत मिळवून दिले. त्यानंतर ली-ली पुन्हा कधीही जुगार खेळली नाही. १९४९ मध्ये चीनमध्ये कम्युनिस्टांचं सरकार आल्यानं दोघांनाही चीन सोडून हाँगकाँगमध्ये पलायन करावं लागलं.

या गोंधळात चार्ल्स चॅन यांना आपली दोन मुलं आणि ली-ली यांना दोन मुली चीनमध्ये सोडाव्या लागल्या. हाँगकाँगमध्ये आल्यानंतर दोघांनी लग्न केलं. १९५४ मध्ये त्यांना मुलगा झाला. तो मुलगा म्हणजेचं जॅकी चान.

चॅन दाम्पत्यानं आपलं उर्वरित आयुष्य ऑस्ट्रेलियामध्ये सामान्य व्यक्तींप्रमाणं काढलं. चार्ल्स यांनी जॅकीच्या काही चित्रपटांमध्ये कॅमिओ देखील केला आहे. २८ फेब्रुवारी २००२ रोजी ली-ली चॅन यांचा ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथे मृत्यू झाला. तर, २६ फेब्रुवारी २००८ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी चार्ल्स चान यांनी हाँगकाँग येथे शेवटचा श्वास घेतला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

तुर्कीतल्या आर्मेनियन लोकांच्या नृशंस शिरकानाविषयी कुठेच वाच्यता केली जात नाही

Next Post

उत्तम वास्तुकलेचा नमुना असूनही हे शहर आज ओस पडलंय..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

उत्तम वास्तुकलेचा नमुना असूनही हे शहर आज ओस पडलंय..!

ग्रहांच्या प्रदक्षिणेचे नियम योहान्स केप्लरने मांडले पण संशोधन टिको ब्राहचे होते..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.