The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जॅक डॅनिएल्स विस्की ‘जॅक’ने नाही तर त्याच्या गुलामाने बनवली होती

by द पोस्टमन टीम
27 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


कोणत्याही उत्पादनाचे नाव ठरवताना सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो त्या उत्पादनाच्या निर्मितीत महत्त्वाचा हात असणाऱ्या निर्मात्याचे नाव. कोणत्या ना कोणत्या प्रकारे हे नाव उत्पादनाच्या नावात येण्यासाठी प्रयत्न केला जातो. भारतातच टाटा सन्स, टेक महिंद्रा अशी कित्येक उदाहरणे देता येतील.

असाच एक जगप्रसिद्ध व्हिस्की ब्रँड आहे- जॅक डॅनिएल्स. आता नावावरुन या व्हिस्कीची रेसिपी शोधण्यात जॅक डॅनिएल्स नामक व्यक्तीचा मोठा हात असावा असं वाटणं साहजिकच. जवळजवळ १५० वर्षं सगळं जग तरी हाच विचार करत होतं. पण या व्हिस्कीची रेसिपी शोधण्यात सगळ्यात मोठा हात असलेली व्यक्ती कोणीतरी दुसरीच होती ही रंजक बाब आता समोर येत आहे.

आधीच्या कहाणीप्रमाणे १८५० च्या दशकात डॅनिएल्स हा डॅन कॉल नावाच्या एका दारु निर्मात्यासाठी काम करत होता. कॉल एक व्यस्त व्यक्ती होता, एकाच वेळी बरेच उद्योग हाती असल्याने त्याने जॅकचे कौशल्य ओळखले आणि व्हिस्की कशी बनवायची हे त्याला शिकवले.

१५० वर्षानंतर जॅक डॅनिएल्सच्या १५०व्या वर्षपूर्तीला खरी कहाणी जगासमोर आणण्याचा निर्णय जॅक डॅनिएल्स कार्यकारी मंडळाने घेतला. जॅक डॅनिएल्स व्हिस्कीचा खरा स्त्रोत उघडकीस आला.



कंपनीने जाहीर केलेल्या कथेनुसार जॅक व्हिस्कीची रेसिपी डॅन कॉलकडुन नाही तर नेअरीस ग्रीन नावाच्या कॉलच्या कृष्णवर्णीय नोकराकडुन शिकून घेतली.

एवढं मोठं गुपित लपवण्यामागे नेमकं काय कारण असावं..?

तर याचे उत्तर आहे त्यावेळी कृष्णवर्णीय नागरिकांना दिली जात असलेली वागणूक. आपल्या रेसिपीमागे एका कृष्णवर्णीय नोकराचा हात आहे हे समजल्यावर त्यावेळच्या जनतेने व्हिस्की स्विकारली नसती असे काही अभ्यासकांचे मत आहे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

अमेरिकन व्हिस्कीच्या साम्राज्यात नेहमीच श्वेतवर्णीय लोकांचे साम्राज्य राहिले आहे. जर्मन आणि स्कॉटिश-आयरिश दारू निर्मात्यांनी त्यांचे जास्तीचे धान्य व्हिस्कीसाठी वापरून तिला दूरच्या बाजारात नेऊन विकले. याचा परिणाम म्हणुन २.९ बिलियन डॉलर्स एवढी उलाढाल असलेला व्हिस्कीचा बाजार उभा राहिला. या श्वेतवर्णीय वर्चस्व असलेल्या व्हिस्की बाजाराच्या वावटळीत नेअरिस ग्रीनसारखे कृष्णवर्णीय लोक आपोआपच झाकुन गेले. अनेक कृष्णवर्णीय लोक दारू कारखान्यात कामाला होते.

पण त्याकाळात असणाऱ्या वर्णभेदामुळे उत्तम दर्जाची दारू बनवण्याची कला असलेले कित्येक कामगार त्यावेळी फक्त गुलाम बनून राहिले.

१८६५ साली कृष्णवर्णीय लोकांवर होणारा अन्याय आणि गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आली. त्याच्या एका वर्षानंतर डॅनिएल्सने दारू कारखाना सुरू केला. त्याने ग्रीनच्या दोन मुलांना त्या कारखान्यात कामावर ठेवले. डॅनिएल्सच्या काही फोटोंमधे ग्रीनची मुले डॅनिएल्सच्या जवळ उभी दिसतात.

‘जॅक डॅनिएल्स लेगसी’ या बेन ग्रीन यांच्या आत्मचरित्रात नेअरीसने डॅनिएल्सला व्हिस्की शिकवावी असे कॉलने सांगितल्याचा उल्लेख आहे. हे गुपित लपवून ठेवण्यामागे काहीही विशेष हेतू नसावा असेही या पुस्तकात नमुद केले आहे.

१५० वा वर्धापनदिन जवळ येत गेला तसे जॅक डॅनिएल्सचा इतिहासात खोलवर बघितले असता ग्रीनचा सहभाग हा अमुल्य होता ही बाब समोर आली.

आता अचानकच हा खुलासा करण्यामागे जॅक डॅनिएल्स कंपनीला कारण विचारले असता, “आम्हाला फक्त सत्य सामान्य लोकांपर्यंत पोहचवायचं होतं. इतिहासकारांना ही बाब माहीत होतीच, परंतु आमच्या ग्राहकांना त्यांच्या हातात असणाऱ्या व्हिस्कीचा मुख्य स्त्रोत कोण आहे हे माहित असणे गरजेचे वाटते. तसेच जॅक डॅनिएल्स कंपनी आज आहे तिथे पोहचवण्यात ग्रीनच्या असलेल्या हातभाराचे आभार मानने गरजेचे आहे म्हणुन हा खुलासा करत आहोत”, असे स्पष्टीकरण दिले.

मुख्य निर्मात्याची ओळख करून देण्यास जॅक डॅनिएल्सला १५० वर्ष लागली असली तरीही आजही व्हिस्की व्यवसायात असलेले श्वेतवर्णीय वर्चस्व बघता या साहसासाठी जॅक डॅनिएल्सची स्तुती करणे गरजेचे आहे एवढं मात्र नक्की!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आजही VVS लक्ष्मण भारतासाठी ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’च आहे आणि पुढेही राहील

Next Post

मोस्ट वॉन्टेड सलमानचा अनवॉन्टेड ‘राधे’

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

मोस्ट वॉन्टेड सलमानचा अनवॉन्टेड 'राधे'

प्राचीन इजिप्शियन पुतळ्यांच्या 'तुटक्या नाका'मागे ही अंधश्रद्धा आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.